कस्तुरी भाग २

गोष्ट अलवार प्रेमाची


"शालिनी...काय ग. या पोरीच काय करावं आता? त्या पोराने हिच्या डोळ्यांवर खोट्या प्रेमाची पट्टी बांधली आहे ती कशी उतरवायची. "वत्सला आज्जी सोफ्यावर बसून डोक्याला हात लावत बोलल्या.

"आई..तू काळजी नको करू. लवकरच तिला सगळ खर समजेल. शब्द आहे माझा. आपल्या लेकीला अशीच कुणासोबत नाही पाठवणार मी." श्रीपतराव कसला तरी विचार करत बोलले आणि शालिनीताई सासूबाईंच्या हातावर हात ठेवून त्यांना नजरेनेच धीर देत होत्या.

श्रीपतरावांनी लगेच कुणाला तरी फोन लावला. त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांनी फोन ठेवला.

दुसऱ्या दिवशी कस्तुरी कॉलेजला जाण्यासाठी निघाली. नेहमी सारखं तिने श्रीपतरावांकडून खर्चाला पैसे मागितले पण यावेळी पैसे न देता त्यांनी तिला स्वतःच ए. टी. एम कार्ड दिलं. कारण गेल्या तीन महिन्यात कस्तुरीने बरेच पैसे मागून घेतले होते. यावेळी ती कुठे खर्च करते आणि किती करते हे त्यांना जाणून घ्यायचे होते म्हणून त्यांनी तिला कार्ड दिलं होत. कस्तूरीने खुश होत वडिलांना मिठी मारली आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यांची माफीही मागितली. श्रीपतराव पण काहीच घडलं नाही अस तिच्याशी वागत होते. शालिनी ताई आणि आज्जीला तर काय चाललय काहीच समजत नव्हत.

"सुचेत, अरे कुठे आहेस? मी केंव्हाची आलेय कॅफे मधे." कस्तुरी बोलली.

"येतोयच ग जानू..बस दोनच मिनिटं, बाइकवरच आहे मी." खांद्याच्या आणि कानाच्या मधे फोन पकडत बाईक चालवण्यावर लक्ष देत तो बोलला आणि पटकन फोन कट केला.

"असा काय हा मुलगा..जाऊदे..येतोय ना मग समोर बसूनच बोलू. आज त्याला लग्नाबद्दल विचारूनच टाकते म्हणजे आई बाबांची खात्री पटेल की सुचेत वाया गेलेला मुलगा नाहीये ते. " कस्तुरी स्वतःशीच पुटपुटली.

"ओहह गॉड..किती ते ट्रॅफिक जाम आणि काय ते उन बापरे..तरी नशीब.. कार घेऊन आलो होतो म्हणून.."कार ची किल्ली टेबलवर ठेवत तो बोलला.

"कारची किल्ली? म्हणजे?" हातात किल्ली घेऊन प्रश्नार्थक नजरेने बघत कस्तुरी त्याला विचारते.

"अग, ते..इकडेच होतो मग मित्राने फोन केला त्याला अर्जंट बाहेर जायचं होत पण बाईक हवी होती त्याच्याकडून त्याची कार घेतली आणि आपली बाईक त्याला दिली, म्हणून तर एवढं लेट झाला मला." सुचेत भडाभडा बोलून मोकळा होतो आणि एकच उसासा टाकतो.

"धर, पाणी पी जरा.. मग बर वाटेल."पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे धरत ती बोलली.

"अं.. हं , थँक्यू.."तिच्या हातातून ग्लास घेत तो बोलला.

"कोल्ड कॉफी विथ व्हॅनिला आइस्क्रीम ऑर्डर केली आहे. तुझी फेव्हरेट. "एक्साईट होत ती बोलली.

"अरे वाह..थँक्यू! माझी आवड एवढी छान लक्षात ठेवलीस. " तो बोलला.

"सुचेत..ऐक ना..माझ्या घरी सगळ समजल आहे. तसा गोंधळ नाही होणार काही, पण बाबांनी माझ लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देण्याआधी आपण ऑफिशली सांगूया का घरात? म्हणजे तू बोल माझ्या घरी येऊन. हवं तर तुझ्या आईला पण घेऊन ये. काल हॉटेलमधे बाबांनी पाहिलं होत आणि मग काय..रात्री चांगलाच क्लास घेतला माझा. फोनला चार्जिंग नव्हती म्हणून काल सांगितल नव्हत तुला आणि फोनवर सांगण्यापेक्षा आज प्रत्यक्ष भेटून बोलावं म्हणून भेटायचं ठरवल आज. बाबांनी त्यांच्या ऑफिसमधे एक मुलगा आहे त्याचाशी बोलले आहेत माझ्याबद्दल."कस्तुरी बोलली.

"ऐक ना कस्तुरी..अग हे काय वय आहे का आपल..लग्न वैगरे करायचं? मस्त एन्जॉय करायचं आणि लाईफ चील मारायची. हे बघ कस्तुरी मला लग्न बिग्न या झंजट मधे एवढ्यात नाही पडायचं त्यामुळे या विषयावर आपण सध्या तरी नको बोलुयात. मला लाईफ मधे खूप पैसा कमवायचा आहे. खूप...."सुचेत त्याचाच दुनियेत रममाण होऊन बोलत होता आणि कस्तुरी भारावल्यागत त्याच्याकडे एकटक पहात होती.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all