कारणं ती एक आई असतें....

Karan ti ek aai aste ... "Swami tinhi jagacha Aai vina bhikari "

✍ ऋतुजा वैरागडकर 

      
कारण ती एक आई असतें...

            स्वामी  तिन्ही जगाचा,
             आई विना भिकारी

ती सुंदर, सोज्वळ, हुशार  ... सायली...

शाळेपासुन ते कॉलेज पर्यत नेहमी पहिली यायची...
तिला अभिनय करायला  खूप आवडायचे...
कॉलेजच्या  शेवटच्या वर्षाला असताना,  कॉलेज मध्ये एक नाटकं सादर करण्याचं ठरलं.... नाटकांमध्ये सायली नी ही भाग घेतला...

नाटकाच्या सरावाला  तिची भेट पराग शी झाली...
पराग हॅनसम.... चिल....ऑल वे बरा होता....
नाटका दरम्यान दोघांची भेट व्हायला लागली..हळूहळू बोलणं सुरू झालं.....
आधी फक्त नाटका निमित्त भेटायचे.....
मग वरचेवर भेटणं सुरू झालं.....
मैत्री झाली ...
मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झालं हे त्याचंही त्यांना कळलं नाही.....
कॉलेजच शेवटच वर्ष पूर्ण झालं...
सायली च्या बाबांची बदली झाली आणि ते दुस-या शहरात गेले...

आता सायली आणि परागच फक्त फोन वर बोलणं व्हायच....
दोघंही तासनतास गप्पा मारायचे.... दरम्यान परागला नोकरी मिळाली....

पांच  - सहा  वर्ष असंच सुरु राहिल... एकमेकांपासुन दूर असल्या मुळे फक्त फोन वर बोलणं व्हायच ....
पण दोघांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की लग्न करायचं...

सायली नी घरी आई बाबांना पराग बद्दल सगळं सांगितलं....पण आई बाबांनी लग्नाला थेट नकार दिला....

पराग आणि सायली नी पळून जाऊन लग्न केलं...
पराग ला कंपनी कडून फ्लॅट मिळालेला होता..
लग्नानंतर पराग सायलीला फ्लॅट वरच घेऊन गेला....

सायली आणि पराग चा संसार सुरू झाला....
एक महिना दोघांनी खुप मजा केली... हनिमून झालं....फिरणं झालं....
नवलाईचे नऊ दिवस संपले...
परागच्या  सुट्ट्या संपल्या.... तो पुन्हा जॉईन झाला
....
पराग दिवसभर ऑफिस मध्ये असायचा....
त्यामुळे सायली दिवस भर  घरी एकटीच असायची...
दिवस कसाबसा निघुन जायचा..... संध्याकाळ झाली की तिला पराग ची चाहुल लागायची....  पराग कधी कधी खुप उशिरा यायचा.... हि वाट बघुन झोपी जायची...

दिवसा मागून दिवस निघत गेले....
एक दिवस सायली सर्व कामे आटपून टिव्ही बघत बसली होती.... तिला अचानक मळमळ वाटायला लागली.... उलट्या झाल्या....   पराग ऑफिस मध्ये असल्या कारणाने सायली एकटीच जवळच्या हॉस्पिटल मध्ये गेली.....

डॉक्टर नी चेकअप केलं आणि टेस्ट केली....
आणि सायलीला गुड न्यूज दिली...
सायली ला खुप आनंद झाला.... तिचा आनंद गगनात मावेना.....

घरी जाऊन ती छान तयार होऊन पराग ची वाट पाहत बसली....   अगदी स्वताच्या धुंदीत ...खुप आनंदात होती.... 

डोअर बेल वाजली ..... तिची धडधड सुरू झाली.... तिनी हळूच दार उघडलं... ती काही बोलणार  तेवढ्यात पराग गलडंला ....
सायलीला हे बघून धक्काच बसला.... पराग चक्क दारु पिउन घरी आला होता ...

बिचारी सायली..... आनंदाची बातमी देणार होती....
पण ते तर राहिलंच....

सायली त्याला कसंतरी उचलुन बेडरूम पर्यंत घेऊन गेली.... आणि त्याला झोपवलं.....
सायली काही वेळाने बिना जेवल्यानेच झोपून गेली...
दिवस उजाडला...
सायली सकाळी उठून तिच्या कामाला लागली...
पराग थोडा ऊशिराच उठला....
सायली छान गरम गरम चहा घेऊन बेडरूम मध्ये गेली....
आणि परागला चहा दिला ....
पराग निशब्द होता तो एकही शब्द बोलला नाही...
मग सायलीनीच बोलायला सुरुवात केली...
आणि सायलीनी  सांगितलं की,  पराग तु बाबा होणार आहेस...  सायलीला वाटलं.... परागला खुप आनंद होईल...

