"अरे डार्लिंग..पैसा असला ना की सगळ कसं..एकदम झक्कास चालू असत. मी फक्त पैशांसाठी तुझ्यासोबत होतो रे. आपली ना.. आपल्या जिगरी दोस्तांसोबत पैज लागली होती. मी जर का तुला पटवली आणि तीन महिने फिरवली तर आपले दोस्त लोक परपर्सन आपल्याला दहा दहा हजार रुपये देणार होते. मी पैज लावली आणि जिंकली. उलट आपली तर तीन महिने ऐश झाली. घराचं भाड पण तूच दिलं आणि आपल्या पोटाच पण बघितल. त्यासाठी थँक्यू हा. हे बघ तुला इथ ठेवली तर या लोकांची मजा होईल पण आता तू बोलते आहेस की तुझ माझ्यावर प्रेम आहे म्हणून मग तुझ्यावर थोडी दया करून तुला घेऊन जातो माझ्यासोबत आणि तुझ्या घराजवळ सोडतो. चल चप्पल घाल. ए फन्टर लोक येतो रे आपल्या आयटम ला घरी सोडून." मित्रांकडे बघून डोळा मारत तो बोलला.
कस्तुरी एका जागी स्तब्ध होऊन अश्रू गाळत होती. तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न सुरू होते. घरी पण एव्हाना लक्षात आल असेल की पैसे आणि दागिने त्यांच्या जागी नाहीत आणि मी सुद्धा.. काहीच सुचत नव्हत.
कस्तुरी एका जागी स्तब्ध होऊन अश्रू गाळत होती. तिच्या डोक्यात असंख्य प्रश्न सुरू होते. घरी पण एव्हाना लक्षात आल असेल की पैसे आणि दागिने त्यांच्या जागी नाहीत आणि मी सुद्धा.. काहीच सुचत नव्हत.
"अरे डार्लींग चल लवकर.. आपला सासरा वाट बघत असेल."सुचेत तोंडात मावा कोंबत बोलला. तसा कस्तुरीने त्याला जोरात धक्का दिला आणि अनवाणीच वाट दिसेल तिकडे धावत सुटली. खांद्यावरची ओढणी तर केंव्हाच निसटून कुठे तरी पडली होती. केस विस्कटले, डोळ्यातून येणार पाणी पुसून पुसून काही ठिकाणी सुकलेल्या अश्रुंवर वाऱ्याने उडत असलेली माती चिकटली होती. पायांना दगड लागून ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या पण याचा तिला काहीच त्रास जाणवत नव्हता. तिला त्रास होत होता आईबाबांना दुखावल्याचा. पोटतिडकीने ते सांगत होते सुचेत चांगला मुलगा नाहीये, पण तीन महिन्याच्या दिखावा असलेल्या प्रेमासमोर अख्खं आयुष्य तिच्यासाठी जगणारे आईवडील तिला दिसलेच नव्हते. मनोमन जीव द्यायचं ठरवून पाय नेतील तिथे ती सैरावैरा पळत होती. ती कुठे पळतेय याच काहीच भान नव्हत तिला. आईबाबांना कस तोंड दाखवू याच विचारात पळताना ती एका ट्रक खाली आली.
"सर..त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चोवीस तासाच्या आत जर त्यांना शुद्ध आली नाही तर त्या कोमात जाण्याची शक्यता आहे. आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. शेवटी सगळ वरच्याच्या हातात आहे." डॉक्टर श्रीपतरावांना धीर देत बोलले.
एव्हाना सगळे हॉस्पिटलमधे पोचले होते. सगळेच रडत होते. कस्तुरीची तब्बेयत ढासळत चालली होती. खूप विनंती करून वत्सला आज्जीने डॉक्टरांची परवानगी घेतली आय.सी. यु मधे जाण्याची.
एव्हाना सगळे हॉस्पिटलमधे पोचले होते. सगळेच रडत होते. कस्तुरीची तब्बेयत ढासळत चालली होती. खूप विनंती करून वत्सला आज्जीने डॉक्टरांची परवानगी घेतली आय.सी. यु मधे जाण्याची.
"कस्तुरी... ए बाळा.. उठ ग. तुझी आई आणि तुझे बाबा डोळ्यात तेल घालून तू उठण्याची वाट बघताहेत. उठ लवकर. माझी चिमण बाई आहेस ना तू. आज्जीच पण ऐकणार नाहीस का? हे बघ बाळा आम्ही कोणीच तुझ्यावर रागवलेलो नाहीये. तुला तुझी चूक समजली आहे हे आम्हाला कळलंय. आम्ही कोणीच तुला काहीच बोलणार नाही. तू बर लवकर." डोळ्यातलं पाणी थोपवून धरत मायेने डोक्यावरून हात फिरवत आज्जी बोलत होत्या.
"डॉक्टर..पेशंटने हाताच्या बोटांची हालचाल केली आहे." बेड शेजारी असलेली नर्स बाहेर जाऊन सांगू लागली.
"डॉक्टर..पेशंटने हाताच्या बोटांची हालचाल केली आहे." बेड शेजारी असलेली नर्स बाहेर जाऊन सांगू लागली.
डॉक्टर तातडीने आत येऊन कस्तुरी ला तपासून बघतात. कस्तुरी मधे सुधारणा दिसू लागते आणि काही तासातच कस्तूरी शुद्धीत येते.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा