कन्यादान एक कर्तव्य... भाग 10 अंतिम

कन्यादान


पूर्वार्ध....

सायली ने पुढे जाऊन सिद्ध च्या घरच्यांना त्यांची जागा दाखवली....
त्यांची चूक, हुंड्या साठी असलेल्या अटी अमान्य करून लग्नाला नकार दिला....


आता पुढे....

सायली आता सगळे झाले आहे, तू आता हे काय नवीन नाटकं लावली आहेस. तुला जे काही करायचे होते ते आधीच करायचे होते ना??? असा सगळ्यांच्या समोर तमाशा का मांडते आहेस?" आजी.

आजी अहो मलापण तमाशा नकोच आहे, पण काय करणार लग्न जसे जसे जवळ येत आहे तश्या तश्या तुमच्या अपेक्षा वाढत चालल्या आहेत. माझा बाबा तुमच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाईल आणि आज माझा बाबा हे सहन करेल ही पण मी नाही बोलले तर याच्या सारखे अजून किती तरी बाप याचं कर्तव्याच्या खाली दबून जातील.
आपल्या सारख्या सुशिक्षित समाजात जर असे वागत असतील तर अडाणी लोकांच्यात आणि आपल्यात फरकच काय राहिला."सायली.

"सिद्ध हिला तुझ्या भाषेत सांगून ठेव आमच्या इज्जतीचा धिंडवडे काढू नकोस. आता हिने कितीही किंवा तू कितीही सांगितले तरी आम्ही या लग्नाला तयार नाही. आम्ही आता इथेच हे लग्न अमान्य करत आहे." बाबा बोलत असताना स्मिता जोरात ओरडून म्हणाली,
"तुम्हाला काय मलाच हे लग्न मान्य नाही. आताच जर तुम्ही असे वागत असाल तर पुढे जाऊन काय.????
तुमच्या सारख्यांच्या घरात मला सून म्हणून कधीच नांदायला यायचं नाही.इतकेच काय तर मी तर म्हणेन की अश्या घरात कोणत्याच मुलीने लग्न करून जाऊन आपले जिवन उध्वस्त करण्यात अर्थ नाही.
सिद्ध अजूनही तुला एकदा विचारते आहे,तुला जर माझ्या बरोबर आयुष्य काढायचे असेल तर मी आहे तशीच मला स्वीकारावी लागेल... त्यासाठी तुला माझ्या विचारांचा आणि माझ्या करिअरचा विचार पहिले करावा लागेल. सगळे मान्य असेल तरी तुझ्या घरात मला मनापासून स्वीकार होणार असेल तरच माझा विचार कर. ..."
सायली बोलून स्टेज वरून खाली आणि बाबाच्या हाताला पकडुन तिथून जाऊ लागली. बाबा मात्र मागे वळून सिद्धार्थ कडे बघत होते की पुढे येऊन त्यांच्या मुलीला साथ देईल. तिचा हात हातात घेऊन आयुष्य भर साथ निभवण्याचे वचन देईल. पण सिद्ध फक्त त्यांना जाताना बघत होता, सायलीच्या बाबाची नजरा नजर झाल्यावर त्याने आपली मान खाली घातली. तो त्याच्या परिवाराच्या विरुद्ध जाऊ शकत नव्हता.


"बाबा आणि आई आता जे झाले ते विसरून जायचे, परत तो विषय कधीच या घरात होणार नाही. मी त्यांच्या विरुद्ध उद्या केस करून आपले झालेले नुकसान आणि मानहानी याबद्दल दावा दाखल करणार आहे" सायली अगदी खंबीरपणे बोलत होती.


"सायली बाळा तू ठीक आहे ना?? तुझे प्रेम आहे ना सिद्ध वर, तो येईल तुझ्याकडे. त्याची वाट पहा, थोडा वेळ दे त्याला..."बाबा.


"बाबा प्रेम माझ्या बाबाच्या स्वाभिमाना पुढे शुल्लक आहे आणि सिद्ध त्याला जर माझा हात पकडायचा असता तर त्याच वेळी त्याने मला थांबवून घेतले असते.
आता तो आला तरी काहीच उपयोग नाही, मी त्याला स्वीकारु शकत नाही. चार लोकांच्यात जर तो मला साथ देत नसेल तर असल्या साथीदाराची मला गरज नाही. मला आजची रात्र दे बाबा, नवीन सकाळ माझी वाट पाहत आहे. नवीन कार्य करण्यासाठी, आणि जीवन सुरवात करण्यासाठी. आजची रात्र फक्त मला स्वतःला सावरायला दे...."सायली बोलून आपल्या रूममध्ये निघून गेली.
बाबाने पण तिला एकटीला सोडले, त्याच्या वाघिणीला परत उभे राहण्यासाठी आता एकांताची गरज होती.


"सायली साखर झोपेत असताना तिच्या डोळ्यांवर उन्हाची तिरीप आली. तसे तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि कुस बदलून परत झोपी गेली.
सायली उठ आता, बघ नवीन दिवस तुझी वाट पाहत आहे. सकाळची पहिली किरण तुझ्यासाठी नवीन उम्मेद, नवीन प्रेरणा घेऊन आली आहे. तुला आज पासून नव्याने सगळ्याला सुरवात करायची आहे..."अर्णव तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला उठवत होता.

"अर्णव तू...! तुझी झोप झाली. आज सकाळ लवकर झाली का? अजून उठावे वाटत नाही..."सायली.


"माझी सकाळ नेहमी अशीच लवकर होते, आणि सूर्य पण त्याच्याच वेळेला आलेला आहे, फक्त तुझ्यातला आळस अजून जात नाही. उठ माझ्या हातचा गरमा गरम चहा घे, फ्रेश वाटेल बघ तुला..."अर्णव चहाचा कप पुढे करत बोलला.


"हमम्म... अर्णव थँकयु, काल पासून तुझी खूप हेल्प झाली. बाबाला तुझा खूप आधार मिळाला, तो माझ्यापुढे काहीही बोलला नाही पण तुला नक्कीच मनातले सगळे बोलेल. तू वेळेवर आमच्यासाठी आलास..."सायली.

"सायली पागल आहेस का??? अरे मी कायम तुमच्या बरोबर आहे, तुला जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा मी समोर उभा असेल.
मला सांगा आता तुझा पुढे काय करण्याचा विचार आहे? " अर्णव.


"अर्णव मला माझ्या प्रोफेशन चा उपयोग करून घ्यायचा आहे. मी काल जे माझ्या बरोबर घडले तसे अजून बऱ्याच मुलीबरोबर घडत असेल त्यांच्यासाठी लढायचे आहे.
आज पासून हुंड्याला बळी पडणाऱ्या बापांची मदत करायची आहे, हुंड्या मुळे होणारे मुलींवर अत्याचार यासाठी आवाज उचलायचा आहे. मला समाजातील कन्यादान बापाचे डोक्यावर कर्ज , कर्तव्य नसून. एक अभिमान वाटला पाहिजे, हे पटवून द्यायचे आहे. सुरवात तर मी करणार आहे बघू पुढे अजून काय करता येईल..."सायली.


"मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, तुला असेच करायला पाहिजे. मी कायम तुझ्या बरोबर आहे, तुला माझी जेवढी होईल तेवढी मदत करेल.
माझी बदली होत आहे तर मी लवकर पुण्यात येत आहे तर आपण दोघे मिळून नक्कीच या काम करुयात..."अर्णव.

"अर्णव आपल्या देशात मुलगी झाली की तेवढा आनंद होत नाही जेवढा मुलगा झाल्यावर होतो.. कारण आज कळले आहे, मुलीला दुसऱ्याच्या ताब्यात सोपवताना आई बाबाला किती त्रास होत असेल. काळजावर दगड ठेवून आपला पोटचा गोळा दुसऱ्याच्या हवाली करायचा.. त्यात तिला घर कसे मिळेल याची काळजी.
आणि हुंडा, मुलगी झाली की तिच्या बरोबर आयुष्याची जमापुंजी पाठवायची. मुलगा सांभाळल्याचा सगळा खर्च मुलीच्या घरच्यांकडून वसूल करणे म्हणजे लग्न आहे. या भुरसटलेल्या समाजात बदल झाला पाहिजे अर्णव मुलगा मुलगी एक समान नुसते बोलले नाही पाहिजे तर तसे वागवले पण पाहिजे..."सायली.


