काटेरी वाटेवरून चालताना... भाग 21

Tu tari thod samajun ghe na

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 21

आधीच्या भागात आपण पाहिले की,

निशा कशीबशी गुंडांच्या तावडीतून सुटली. ती आठ दिवस मंदिरात राहिली त्यांनतर एक महिला तिला तिच्या आश्रमात घेऊन गेली.

आता पुढे,

कामथे काकू आश्रमातील संचालिका  त्याचं निशाला घेऊन आलेल्या. त्यांनी निशाला जेवण देऊन झोपायला जायला सांगितलं. 
ती खोलीत गेली, बाजूच्या पलंगावरच्या सुरु आजी झोपलेल्या होत्या. निशा पलंगावर बसली. 

आज कुणास ठाऊक पण निशाचं मन खूप विचलित होत होतं. राहवून राहवून रडायला येत होतं, अस वाटत होतं कुणाच्यातरी कुशीत डोकं टाकून खूप रडावं आणि मन हलकं करावं मनोमन विचार सुरू असताना कधी डोळे पाणावुन गालावर अश्रू ओघडले तिला तिचचं कळलं नाही. तिच्या हुंडक्याने सरू आजीला जाग आली.


“कोण आहे तिकडे?” कोण  हुंदक्या देतंय.” 

“सरू आजी मी आहे निशा, आजच आली आहे इथे, तुम्ही झोपा. आपण सकाळी बोलूच.” निशा
निशा पुन्हा विचारात गुंतली. आपसूकच डोळ्यासमोर रोहित आला. आणि त्याच्या आठवणीत ती गुंतली.

“तुझ्या आठवणीत मन हे गुंतले,
तुझ्या श्वासात श्वास हा गुंतला...
का असा छळ मांडलास आयुष्याचा,
प्रेम केले होते तुझ्यावर भरभरून
आणि तू केसाने गळा कापला...”

विचारात गुंतली असतानाच  पुन्हा हुंदके सुरू झाले. निशाने दोन्ही पायाच्या मोडी करून त्यात मान आत घालून बसली होती. 

सरू आजी उठली, तिने निशाच्या डोक्यावर हात ठेवला. निशाने मान वर करून बघितलं. बाजूला आजी दिसताच डोळे पुसायला लागली आणि जणू काही झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करू लागली.

“आजी काही हवंय का तुम्हाला? पाणी आणून देऊ का? काही दुखतंय का तुम्हाला? मला सांगा मी मदत करते तुम्हाला?”

“बस कर पोरी, काय अवस्था करून ठेवलीस स्वतःची. अग स्वतःची नाही तर  त्या बाळाची तरी काळजी कर.”
निशाने आश्चर्याने आजीकडे बघितलं.

“आजी तुम्हाला कसं कळलं?” 


“हे केस असेच पांढरे नाही झालेत, तुझा चेहरा पाहूनच कळलं मला की तुला दिवस गेलेत. कोणी तुला असं वाऱ्यावर टाकलं? जाब का विचारला नाहीस? चूक दोघांची आणि शिक्षा मात्र तुला एकटीला. का सगळ एकटीने सहन करतेस?” 

निशा आजीच्या कुशीत शिरली,
“आजी मी काय करू? मी एकटी पडली आहे. कुणीच माझ्या सोबतीला नाही आहे, कुणाचीच मला साथ नाही. कधी कधी कधी वाटतं जीव द्यावा पण मग या बाळाचा विचार मनात येतो आणि मी स्वतःला सावरते. मला आता फक्त माझ्या बाळासाठी जगायचं आहे.”


निशा आजीच्या कुशीत जाऊन रडायला लागली. आणि आजी सांत्वन करू लागली. थोड्यावेळात निशाला झोप लागली.


..................................

कुसुमावली त्या माणसांना फोन करून करून थकली, ती माणसे फोनच उचलत नव्हती.


‘कुठे जाऊन मेलीत कुणास ठाऊक, दोघेही फोन उचलत नाही आहे. काही वाईट घडलं  तर नसेल ना. निशा....तिला तर काही झालं नसेल? काहीच कळायला मार्ग नाही. काय करू काहीच कळत नाही. बॉसला फोन करते आणि सगळं सांगते.’ कुसुमावली मनोमन बोलू लागली.


तिने बॉसला फोन केला,
“हॅलो बॉस..कुसुमावली बोलते.”

“बोल कुसुम..”
“बॉस त्या दोन्ही माणसांचा फोन लागत नाहीये, ते दोघे फोन उचलेना झालेत. कधी लागते तर उचलत नाही आणि कधी लागतच नाही. काही कळायला मार्ग नाही. त्यांच्या काही पत्ता नाही, असतील नसतील काहीच खबर लागत नाहीये. काय कराव आता.”
 
“मी माहिती काढतो.”
“ठीक आहे बॉस.”

कुसुमावलीने फोन ठेवला तिकडे बॉसने  पण फोन ठेवला.

एक-दोन दिवसांनी ती दोघे माणसे कुसुमावलीच्या घरी आले. कुसुमने दार उघडला. ती दोघे माणसे धापा टाकत आत आले आणि त्यांनी पटकन दार लावून घेतला.

“काय रे वाघ धावल्या सारखे का आलात.”


