कष्टांची किंमत भाग ३ अंतिम

Sk लोखंडे


राजेश घरी येता येता पेपर घेऊन येतो. त्यात कुठे विकेंसी आहे का ते बघायला. कोरोना असल्याने पेपर मध्ये जॉब साठी पण फार काही चान्स नव्हते. बाहेर फिरून फिरून आठ दिवसातच राजेशला कोरोनाची लागण झाली आणि सगळंच बिघडलं. राजेशचे मित्र ज्यांनी राजेशला धडा शिकवण्यासाठी बॉस च्या मदतीने राजेशला नोकरीवरून काढून टाकलं होतं........त्यांना आता या सगळ्याचा पश्चाताप होऊ लागला होता.

स्मिताने बीएमसी च्या हॉस्पिटलमध्ये फोन करून नवरा पोसिटीव्ह असल्याचं कळवलं. मुळातच स्मिताचा लाघवी स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची सवय तिच्या आत्ता कामी आली होती. बीएमसी वाल्यानी स्मिताला आणि तिच्या मुलाला किमान आठ दिवस घराबाहेर पडू नये अशी विनंती केली,आणि स्मिताने पण ती तंतोतंत पाळली. गेट वरचा व्हॉचमन आठ दिवस हिरव्या पालेभाज्या,दूध, आणि गरजेच्या वस्तू........... त्याची ड्युटी चालू होण्याआधीच स्मिताच्या दारात ठेऊन जात असे. व्हॉचमन ची आई आजारी असताना स्मिताने आपलेपणाने बाहेरून का होईना जमेल तशी त्यांची काळजी घेतली होती. तिच्या काळजीची किंमत नाही देता येणार, पण कधी तरी तिच्या मदतीला नक्की येऊ अशी अपेक्षा होती व्हॉचमनला.

आठ दिवसांनी स्मिता राजेशला बघायला गेली. त्याला लांबूनच धीर दिला........ कारण तिला आतमध्ये सोडत नव्हते. राजेशला भेटून ती घरी परत येत असताना तिची नजर शाळेच्या मैदानावर पडली.तिथे रोज हॉस्पिटलमधल्या लोकांसाठी जेवण बनत होत. स्मिताच्या डोक्यात घरी डब्बे बनवण्याची कल्पना आली. पण ही गोष्ट राजेशला आवडणार नाही हे सुद्धा ती जाणून होती. राजेशला नवीन काम भेटेपर्यंत काही तरी हात पाय मारावेच लागतील, या हेतूने तिने राजेशच्या मित्राला फोन लावला.

घरच्या डायरीत राजेशचे बरेच असे कामाचे नंबर होते त्यातच तिला तो नंबर मिळाला. फोन लावून तिने राजेशच्या त्याच तीन मित्रांना घरी बोलावलं ज्यांनी तिच्या जेवणाचं कौतुक केलं होतं. त्यांच्या सोबत बसून तिने सगळ्या गोष्टींचा आराखडा काढला. किती सामान,खर्च किती,माणसं किती...... टिफिन मध्ये काय काय द्यायचं आणि टिफिन चे महिन्याला किती पैसे घायचे वैगरे.

सगळ्यांनी मिळून व्यवस्थित मॅनेजमेंट केली आणि घरी यायला निघाले..... पण येण्याआधी तिघांनी पण आपली चूक कबूल करायचं ठरवलं होतं. त्यांनी राजेशला जॉब मधून काढण्याचं कारण सांगितलं आणि कारण ऐकून स्मिताला धक्काच बसला. पण तिला आनंद ही झाला होता. कोणीतरी आहे जे तिला या सगळ्यात समजून तिचा होणारा अपमान बघून तिच्या कष्टांची किंमत समजलेलं.

तिने मोठ्या मनाने सगळ्यांना माफ केलं. सगळे गेले त्याच क्षणापासून स्मिता कामाला लागली. किरण ला अभ्यास करायला सांगून ती खाली भाजीपाला आणि इतर वाण सामान भरायला गेली. वाण्याला लिस्ट देऊन भाजीपाला घेऊन स्मिता घरी आली आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासूनच ती राजेशच्या मित्राचा आणि त्याचा सोसायटीतील इतर तेरा जणांचा डब्बा बनवून देऊ लागली. स्मिताला पहिले फायनान्शिअल सपोर्ट म्हणून पहिल्या पाच दिवसांच्या टिफिन चे पैसे देण्यात आले तोपर्यंत राजेश घरी आला होता त्याचे चौदा दिवस पूर्ण झाले होते.

गेल्या दिवसापासून तो स्मिताला जेवणात गुंतलेलीच बघत होता पण त्याने लक्ष नाही दिल कारण घरी गेल्यानंतर देखील आणखी पाच दिवस तो होम कॉरंटाईन होता.

पाच दिवसांनी पुन्हा तो नेहमी सारखा घरात वावरू लागला तेंव्हा स्मिताने त्याला सगळं सविस्तर सांगितलं. पहिले तर तो चिडला पण स्मिताच्या समजावून सांगितल्यानंतर तो थोडा शांत झाला.

राजेश पुन्हा घराबाहेर पडून जॉब साठी जिथे कुठे इंटरव्ह्यू साठी कॉल होते तिथे जाऊन आला पण चौदा दिवस हॉस्पिटलमध्ये असल्याने त्याची ती संधी पण हुकली.

राजेश घरी आला तर स्मिता बरेचसे कांदे घेऊन बसली होती कापायला, आणि बाजूला सुक्या खोबऱ्याच्या वाट्या होत्या.राजेश आला तसं स्मिताने त्याला पाणी दिलं प्यायला. राजेश पाणी पिऊन स्मिताच्या बाजूला बसला आणि स्मिता काय करते याच निरीक्षण करत होता. त्याने स्मिताला खोबऱ्याचा काय करणार असं विचारलं.....तर तिने खोबरं किसणीवर किसून भाजायचं मग कांदा आणि काही गरम मसाला भाजून घ्यायचा मग त्याच मिक्सरमध्ये बारीक वाटण वाटून घ्यायचं म्हणजे कुठल्याही कडधान्यांच्या भाजीत हा मसाला थोडा तेलावर परतून घातला की भाजीला चव छान येते असं सांगितलं.

राजेश किसणी घेतो आणि खोबऱ्याच्या वाट्या घेतो किसायला. स्मिता नको म्हणत असते पण राजेश काही काम नाही म्हणून कंटाळला होता घरात हे स्मिताला जाणवलं आणि मग तिने खोबरं कसं किसायचं हे दाखवलं.

स्मिताने सांगितल्याप्रमाणे राजेश खोबरं किसत होता. तेवढा वेळ हातात काम असल्याने राजेशला पण जरा बरं वाटलं. हॉस्पिटलमध्ये आणि मग घरात नुसतं बसून बसून त्याला उबग आला होता. राजेशने नाही नाही करता बरीच मदत केली स्मिताला.
पाण्याचा ग्लास न उचलणारा राजेश बायकांची सगळी काम स्वता करू लागला होता.(खरं तर कुठलंच काम कमी नसतं किंवा हे काम बाईच आणि हे पुरुषाचं.......असं ही नसतं, पण आपली मानसिकताच अशी आहे की नवऱ्याने बायकोला मदत केली की लोक त्याला बायकोचा बैल किंवा ताटाखालचं मांजर बोलतात.)

राजेश ने स्मितासोबत मिळून आता बऱ्याच टिफिन च्या ऑर्डर मिळवल्या होत्या आता तर राजेश स्वतः स्मितासोबत सामान भरायला जात होता आणि फावल्या वेळेत तो आणखी कुठे टिफिनची गरज आहे का ते बघून ऑर्डर घेऊन येत होता.

स्मिता ला आता टिफिनची काम करायला घेऊन महिना झाला होता महिन्याभरात तिने खूप ऑर्डर घेतल्या होत्या आता तर तिला आणि राजेशला दोघांना सगळं सांभाळताना जरा अवघड जात होतं. स्मिता आता घराबाहेर पडून तिच्या बाजूच्या चाळीत काही कुटुंब अशी होती ज्यांची हातावरची पोटं होती आणि लॉकडाऊन मुळे त्यांचे नवरे घरी होते. अश्या सात आठ बायकांना एकत्र करून ती आता काम करू लागली होती. बायका जरी खूप असल्या तरी फोडण्याची काम मात्र स्मिता स्वतः करत होती. काय गोष्टी किती प्रमाणात लागतील हे तीच बघत होती. तिच्या या कामामुळे आता आणखी गरजू बायकांना आणि त्यांच्या संसाराला हात भार लागत होता.

राजेशला स्मिताकडे बघून त्याच्या मित्रांसमोर तिला बोललेले शब्द आठवू लागतात. राजेश घरी जाऊन स्मिताची माफी मागायचं ठरवतो. तो त्याच्या त्याच मित्रांना घरी जेवायला बोलावतो ज्यांच्या समोर त्याने स्मिताचा अपमान केला होता.

स्मिता संध्याकाळी सगळं आवरून राजेश सोबत दिवसभराचा हिशोब करत बसलेली असते. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. स्मिता दार खोलायला उठते बघते तर काय????? राजेशचे मित्र असतात. ती सगळयांना आत घेते आणि सगळ्यांना पाणी आणून देते. स्मिता पुन्हा किचन मध्ये जायला वळणार तोच राजेश तिला आवाज देऊन बसायला सांगतो.

एरव्ही कोणी आलं की डोळ्यानेच आत जा सांगणारा राजेश आज तिला बसायला सांगत होता आणि ते ही अदबीने.........तिला खूप बरं वाटलं.

"स्मिता.........म्हणजे........ सॉरी............कुठून बोलू आणि कसं बोलू हेच समजत नाही......... सॉरी स्मिता.....मी तुला नेहमी कमी लेखलं.......... मला नेहमी वाटायचं बायकांना घरात काय काम असतं पण अगं......... आता घरात राहून बघितलं मी........बायकांना काय नाही.......... किती कामं असतात.आम्हा पुरुषांना निदान हक्काची एक सुट्टी तरी असते, पण तुम्हाला........तुम्हाला ती पण नसते...... उलट आमच्या सुट्टीच्या दिवशी तुम्हाला जास्तीची काम असतात. आम्ही पुरुष सहज बोलून जातो गं...... दिवसभर घरात राहून काय करतेस???खरतरं घरात राहून सगळंच कसं व्यवस्थित मॅनेज करावं हे तुमच्या कडूनच शिकावं.

आम्हाला साधी मॅनेजमेंटची पोस्ट हवी असेल तरी अभ्यास करावा लागतो आणि त्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू द्यावा लागतो........बरं आम्हाला आमच्या कामाची सॅलरी मिळते पण तुम्ही तर कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांसाठी करता.आजारपणात काळजी घेता, पाहुण्यांचा पाहुणचार करता, आमच्या आवडी निवडी जपता पण या सगळ्यात तुम्ही स्वतःला मात्र विसरून जाता.

मागच्या वेळी माझ्या याच मित्रांसमोर मी तुझा अपमान केला होता.मी खूप चुकीचे शब्द वापरले होते. आता मला ते सांगायची पण लाज वाटते, कारण तुझ्या कष्टांची किंमत मला समजली आहे स्मिता...........खरचं स्मिता मनापासून मी तुझी माफी मागतो.........मी खरचं चुकलो.......बाई नि मनात आणलं तर काहीही करू शकते हे मला कळलंच नाही........ माझ्या मित्रांसमोरच काय?????मी घरातही कित्येकदा तुझा अपमान केला आहे....... त्यासाठी सॉरी स्मिता. मला आईबाबा नेहमी म्हणायचे...... आमच्या लक्ष्मी ला काही बोलू नको..... तिला दुखवू नको...... बाई मुळे घराला घरपण असतं....... आई असं का म्हणायची हे आता समजलं......."राजेश.

"अहो..........माफी नका मागू........म्हणजे तुम्ही बोलायचे तेंव्हा मला राग यायचा पण तुम्ही कधी माफी मागावी अस कधीच वाटलं नाही.........हां......फक्त समजून घ्यावं, एखादी गोष्ट आवडली तर कौतुक करावं असं नेहमी वाटायचं.तुम्ही फक्त मित्र आणि आपल्या कुटुंबसमोर माझं कौतुक केलंय पण ते फक्त दाखवण्यासाठी...... तुम्हाला माझ्या हातचे गुलाबजाम,बेसनाचे लाडू आणि पुरणपोळी आवडते हे मला पण माहीत आहे.पण नेहमी वाटायचं की तुम्ही कधी तरी बोलावं........माझं कौतुक करावं.....पण तुम्ही कधी नीट बोललातच नाही. मला वाटायचं मी कुठे तरी कमी पडते,पण नाही आज मी भरून पावले..........तुमच्या कडून सॉरी कधीच नको होतं मला पण जे कौतुक हवं होतं....... रादर ज्या कौतुकाची मी वाट बघत होते ते आज भेटलं. कुठल्याही बाईला प्रेमाचे दोन शब्द आणि कौतुकाची थाप पुरेशी असते आणि तिच्या कर्तुत्वाला बळ देणारी असते........मग ते कर्तृत्व जगासमोर गाजणार असुदे किंवा संसारतलं."स्मिता.

राजेश......आम्हालाही माफ कर.......नाही म्हणजे...... ते......मागच्या वेळी आम्ही कामासाठी जेंव्हा तुझ्या घरी आलो होतो.......तेंव्हा तू वहिनींना जे बोलला होतास त्यावरून आम्हाला तुला धडा शिकवायचा होता......म्हणजे तू एवढा पुढारलेला असून पण तुझे विचार असे असू शकतात यावर आमचा विश्वासच बसतं नव्हता, पण जे त्यादिवशी कानांनी ऐकलं त्या दिवशीच ठरवलं तुला वहिनींच्या कष्टाची किंमत कळाली पाहिजे, म्हणून आपल्या सरांना सोबत घेऊन तुला आम्ही जॉब वरून काढून टाकलं. जेव्हा तुला कोरोनाची लागणं होऊन तू ऍडमिट असल्याचं समजलं तेंव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं कारण, आमच्या मुळे तू जॉबलेस झालं होतास आणि आमच्या मुळेच तुला जॉब शोधायला बाहेर पडावं लागलं. आम्ही नंतर येऊन वहिनींची माफी मागितली आणि सगळं खरं सांगितलं त्यांनी पण मोठ्या मनाने माफ केलं आणि मग आम्ही वहिनींना मदत करून हा सगळा उपक्रम सुरू केला........खरचं राजेश आम्हाला माफ कर........अरे तुला धडा शिकवण्याच्या नादात त्याच्या परिणामांकडे आमचं दुर्लक्ष झालं. कोरोनावर मात करून घरी परत आलास तेंव्हा आमच्या जिवात जीव आला. तुझं जर काही बरंवाईट झालं असत तर आम्ही कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो. खरचं सॉरी मित्रा...........

राजेश त्याच्या मित्रांवर न रागावता त्यांचे आभार मानतो आणि झालं गेलं सगळ्यांनी विसरून जाऊया अस म्हणतो.

सगळे राग रुसवे बाजूला ठेवून नव्याने सुरवात करतात. राजेश पण पुन्हा जॉब जॉईन करतो आणि तो सरांची देखील माफी मागतो. सरांबद्दल त्याचे काय विचार होते ते सांगून तो मन हलकं करतो. त्याचे सर पण त्याला मोठ्या मनाने माफ करतात आणि ऑफिस सोबतच बायकोला पण कामात मदत करत जा....... सगळ्या गोष्टी अरेंज करून ऑफिस ला येण्याचा सल्ला देतात शिवाय बायको ही घरातली लक्ष्मी,सरस्वती आणि वेळ आली तर नवऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहणारी दुर्गा पण होते. याची जाणीव करून देतात.

सगळ्यांच्या बोलण्यावरून त्याला स्मिताच्याचं नाही तर सगळ्याच बायकांच्या कष्टाची किंमत समजते.

समाप्त.........

कथेचा हा शेवटचा भाग कसा वाटला हे कमेंट मधून जरूर कळवा.......आणि शेवटचा भाग पोस्ट करण्यासाठी उशीर झाला त्या साठी क्षमस्व.......

धन्यवाद???......



🎭 Series Post

View all