कस्तुरी.. भाग ४

गोष्ट अलवार प्रेमाची


"आई..कस्तुरी तयार झाली का? नाही म्हणजे दिसत नाही म्हणून विचारलं. एक महत्वाची फाईल पूर्ण करायची होती म्हणून मला जरा लेट झाला." पायातले शूज घाईघाईत काढून शुरॅक मधे ठेवतच तो बोलला.

"ती तयार होते आहे. तू आवरून घे पटकन.. तोवर मी चहा टाकते.
अरे, ही बघ..आलीच ती तयार होऊन. कीचन कडे वळता वळता सुलभा ताई बोलल्या तस विजयने वळून पाहिलं.

एका बाजूने पिन अप करून पुढे घेतलेले दाट कुरळे केस.. फिकट गुलाबी रंगाची शिफॉन साडी..हलक्या गुलाबी रंगाची लिपस्टिक, मोती रंगाचे कानातले..एका हातात दोन हिरव्या बांगड्या आणि त्यांच्या मधे डायमंडच कडं आणि दुसऱ्या हातात सिल्वर प्लेटेड नाजूक डाय असलेलं घड्याळ. एका हाताने केस सावरत दुसऱ्या हातात साडीच्या निऱ्या पकडुन ती घाई घाईत पुढे येत होती आणि तेवढ्यात तिचा पाय सावरणाऱ्या निऱ्यांमधे गुंतून ती पडणारच होती की त्याने तिला सावरलं..

उजव्या हाताने तिची कंबर पकडुन त्याने तिला पडण्यापासून वाचवलं होत. मिठीत नाही पण अगदी मिठीच्या जवळ होती ती. पहिल्यांदा तो तिच्या इतक्या जवळ होता. ती तिचे केस सावरत होती तेवढ्यात तिच्या लक्षात आल की त्याने तिला पकडल आहे. सुलभा ताईंनी तर लांबूनच दोघांवरून हात फिरवून कडाकडा बोटं मोडली. तिच्याकडे एकटक बघणार तो.
तिने पण पहिल्यांदाच त्याला इतक्या जवळून पाहील होत. त्याच्या डोळ्यात बघता बघता डोळ्यातलं पाणी देखील तिने हेरल होत, पण ते का असावं असा प्रश्न तिला पडला होता.

"सॉरी..अँड थँक्यू."

"हरकत नाही. छान दिसतेस." तो पटकन बोलून गेला आणि त्याने दाताखाली जीभ चावली.

"थँक्यू." तिने पण स्मित करत उत्तर दिलं.

"विजय.. झालं असेल तर चहा आणू का बाहेर?" काहीच माहीत नसल्यासारखं सुलभा ताईंनी किचन मधुन आवाज देत विचारलं.

"हो आई आण झालच माझं." गडबडीत आतमध्ये जातच विजय बोलला.
पटकन फ्रेश होऊन शर्ट बदली करतच तो तयार झाला. शेवटचा परफ्यूमचा स्प्रे करून तो बाहेर आला. कस्तुरी सुलभा ताईंसोबत चहा घेत बसली होती त्याच दोघींना तो पण जॉइन झाला. तयार होईपर्यंत गार झालेला चहा एका घोटात संपवून दोघेही सुलभा ताईंचा निरोप घेऊन निघाले.
पार्किंग मधून कार बाहेर काढतच त्याने नेहमी सारखं पुढच्या सिटच दार उघडलं. ती आत येऊन बसली. दोघेही मूकपणे निघाले होते.

"कालच मी मैत्रिणीसोबत नवीन सिनेमा पाहायला गेले होते, त्यात एक गाणं होत मला फार आवडलं ते. लावू का?" कस्तुरीने विचारलं.

"हो, लाव ना..विचारायचं काय त्यात!" विजय बोलला.
तिने पटकन तिचा फोन घेऊन गाडीमधल्या सिस्टिमला कनेक्ट केला आणि गाणं लावल..

केवड्याच पान तू.. कस्तुरीच रान तू.
पघुळल्या जिवाचं गं भान तू..
केवड्याच पान तू.. कस्तुरीच रान तू.
पघुळल्या जिवाचं गं भान तू..

क्रमशः
@श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all