काटेरी वाटेवरून चालताना... भाग 4

Nishane datlelya ashrunna wat dili

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 4


आधीच्या भागात आपण पाहिले की,


पायलची सहनशक्ती संपली आणि तिने आत्महत्या केली.

निशाला याचा खूप त्रास झाला. तिला या परिस्थितीतून निघायला वेळ लागणार होता.  सायलीचा बघण्याचा कार्यक्रम झाला. पण तिथे काही नातं जुळू शकलं नाही.


निशा पायलच्या घरी गेली. फोटोसमोर उभी राहून रडत होती. 
तितक्यात पायलची आई आली.


“रडू नको बेटा, या सगळ्याची कल्पना आम्हाला होती.” पायलच्या आईच बोलणं ऐकून निशा आश्चर्यचकित झाली.
“म्हणजे.? निशाने पायलच्या आईला विचारलं.


आता पुढे,


पायलच्या आईने सांगितलं की,


“निशा बेटा एका गुरुजींनी सांगितले होते की तिच्या जीवनातील वीसाव्या वर्षापासून ते पंचवीस वर्षापर्यंतचा काळ खूप धोकादायक असेल. या काळात तिच्यासोबत काही घटना घडू शकतात आणि कदाचित ती या जगातून निघून जाऊ शकते.

त्या गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरली. आणि बघ ना आज पायल आपल्यामध्ये नाही. गेली ती आपल्याला सोडून. आत्महत्या करून गेली. हे सगळं विधिलिखित होतं ते घडणारच होतं. ह्या कारणाने नसतं घडलं तरी दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने पायल आपल्यात नसती राहिली. ती लहान असतानाच गुरुजींनी भाकित केलं होतं तिचं आयुष्य अल्पायुषी राहील. तिला विवाह सुख मिळणार नाही. कदाचित विवाह सुख मिळणार नसेल म्हणून ती आज आई होण्याच्या मार्गावर होती. पण बघ ना ती आई बनू शकली नाही.”


पायलची आई बोलत होती आणि निशा ऐकत होती.

निशा हे सगळ ऐकून सुन्न झाली. तिच्या मनात पोकळी निर्माण झाली. निशा घरी गेली आणि खोलीत जाऊन डोळे बंद करून बसली.


दुसऱ्या दिवशी सकाळी सायली, मेघा, रागिनी आणि निशा स्टेशन वर भेटल्या. तिथून ट्रेन पकडली. ट्रेन मध्ये बसल्या, सगळ्यांच्या गप्पा रंगल्या.

निशा थोडी अस्वस्थ बसलेली होती.


“काय झालं निशा? का अस्वस्थ आहेस?” मेघाने विचारलं.


“काही नाही, काल पायलच्या घरी गेले तेव्हा तिची आई बोलली की तिच्या कुंडलीमध्ये दोष होता. गुरूजींनी भाकित केलं होतं की तिचा आयुष्य अल्पायुषी असेल. वीस ते पंचवीस वर्षात तिचा मृत्यू निश्चित आहे.” निशाने सगळ्यांना सांगितलं.


“निशा पण खरंच असं असतं का गं?” सायलीने विचारलं.


“काय माहिती?” निशा नर्वस होऊन बोलली. त्यांनतर सगळ्या अगदी शांत बसल्या. स्टेशन आलं सगळ्या उतरल्या आणि कॉलेजमध्ये गेल्या.


क्लास संपल्यानंतर सगळ्या मुली कॅन्टीनमध्ये गेल्या.


निशा एकटीच गार्डन मध्ये जाऊन बसली. बाजूला टवाळक्या मुलांचा ग्रूप बसलेला होता. त्यातल्या एका मुलाचं निशाकडे लक्ष गेलं. तो खूप वेळचा निशाला बघत होता. निशा काहितरी विचारात असतांना वाटलं म्हणून तो तिच्याजवळ गेला.


“हाय मी रोहित.” तो बोलला तरी निशा गप्पच होती.


“हॅलो तू अस्वस्थ वाटली म्हणून मी तुझ्याशी बोलायला आलोय.” तो पुन्हा बोलला.


निशा उद्धटपणे बोलली.
“मला नाही बोलायचं.”


“तरी विचारायला आलोय बोलायला आलोय आणि तू अशी का बोलतेस माझ्याशी?” तो मुलगा बोलला.


“मी बोलावलं नव्हतं तुला.” निशा चिडून बोलली.


“माणुसकी म्हणून आलोय.  एकटीच इथे नर्व्हस बसलेली मला दिसली म्हणून मी म्हटलं की चला विचाराव काय झालं? तुझं दुःख थोडं हलकं करावं. तू माझ्याशी काही शेअर केलं तर तुला बरं वाटेल हा विचार करून आलो आणि तु अशी उध्द्ट वागतेस माझ्याशी.” तो मुलगा निशाला बोलला.

“एक मिनिट, मी कशी आहे याचं तुला काय करायचय आणि तू कोण आहेस मला विचारणारा? मी तुला ओळखतही नाही. त्यामुळे माझ्याशी बोलायचं नाही.” निशा भयंकर चिडली.


रोहित बिचारा तिच्याशी बोलायला आला होता आणि निशा त्याच्यावर एकदम चिडली. त्यामुळे तो तिथून गेला. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तो तिच्याशी बोलायला आला. पण यावेळी त्याने निशा बद्दल सगळी माहिती काढलेली होती.


निशा कँटीनमध्ये बसलेली असताना तो तिच्या बाजूला जाऊन बसला.
“हाय निशा.” त्याने बोलायला सुरुवात केली.


