करवंदाच आंबट चिंबट लोणचं

Pavsala suru zala ki zadanchi palvi chan tavtavit hote...


पावसाळा सुरु झाला की झाडांची पालवी छान टवटवीत होते....आणि छान हिरवीगार पाने पाहून मन छान प्रसन्न होते...मस्त वाटतं मनाला अगदी तजेलदार झाल्या  सारखं... बागेत तासनंतास बसून राहावसं वाटतं.... तो फुलांचा सुगंध.....अगदी मस्तच......  पानावर पडलेले दवबिंदू... झाडांचा आणि पावसाचा झालेला तो पहिला टंचिग.....

सगळं किती छान असतं ना....

आमच्या घरच्या बागेत खुप वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची आणि फुलांची झाडे आहेत...पहिला पाऊस पडला की छान फुलांच्या झाडांना छोट्या छोट्या कळ्या यायला लागतात   आणि फळांच्या झाडांना फुले .....

एकदा असंच माझ लक्ष करवंदाच्या झाडाकडे गेले .. करवंदाच झाडं छोटेस पण त्या इवल्याशा झाडाला भरपूर करवंद लागलेली होती .. मस्त पांढरी  - गुलाबी  करवंद.....खायला हि मस्त आंबट- चिबंट.....पण एवढया करवंदाच करायचं काय हा प्रश्न मला पडला ...

मग माझ्या लक्षात आलं की मागल्या  वेळी माझ्या  सासुबाईंनी करवंदाच लोणचं केलेलं.... घरच्यांना  तर ते लोणचं  खूपच आवडलं...मग ठरवलं आता आपण करवंदाच लोणचं करायचं..  आणि हा माझा पहिला प्रयोग होता....करवंदाच लोणचं खरंच मस्त झालं.... आणि मलाही एक नविन अनुभव मिळाला...तोच अनुभव मी तुमच्यशी शेअर करतीय...

सामग्री:

1. करवंद

2.गरम तेल

3.मौरीची दाळ

4.तिखट आणि मिठ

5.लोणचं मसाला

6.थोडीशी साखर

कृती:

सर्व प्रथम करवंदाच छोटे छोटे काप करायचे.... ते काप एका पातेल्यात टाकून त्यात तिखट मिठ घालुन छान मिक्स करायचं आणि ते एक रात्र तसंच ठेवायचं.....

दुस-या दिवशी  एका पातेल्यात तेल गरम करायचं, गरम तेलात मौरीची दाळ टाकून ती थोडी तळतळ होऊ द्यायची... नंतर तेल थंड करायला ठेवावे.... तिखट मिठ  घातलेल्या लोणचं मसाला मिक्स करायचं आणि त्यात  थंड केलेल तेल घालायचं...  त्यात थोडी चवीपुरती साखर घालायची.... आणि एका काचेच्या  बंद बरणीत भरून ठेवायचं... शक्यतो लोणचं थंड ठिकाणी ठेवायचं... नाही तर   काही महिन्यांनी बुरशी चढायला लागते .......झालं लोणचं तयार....

आहे ना अगदी सोपं...

चला मग तुम्हीही करुन बघा करवंदाच लोणचं.... आणि मला नक्की कळवा कि तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला .. हा माझा पहिला प्रयोग होता आणि   पहिला अनुभव सुद्धा.....
सखीनो तुमच्या प्रतिक्रिया  आणि तुुुुमचा अनुभव  नक्की कळवा....