कन्यादान एक कर्तव्य.. भाग 7

कन्यादान.


पूर्वार्ध...
सायलीचे बाबा आणि सिद्धचे बाबा भेटून लग्नाची पुढील बोलणी करणार होते..
सायली आज प्रथमच सिद्धच्या घरी जाणार आहे, बघुया पुढे काय होतेय.


"सायली, आज तू पिंक कलरची साडी नेसून ये. तुझ्यावर तो कलर उठून दिसतो, मला आज तुला त्याच कलरमध्ये बघायचे आहे." सिद्ध फोनवर सायलीला सांगत होता.


"सिद्ध, अरे आता कुठून आणून पिंक कलर? मी तर आजसाठी ही ब्लू साडी तयार केली होती. एकतर आधीच मला साडीचे टेन्शन येते. साडी सांभाळणे किती कठीण आहे, तुला नाही कळणार..."सायली.


"हो ते आहे, पण साडीत तू इतकी भारी दिसते की माझी तुझ्यावरची नजर हटत नाही. त्या दिवशी तू साडी नेसली पण तुला नीट बघता पण आले नाही. त्या वेळी घरात सगळे आपल्याकडेच बघत होते. पण आज तू आलीस की आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. नाहीतर तुला आपले घर दाखवतो, आणि खास करून आपली बेडरूम..."सिद्ध मिश्किलपणे म्हणाला.


"सिद्ध उगीच फाजीपणा करू नकोस. आज आपल्या लग्नाची तारीख काढणार आहेत. थोडेच दिवस, मग मी कायम तुझ्या जवळ राहील. तुझ्या घरी पहिल्यांदा येत आहे तर मला आजचे टेन्शन आले आहे, माझ्याकडुन काही घोळ व्हायला नको.." सायली.


"काही नाही होणार, सगळे ठीक होईल.. पण मला तुला आज बेडरूम दाखवायची आहे. माझी इच्छा आहे तशी..."सिद्ध.

"सिद्ध बस झाले आता, फार बोलायला लागला आहेस. अती चावटपणा करू नकोस ... " सायली काहीशी लाजत म्हणाली.

"अरे हे बरं आहे, मी काय चावटपणा केला? मला आपली रूम तुझ्या आवडीने डेकोरेट करायची आहे. आता तू पाहिली नाही तर फर्निचर, कलर, कसा पाहिजे तर ते कसे सांगणार? तुला काय वाटले? सायली शी शी कसला विचार करते तू? मी काय तुला इतका वाईट वाटलो का.? तुझ्या मनात आपले काहीतरीच असते.. पण तुला जर इच्छा असेल तर मी तयार आहे..."सिद्ध.


"मला आई बोलावते आहे, निघायला उशीर होतोय... " सायलीने लाजतच बोलून घाईत फोन ठेवून दिला. तिकडे सिद्ध सायलीचा चेहरा कसा झाला असेल, आठवून पोट धरून हसत होता.


बाबा आई तयार होऊन बसले होते, सायली अजूनही तयार झाली नव्हती. आई बाहेरून आवाज देत होती पण मॅडमचा अजूनही बाहेर येण्याचा विचार नव्हता. बराच वेळ गेल्यावर सायली बाहेर आली तेव्हा बाबा तिच्याकडे बघतच बसला.

"बंड्या, तू हे काय केले? तुला माहीत आहे ना ही आईची किती फेवरेट साडी आहे, कोणाला हात लावू देत नाही. आणि तू तिच नेसली? पण त्या म्हशीपेक्षा तुला जास्त चांगली दिसते." बाबा मस्करी करत म्हणाला.

"हो आता तुम्हाला मी म्हैसच दिसेल ना? मान्य आता तुमच्या लेकीसारखे सडपातळ नाही राहिले, पण तुमचे सुद्धा तर आता डोक्यावर निम्मे केस राहिले. मग तुम्हाला मीच सूट करेल, दुसरी कोणी भाव पण देणार नाही..."आई.


"अग समजतेस का तू मला? अजूनही लाईन लागेल माझ्यामागे, पण मी तुला सोडून कोणाला बघत नाही. तूच एकमेव राणी आहेस माझ्या या दीलाची..."बाबा फुल्ल ऑन रोमँटिक मुडमध्ये आले.


"बाबा, अरे मी आहे समोर. जरा तरी काहीतरी वाटू द्या रे. आता माझे दिवस आहे, इथे तर तुम्हीच चालू झालात. बिचारा माझा सिद्ध चातकासारखी वाट पाहतोय माझी..."सायली.


"सायली...! माझी ही साडी घालण्याची तुझी हिम्मत कशी झाली? माझ्या भावाने घेतलेली मागची साडी तर तू एक दिवसात फाडून आणली होती. आता तुझा डोळा या साडीवर आहे का?"आई.


"आई, अगं मी तुझी एकुलती एक लाडाची लेक आहे ना? मग मी एक दिवस नेसली तर कुठे बिघडले? असेही तुझ्या नंतर सगळे माझेच तर आहे.."सायली.


"अगं तुला काही वाटते का? आता पासून माझ्या वस्तू हडपण्याची तयारी करते आहे, अहो तुम्ही तर काहीच बोलणार नाही हिला? लाडावून ठेवले आहे नुसते..."आई.

"अग राहू देत, दोन दिवसांनी इथून लग्न करून जाईल, उगीच कशाला त्रास करून घेते? ती गेली मग तुझेच राज्य राहील घरावर आणि माझ्यावर...आता निघुया का? लेट झाले आहे..." बाबा घाईत विषय बदलत म्हणाले.


सिद्धच्या घरातील वातावरण एकदम नॉर्मल होते जसे रोजचे दिनचर्या असते तसेच वागणे होते. काहीच वेळेत सायली तिच्या आई बाबांबरोबर तिथे पोहचली. सिद्धच्या दादा आणि वाहिनीने त्यांचे स्वागत केले आणि आत हॉलमध्ये बसायला सांगितले. काही वेळाने बाबा आणि आजी आले. सायलीने सगळ्यांना नमस्कार केला आणि समोर सिद्धच्या आईच्या बाजूला जाऊन बसली. तिला लाजणे किंवा अगदी मान खाली घालून बोलणे कधी जमले नाही, पण तरी आज आईने खूप समजावले म्हणून ती स्वतःला कंट्रोल करत होती.


"सिद्ध, जा सायलीला घर दाखव. ती पहिल्यांदा आली ना, तिला घर, माणसे आणि नियम सांगशील...."आजी.


सिद्धला तर कधी पासून याच गोष्टीचे वेध लागले होते, घरातले कधी म्हणतील आणि मला सायलीला घेऊन वरती जाता येईल.

"सायली चल…!" सिद्ध पुढे जात म्हणाला. सायलीने बाबा कडे पाहिले, त्याने डोळ्याने हो असा इशारा केला, तशी सायली सिद्धच्या मागे मागे गेली.


सिद्ध सायलीला घर दाखवत होता. रूम, किचन, जिम एरिया, स्विमिंग पूल.. सगळ्या सोई सूविधेने परिपूर्ण असे ते सुखवस्तू घर होते. सायली सगळ्या गोष्टी अगदी निरखून पाहत होती.

"सायली, ही शेवटची जागा आपली बेडरूम!" सिद्धार्थ असे म्हणताच सायली छान लाजली.

सिद्धार्थ तिला आत घेऊन गेला आणि त्यांची होणारी बेडरूम दाखवू लागला. त्यात काय काय बदल हवे ते पण तिला विचारू लागला.

"सिद्ध, रूम खूप छान आहे. सगळे इतके परफेक्ट आहे की त्यात काही बदल करण्याची गरज नाही. मला अगदी अशीच रूम आवडते." सायली बोलत होती तर सिध्दार्थने तिला मागून मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिच्याशी बोलू लागला. सायली त्याच्या असे अचानक जवळ येण्याने थोडी घाबरली पण सिद्धार्थच्या परफ्यूमचा वास नाकात गेला तसे तिच्या अंगावर शहारा आला.


"सिद्ध, सोड ना! कोणी येईल, चांगले नाही वाटत. खाली सगळे लोक आहेत, कोणी वर आले तर उगीच बोलतील..."सायली.


"सायली कोणी नाही येत, मी दादाला सांगितले आहे, कोणी येणार असेल तर तो आपल्याला कळवेल. आणि तू कधीपासून एवढी घाबरायला लागली?" सिद्ध तिच्या कानाजवळ ओठ नेत मुद्दाम तिला चिडवत होता.

"सिद्ध, लग्न करून मी इथे येणार आहे. पण आता जर कोणी पाहिले, तर उगीच माझ्याबद्दल गैरसमज होईल. मी बाहेर कशीही असले तरी मला माझ्या बाबाचा आणि तुझ्या इज्जतीची काळजी तर घ्यावीच लागेल ना.." सायली बोलत होती, पण आज सिद्ध भलत्याच मुडमध्ये होता. त्याने सायलीला बळच आपल्या मिठीत ओढून घेतले आणि तिची हनुवटी, तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठावर आपले ओठ टेकवले.
दोघांचीही पहिलीच वेळ होती त्यामुळे प्रेमाची पहिली सुरावात करताना दोघांच्याही भावना सारख्याच होत्या.
सायली मिनिट भारत लांब झाली आणि रूम्मधून बाहेर पळाली. सायली स्वतःला नॉर्मल ठेवत खाली सगळ्यांमध्ये येऊन बसली, सिद्ध पण तिच्या मागून खाली आला.


"बर झाले तुम्ही आलात, लग्नाची पुढच्या आठवड्याची तारीख काढली आहे, नंतर सहा महिने तारीख निघणार नाही. बघा तुम्हाला काय वाटते?" सिद्धचे बाबा.


सायलीच्या बाबांच्या चेहऱ्यावर मात्र खूप टेन्शन दिसत होते, पण मुलगी आज सिद्ध बरोबर किती आनंदात आहे हे बघून त्यांनी स्वतःला कसेबसे हसत ठेवले.

सायलीने बाबाकडे आणि मग सिद्धकडे पाहिले. आठ दिवसांत कसे होणार सगळे, एवढी सगळी तयारी कसे करणार. ती मनात विचार करत होती. सिद्धने तिला डोळ्याने सगळे होईल असे खुणावले आणि एक गोड स्माईल दिली.


सायली आणि तिचे घरचे काही वेळ थांबून परत निघाले. पण सायलीच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

"बाबा, काय झाले? कसला विचार करतो आहेस? इतक्यात तयारी कशी होईल याचेच टेन्शन आले ना?" सायली बाबाला विचारत होती.

"बंड्या, इतक्या लवकर कसे होईल? आपल्या कडून सगळे नीट होईल ना?" बाबा बोलत एक होता पण मनात त्याच्या वेगळेच विचार चालू होते.


"बाबा, होईल रे सगळे नीट. आपण कॉन्ट्रॅक्ट देऊ म्हणजे आपल्याला फार काळजी राहणार नाही आणि सिद्ध आहे की मदतीला, तो करेल मदत..."सायली.


"हो बाळ, आपण सगळे करू, हा बाप तुझ्यासाठी काहीही करेल. तू खुश आहेस तर सगळे करेल मी..."बाबा बोलून त्यांच्या खोलीत गेले.


क्रमशः…

🎭 Series Post

View all