काटेरी वाटेवरून चालताना...भाग 17

Tumhala mazi nishu phon karte

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 17


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशाने मंदिरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात तिला दुखापत झाली, कुसुमने तिला दवाखान्यात नेलं आणि तिची काळजी घेतली.

सौरभ घरी न सांगता परस्पर लग्न करून घरी आला. निर्मलाला या गोष्टीचा खूप त्रास झाला. दोघांमध्ये वाद झाला आणि सौरभ तिथून निघून गेला.


मेघाकडे तिच्या आईने तिला खोलीत डांबून ठेवलं, जोपर्यंत खर काय ते सांगणार नाहीस तोपर्यंत तुला बाहेर काढणार नाही असं सांगून ठेवलेलं होत. सुशीला निशाच्या घरी जाण्यासाठी म्हणून निघणार तेवढयात मेघाच्या किंचाळण्याचा आवाज आला तशीच सुशीला ने हातातली बॅग फेकून देऊन त्या दिशेने  धाव घेतली.


आता पुढे,


सुशीला धावत खोलीजवळ गेली, बाहेरून दार उघडला. मेघा खाली पडलेली होती. बाजूला टेबल पडलेला होता. सुशीला धावत मेघाजवळ गेली. तिला उचललं आणि बेडवर बसवलं. तिच्या हाताला खरचटलं होतं. सुशिलाने तिला पाणी दिल. मेघा पाणी प्यायली. सुशिलाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिला छातीशी कवटाळलं.


“यानंतर असं काही केलंस तर याद राख,गाठ माझ्याशी आहे.”


“आय एम सॉरी आई.” मी असं नाही वागणार. पण आई तू रागावू नको ना. अग मला खरच त्या बाईचा पत्ता माहीत नाही. आई माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मान्य आहे मला. अग पण मी आता खोटं बोलत नाही आहे. आई मला माझी चूक कळली आहे, मी असं करायला नको होतं.” मेघा

“तुला वाटतं ना की तुझी चूक झाली तर मग याचं प्रायश्चित्त पण कर.” सुशीला
“म्हणजे?” मेघा


“म्हणजे आता तू माझ्यासोबत निशाच्या घरी यायचं आणि सगळं सत्य सांगायचं.” सुशीला
“नाही आई, माझ्यात तेवढी हिम्मत नाही,मी त्यांच्या समोर जाऊ शकणार नाही.”  मेघा


“तुला हे करावंच लागणार आहे.” सुशीला
“आई पण.” ती समोर काही बोलणार तितक्यात फोनची रिंग वाजली.


सुशीलाने  फोन उचलला.
“हॅलो.” सुशीला
“हॅलो काकू सायली बोलते, मेघाला फोन देता का प्लिज.”
“हो एक मिनिटं.” सुशिलाने मेघाला आवाज दिला.
“हॅलो, बोल सायली.”  मेघा


“अग मेघा, तुला कळलंय का? निशाच्या घरी काय झालं ते?”  सायली
“काय झालं?” मेघा


“निशाचा भाऊ सौरभ, तो घरी कुणालाही न कळवता लग्न करून आला. निर्मला काकूने त्याला घरात घेतलं नाही. दोघांमध्ये वाद झाला आणि सौरभ घर सोडून निघून गेला. निर्मला काकूंना खूप मोठा धक्का बसला, एकतर त्या घरी एकट्याच होत्या. काका पण त्यावेळी घरी नव्हते. काका आले तेव्हा त्यांना कळलं. त्यांनी सौरभला फोन केला आणि तिथेही दोघांचं वेडेवाकडे झालं. दोघांनाही खूप त्रास झाला, काकू तर खूप रडत होत्या.  मी उद्या निशाकडे जाणार आहे तू येणार का?” सायली


“अ..मी..मी बघते,तू जाऊन ये ना.” मेघा


“ओके बाय.”
मेघा स्तब्ध होऊन सोफ्यावर बसली. तिने आईला सगळं सांगितलं.


“आई अश्या परिस्थितीत मी आता काकूंना काहीच सांगू शकणार नाही. आधीच त्या त्रासात आहेत, उगाच माझ्यामुळे त्यांना आणखी त्रास व्हायला नको.” मेघा


“बर ठीक आहे, पण तू आता सहज तरी त्यांना भेटायला जा, त्यांना बर वाटेल.”
“हो आई.”


.................................

एक दिवस एक मोठी गाडी कुसुमच्या घरासमोर येऊन थांबली.


कुसुम घरात नव्हती. निशाने दार उघडला, समोर दोन व्यक्ती उभे होते. चेहऱ्याने तर भले वाटत होते.  


“बोला कोण हवंय?” निशा
“कुसुमला भेटायचं आहे.” समोरचा माणूस


“कुसुम मावशी घरात नाही, नमस्कार. तुम्ही येऊ शकता.” 
निशा दार लावायला थोडी मागे सरकली तोच तो माणूस ओरडला.


“ये दार का लावतेस? आम्ही वाट बघतोय.” ते दोन माणसे आत घुसली आणि सोफ्यावर पाय पसरून बसले.


निशा घाबरली. आता काय करावं ? फोन लावावा तर मावशी फोन घेऊन गेलेली नाही. ती माणसे डोळ्यासमोर बसलेली होती, निशाची धडधड वाढत होती. ती दोन माणसे निशाकडे विचित्र नजरेने बघत होती. बराच वेळ झाला मावशीच्या येण्याचे काहिच संकेत दिसत नव्हते. ,अर्धा एक तास सगळ्यांनी वाट बघितली त्यांनतर त्यातला एक माणूस म्हणाला.


“चल तू ,आम्हाला पत्ता सांग, आम्ही नेतो तिकडे.” 
“अहो दादा नाही, थांबाना जरा वेळ” निशा
“थांबायची वेळ नाही, चल लवकर” त्यातला एक माणूस बोलला.


“नाही मी कुठेही येणार नाही, आणि तुम्ही मला जबरदस्ती करू शकत नाही. मी आरडाओरडा करेल ह आधीच सांगून ठेवते.” निशा


ते दोघेही हसायला लागले.
ते उठून उभे झाले, एकमेकांकडे बघितलं आणि एक एक पाऊल टाकत निशाच्या जवळ येऊ लागले. निशा पुरती घाबरली. काय करावं तिला कळेना. 


“कुसुम मावशी आली नाही, फोनही घेऊन गेली नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याशिवाय ही माणसे अचानक इथे कसे येतील. मावशीला सगळं माहीत असेल का? तिनेच तर या माणसांना बोलावून घेतलं नसेल? हे देवा काय करू मी?” निशा मनातल्या मनात विचार करू. तिने डोळे घट्ट मिटले आणि देवाला प्रार्थना करू लागली. डोळे उघडले तर समोर ती दोन माणसे उभी होती. निशा दोन्ही हात कानाला लावून जोरात किंचाळली. आणि पटकन मागे गेली.


“हे बघा, तुम्ही तिथेच थांबा एक पाऊलही समोर टाकू नका. कुसुम मावशी आल्याशिवाय मी इथून हलणारही नाही.”  निशाने बाजूच्या टेबलवर  ठेवलेला फ्लॉवर पॉट हातात घेतला आणि


“आता समोर आलात तर मी माझ्या जीवाचं काही बर वाईट करून घेईन.”
हे ऐकताच ती माणसे मागे सरकली, त्यांच्यात कुजबुज सुरू झाली.


“अरे आपण थांबू थोडा वेळ, उगाच हिने काही केलं तर मॅडम आपल्याला सोडणार नाही.”


“हो हो तिला आणि तिच्या बाळाला काही होता कामा नये.”
दोघेही शांत बसले. दहा पंधरा मिनिटं शांतता पसरली त्यांनतर निशा तिच्या खोलीत जाऊन लेटली. तिला बर वाटतं नव्हतं आणि त्यांच्यासमोर काय बसू म्हणून ती खोलीत गेली होती.
थोडा वेळ लेटते आणि जाते या विचाराने तिने दार उघडाच ठेवला पण तिचा डोळा लागला आणि ती अगदी गाढ झोपली. दरवाजा तसाच उघडा राहिला.

..........…....…...............

सायली आणि मेघा दोघीही निशाच्या घरी गेल्या. दाराजवळ पोहोचल्या तर दार खोललेलं होत. सायलीने आवाज दिला पण आतून काहीच आवाज आला नाही म्हणून दोघी आत गेल्या. तर निर्मला आत मध्ये खोलीत निशाची फोटो घेऊन बसल्या होत्या. सायली आणि मेघा निर्मलाच्या जवळ जाऊन बसल्या.


“काकू..काकू.” ,सायलीने निर्मलाच्या खांद्यावर हात ठेवून तिला हलवलं.
निर्मला भानावर आली.
“पोरींनो तुम्ही? तुम्ही इथे कसे?”


“आम्ही सहज तुम्हाला भेटायला आलो आहोत.” सायली
“पोरींनो बर झालं आलात तुम्ही, हे घर तर अगदी खायला उठल्यासारख वाटतंय. दोन्ही पोर घरातून निघून गेलीत आणि हे घर.. घर राहील नाही त्यात फक्त भिंती उरल्या.


आधी माझी निशु गेली आणि आता माझा सौरभ. एवढं दुःख पदरात यायचं होत तर मी वांझोटी राहिली असती तर बरं झालं असतं. त्या वयात ते दुःख तरी पचवता आलं असतं पण आता या वयात सगळं नकोस वाटतंय. असं वाटतंय कुठेतरी दूर निघून जावं.” 


निर्मला  मेघाकडे बघत,


“तुम्हाला माझी निशु फोन करते? तुम्हा दोघींना माहीत आहे ती कुठे आहे? पोरींनो सांगा ना कुठे आहे माझी निशु?” कुठे आहे माझी पोरं? कशी आहे?” निर्मला रडायला लागली. मेघा त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकली नाही.

तिला खूप अपराधी वाटत होतं. आपल्या हातून खूप मोठी चूक घडली हे तिला जाणवलं पण आता काय करायचं? कुठे शोधायचं निशाला? अशा अनेक प्रश्न तिच्यासमोर उपस्थित झाले.


क्रमशः

🎭 Series Post

View all