कस्तुरी भाग १

प्रेम म्हणजे संयम.
"बाबा..मला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. प्लीज..ऐका ना."कस्तुरी रडवेली होऊन बोलत होती.

"मी निवडलेला मुलगा चांगला आहे आणि तुम्ही जे बाहेर उद्योग करून ठेवले आहेत ना त्या सगळ्यासकट तो तुला स्वीकारतो आहे. असा मुलगा पुन्हा भेटणार नाही." श्रीपतराव कडक आवाजात बोलले.

"हो.. तयार आहे ना तो, पण तुम्ही त्याच कर्ज माफ करताय म्हणून. कर्ज माफ करून त्याला आपल्या कारखान्यात चांगल्या पगाराची नोकरी आणि मुंबई सारख्या शहरात थ्री बी.एच.के फ्लॅट देताय म्हणून.. एक प्रकारचा माझा सौदाच करताय तुम्ही. समोरून चालून आलेली लक्ष्मी तो कशी नाकारेल म्हणून तयार झाला तो. " कस्तुरी थोड रागातच बोलली.
कस्तुरी.. सSSSSSSन करून एव्हाना तिच्या गालावर चांगलीच चपराक बसली होती. शालिनी ताईंनी कधी नव्हे ते लेकीवर हात उगारला होता. त्यांची पाचही बोट तिच्या गालावर चांगलीच उठली होती. आजुबाजुला असलेल्या नोकर माणस लगेच माना खाली घालून तिथून निघून गेले.

"अग जरा तरी शरम असुदे. जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळग. ज्या बापाने तळहाताच्या फोडाप्रमाणे तुला जपली त्याला तू बोलतेस आणि तो तुझा सौदा करणार? वाह ग वाह! अग त्या सुचेत ने तुला फक्त वापरलं आणि सोडून दिलं त्याच्यासाठी तू तुझ्या बापाला बोलतेस? अग तो जर वेळेत आला नसता ना.. तर आज कुठल्या तरी बाजारात विकली असती त्याने तुला." शालिनीताई जीव तोडून बोलत होत्या. त्यांच्या आवाजाला कंप सुटला होता. बोलतांना हातपाय थरथर कापत होते. डोळ्यात आसव जमा झाली होती पण त्यांना डोळ्यातच थोपवून धरल होत त्यांनी.

"आई.. खरच मला विजय सोबत लग्न करायचं नाहीये. प्लीज आई.. हात जोडते. तुम्हाला वाटतो तसा मुलगा नाहीये सूचेत. तो खरच खूप चांगला मुलगा आहे. तो बोलला मला त्यादिवशी त्याला फसवल गेलं होत. बाबा..प्लीज समजून घ्या ना. माझं खूप प्रेम आहे त्याचावर. बाबा..मला त्याच्याशिवाय दुसर कुणाशीच लग्न करायचं नाहीये." कस्तुरी तिच्या निर्णयावर ठाम होत बोलली.

"कस्तुरी, बाळा.. तू खूप मोठी चूक करतेस. जे समोर दिसत ते नेहमी खर नसत ग बाळा. एखादा गरिबी मुलगा जरी निवडला असतास ना तू, तर आम्ही खूप आनंदात तुझ लग्न लावून दिलं असत पण सुचेत फक्त तुझ्या पैशांवर प्रेम करतो. त्याच तुझ्यावर प्रेम नाहीये आणि कस्तुरी.. तुझ्या मते जी गोष्ट आम्हाला आता माहीत पडली आहे ना तर तस अजिबात नाही. तीन महिन्यांपूर्वीच आम्हाला या गोष्टी माहीत पडल्या होत्या. तुम्ही दोघे पिक्चरला जात होतात, कॉफी शॉप मधे जात होतात, सगळीकडे आपली माणस नेहमी तुझ्या अवतीभोवती होती. सुचेतला ही गोष्ट माहीत होती म्हणून आतापर्यंत तुझ्यासोबत काही चुकीचं झालं नाही. काल जेंव्हा तो तुला आपल्या शहराबाहेरील हॉटेल मधे घेऊन गेला तेंव्हा त्याच हॉटेल मधे नेमक माझं पण बुकिंग होत. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तुला तो घेऊन जातो म्हणजे त्याची नियत साफ असेल अस नाही बाळा.. रिसेप्शन जवळून तुला त्याने वर पाठवलं आणि पुन्हा हॉटेल बाहेर येऊन त्याने काही माणसांना पैसे दिले. तुझ्या मागोमाग खोलीमध्ये सुचेत येणार नव्हता ती चार माणस येणार होती ज्यांनी त्याला पैसे दिले होते. ही गोष्ट लक्षात येताच मी त्या खोलीत येऊन तुला माझ्यासोबत घेऊन इकडे आलो.

"बाबा..ती माणस तुम्हीच तर नव्हती ना पाठवली म्हणजे सुचेत ला माझ्या नजरेत पाडाव म्हणून." कस्तुरी खोडसाळ पणे बोलली.

"कस्तुरी.. अग जरा तरी भान ठेव बोलतांना. हजार वेळा सांगत होते..फक्त ओरडत जाऊ नका तिला. थोडा धाक पण असूद्या.. पण नाही.. माझं ऐकणार कोण ना इकडे." नुकतीच मंदिरातून आलेली वत्सला आज्जी बोलली.

"आज्जी..आता तू पण मला कुठले धडे देऊ नको. मी ठरवलं आहे लग्न करेन तर सुचेत सोबतच."
क्रमशः
@श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all