काटेरी वाटेवरून चालताना... भाग 18

Mazi ardhangini hoshil

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 18


आधीच्या भागात आपण पाहिले की,


कुसुम बाहेर गेलेली असताना घरात दोन व्यक्ती आले. निशाने सांगितलं की घरी कोणी नाही आहे पण ते आम्ही वाट बघतो असं म्हणून घरात थांबले. निशा घाबरली,तिला खूप भीती वाटत होती. त्यांनी निशाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण निशा ऐकली नाही.


निशाच्या घरी सायली आणि मेघा निर्मला काकुंना भेटायला गेल्या. त्या निशाचा फोटो घेऊन बसलेल्या होत्या. त्यांना रडू आवरत नव्हतं. त्यांना त्यांच्या मुलांची आठवण येत होती. त्या मेघाला विचारू लागल्या. निशा फोन करते का? तुम्हाला भेटली का? तुम्हाला काही माहिती आहे का? त्यांचे अनेक प्रश्न सुरू झाले, पण कुणाजवळ कुठलेही उत्तर नव्हते.


आता पुढे,


निशा थोडा वेळ लेटते म्हणून खोलीत गेली, तिने दार उघडा ठेवला होता आणि तिचा डोळा लागला. या संधीचा फायदा त्या दोन माणसांनी घेतला. 


ते हळूच तिच्या खोलीत घुसले त्यांनी एका रुमालावर गुंगीच औषध टाकलं आणि तो रुमाल निशाच्या नाकाला लावला. दोन मिनिटातच निशा बेशुद्ध पडली आणि ते निशाला गाडीत टाकून घेऊन गेले.


थोड्या वेळाने कुसुम घरी आली, निशाला घरी न बघून तिने आरडाओरडा केलस. निशा घरी नाही कुठे तरी निघून गेली म्हणुन कांगावा केला आणि मेघाला फोन केला.
हॅलो.. मेघा, कुसुम मावशी बोलते.


“तुम्ही माझी मावशी नाही आहात, जास्त नाटक करु नका. माझी मैत्रीण निशा कुठे आहे सांगा. तुम्ही मला जो पत्ता दिलात तो तर चुकीचा होता. मी त्या पत्त्यावर जाऊन आले पण तुम्ही आणि निशा दोघीही तिथे नव्हतात. मीच वेडी आहे तुमच्या बद्दल काही माहिती नव्हती, आणि मी जे अस केलं.
आता मला सांगा माझी निशा कुठे आहे?” मेघा

“मेघा.. मेघा मी तुला हे सांगायला फोन केला की बाळा निशा इथे नाही आहे. मी आत्ता बाजारातून आली, बघितले तर घर पूर्ण खाली आणि निशा गायब. निशा पळून गेली की काय?” कुसुम

“ काय? काय बोलता तुम्ही? तुम्ही तिची जबाबदारी घेतली होती ना. मी निशाला ठेवेल माझ्याकडे, मी तिची काळजी घेईल हे असं सगळं तुम्ही बोलला होतात ना. अशी कशी निघून गेली निशा? हे बघा नीट काय ते सांगा नाहीतर मी पोलिसात जाऊन तुमची कंप्लेंट करेल.” मेघा

“अगदी खरं सांगते आहे ग.” कुसुम रडू रडू तिला सांगू लागली. ती निशा घर सोडून गेली आहे.” असं म्हणत कुसुमने फोन ठेवला.

त्या दोन माणसांनी गाडी रस्त्यावरून सुसाट केली. काही वेळानंतर एका निर्जन ठिकाणी थांबले, तिथे गाडी रस्त्याच्या बाजूला लावून निशाला उचलून निर्जन ठिकाणी घेऊन गेले. ते एक घनदाट जंगल होते, दुरदूरपर्यंत तिथून कुणी दिसत नव्हते. त्या जंगलात एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीच्या आत निशाला नेऊन ठेवलं आणि ते तिथून निघून गेले.
त्या माणसाने कुसुमला फोन केला.


“कुसुमावली आज का काम हो गया है, पेमेंट भेज दीजिए.” त्यातला एक माणूस
“ये मोरक्या माझ्या मागे घेऊन गेलास रे तिला. तुला सांगितलं होतं ना मी  येइस्तोवर थांबायचं.” कुसुम

“कुसुमावली, ओ लडकी जादा नाटक कर रही थी, अगर वो कुछ करती और भाग जाती तो फिर क्या होता. इसलीये ऐसे पकड के लाये और उसको यहा पे झोपडी मे रखा है.” तो माणूस

“ठीक आहे ठीक आहे, मी पैसे ट्रान्सफर करते तुला. ये मोरक्या माझं पेमेंट आधी येऊ दे मग मी तुला पेमेंट करते. तोपर्यंत जरा शांत बस.” कुसुम

“चलता है चलता है.” असं म्हणत त्याने फोन ठेवला.
कुसुमावली सोफ्यावर बसून जोरजोरात हसायला लागली. जणू तिला जे मिळवायचे होते ते तिने मिळवले या आवाकामध्ये ती पाय पसरून बसली होती.
बघता बघता दोन दिवस झाले.


निशाला जाग आली, तिने हळूहळू डोळे उघडले. आजूबाजूला नजर फिरवली आणि ती एकदम दचकून उठली. ती उभी झाली आणि सगळीकडे भोवताली फिरू लागली, ती नवीन ठिकाण बघून खूप घाबरली.


“हे देवा मी कुठे आहे? हे कोणते ठिकाण आहे? मनातल्या मनात ती बडबडू लागली. त्या झोपडीला एकही खिडकी नव्हती फक्त एक दरवाजा होता तोही बाहेरून लागलेला असावा. कोणी उघडत नव्हतं.

निशाने बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न केले पण कोणतेच प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. शेवटी ती दमून बसली. तितक्यात चालण्याचा  खडखड आवाज आला आणि तिने पुन्हा बेशुद्ध पडण्याचे नाटक केले.


थोड्या वेळाने दरवाजा उघडला. एक माणूस आत आला. त्याने निशाच्या नाकाजवळ हात नेऊन निशाला चेक केलं.
“च्यायला अजुन ही शुद्धीतच आली नाही.” निशाकडे बघून म्हणाला.
“ये भाई ये तो अभी तक बेहोश गिरी पडी है क्या करनेका” दुसऱ्याकडे बघून.


“पाणी डाल चेहरे पर.” त्या माणसाने निशाच्या चेहऱ्यावर पाणी टाकलं. पण निशा एवढीशी हलली नाही.
“चल वो आयेगी शुद्धी पे, चल निकलते है. बाद मे आयेंगे.” असं म्हणत ते दोघे तिथून निघून गेले.

ती माणसे गेल्यानंतर निशा हळूच उठली. तिने दार उघडण्याचा पुन्हा प्रयत्न केला, पण तो नाही उघडला. ती पुन्हा हतबल होऊन तशीच बसून राहिली
...........................

सायली आणि मेघा निशाच्या आईला भेटून आल्या. मेघा घरी आल्यानंतर आईजवळ जाऊन बसली. तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागली.
सुशीला ने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारलं काय झालं?
“मेघा का इतकी अस्वस्थ होतेस?”


“आई निर्मला काकुंच दुःख बघवत नाही ग. त्यांची अवस्था खूप खराब झाली आहे. आई माझ्यामुळे झालं का गं हे सगळं? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ना? त्याचं मला प्रायश्चित्त पण करता येत नाहीये. माझी हिम्मत होत नाही आहे हे त्यांना जाऊन सांगायची. आई हे सगळं माझ्यामुळे झालं?” मेघा रडायला लागली.


“नाही बेटा निशाच जे झालं ते झालं, आता सौरभने असं केलं त्यामुळे त्या पुन्हा दुखावल्या. थोडा वेळ जाऊ दे, त्या या दुःखातून नक्कीच बाहेर येतील.” सुशीला मेघाला समजावत होती.
“आई आपण काही प्रयत्न करून बघू या का? त्यांना काही दिवस आपण आपल्याकडे आणलं तर? आई त्या राहायला येतील? आल्या तर त्यांचही मन रमेल आणि आपल्याला ही बरं वाटेल.  आपण दोघीच जण असतो तर आपल्याला पण सोबत होईल.”  मेघा

“हो पण त्यांनी तर यायला हवं ना. निशाचे बाबा त्यांचा स्वभाव तुला माहिती आहे ना, ते नाही येणार. तुला जर वाटत असेल तर तू जाऊन येत जा त्यांच्याकडे.” सुशीला

“मी परिस्थिती बदलू शकत नाही, आणि काही  बोलूही शकत नाही मला खूप त्रास होतो.” मेघा पुन्हा रडायला लागली.

.................................

कॉलेजमध्ये गॅदरिंगचा दिवस आला. सगळे जण खूप एक्साईटेड होते. सगळे छान तयारी करून आलेले होते. ज्यांनी  कार्यक्रमात भाग घेतलेला होता तेही त्यांच्या गेटअप मध्ये आलेले होते.

कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्य, नाटक, एकपात्री अभिनय सगळेच परफॉर्मन्सेस होणार होते. नाटकाला सुरुवात झाली. सायली आणि प्रथमेश दोघेही प्रेमीयुगुल च्या रोल मध्ये असल्यामुळे सगळ्यांना सायलीचा रोल खूप आवडला. सायलीने खूप छान परफॉर्मन्स केला.

त्यांचे नाटक संपल्यानंतर सगळ्यांनी सायली आणि प्रथमेशचं खूप कौतुक केलं. त्यानंतर नृत्याची फेरी झाली आणि त्याच्या फेरीमध्ये रागिनीला प्रथम क्रमांक मिळाला. सगळा कार्यक्रम संपल्यानंतर सायली आणि प्रथमेश हे दोघे घरी जायला निघाले.


अर्ध्या वाटेत प्रथमेशने गाडी थांबवली.
“काय झालं? गाडी का थांबवली?” सायली
“मला तुझ्याशी बोलायचे आहे.” प्रथमेश
सायलीने मिश्किल स्माईल दिली


“तुला माझ्याशी बोलायचे.”
त्याने डोळे मिचकावून होकारार्थी मान हलवली.


प्रथमेशने त्याच्या बॅगमधून एक गुलाबाचं फूल काढलं आणि सायली समोर उभा राहून तिच्या समोर फुल घेऊन तिला
“सायली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला जीवनभराची साथ देशील? माझी अर्धांगिनी बनशील?”


सायली अवाक झाली.
“प्रथमेश तु मस्करी करतोयस?”
“नाही मी खरच बोलतोय.”


“नाही माझा तुझ्यावर विश्वास नाही.”
प्रथमेशने तिच्या हातावर ओठाने चुंबन घेतला.


“आता तरी विश्वास बसेल ना.”
सायलीने एक गोड स्माईल दिली.


क्रमश:

🎭 Series Post

View all