Karan tu asamanya ahes...

Motivational poem for women empowerment, to encourage women power and introduce as a strong human being

✍️ अंजली काचळे.
               
                    कारण तु असामान्य आहेस! 

    स्वतःचा आदर करायला शिक, समाज पण तुझा आदर करेल. तु सर्वसामान्य नाहीस, तु इतरांपेक्षा खास आहेस. असह्य वेदना सहन करून नवीन जीव जन्माला आणण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. कारण तु असामान्य आहेस. दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःसाठी जगायला शिक आणि जगताना तुझ्याकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्याला उत्तर द्यायला शिक. स्वप्न तुझीही आहेत आणि ती पूर्ण करण्याचा तुला अधिकारही आहे. त्या अधिकारासाठी लढायला शिक. घरातील काम करणं काही वाईट नसतं, पण ती सगळी कामं तुच करणं हेही काही बर नसतं. थोडा वेळ तुझ्यासाठीही दे, कधीतरी थोडी बेडरेस्ट तूही घे. बन थोडी आत्मनिर्भर, राहा स्वतःच्या पायावर उभी, नको हात पसरूस बापाकडे, नको हात पसरूस नवऱ्याकडे. जोपास तुझा छंद, हो त्यातून तु मोठी. काही तरी खास प्रत्येकाच्या अंगी असतं, फक्त थोडस बाहेर त्याला आणायचं असतं. प्रत्येकवेळी कोणाची सोबत शोधत बसू नकोस.
लढत, रडत, धडपडत, हसत एकटीने प्रवास करायला शिक.
कारण तु कोणी सर्वसामान्य नाहीस, हातातून सहज निसटेल ती रेतही नाहीस. 
         तू आहेस मोकळं आकाश..
         दूरवर पसरलेला समुद्र.....
         तू आहेस जगत् जननी....
         तू आहेस उद्याची प्रगती ...
         तू आहेस एक स्री....!!