कन्यादान एक कर्तव्य

कन्यादान बापाचे एक कर्तव्य


     "अरे साला कोणाचा जीव जड झालाय, जो माझ्या गाडीखाली मरायला आलाय.
अरे ये हिरो मरण्याची एवढीच हौस आहे तर रेल्वे खाली जाऊन जीव दे. माझ्यावर उगीच खुनाचा आरोप लागेल , अजून लग्न व्हायचे आहे माझे......खुनी बायको आवडणार नाही कोणाला." ती रागाने गाडीवरून खाली उतरून ओरडत होती.


"ओ मॅडम का उगीच गोंधळ घालताय. असेही तुमच्या या खटाऱ्याखाली येऊन कोण मरेल?
आणि या गाडीखाली माणूस मरणार नाही फक्त हात पायाला लागेल थोडेफार,कश्याला उगीच आमचा वेळ घालताय. चला गाडी बाजूला घ्या, रस्ता जाम नका करू उगीच." एक मुलगा डोक्यावरचे हेल्मेट काढून तिच्यावर ओरडू लागला.


"तू? ती पुढे काही बोलणार पण त्याचा चेहरा बघून ती मंत्रमुग्ध होऊन त्याला बघू लागली.
कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासून ज्याच्या मागे वेडी होऊन फिरत होती तोच सिद्धार्थ मराठे.
आज तिच्यापुढे उभा होता.
कॉलेज चा चॉकलेट बॉय.
दिसायला एकदम हँडसम, गोरापान, जिममध्ये जाऊन बनवलेले पिळदार शरीर...  आणि मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा.


"ओ मिस. कुठे हरवलात?"
सिद्धार्थ तिच्यापुढे चुटकी वाजवत बोलला.
.
"तुझ्यात." ती अजूनही त्याच्यातच हरवली होती.

"काय नमुना आहे? डोक्यावर पडल्या आहेत का?
मागे ट्रॅफिक जाम झाले आहे. बाजूला होऊन रस्ता मोकळा करण्याचे उपकार कराल का?" सिद्धार्थ वैतागत बोलला.


"हे माझे कार्ड. मी सहा वाजता आपल्या कॉलेज जवळच्या सी सी डी मध्ये वाट पाहिलं. तू येशील नक्की." ती  घाईत गाडी बाजूला करत बोलली आणि त्याला एक स्माईल देऊन निघून गेली.


"काय ?अरे हे काय आहे? कार्ड देऊन निघून गेली. कोण आहे ही मुलगी नक्की? आणि तुलाच भेटायला बोलावले आहे. स्माईल तर कसली किल्लर होती, एकदम कातिल.
यार आम्ही तर कधी पासून लाईन मध्ये उभे आहोत. आम्हाला कोणी चारा पण घालत नाही." सिद्धार्थचा मित्र साहिल मागून त्याला बोलला.


"सिद्धार्थ हातातील कार्ड बघत गालात हसला.
"सायली पाटील.इन्फोसिटी मेडिया."


 "सिद्धार्थ कोण होती रे ती?" ओळखतो का तू तिला? तुला इंटरेस्ट नसेल तर माझी सेटिंग लावून देशील का?" साहिल बोलला तसा सिद्धार्थने एक रागाचा कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि गाडीला किक मारली.
आता निघायचे की बॉसच्या शिव्या खायच्या आहेत, उशीर झाला म्हणून." साहिल शांतपणे गाडीवर जाऊन बसला. बॉस याचा बापच आहे तरी नोकरा सारखे वागवतो याला. हे बेन पण किती घाबरते बापाला."साहिल मनात शिव्या घालत बसला.


  
"सायली कोण होता ग तो? तू त्याला डायरेक्ट कार्ड देऊन आलीस. तुला भीती नाही का वाटत?^
असे कोणाला काही ओळख नसताना आपली इन्फफॉमेशन दयायला.
पण काही असो मुलगा फारच हँडसम आहे बर का" प्राची सायलीची मैत्रीण.


