कन्यापूजन
नवरात्रीचे वेध लागले तसे अनघा च्या मनात आता येणारे दिवस आपले ऑफिस चे routine सांभाळून कसे manage करायचे याचे plannig सुरू झाले.तशीही अनघा "WLB"(work life balance)सांभाळण्यात अगदी तरबेज.साफसफाई,घरातले सामान, नऊ रंगाच्या साड्या-कुर्ती गोळा करायच्या, रात्री सोसायटी मधील गरबा ला हजेरी लावायची एक ना हजार गोष्टी.पण दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनघा या साऱ्या गोष्टी लीलया हाताळनार होती.
अगदी offece मधील presantaion आणि deadline इतक्याच कुशलतेने.
आणि हो,या सगळ्यात महत्वाचे काम अष्टमी साठी कुमारिका शोधून आणि सांगून ठेवणे.अष्टमी आठवल्यावर अनघा ला मागच्या वर्षीचा प्रसंग डोळ्यासमोर आला.घरी कन्या पूजन साठी तिला कसे बसे दोन कुमारिका मिळाल्या.ऑफिस ला थोडी उशिरा येते सांगून अनघा ने घरी खीर पुरी उसळ अशी जय्यत तयारी करून ठेवली.मुलींना द्यायला तिने खास "girlish colour" गुलाबी आणि जांभळा, अशा रंगाच्या छोट्या purse सुद्धा आणून ठेवल्या.ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा या दोन्ही कुमारिका आपापल्या आयांबरोबर जरा नाखुषीनेच आल्या.बहुतेक आधी दोन तीन ठिकाणी प्रसादासाठी जाऊन आल्या असल्याने त्यांचे "tummy full"झालेले होते.आणि आता इथे पण खावे लागणार आणि तेच खीर पुरी वैगरे या विचारानेच पोरी धास्तावलेल्या.अनघा ने त्या दोघींची पाय धुवून यथासांग पूजा केली आणि दोन छोट्या ताटांमध्ये खीर पुरी उसळ असे वाढून त्या दोघींच्या समोर ठेवले.पुढ्यात पुन्हा खीर पुरी बघून दोन्ही चिमुकल्यांनी तोंड फिरवली.शेवटी आयांनी नी बळजबरी केल्यावर कसे बसे दोन घास खाऊन त्या दोघीही उठल्या.गिफ्ट म्हणून अनघा ने दिलेली purse बघून ",I already have this",असे पुटपुटत निघून गेल्या.हे सारे बघून अनघा मनातल्या मनात कोमेजली.सारे आवरून ऑफिस गाठता गाठता तिला चांगलाच उशीर झाला.रस्त्यात सिग्नल ला थांबले असताना तिची नजर सहज बाजूच्या फूटपाथवर गेली.तिथे बाजूला एका पोत्यावर एक 7 ते 8 महिन्याचे तान्हुले निवांत झोपले होते आणि त्याचाच शेजारी बसून एक 5 ते 6 वर्षांची नाकी डोळी नीटस अशी एक चिमुकली हातातल्या भांड्यामधून कालवलेला भात खात होती.जवळच त्या पिल्लांची आई रस्त्यावर चाललेल्या दुरुस्तीच्या कामात मग्न होती.ते बघून अनघाला सकाळचा प्रसंग आठवला.चार ठिकाणी बळजबरी जेऊन आलेल्या त्या कुमारीकाही साधारण त्या चिमुकलीच्याच वयाच्या असतील.
आताही हा प्रसंग आठवून अनघा ला उगीचच गळल्यासारखे झाले.रात्री खाली गरब्याला जमल्यावर या वर्षीच्या अष्टमीच्या चर्चेला रंग चढला, कोणाला बोलवायचे ,प्रसाद काय करायचा वस्तू काय द्यायच्या.अनघा तिथे असूनही मनाने कशातच नव्हती.तिला डोळ्यासमोर दिसत होती ती भात खाणारी चिमुकली "कुमारिका".
असेच दुसऱ्यादिवशी ऑफिस ला जाता जाता तिची नजर सहज रस्त्यावरच्या एका बोर्ड कडे गेली.एका स्वयंसेवी संस्थेचा बोर्ड होता तो,त्यांच्याकडून रस्त्यावरील मुलांसाठी शाळा चालवली जात होती.सहज वाट वाकडी करून अनघा आत शिरली तर आत अगदी तान्ह्या बाळापासून ते 12 /15 वर्षांच्या मुला मुलींपर्यंत तिथे वीस पंचवीस मुले तरी होती.सर्वांच्या शिक्षणाचा आणि खाण्यापिण्याच्या खर्च मिळालेल्या देणग्यांवर चालवला जात होता.
तिथून बाहेर पडताना अनघा ला एक नवीनच विचार मिळाला,त्याच विचारात हरवलेली अनघा ऑफिस मध्ये पोहचली.संध्याकाळी घरी पोहचल्यावर एका नव्या विचाराने प्रेरित झालेल्या अनघा ने सोसायटी ग्रुप वर एक मेसेज पोस्ट केला."अष्टमी साजरी करूया,एका वेगळ्या पद्धतीने",वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रियांसमावेत अनघा ला 8/10 तरी समविचारी मैत्रिणी मिळाल्या ज्या तिच्या या कामामध्ये तिला साथ द्यायला बिनशर्त तयार होत्या.
अष्टमी दिवशी घरी बनवलेला सुग्रास प्रसाद आणि मुलांना लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी घेऊन या सगळ्या मैत्रीण संस्थेमध्ये पोहचल्या.तिथल्या सगळ्या मुलांना स्वतःच्या हाताने जेवण वाढून देऊन त्यांच्यासाठी आणलेल्या वस्तू देखील भेट दिल्या.रोज दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेली ती खरी गरजू मुले या सगळ्या प्रेमामुळे अतिशय भारावून गेली होती.त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद बरेच काही सांगून जात होता.
प्रसाद देताना देणाऱ्याच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर चा आनंद दोन्हीही अवर्णनीय सोहळा होता.
आज खऱ्या अर्थाने अष्टमी साजरी झाली होती.
Rutuja Naik