कर्म

कर्म
#अलख

*कर्मा*

आपल्या पॉश AC गडीतून उतरून
खूप घासाघीस करून तिने
साठ रुपयांची जुडी
पन्नास रुपयाला घेतली .
पण जेंव्हा भाजीवाल्याचे आपल्या कडे लक्ष नाही
हे हेरून ती पटापट पाऊले टाकत
पैसे न देताच आपल्या गाडीत येऊन बसली ,
आणि क्षणात घराकडे रवाणाही झाली .
पण ...
घरी येऊन जेंव्हा तिच्या लक्षात आलं की ,
तिची पैशाने भरलेली पर्स
ज्यात क्रेडिट कार्ड ,
ATM कार्ड असलेलं
सारं सारं गहाळ झालेलं
तेंव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली
आणि मनात विचार आला
त्याला आपण पन्नास रुपयाने फसविले
आणि देवाने आपल्याला ....
?

कर्म परत येतात ते असेच काय ???

*©®मीनल सचिन*