कस्तुरी भाग ३

मुलांचे लक्ष अभ्यासावर नाही फक्त दंगामस्ती भांडणं यामध्ये वेळ वाया घालवतात म्हणून त्यांना वसतिगृहात ठेवायचा निर्णय आई वडीलांनी घेतला.


कस्तुरी
भाग (३)

रूपा आणि नेहा या दोघी होत्या तर मैत्रीणी पण जुळ्या बहिणी सारख्याच राहायच्या.दोघींची इतकी मैत्री झाली होती की दोघी एकमेकींना सोडून राहायच्या नाही. शाळेच्या संमेलनामध्ये दोघींनी मिळून परीचा डान्स केला. दोघींचे ड्रेस सेमच होते.स्टेजवर दोघी गेल्यावर त्यांच्या पालकांना देखील आपल्या मुलींना ओळखला कठीण झाले होते.

वार्षिक परीक्षेत दोघी मैत्रिणी अव्वल स्थानावर पास झाल्या. आता यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. दोघी मन लावून अभ्यास करायच्या. एक दिवस ही शाळा चुकवायच्या नाहीत. प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी व्हायच्या. जसे गायन स्पर्धा,
हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा .ज्या ज्या स्पर्धा शाळेत असायच्या त्या त्या स्पर्धेत सहभागी होऊन नंबर मिळविणाऱ्या या दोघी मैत्रिणी.

याउलट तिचे तिन्ही मोठे भाऊ. त्यांना अभ्यास,शाळा याचे काहीही महत्त्व नव्हते. दिवसभर शाळेत दंगामस्ती, भांडणं,खेळ .नंतर शिक्षकांचा मार खाऊन घरी यायचे. घरी काही तरी खोटे कारण सांगून शाळा चुकवून बसायचे.अभ्यास करा म्हटले की आईलाच उलट बोलणे," सारखं किती आम्हाला अभ्यास कर अभ्यास कर म्हणतेस. जा तुझ्या लाडक्या लेकीला सांग जा. बघं ती कशी खेळत बसलीय. ते दिसत नाही तुला." रात्री वडिल घरी येण्याची वेळ झाली की त्यांच्या समोर आपली पुस्तके उघडून वाचत बसलेले नाटक करायचे.

"परीक्षा जवळ आली आहे रे पोरांनो . अभ्यासात लक्ष केंद्रित करा. यावेळी जर तुम्ही मार्क कमी घेतले तर तुम्हाला दुसऱ्या शहरातील शाळेत प्रवेश घेण्यासाठी नेणार आणि तिथेच वसतिगृहात ठेवणार. खूप झाले तुमचे लाड. आता मी काही ऐकणार नाही तुमचे. आई तुमची रोज काळजी करत बसते. असा उनाडकेपणा काय कामाचा. आम्ही कायम तुमच्या सोबत असणार आहोत थोडेच...! आमच्या नंतर तुमचे काय होणार. आणि हो जर तुम्ही सुधारला नाही तर सगळी फॅक्टरी, पैसा, दागिने रुपाच्या नावावर करणार . मग बघा काय करता तुम्ही." असे जरा जोरात वडीलांनी मुलांना सांगितले.
\"हे काय रोजचेच आहे भाषण\" असे मनात म्हणत हे तिघे जसेच्या तसे वागत होते ‌. अभ्यासाकडे तर काडी मात्र लक्ष नाही. रुपा अभ्यास करत बसली की तिला चिडवायचे , हसायचे. येता जाता तिच्या वेण्या ओढायचे.जितका होईल तितका त्रास द्यायचे. पण ती मात्र कधीही त्यांना प्रतिउत्तर द्यायची नाही. याउलट ती आणखी जोमाने अभ्यास करायची.

वार्षिक परीक्षेत तिघेही नापास झाली. पण रुपा मात्र पण पहीला नंबर घेऊन पास झाली. तिचे कौतुक करुन आई-बाबांनी सर्वांना पेढे वाटले. आणि आपल्या मुलांना दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या निर्णयावर नाराज होऊन तिघेही रात्री न जेवता झोपले. सकाळी उठल्यावर तिघेही आपल्या आई-बाबांचे पाय धरुन," आईबाबां आम्ही आता अभ्यास करतो मन लावून. पण आम्हाला बाहेर ठेवू नका.खरंच आता दंगामस्ती भांडणं करणार नाही. अगदी शहाण्या मुलासारखे वागणार. आई बाबा ऐका न आमचे. नका न दुर ठेवू आम्हाला." पण त्यांच्या बोलण्यावर लक्ष न देता त्यांचे वडील म्हणाले," आता आम्ही तुमचे अजिबात ऐकणार नाही. इतके दिवस आई सांगत होती तिचे ऐकले नाही तर पुढे पण ऐकाल यावर कसा विश्वास करावा. ते काही नाही. चला तुमच्या तुमच्या बॅगा आणल्या आहेत त्यामध्ये तुमचे साहित्य,कपडे भरून ठेवा.संध्याकाळी ६ वाजताच्या रेल्वेने जायचे आहे."

क्रमशः
परवीन कौसर

🎭 Series Post

View all