“निशा भाग गई, कही भी नही मिल रही है, दस दिन से हम उसको धुंड रहे है लेकीन वो कही नही मिल रही है, और अभी तो पुलीस हमारे पीछे पडी है. उनको क्या कैसे खबर लगी पता नही पुलिस हमारे पीछे है.” त्यातला एक माणूस बोलला

कुसुमावलीने पटापट सगळी दारे खिडक्या लावून घेतले आणि त्या माणसांजवळ जाऊन
“काय रे, डोक्यात अक्कल वगैरे आहे की नाहीये? एका मुलीला तुम्ही सांभाळू शकला नाहीत. तरी फक्त तिला सांभाळायचंच होतं, मारून टाकण्याची सुपारी नव्हती. मारून टाकण्याची सुपारी दिली असती ना तर ते तरी बरं झालं असतं डोक्याला ताप होता.”

“खूप शोधलं तिला,लेकीन मुझको नही मिली.” त्यातला एक माणूस

“अरे पण आता बॉसला काय उत्तर देऊ? बॉसने विचारलं तर काय सांगू? तुम्ही दोघं कारनामे करता आणि त्याचं सगळ मला भोगाव लागते. आणि आता पेमेंट वगैरे विसरून जा, मला काय देणार नाही, तुम्हालाही मिळणार नाही.”

“मॅडम एक बात पुछु क्या?”
“हा हा बोल.”
“तुमने कभी बॉसको देखा है?’

“नही, कभी देखा नही है और कभी मिलने का मौका भी नही मिला.”

“ए तू हे सगळं का विचारतोस? तू तुझ्या कामाकडे लक्ष दे.”

तिघेही विचार करत बसले की निशा कुठे असेल? कशी असेल? काय करत असेल?

..............................................

पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर सायली आणि प्रथमेशने लग्न केलं. प्रथमेश त्याच्या बाबांचा बिझनेस सांभाळायचा. सायलीने पण नोकरी शोधायला सुरुवात केलेली होती.

सुरुवातीला सायलीला सगळं छान छान वाटायला लागलं होतं. सुरुवातीचे दिवस तिचे छान मजेत गेले. मॅच्युरिटी नसल्यामुळे तिला काही काही गोष्टी जमवून घ्यायला त्रास होत होता. 
प्रथमेशच सायलीवर खूप प्रेम होतं म्हणून प्रथमेश तिला सांभाळून घ्यायचा. पण अधामधात आई बाबा सोबत त्याचे वाद होत होते. त्यामुळे प्रथमेशचे आईबाबा त्याला बोलायचे की बायको आली तर बायकोची बाजू घेतो आणि आई-बाबांना एकटे टाकतो.


एक दिवस असाच वाद झाला प्रथमेश त्याच्या आई-बाबांना खूप बोलला आणि नंतर त्याला कळलं की आपण आई-बाबांना उगाच बोललो.तो त्यांच्या जवळ गेला तर त्यांनी सायलीच्या विरोधात त्याच्या कानात दोन-चार शब्द टाकले. त्यांनी सायली विरोधात प्रथमेशला भडकावलं. प्रथमेश अविचारी होता तो लगेच जाऊन सायलीवर भडकला.  शब्दाने शब्द वाढला आणि वाद विकोपाला गेला आणि त्यात प्रथमेश कडून सायली वर हात उगारला गेला.

सायली रडत रडत घराच्या बाहेर गेली, रात्रभर घराच्या बाहेरच बसून राहिली. प्रथमेशला वाईट वाटलं आणि तोही बाहेर गेला. तिच्या बाजूला जाऊन बसला,
“सयु आय एम सॉरी...” प्रथमेश

“डोन्ट टॉक विथ मी प्रथमेश..आय हेट यू.. आय हेट यू..”

“सॉरी ना डार्लिंग, एक्स्ट्रीमली सॉरी... तू तरी समजून घे ना ग, माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकंच आई-बाबांवर आहे. तुला तर माहिती आहे त्यांचं वय होतं आलंय. त्यांना आता आपल्याला समजून घ्यावे लागेलं. तू थोड समजून घे ना प्लीज, त्यांचे आता उतारवय आहे, त्यांना आपली गरज आहे आपण त्यांना समजून घ्यायला हवं.. आतापर्यंत त्यांनी मला सांभाळलं आता मला त्यांना सांभाळायचं आहे आणि तेच मी करतोय. हे माझं  कर्तव्य आहे आणि मला माझ्या कर्तव्य पार पाडावे लागेल. यात तू माझी साथ देशील ना? आज माझ्या हातून जी चूक घडली ती चूक आयुष्यात कधीही घडणार नाही. मी तुला प्रॉमिस देतो पण प्लीज तू माझी साथ सोडू नकोस. तू कधीही मला सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. माझे आई-वडील आणि तू एवढंच माझ आयुष्य आहे. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तुम्ही तिघे माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे आहात. तुम्ही जर माझ्याजवळ नसाल तर मी कसा जगेल. मी आई-बाबांना समजावतो पण तू थोड जुळवून घे ना, अगं मी तुला हक्काने बोलू शकतो तुझ्या जवळ मन मोकळं करू शकतो. पण  आई-बाबा जवळ तेवढं नाही बोलू शकत ग, प्लीज मला समजून घे.”

सायलीने एक मिश्किल स्माईल दिली आणि दोघांनी एकमेकाच्या हातात हात घालून गळ्यात गळ्यात गळा घालून मिठी मारली.


क्रमशः

🎭 Series Post

View all