कसला हा अबोला भाग १

प्रेम करण सोप असते. ते शेवटपर्यंत निभावणे तितकेच महत्वाच असते.

नेहा आणि निरज लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण. दोघांची शाळा एकच असल्याने एकत्र अभ्यास करणे, खेळणे, गप्पा-गोष्टी हे सर्व चालूच असायचे. यातच रुसवे फुगवे देखील होत असायचे. दरवेळी नेहा माघार घेत असायची. तिला निरजने आपली मैत्री आयुष्यभर निभवावी असे वाटायचे. त्याला राग येवून मैत्री तोडली तर...., या विचाराने नेहा स्वत:लाच समजवत शांत राहायची. निरज बरोबर पुन्हा पहिल्यासारखी वागत असायची.
दोघे ही आता काॅलेजला जावू लागले. निरज काॅलेजला येताना बाईकवर नेहाला देखील सोबत घेवून येत असायचा. असेच काही महिने उलटून गेले. नेहाला काय होत आहे, हे समजतच नव्हते.नेहाच्या मनात निरज विषयी मैत्री तर होतीच पण आता ती जागा हळूहळू प्रेमात परिवर्तन करायला लागली होती. नेहा निरजला नेहमी त्याच्या आवडी-निवडी विचारत असायची. त्याचे आवडते पदार्थ, आवडता रंग जाणून घेऊन. नेहाने एक लिस्टच बनवली होती.ती त्याच्या वाढदिवसाला निरजला आवडणा-या गिफ्टचा वर्षाव करत असे.
निरजला नेहा विषयी मात्र मैत्रीची भावना जाणवत होती. एक मित्र म्हणून नेहा एवढी आपली काळजी करत आहे. ह्याच दृष्टीकोनात राहून निरज विचार करत असायचा. नेहा मात्र निरजच्या आवडीच्या रंगाचे ड्रेस घालताना त्यावर मॅचिंग ज्वेलरी घालत असायची. निरजची नजर आपल्यालाच पाहत असणार अश्या समजूतीत, नेहा स्वत:कडे विशेष लक्ष देऊ लागली.


नेहा अनेक इशा-यांमधून आपल प्रेम व्यक्त करत असायची. परंतु निरज प्रत्येक गोष्ट मस्करी ने घेत असायचा. नेहाला नंतर आई-वडिलांनी बाईक घेवून दिली. दोघे एकत्र बाईक घेवून काॅलेजला येत होते. काॅलेज सुटले तरी निरज आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसायचा. नेहा मात्र निरज येण्याची वाट पाहत बसायची. निरज आल्यावरच घरी जायला निघायची. नेहाचे निरज विषयी वाटणारे प्रेम महेशच्या नजरेतून काही सुटले नाही.
त्याने नेहाला विचारले या बद्दल. नेहाने आपल निरजवर प्रेम आहे याची कबुली दिली. महेशने दुस-याच दिवशी निरजला विचारायचे ठरवले. निरज काॅलेजला आला. महेश धावतपळत त्याच्या जवळ आला. तुझ आणि नेहाच नात काय आहे. ह्या प्रश्नावर त्याने फक्त मैत्री असेच उत्तर दिले. महेशला खर काय समजले होते. नेहा च एकतर्फी प्रेम आहे.

         

नेहाने ठरवले आता खूप झाले. काॅलेज पूर्ण झाले की लग्न करुन संपूर्ण आयुष्य निरज बरोबर काढायचे. आपल प्रेम आता बोलून दाखवायला हव. निरजच आपल्यावर किती प्रेम आहे हे देखील पाहायचे होते.
नेहा : पुढे काय करायचे ठरवले. काॅलेज संपून नोकरीला लागणार नंतर काय विचार आहे तुझा.

निरज : उत्तम कंपनीत मुलखात द्यायची. आणि आई-बाबा सांगतिल त्या मुलीशी लग्न करायचे. दुसर काय विचार असणार या व्यतिरिक्त.

नेहा : अरे वा. कोण आहे ती भाग्यवान मुलगी. कशी मुलगी हवी तुला.

निरज : अग माझ काही नाही. आई-वडिलांना आवडणारी सून माझी बायको बनणार.


नेहा : हो का. मला तरी सांग कोणी आहे का तुझ्या मनात. ( नेहा स्वत:च नाव ऐकायला उत्सुक होती.)

निरज : माझ जावू दे. (उत्तर देण्याचे टाळले) तुझ सांग. तुझ्या लग्नाच आता स्थळ शोधणे चालू देखील झाले असणार.

निरज असे काय वागतो. नेहाला समजत नव्हते. प्रेम आहे तर बोलून का दाखवत नाही. आई-वडिलांची मर्जी सांभाळत असणार. ते एकदा का हो बोलले की आपल प्रेम आपल्याला मिळणार. यावर नेहाचा ठाम विश्वास बसला.

जलद कथामालिका  

क्रमश:

नेहा आता कोणते पाऊल उचलणार आहे ते आपण पाहुयात कथामालिकेच्या भाग क्रमांक - २ मध्ये.

🎭 Series Post

View all