कस्तुरी..भाग ८ अंतिम

गोष्ट अलवार प्रेमाची.


"विजय, हे बघ.. तू माझ्याबद्दल काय विचार करतोस मला माहित नाही, पण..मला कळत नाहीये काय बोलू..म्हणजे कसं सांगू ते कळत नाहीये." कस्तुरी लांब श्वास टाकत बोलत होती.

"काय कळत नाहीये? काय बोलायचं आहे? बोल लवकर मला टेन्शन यायला लागलं आहे आता. प्लीज बोल कस्तुरी." विजयला तिच्या डोळ्यात जे दिसत होत ते आता ऐकायची घाई झाली होती.

"विजय..विजय..आय लव्ह यू." ती एका दमात बोलली आणि चेहरा हाताच्या ओंजळीत लपवत मंदिरातून बाहेर पळत गेली.

विजय मात्र जागीच थिजला होता. त्याला जे ऐकायचं होत ते खर होत की स्वप्न हेच त्याला समजत नव्हत. त्याने गभाऱ्यातल्या बाप्पाकडे एकदा पाहिल आणि त्याला आठवल आज्जीने त्याला एक डब्बी दिली होती. पटकन खिशातून त्याने ती डब्बी बाहेर काढली आणि हलक्या हाताने तीच झाकण काढल. त्यात एक छोटीशी अंगठी होती. आज्जीचे शब्द त्याला आठवले तसा तो पुन्हा बाप्पाच्या पाया पडून बाहेर गेला. इकडे तिकडे पाहिलं पण कस्तुरी त्याला दिसली नाही. शेवटी त्याची नजर जास्वंदीच्या झाडाखाली असलेल्या बेंचवर गेली तिकडे कस्तुरी बसली होती.
तो पळतच तिकडे गेला आणि तिच्यासमोर गुडघ्यांवर बसला.

"कस्तुरी...जे मगाशी बोललीस ते पुन्हा बोलशील, प्लीज." त्याने तिच्या समोर गुडघ्यावर बसून तिच्या मांडीवर असलेले तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेत विचारलं.

"विजय..आय लव्ह यू." मान खाली घालुनच ती बोलली आणि डोळे गच्च बंद करून घेतले. लाजेने तिचा चेहरा अगदी लाल झाला होता जो चांदण्या रात्रीत आणखीन तेजस्वी भासत होता त्याला. त्याने तिची हनुवटी पकडुन तिचा चेहरा वर केला तशी तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याचेही हात तिच्या भोवती गुरफटले गेले. तिच्या डोळ्यातल्या पाण्याने त्याचा खांदा ओला झाला होता.

"कस्तुरी..थँक्यू ..थँक्यू सो मचं. खूप मोठा आनंद दिला आहेस तू मला. खूप वाट पाहिली ग मी या दिवसाची. मला वाटल होत मी तुझ्या लायकच नाही. आजच माझा एक कलीग बोलला. मी तुझ्याशी बोलावं,पण मी काय बोलावं हेच कळत नव्हत. कस्तुरी..मी खूप म्हणजे खूप खुश आहे आज. थँक्यू सो मच." त्याने परत तिला मिठी मारली.

"खरतर मला हे खूप आधीपासून वाटत होत म्हणजे तुला सांगावं. माझ्या मनातल बोलावं पण हिंमतच झाली नाही माझी. मी आधीच सुचेत मुळे डिस्टर्ब होते त्यात जर पुन्हा तू माझ्याबद्दल काही गैरसमज करून घेतला असशील तर? म्हणून मी काही बोलले नाही." कस्तुरी त्याचा हात स्वतःच्या हातात घट्ट पकडत बोलली.

"मी असा विचार कधीच केला नव्हता. इन्फॅक्ट मला वाटायचं माझ्यात काही तरी कमी असेल. जाऊदे आता. जे झालं ते मागे सोडून देऊ. चल उठ...चल माझ्यासोबत." एका हाताने डोळे पुसत त्याने कस्तुरीला उठवले.

"कुठे चल..अरे पण काय झालं?"
त्याने तिला पुन्हा देवळात आणली आणि बाप्पाच्या मूर्ती समोर उभी केली. आरतीच्या ताटामधल कुंकू तिच्या कपाळी लावत त्याने अंगठी तिच्या बोटात घातली.

"कस्तुरी...बाप्पाला साक्षी मानत आज मी तुला वचन देतो. मी तुझी साथ आयुष्यभर सोडणार नाही. मला जस जमेल तशी मी काळजी घेत जाईन. तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही आणि कायम तुझ्यावर प्रेम करत राहीन."
त्याची वचन ऐकून तिचे डोळे पाणावतात. पुन्हा ती त्याला घट्ट मिठी मारते. विजय पण मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि पुन्हा दोघे जोडीने बाप्पाचा आशिर्वाद घेतात. यावेळी दोघेही नवरा बायको म्हणून मंदिरातून बाहेर निघतात.

खाली उतरून दोघात एकच कुल्फी खायला घेत दोघे एन्जॉय करतात. गाडीत बसल्यावर तिने एफएम सुरू केलं छान मराठी गाणं सुरू होत.

\"भास सारे कालचे, आज ते झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपलीशी..
तू हवीशी मला..तू हवीशी..
आज कळले..तुला..तू हवीशी.

त्याने तीच्याकडे बघतच तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन गिअर वर ठेवला. गाण्याच्या प्रत्येक कडव्या सरशी कस्तुरीच्या हातावरची पकड आणखी घट्ट होत जात होती. गाण्यातला प्रत्येक शब्द तो इतके दिवस तिच्यासाठी फील करत होता. ती सुद्धा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. दोघेही घरी पोचले. विजयच्या आईने दार उघडलं तर दोघेही दाराच्या दोन बाजूला उभे होते. दोघेही लाजत होते. त्याच्या गालावर असलेली खळी आणखीनच उठून दिसत होती. एवढ्या महिन्यांनी त्यांनी दोघांना अस हसताना पाहिलं होत. आज्जीने विजयच्या आईला इति वृतांत दिला होता म्हणून त्यांनी पण कुठे आहेत वैगरे विचारायला फोन केला नव्हता. दोघेही रात्री त्यांच्या खोलीत झोपायला गेले पण आजही ते वेगळे झोपले.

दुसऱ्या दिवशी विजयने कस्तुरीच्या घरच्यांना त्याच्या घरी बोलावलं. अचानक अस बोलावल्यामुळे आज्जी सोडून बाकी दोघेही चिंतेत होते त्यामुळे गडबडीतच सकाळी सगळे आले. घरी येऊन बघतात तर घर फुलांनी छान सजवल होत. हॉल मधेच छोटासा मंडप आणि लग्नाला लागणारी सामग्री होती. गुरुजी सगळी पूजा व्यवस्थित मांडत होते.

"हे काय आहे? म्हणजे काही कार्यक्रम आहे का?" शालिनी ताई

"लग्न आहे. माझ्या लेकाच तुमच्या लेकीशी."

"म्हणजे?" श्रीपतराव

"म्हणजे मी सांगतो. आमचं लग्न झालं ते कस्तूरीच्या इच्छेविरुद्ध. लग्नाला ती स्वतःहून तयार झाली होती पण ती स्वतः तयार नव्हती पण आज ती स्वतः लग्नाला तयार झाली आहे. मागच्यावेळी सगळे विधी आम्ही पार तर पाडले पण एखाद्या मशीन प्रमाणे. यावेळी मात्र तस नाहीये." हॉल मधे येत विजय बोलला.

"यावेळी मी माझ्या मनाने विजयच्या गळ्यात हार घालणार आहे. त्याच्या नावाचं मंगळसूत्र त्याच्याच हाताने घालून घेणार आहे आणि यावेळी तुमच्या सगळ्यांचा आशिर्वाद पुढील सात जन्म आमच्यावर असाच राहूदे हेच मागणार आहे." बाबांच्या कुशीत शिरत कस्तुरी बोलली.

चला नवरा नवरी उभे रहा. गुरुजींचा आवाज आला तशी कस्तुरी खांद्यावर पदर घेत पुढे गेली. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

लग्न अगदी साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडलं.
चल उखाणा घे आता. विजयची आई बोलली.

"गळ्यात मंगळसूत्र आणि कुंकू लावते माथी
विजयरावांच नाव घेते पुढच्या प्रत्येक जन्मात तेच मिळो मला जीवनसाथी.."

नव्याने दोघांचा गृहप्रवेश झाला. इतर सगळे विधीही पूर्ण झाले. आज्जीने घरून येताना बाळकृष्णची मूर्ती आणली होती ती दोन्ही नवदाम्पत्याच्या हातात देत लवकरच पाळणा हलुद्या अशी आज्ञा वजा सूचनाही देऊन टाकली. सगळ घर अगदी आनंदाने न्हाऊन निघालं होत.

आज दोघांची खऱ्या अर्थाने मधुचंद्राची रात्र होती. त्याने त्याच्या फोनवर पुन्हा तेच गाणं लावल..तिला आवडणार.

तू रे गाभुळला मेघ, तुझ्या पिरतीची धग
सुख ओंजळीत आज माईना..सुख ओंजळीत आज माईना.
हो..तुझा मातला मोहोर, तुझ्या मिठीत पाझर
येड्या काळजाचा तोल ऱ्हाइना..येड्या काळजाचा तोल ऱ्हाइना..
मेघुटाची हुल तू, चांदव्याची भुल तू.. भागना कदी अशी तहान तू.
केवड्याच्या पान तू कस्तुरीच रान तू पाघुळल्या जिवाचं ग भान तू..
गाण्याच्या बोलाप्रमाणे दोघेही एकमेकांत विसावले होते. दोघेही मनासोबतच आज शरीराने सुद्धा एक झाले होते. अगदी दो जिस्म एक जान...
समाप्त..
@श्रावणी लोखंडे
(गाण्याचं कडव हे "सरला एक कोटी" या मराठी सिनेमातल आहे. अजय- अतुल आणि आर्या आंबेकरच्या आवाजतील सुरेख..अर्थपूर्ण गाणं. नक्की ऐका.)

धन्यवाद...

🎭 Series Post

View all