निशाने मान वर करून बघितलं. मनातल्या मनात बोलली.
“अरे हा तर कालचाचं मुलगा आहे.” तिने न बिघडल्यासारख करून खाली मान केली.
“हाय निशा.” 
निशा तिथून उठली ती जायला निघाली. तसच रोहितने तिचा हात पकडला.


“अगं मी कालपासून तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तू मला इग्नोर का करते आहेस.” रोहित तिच्याकडे बघत बोलला. निशाने हात झटकला.

तसाच रोहित दूर झाला.


“हे बघ मला तुला त्रास द्यायचा नाही आहे. पण मला फक्त एवढेच कळते की तुझ्या मनातलं कुणातरी जवळ बोलावस. माझ्याजवळ बोलायचं नसेल तर दुसऱ्याजवळ बोल पण बोल. मनातल्या मनात किती काय साठवून ठेवलसं कुणास ठाऊक.? तुझा चेहरा सगळं सांगतोय. तुझे डोळे सगळं बोलत आहेत.” रोहित बोलून मोकळा झाला.


त्याचे ते शब्द ऐकून निशा भावुक झाली. तिने हळूच डोळे वर केले त्याच्याकडे बघितलं. निशाच्या डोळ्यात आसवांचा पूर साचलेला होता जो कधीही बाहेर वाहून निघणारा होता.

त्याच्याकडे एक नजर बघून तिने तिचे डोळे खाली केले त्यातून पटकन आसवं बाहेर पडली. त्यातला एक अश्रूचा थेंब रोहितने हात समोर करून ते त्याच्या मुठीत घेतले.


“निशा तुला याचे मोल नसेल,पण हे खुप अनमोल आहे. याला असं व्यर्थ घालवू नकोस. पुसणारा जवळ असेल ना तर त्याला किंमत असते. नाहीतर ते मातीमोल होतात. तू स्वतःला एकटी समजू नकोस.”

“घरंगळती गालावर अश्रू
कुणी म्हणती त्यास मोती
कुणास वाटे ते फक्त पाणी
किंमत त्यालाच जो फरक जाणी”

असं म्हणून तो तिथून निघून गेला.
त्यानंतर निशाने दाटलेल्या अश्रूंना वाट दिली आणि थोडी मोकळी झाली.


क्लास सुरू होणार होता म्हणून निशा क्लासमध्ये गेली. तिथे ती कुणाशी काही न बोलता गप्पच होती. क्लास संपल्यानंतर सगळेजण बाहेर निघाले. 


निशाला गेटजवळ रोहित भेटला. त्याने तिच्या हातात एक चिट्ठी दिली आणि तो निघून गेला. निशाने चिठ्ठी उघडून बघितली तर त्यात मोबाईल नंबर होता. सगळ्या मुली हसत बोलत स्टेशनपर्यंत गेल्या. निशा मात्र आपली गप्पच होती.


सायली मेघा कडे बघून,


“आपली निशा किती गप्प गप्प झाली ना. आधी किती बोलायची.  आपली लीडर होती ती  पण आता बघ ना तिचं बोलणं बंद झालं. किती शांत शांत असते.


त्यावर रागिनी म्हणाली,


“हो ना पायलचं अस झालं तेव्हापासून ती शांत झाली. आपण बोलूया तिच्याशी. आपल्याजवळ थोडं मन मोकळं करायला सांगू. आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना तरी ती आपल्याशी बोलत नाही.”


 
“पायल नंतर आली आपल्या आयुष्यात, तरी निशाला तिचा लडा लागला होता.” मेघा बोलली.
त्यावर सायली बोलली,


“तसं नाहीये गं, ती बोलू शकत नव्हती ना म्हणून निशाला तिच्याबद्दल जास्त जवळीक होती. आणि तसही पायल किती निरागस होती ना.”


“गर्ल्स मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.” सायलीने बोलायला सुरुवात केली.


“मला बघायला मुलगा आला होता. मुलगा आणि त्याचे आई वडील. पक्क वगैरे काही झाल नाही म्हणून नाही सांगितलं आणि मी आईला सांगितलं की मला अजून खूप शिकायचे आहे, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण घर संसार सांभाळू शकतो ना. बरं झालं माझं लग्न जमलं नाही स्वतःच्या पायावर उभे राहून चार पैसे कमावले तर आईबाबांचा मला आधार देता येईल. चूल आणि मूल सांभाळत बसेल तर माझ्या आई बाबांचा आधार कोण बनणार? लग्न झालं सासरी गेली म्हणून माझी जबाबदारी संपली असं नाहीये ना.”


“खर आहे का आपण लग्न करून गेलो की आपले आई-वडील एकटे पडतात मी पण जॉब लागल्याशिवाय लग्न करणार नाहीये आणि लग्न ठरल्यानंतर स्पष्ट शब्दात सांगेल की लग्नानंतर मी माझ्या आई बाबांचा आर्थिकदृष्ट्या सांभाळ करेल जमत असेल तर बघा.” रागिनी बोलली.


बघण्याचा कार्यक्रम वगैरे ना करणारच नाही मी. ज्याच्यावर प्रेम असेल त्याचा सोबत लग्न करेल. मुलाला एकदा बघायचं त्याच्याशी लग्न करायचं कसं यार त्याचा स्वभाव कसा आहे? तो कसा आहे? आपल्याला काहीच माहिती नाही त्याच्याशी आपण लग्न करायचं मला तरी पटत नाही यार.” मेघा बोलली.


सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या तितक्या ट्रेन आली.


क्रमश:

🎭 Series Post

View all