"अर्णव आणि सायली फ्रेश होऊन बाहेर आले, बराच वेळ बाहेर आई बाबांच्या बरोबर घालवून ते घराबाहेर पडले.
मग ते सिद्ध आणि सिद्धार्थ च्या घरच्यांना धडा शिकवायला त्यांनी कोर्टाचा आधार घेतला.


सायली ने धाडसाने पुढे जाऊन समाजात चालणाऱ्या या प्रथेविरुद्ध आवाज उचलला. सुरवातीला बराच त्रास झाला बऱ्याच लोकांनी विरोध केला. पण हळूहळू समाजात तिचे काम, तिचे नाव होऊ लागले. बऱ्याच मुलींनी आपल्या बापासाठी सायलीची मदत घेतली. हळूहळू बऱ्याच महिला तिच्या बरोबर काम करू लागल्या, बघता बघता एक एंजियो तयार झाली.
अर्णव आणि बाबा ने तिला खूप मदत केली, वेळोवेळी तिचा आधार बनले आणि तिच्या कार्याला पुढे नेण्यास मदत केली.
आज तिच्या जवळच्या लोकांना तिच्या कार्याचा फायदा होऊ लागला, तिने आपले रिपोर्टिंग चे काम चालू ठेवले होते. त्याची तिला बरीच मदत होणार होती. तिने मुलगी आणि हुंडा बंदी यावर बरेच लेख, बातम्या प्रदर्शित केले गेले. तिने स्वतः ने आपल्या कार्याचा आढावा त्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहचवले. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून तिला मदत होऊ लागली.

"सायली तुला जे सध्या करायचे ते तू करत आहेस. पण या बरोबर तुझ्या आयुष्याचा विचार केला पाहिजे.
सिद्ध परत आलाय, तो बाहेर तुझी वाट पाहत आहे. एकदा बोलून घे त्याच्याशी, त्याला काय म्हणायचे आहे ते ऐकून तरी घे..."
बाबा ऑफीसमध्ये येऊन सायलीला सांगत होता, अर्णव ही त्याच वेळी बाजूला बसलेला होता.

"बाबा प्लीज मला त्या माणसाशी काहीही संबंध ठेवायचे नाही. तुला माझी काळजी आहे कळते मला, पण मला अजून खूप कामे करायची आहे . इतक्यात माझा स्वतःचा विचार करून चालणार नाही.."सायली.


"सायली....! मला तुझ्याशी बोलायचे आहे, एकदा मला समजून घे. मला तू माझ्या आयुष्यात पाहिजे, तू नाही तर मला कोणीच नको आहे. गेले एक वर्ष मी तुझ्यासाठी झुरत आहे, तुझी वाट पाहत आहे. मला एकदा माफ कर, मी तुला सगळ्या प्रकारे साथ द्यायला तयार आहे. घर परिवार सगळे सोडून मी फक्त तुझ्याकडे यायला तयार आहे..."सिद्ध डायरेक्ट केबिन मध्ये येत बोलला.


"सिद्ध खूप वेळ झाला आहे, आता माझ्या आयुष्यात तुझी कुठेच जागा नाही. मला माझ्या बाबाचा स्वाभिमान मोठा आहे त्यापुढे माझे प्रेम शुल्लक आहे...
अर्णव तू माझ्याशी लग्न करशील, मला आयुष्य भराची साथ देशील. मी अगदी मना पासून तुझी होऊन राहील. देशील मला साथ...सायली हात पुढे करत बोलली तसे अर्णव ने एकदा सिद्ध आणि एकदा बाबा कडे पाहिले आणि सायलीचा हात हातात घेतला, आयुष्य भरासाठी...........

समाप्त.....

🎭 Series Post

View all