पण तस काहीच झाल नाही..... पराग हे मुल नको होतं.....
साध बोलणं झालं, वादविवाद करुन झाला... सगळं बोलुन झालं.... पण पराग काही बोलायला तयार नव्हता...  खुप विनवण्या केल्यानंतर  पराग बोलला.... बोलला काय.. त्यानी तर बॉम्बच फोडला....  पराग जे काही बोलत होता.. ते एक एक शब्द सायलीच्या  हृदयाला चिरुन जात होते....

दोन वर्षांपूर्वी परागच लग्न झालेलं होतं.....

त्याच्याच कंपनीत काम करणा- या पुर्वा सोबत  ... पुर्वाच प्रमोशन होऊन पुर्वा दुस-या शहरात  स्थायिक झाली होती ....
आणि दोघांना  एक वर्षाची मुलगी होती......

पुर्वा आणि मुलगी दोघेही पराग च्या आई बाबांसोबत फ्लॅट मध्ये राहायचे.... पराग आणि पुर्वाच लग्न आई बाबांच्या मर्जी ने झाले होते....  त्यावेळी  पराग तयार नव्हता.... पण नंतर तो पुर्वा वर प्रेम करायला लागला....

आता राहिला प्रश्न सायलीचा... परागनी  सायलीशी अस का केलं.....

पुर्वा दुर असल्यामुळे पराग ला नेहमी एकट वाटायचं... त्याला कोणाची तरी सोबत हवी होती...

आणि सायली तर त्याच्या वर प्रेम करायचीच.....
आणि म्हणुन परागनी सायलीशी  लग्न केलं.... आणि तिची फसवणूक केली...

सायली निशब्द होऊन खाली बसली...

आता सायलीला हळूहळू उलगडा व्हायला लागला....
जेव्हा जेव्हा सायली त्याच्या आई बाबां बद्दल विचारायची.... तो काही तरी कारण सांगुन टाळायचा....
कधी फोन वर पण बोलु देत नसे....

सायलीला वाटायचं की सगळं ठिक आहे... कारण पराग नी तसं कधी जाणवू दिलं नाही....

सायली निशब्द पडुन होती....

दुस-या दिवशी सायलीनी बॅग पॅक केली आणि निघाली..... पराग नी थांबवण्याचा खुप प्रयत्न केला पण सायली काही थांबली नाही...

माहेरी तुटलं होतं... पोटच्या गोळयाला  घेऊन जायचं कुठे..... हा मोठा प्रश्न सायली समोर होता...
मग तिनी खुप विचार केला आणि माहेरी गेली....

तिनी आई बाबाला सर्व सांगीतलं....

मुलीनी कितीही चुका केल्या तरी आई वडिलांचं मन मुलींसाठी झुरतच  .... त्यानी तिला जवळ केलं... आणि ती तिथेच राहु लागली....

नऊ महिने पुर्ण झाले,  सायली नी एका गोंडस मुलीला जन्म दिला....
वर्ष उलटलं ....

आता सायलीने स्वता:चा विचार करायला सुरुवात केली....
तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं होतं...
सायली शिक्षीत असल्यामुळे तिला नोकरी मिळाली....

आई- बाबा , सायली आणि तिची मुलगी  रीया असा प्रवास सुरू झाला....  प्रवास खर तर खुप खडतर होता .... पण सायली नी हिंमत हारली नाही आणि हताश ही झाली नाही... ती  स्वताः ही जगली आणि रीयाला ही जगवलं...

आता सायली ची मुलगी रीया  पंधरा वर्षांची आहे..... पंधरा वर्षांचा काळ काही कमी नसतो.... पण दोघीही छान आनंदाने जगल्या ....आणि जगत आहेत...
तिची आई तिच्या साठी प्रेरणा आहे....

कारण सायली नी खुप छान संस्कार दिले आहेत तिला....
तिची प्रत्येक इच्छा पुर्ण करते... आई वडिलांचं दोघांच प्रेम दिलं... तिला कधी वडिलांची कमी पडू दिली नाही...  रीया च्या पालन पोषण मध्ये कधी कमी पडू दिलं नाही... रीया अभ्यासात हुशार आहे.... 

रीया ला तिच्या आईच्या कर्तुत्वाची जाण आहे ....

रीया समोर सायली एक आदर्श आहे ...
कारण ती तीची आई आहे...
आता सायलीच एक ध्येय आहे रीया ला चांगलं शिक्षण देऊन स्वता:च्या पायावर उभे करणे .... 

आजच्या काळात स्त्री समोर हे खुप मोठ आव्हान असतं...

मुलीचं आयुष्य घडवणं हे फक्त आईच्या हातात असते....
आणि ते करायला आई  समर्थ असते,  सक्षम असते...

कारण ती एक आई असतें.....
कारण ती एक आई असतें ...

माझा ब्लॉग आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा... आणि फॉलो मी..

✍ऋतुजा वैरागडकर