लक्ष कुठे असतं ग तुझं?????? बघावं तेंव्हा फोन घेऊन बसलेली असतेस, काय गं..... काय करत काय असतेस त्यात........नुसतं आपलं मैत्रिणींशी गप्पा मारत बसायचं बस्स......
घरी आल्यावर जरा म्हणून आराम नाही. जरा किरण कडे पण लक्ष देत जा....... चौथीला गेलाय....
नि अजून घोड्याला ABCD येत नाही.......घरच्या प्रति काही जबाबदाऱ्या आहेत की नाही तुझ्या....... राजेश स्मिता वर चिडतच बोलला.तसा किरण अभ्यासात खूप हुशार होता........पण गेल्या वर्षभरात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने किरण फार हट्टी झाला होता. अभ्यासाच्या नावाखाली फोन घेऊन त्यात गेम खेळत बसणं एवढंच करायचा, शिवाय आई ओरडली की तुला काय कळतं अस म्हणायचा.
स्मिता हॉल मधून उठली.फोन फ्रिजवर ठेवला आणि किचन मध्ये गेली.रात्री साडे आठ म्हणजे जेवणाची वेळ असल्याने ती पानं वाढू लागली. सगळा स्वयंपाक मुलाच्या आणि नवऱ्याच्या आवडीचाच होता.रात्री जेवणानंतर गोड खायची सवय असल्याने स्मिताने दोघांनाही वाटीत दोन दोन गुलाबजाम दिले.
स्मिताच्या हातचे गुलाबजाम......जिभेवर ठेवताच विरघळणारे बेसनाचे लाडू......आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या म्हणजे बाप लेकाचा जीव की प्राण.
दोन दिवसांनी राजेशचे तीन मित्र म्हणजे ऑफिसमधील सहकारी कामानिमित्त त्याच्या घरी आले होते. राजेश ने स्मिता ला जेवणात चांगला फक्कड असा बेत करायला सांगितला. मुळात स्मिता कोल्हापूरची असल्याने तिने झणझणीत मटण, तांबडा पांढरा रस्सा, भाकऱ्या, उकडा भात आणि जोडीला कांदा लिंबू. कामाचं बोलून झाल्यावर सगळे जेवायला बसले. स्मिताच्या हातचं जेवून सगळे एकदम सुस्तावले होते. त्यातला एक मित्र बोलला.
राजेश......... वहिनींना एखादा छोटासा गाळा घेउन दे नाही तर वहिनी तुम्ही घरातच डब्यांची कामं हाती घ्या......अस पण कोरोनामुळे आता बऱ्याच बायका मुलांसोबत गावी आहेत एकटा पुरुष कामातून येऊन कधी काय करणार??? त्यांच्यासाठी काही मुबलक पैशांमधें डब्बा उपलब्ध करून द्या......अहो एकदम फॉर्म मध्ये चालेल एवढी भारी चव आहे तुमच्या हाताला. हवं तर तुम्हाला गिर्हाईक मी देतो. आमच्याच सोसायटीमध्ये आम्ही तेरा जण आहोत. कधी कधी एवढा कंटाळा येतो ना....मग एखाद्याच्या घरी जाऊन ज्याला जे जमेल तशी मदत करून एकत्रच काही तरी बनवून खातो.
तेवढ्यात राजेश बोलतो. डब्यांचं कामं हाती घेणं...... म्हणजे खायचं कामं नाही.... आणि तिला ते जमणारही नाही.......आणि जरी जमलं तरी काय गरज नसत्या उठठेवी करण्याची??? बायकांनी फक्त घर,मुलं आणि नवऱ्याच्या इच्छा संभाळाव्या.....घरातल्या बाई ला मोकळीक दिली की ती डोक्यावर चढू पाहते त्यापेक्षा पायातली पायताण नेहमी पायातचं असावी.......तिला देवघरात ठेवू नये..... देवघरात देवांच्या पादुकाचं शोभून दिसतात.
राजेशच्या अश्या बोलण्यावर आणि विचारांवर सगळे एकदम शॉक झाले कारण ऑफिसमध्ये नेहमीच नवीन विचार मांडणारा खऱ्या आयूष्यात स्त्री ला पायताण समजत होता. त्यामुळे आणखीन कोणी काही बोलण्याच्या भानगडीत पडलंच नाही पण यामुळे स्मिताच मन मात्र खूप दुखावलं होतं, कारण एरव्ही घरात मुलासमोर तर तिला मान मिळतच नाही पण जिथे बाहेरची माणसं कौतुक करत होती........ तिथे सुद्धा यांनी तिला पायताण म्हणून तिचा अपमानच केला होता. तिला खूप वाईट वाटलं आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने कसनुस तोंड केलं आणि गुलाबजाम घेऊन आली. सगळ्यांनी ते शांतपणे खाल्ले आणि निघून गेले.
स्मिता मात्र भांडी घासतांना राजेशच्या बोलण्याचाच विचार करत होती. तिचा कंठ दाटून आला होता. तिने नळाखाली हात धुतले आणि बाथरूममध्ये गेली रिकामी बादली नळाखाली लावली आणि खूप रडू लागली कारण बादलीत पडणाऱ्या नळाच्या पाण्याने तिच्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये.( आजही कितीतरी बायका असच करतात. मन भरून आलं की बाथरूम मध्ये जाऊन रडतात. चेहऱ्यावर पाणी मारतात आणि जणू काही झालंच नाही असं दाखवतात.)
राजेशचे मित्र पण तोच विचार करत असतात. की एवढया चांगल्या पोस्ट वर काम करणारा....... असा विचार कसा करू शकतो. राजेशचा बॉस करोडपती होता पण तरी बायकोची इच्छा आहे म्हणून त्याने तिला निव्वळ 30,000 च्या जॉब साठी परमिशन दिली होती. आपल्यासारख्या मिडलक्लास लोकांसाठी 30,000 खूप झाले पण त्याच्यासाठी ती फक्त रक्कम होती आणि ती रक्कम सुद्धा बालवृद्धाश्रमात ते दान करत होते. पैशांपेक्षा बायकोच्या आनंदांत ते खुश होते. घरातली लक्ष्मी खुश असली की घर पण आनंदी राहतं अस त्यांच्या बॉस चं मत होतं. आधी सगळेच त्यांना बायकोचा गुलाम म्हणायचे पण राजेशच्या घरी गेल्यावर त्यांना एक गोष्ट जाणवली की त्याचे बॉस फक्त पैशानेच नाही........तर मनाने सुद्धा करोडपती आहेत.म्हणून राजेश ला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या बॉस ला हाताशी धरून राजेशला बायकोची आणि तिच्या कष्टाची किंमत शिकवायची अस ठरवलं.
क्रमशः..........
कथेचा हा भाग कसा वाटला हे तुमच्या कमेंट मधून जरूर कळवा.
धन्यवाद????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा