करोनाची ऐशी की तैशी
सध्या आहे सगळीकडे,करोनाचा कहर,
त्यातून निर्माण झाली ,एक भितीची लहर,
त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी,धुवायचा हाथ साबणाने वारंवार,
स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी,घ्या सात्विक आहार,
दिवसातून कमीत कमी चारवेळा,घ्या गरम पाण्याचा आधार,
रोज सकाळी लवकर उठल्यानंतर,करा गुळन्यांचे प्रकार,
शारीरिक स्वास्थ्यासाठी,करा व्यायामाचे प्रकार,
मानसिक स्वास्थ्यासाठी,करा योगाचे प्रकार,
आपल्या सर्वांच्या आयुष्यात ,करोनाने केला आहे प्रहार,
हे सगळं करून आपण,करु करोनाचा संहार,
करोना नंतर येणारे संकटासाठी,व्हा खबरदार,
करा मनाची तयारी,की मानणार नाही हार,
ह्यालाच तर म्हणतात जीवन,ज्यात असतो चढ उतार
रुपाली थोरात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा