भाग ३०
रुपाने आपला मोबाईल फोन हातात घेऊन काही मेसेजेस आहेत का हे चेक करु लागली.
कॉलेजच्या व्हाट्सअप गृपचे नाव गेट टुगेदर गृप म्हणून केले होते. रुपाने व्हाट्सअप आॅन केले तर पटापट एका मागून एक मेसेजांचा पाऊस पडू लागला होता.
जो तो आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत होता. कॉलेज जीवनात केलेल्या गमती जमती सांगून एकापेक्षा एक विनोदी स्टिकर्स त्याचबरोबर विनोदी ईमोजी टाकत होते. वर्गात काही असे विद्यार्थी होते जे त्यावेळी काहीसे दंगेखोर काहीसे विनोदी स्वभावाचे तेच आज खूप गंभीर प्रवृत्तीचे झाले होते तर याउलट जी मुले मुली अभ्यासात अगदींच सिरीयस होती . ती क्वचितच बोलायची किंवा मुलांच्या दंग्यात सामिल व्हायची ती आज अगदीच उलट झाली होती. सर्वात जास्त दंगा तर व्हाट्सअप वर त्यांचाच सुरू होता.
जो तो आपापल्या फॅमिली ची फोटो शेअर करत होता. काही मुलांची केस विरळ झालेली होती हे बघून हसण्याच्या ईमोजीचा वर्षाव.कोणी हळूच आपल्या सासूचा फोटो काढून टाकत होती. तर कोणी आपल्या आॅफिसमध्ये चिडलेल्या बॉसचा फोटो टाकत होता. हे सगळे बघत रुपा गालातल्या गालात हसत होती.
पण ती ही सगळी फोटो पुन्हा पुन्हा परत परत बघत होती. ती ज्याचे फोटो शोधत होती ते फोटो तिला दिसतच नव्हते. यामुळे ती थोडीशी उदासीन झाली.
इतक्यात ड्रायव्हर ने गाडी थांबवली.
" मॅडम ...! थोडा वेळ इथे जाऊन चहा नाश्ता करून फ्रेश होऊ. थोडे पाय मोकळे करा तुम्ही . मग पुढील प्रवासासाठी निघू. " ड्रायव्हर म्हणाला.
ड्रायव्हरच्या आवाजाने रुपाने पटकन आपला मोबाईल बंद करून पर्स मध्ये ठेवला.
" ताई ...! किती थंडगार वातावरण आहे न इथे. नाही तर आपल्या इकडे बापरे..! किती ती उष्णता किती ती गाड्यांची गर्दी. बाई बाई..! मला असे थंड वातावरण लै आवडते बघा." शांतामावशी म्हणाली.
" हो मावशी हे शहरापासून दूर असलेमुळे इतकी रहदारी नसते. जास्त वस्ती पण नाही न इकडे. रिलॅक्स व्हायला येतात लोक इथे." रुपा म्हणाली.
तिघांनी हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होऊन चहा नाश्ता केला.
ड्रायव्हर गाडी पुसत होता. शांतामावशी झाडाच्या सावलीत आरामात बसली होती. रुपा आपले पाय मोकळे करायला तिथल्या तिथे चालत होती तोच तिचा फोन वाजला.
तिने पर्स मधून फोन बाहेर काढला.
\" हा कोणाचा नंबर ? बाहेरचा दिसतोय !! \" असे मनात म्हणत तिने फोन उचलला.
" हॅलो...! "
पण तिकडून काही आवाज नाही.
पुन्हा तिने " हॅलो....!" म्हटले
पण पुन्हा काहीच उत्तर नाही.
तिने फोन बंद केला.
\" बहुतेक इकडे नेटवर्क इश्यू असेल.\" असे मनात म्हणत ती चालू लागली.
पण का कोणास ठाऊक हा नंबर कोणाचा असेल ? कोणी केला असेल फोन ? या प्रश्नाचे काहूर तिच्या डोक्यात माजले होते. तोच पुन्हा तिचा फोन वाजला.
अरे दादाचा फोन..!
" हॅलो..! बोल दादा..!"
" अगं कुठं पर्यंत पोहोचली आहे. केव्हा पासून तुला फोन करतोय पण लागतच नव्हता. तुझी वहिनीने तर घर डोक्यावर घेतले आहे. तू येणार हे ऐकून ती तर दिवाळीच्या साठी करतात तशी तयारी करत आहे. सकाळपासून शंभर वेळा मला अहो फोन आला का ? कुठं पर्यंत पोहोचल्या? विचारा फोन करून. असे मला सारखी म्हणत होती. त्यात तिचा फोन कामाच्या गडबडीत हातातून निसटून खाली पडून खराब झाला आहे त्यामुळे ती तुला फोन करू शकत नाही तर माझ्या मागे लागलीय." दादा म्हणाला.
" अरे हो दादा. आता इथे हॉटेल मध्ये थांबलो आहोत. चहा नाश्ता केला निघतोच थोड्या वेळात. जरा वेळाने निघालो न कामानिमित्त बाहेर पडण्यास वेळच झाला. " रुपा म्हणाली.
" ठिक आहे. या सांभाळून." दादा म्हणाला.
दादाचा फोन ठेवला न ठेवला तोच नेहाचा फोन
" हाय मॅडम ...! कुठं पर्यंत पोहोचल्या ?" नेहाने विचारले.
" आता थोड्याच अंतरावर आहोत. येतोय." रुपा म्हणाली.
" ठिक आहे आतुरतेने वाट पाहत आहे गं तुझी. तुला गळाभेट द्यायची आहे. कामिनी पण माझ्या जवळ आली आहे." नेहा म्हणाली.
" अरे व्वा मस्तच..!" रुपा म्हणाली.
इतक्यात
" मॅडम ...! निघुया न ?" ड्रायव्हरने विचारले.
रुपाने होकारार्थी मान डोलावली.
" सांभाळून ये गं. चल बाय . टेक केअर डियर." असे म्हणत नेहाने फोन ठेवला.
शांतामावशी रुपा दोघी गाडीत येऊन बसल्या.
ड्रायव्हरने गाडी सुरू केली. बाहेर ऊन असलेमुळे गाडी सुरू झाल्यामुळे बाहेरच्या हवेच्या गरम झळा येत होत्या . रुपाने गाडीच्या काचा लावून एसी सुरू करायला सांगितले.
ड्रायव्हरने रेडिओ सुरू केला.रेडिओवर सुंदर सुंदर हिंदी गाणी सुरु झाली. शांतामावशीनी अंगणातील मोगऱ्याच्या कळ्या आणल्या होत्या त्या बसल्या बसल्या कळ्यांचे गजरे करत बसल्या होत्या. मोगऱ्याचा सुगंध गाडीमध्ये दरवळत होता. मोगऱ्याचा सुगंध त्याला साथ देणारी सुंदर गाणी एक वेगळेच समीकरण झाले होते. गाडीमध्ये एक वेगळेच प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. कधी नव्हे ते आज रुपा गाणी अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. तोच तिच्या फोन वर मेसेज ची रिंग वाजली.
तिने मेसेज बघितला तर
तिने मेसेज बघितला तर
" हाय..!" असा मेसेज पण अनोळखी नंबर .
\" अरे हा तर तोच नंबर आहे त्यावरून फोन आला होता पण ऐकू काही आले नव्हते.\" रुपा मनात म्हणाली.
\"काय करावे उत्तर द्यावे की नाही? काय माहित कोणा अनोळख्या व्यक्तीचा मेसेज असेल तर उगीच काहीतरी कामामध्ये मला त्रासदायक ठरू शकेल. यापेक्षा उत्तर न दिलेलेच बरे.\" असे मनात म्हणत तिने फोन ठेवला आणि पुन्हा एकदा गाण्यांमध्ये आपल्या विश्वात रममाण होऊन गेली.
" हो...बोला वागळे की दुनिया वालो. तुमने पुकारा और हम चले आये. जान हथेली पर लेके बाईकपरसे फास्ट फास्ट आये." असे अगदी वाऱ्यासारख्या तिव्रतेने शशांक या दोघीजवळ आला.
" बापरे...!" दोघीही एकदमच म्हणाल्या.
" कुछ बोला क्या?" शशांक गाडी थांबवून म्हणाला.
" न... नाही... नाही तर...!" रुपा म्हणाली.
" ओय...! हे वागळे की दुनिया वागळे की दुनिया काय रे सारखे आम्हाला म्हणतोस. काय आहे हे?" नेहा ने जरा रागा रागानेच म्हटले.
यावर हास्याचे चौकार षटकार मारत शशांक म्हणाला," कुठल्या जगात राहता ग तुम्ही ? वागळे की दुनिया माहित नाही म्हणजे...! ग..ज..ब..! अजबच..! वागळे की दुनिया हा एक टिव्ही शो होता. खूप आधी म्हणजे जेव्हा नवीन नवीन टिव्ही आला तेव्हा. एक आगळं वेगळं विनोदी पण मध्यमवर्गीय कुटुंबाचे विचार करायला लावणारे असा सिरीयल होता. त्यामध्ये ते आपल्या मुलांना एकाच कापडात सर्वांना कपडे शिवायचे. आज तुम्हा तिघींचे कपडे सेमच दिसले म्हणून मी विनोद केला. "
हे ऐकताच रुपा नेहा एकमेकांना बघून पोट धरून हसू लागल्या.
क्रमशः
©® परवीन कौसर
©® परवीन कौसर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा