काटेरी वाटेवरून चालताना... भाग 11

Janu ti tichy hrudyache tukde wecht hoti

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 11


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशा तिच्या आईला भेटायला गेली.
तिने आईची माफी मागितली. आईला निशाला बघून खूप आनंद झाला.


पण सौरभ आणि बाबा खूप चिडले.


सौरभने तिच्या हाताला धरून ढकललं. आणि निशा पोटाच्या भारावर पडली. तिला लगेच ऍडमिट केलं.

डॉक्टरने बेड रेस्ट सांगितली, तीन महिने तरी आराम करावा लागेल नाहीतर बाळाच्या जीवाला धोका आहे. नर्सने हे सगळं निर्मलाला सांगितलं. निर्मला  निशा प्रेग्नेंट आहे हे ऐकून आश्चर्यचकित झाली.

आता पुढे,


निशाला थोडं बरं वाटलं, तर ती उठून आईच्या खोलीत गेली. निर्मला उठून बसली निशाच्या डोक्यावरून हात फिरवला.


“बाळा इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली?”


“काय लपवलं आई?” निशा


“मला सगळं कळलंय, त्यामुळे आता काही लपवायची गरज नाही. सांग मला काय घडलं तुझ्या सोबत?” निर्मलाने असं विचारतात निशाला भरून आलं.


तिने रडत रडत आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आणि ते बाळ रोहितचं आहे असंही सांगितलं.


बाहेरून हे सगळं सौरभने ऐकलं आणि तो तडकाफडकी तिथून निघून गेला.


सौरभने रोहितचा पत्ता शोधला, त्याला गाठलं आणि त्याला खूप मारहाण केली त्यात रोहित गंभीर जखमी झाला पोलीस केस झाली आणि सौरभला पोलिसांनी अटक केली.

कॉलेजमध्ये गॅदरिंगची तयारी सुरू होती.


नाटकाची रियलसर सुरू झाली, प्रथमेश आणि सायली दोघांचा लीड रोल असल्यामुळे त्यांना जास्त वेळ सराव करावा लागायचा. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत असायचे.

सायली आणि प्रथमेश मध्ये संवाद वाढायला लागला, पण दोघेही खूप भांडायचे. छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचं भांडण व्हायचं. खटके उडायचे.


एकदा सराव करताना सायली टेबल वरून खाली पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली.

प्रथमेशने तिला उचलून बेंचवर बसवलं. तिच्या पायाला मोच आलेली असल्यामुळे त्याने पटकन पाय चोळून दिला. पाय चोळून देत असताना त्या दोघांची नजरानजर झाली आणि आणि सायलीला जाणवलं हा कितीही माझ्याशी भांडत असला तरी याच्या मनात माझ्याविषयी राग नाहीये. दोघांनी एकमेकांकडे बघून स्मितहास्य केलं.


“आता बरं वाटतय ना तुला?” प्रथमेशने विचारलं.


सायलीने स्मितहास्य करून होकारार्थी मान हलवली.


“चल मी तुला घरी सोडतो.” प्रथमेश
“नाही, मी जाईल माझी एकटी.” सायली


“नाही मी सोडून देतो माझ्या बाईकवर. तू कुठे एकटी जाणार आहेस? चल मी सोडतो.” प्रथमेशने बाईक स्टार्ट केली.


सायली हळूच त्याच्या मागे बसली. उजवा हात त्याच्या खांद्यावर ठेवला, डावा हात मागे पकडला.


“बसलीस ना.?” प्रथमेश
“हम्मम.” सायली


प्रथमेशने मिरर सेट केला. मिरर मध्ये पण दोघांची नजरानजर झाली.
प्रथमेशने बाईक स्टार्ट केली.


बाईक सुसाट निघाली,हवेत गारवा होता. झुळझुळ वाऱ्याने सायलीचे  केस हवेत उडत होते. थंडगार वारा शरीराला भेदून जात होतं. सायलीने पकडलेला हात घट्ट केला.
प्रथमेशला पण खूप छान वाटलं, आपणही तिचा हात घट्ट पकडावा, त्याच्या मनात लड्डू फुटत होते.


हा रस्ता संपूच नये, मी असच बाईक चालवत राहावं आणि सायली माझ्या मागे बसली असावी प्रथमेश मनातल्या मनात आनंदी होत होता आणि गुणगुणायला लागला.


“सूहाना सफर और ये मौसम हसी...”


“प्रथमेश छान गातोस थांबलास का?”  सायली
“मी ते सहजच..” प्रथमेश


“अरे खरच छान वाटलं. आवाज छान आहे तुझा.” सायली
प्रथमेश पुन्हा गुणगुणायला लागला.


“युही कट जायेगा सफर साथ चलनेसे
की मंजिल आयेगी नजर साथ चलनेसे..”

दोघेही गाणं गुणगुणत होते.


बघता बघता घर आलं, बाईक थांबली.
सायली उतरली.


“बाय, मी निघतो. भेटू उद्या आणि काळजी घे.”


“अरे आत तर ये, दारापर्यंत येऊन परत जाशील तर घरचे मला टोचू टोचू बोलतील. आत ये सगळ्यांना भेट आणि मग जा.” सायली


प्रथमेश होकारार्थी इशारा दिला,


आत गेल्यानंतर सायलीने तिच्या आईला सगळं सांगितलं.
“थँक्यू बेटा.” अस म्हणत त्याला बसायला सांगितलं आणि त्याच्यासाठी कॉफी आणली.


“तू पण नाटकात काम करतोस का?” सायलीची आई
“हो काकू.” प्रथमेश
“काय पात्र आहे तुझं?”  सायलीची आई
“तुमच्या मुलीचा हिरो आहे मी.” प्रथमेश
“म्हणजे? सायलीची आई आश्चर्यचकित झाली.


“काकू मी कथेतला हिरो आणि सायली माझी हेरॉईन , अस आहे.
बोलणं झालं आणि प्रथमेश तिथून निघून गेला.


....................


आज मेघाचा वाढदिवस होता. ती सकाळी उठून छान तयार झाली. आईने औक्षण केलं. तिला भेट म्हणून नवीन ड्रेस दिला. मेघा आई बाबांच्या पाया पडली, आशीर्वाद घेतला.


“आई मी ड्रेस घालून बघते.” असं म्हणत मेघा आत गेली.
आतमधून अगदी ओरडतच आली, आई बाबा घाबरले.


“अशी काय ओरडते.” मेघाचे बाबा 


मेघा आतून धावत अगदी आनंदात आली, आईला बिलगली.
“आई आई थांक यु ,किती सुंदर ड्रेस आहे.”


“तुला आवडला ना?” 
“हो खूप छान आहे, मला खूप आवडला. आता मी दिवसभर हाच घालून राहणार.”


“मेघा आपण मंदिरात जाऊया. आज तुझा वाढदिवस ना, तर देवाचे पण आशीर्वाद घ्यायला हवेत ना.”  मेघा आई बाबा मंदिरात जायला निघाले 


देवाचे दर्शन घेऊन आई बाबा घरी गेले आणि मेघा हॉस्पिटलमध्ये निर्मलाला भेटायला गेली. सोबत प्रसाद घेऊन गेली. निशा पण तिथेच होती.


“हाय निशा. कशी आहेस?.” मेघा
“मी बरी आहे. तू सकाळी सकाळी इकडे?” निशा

“हो मंदिरात गेले होते आणि काकूंना प्रसाद द्यायला आले.” मेघा
“मी तर विसरले आज तुझा बर्थडे आहे ना. मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे माय स्वीट फ्रेंड. खूप खुश रहा, खूप आनंदी रहा, हसत रहा.” निशा


दोघींनी एकमेकांना मिठी मारली. मेघाने निर्मलाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. 


“माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बेटा. तू माझ्या मुलीसाठी जे काही केलेस ना, ते कुणीही कुणासाठी करत नाही. मी आयुष्यभर तुझी ऋणी असेल.” निर्मला

“काहीही काय बोलताय काकू. आताच मुलगी म्हणालात आणि आता असं बोलून परकं करताय? तुम्हाला जशी तुमची निशा आहे ना तशीच मी पण , त्यामुळे अस उपकाराची भाषा करू नका. मी माझं कर्तव्य केल. काही उपकार केले नाहीत.
तुम्ही लवकर बरे व्हा. लवकर घरी जा. मला इथे यायला नाही आवडत. आता मी डायरेक्ट घरी येईल. असं म्हणत तिघ्याही हसल्या.


दोन-तीन दिवसांनी निर्मलाला डिस्चार्ज मिळाला.


......................

कॉलेजमध्ये जोराशोरात  गदरिंगची तयारी सुरू होती, आता क्लास पण होत नव्हते. सगळे सरावाला लागले.


मेघा निशाला कॉलेजलामध्ये घेऊन गेली.
तिथे सगळ्यांना भेटून निशाला बर वाटलं. 


रागिनी कॉलेजमधून घरी गेली. घरी जाऊन ती फ्रेश झाली. प्रॅक्टिस करायची म्हणून तिने पायाला घुंगरू बांधले आणि  गाणं सुरू केलं.


छान आनंद घेत ती प्रॅक्टिस करत होती. गाण्याचा आवाज बाहेर गेला.


“कोण एवढया जोराजोरात गाणं वाजवतंय.” मनोहर ( रागिणीचे बाबा)


वसुधा ( रागिणीची आई ) किचनमधून बाहेर आली.
“अहो बहुतेक रागिणी प्रॅक्टिस करत असेल. कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे, अस बोलली होती.” वसुधा


“तुम्हाला कितीदा सांगावं लागत, हे सगळं चालणार नाही. आवाज दे तिला.” मनोहर


वसुधा घाबरली, ती लगेच रागिणीच्या खोलीकडे गेली, खोलीचा दार लागला होता.


वसुधाने आवाज दिला,
“रागिणी दार उघड, बाबा बोलवत आहेत.”


आईचा आवाज ऐकून रागिणीने पायातले घुंगरू काढले आणि लगेच बाहेर आली.


वसुधाने रागिणीचा हात पकडून बाबासमोर उभं केलं.
“ काय चाललंय आतमध्ये ?” मनोहर 


“बाबा मी ते..” रागिणी अडखडली.
“बाहेर आण ते घुंगरू.” मनोहर
“पण बाबा..” रागिणी


“आण म्हंटल ना.” मनोहर जोरात ओरडले. 


तशीच रागिणी धावत आत गेली आणि घुंगरू घेऊन आली. बाबांच्या हातात दिले.


मनोहरने रागात ते घुंगरू चक्क जमिनीवर फेकून दिले.
जमिनीवर घुंगरू पसरले.


“यानंतर मला या घरात घुंगरू दिसायला नकोत, कळलं. वसुधा ही जबाबदारी तुझी.” असं म्हणत ते घराच्या बाहेर निघून गेले.


रागिणी जमिनीवर बसली, रडायला लागली.

रडता रडता घुंगरू वेचायला लागली.

जणू ती तिच्या हृदयाचे तुटलेले तुकडे उचलत होती.


क्रमशः

🎭 Series Post

View all