"प्राची तो अनोळखी नव्हता.आज जर भेटायला आला तर तुला कळेल सगळे. चला आता काम करूया, नवीन न्यूज आली आहे ती कव्हर करायला जायचे आहे आता.
साहेबांनी सांगितले आहे न्यूज नाही तर परत ऑफिसमध्ये पाय पण द्यायचा नाही." सायली बोलून कॅमेरा हातात घेऊन बाहेर पडली.


दिवसभर काम करून पण आज सायली मॅडम उत्साहात होत्या. संध्याकाळी सहा वाजेचे वेध लागले होते. कॉलेज नंतर आज तीन वर्षाने त्याला भेटणार म्हणून आनंद काळजात मावत नव्हता.


"सायली सहा वाजून वीस मिनिट झाले तरी तुझा हृतिक रोशन काही येत नाही."

"त्याचा नंबर पण नाही त्याला कॉल करून विचारायला आणि येईल की नाही हे पण माहीत नाही."


असे रोडवर भेटले की त्याला भेटायला सांगितले काय विचार करत असेल तो तुझ्या बद्दल." प्राची घड्याळ बघत बोलली.

"डार्लिंग थोडा दम काढ,तो नक्की येईल खात्री आहे मला. त्याला फक्त वेळेवर न येण्याचा रोग आहे. अजून तो बरा झाला नाही, हळूहळू त्याला बरे करेल मी माझ्या रांजनाला." सायली फुल्ल एक्साईटमेंट होती.


"सिद्धार्थ आठ वाजत आले. तुला त्या हिरोईन ने सहाला बोलावले होते. तूला तर तिचे कार्ड पण जपून ठेवता आले नाही.त्यातल्या त्यात मुद्दाम कामात इतका वेळ घालवला.

तू भेटायला जायचे की नाही यातच दोन तास घालवले. आता पर्यत काय तुझी वाट पाहत उभी असेल का हिर?" साहिल गाडीवर मागून ओरडून बोलत होता.


"खरंच जर तिला माझी हिर बनण्याची इच्छा असेल तर नक्की थांबेल ती.
(तुला विसरून पुढे गेलो होतो, कधी वाटले नव्हते परत आपली भेट होईल. पण तू अशी अचानक माझ्या समोर आलीस. परत मला तुझ्याकडे ओढून घेतले. आज जर तू माझी वाट बघत थांबली असशील तर तुझा रांजना तुला आज नक्की भेटेल. सिद्धार्थ मनात विचार करत कॅफे जवळ पोहचला.)


"सायली अजूनही तिथेच बसली होती. समोर दहा बारा कॉफीचे कप एकावर एक रचून ठेवले होते.
दाखवण्यासाठीच ठेवले होते सगळे. म्हणजे कळेल की किती बिल भरायचे आहे.


"सॉरी थोडा उशीर झाला. मला वाटले तू गेली असशील.पण अजूनही तू वाट पाहत आहेस." सिद्धार्थ समोर बसत बोलला.


"फार नाही दोन तास लेट आहेस फक्त आणि सवय आहे मला. आजही खात्री होतीच तू येशील म्हणून. आणि वाट पाहणे कधीच सोडले नव्हते मी.
मला माहीत होते डेस्टिनी मला तुझ्या पुढ्यात नक्की परत उभे करेल. पण इतक्या लवकर याची अपेक्षा नव्हती केली मी." सायली सिद्धार्थ च्या डोळ्यात बघून बोलत होती.
आजही ते डोळे काहीतरी लपवत होते.


"आम्ही पण आहोत इथे जरा ओळख करून दिले तर उपकार होतील." प्राची बोलली.


"अरे यांच्या रहस्यमयीन वर्तवणुकीतून नाही वाटत यांना आपली काही पडलेली आहे. मीच ओळख करून देतो. या पामराला साहिल बोलतात, सिद्धार्थ चा एकुलता एक वानीतिणीचा मित्र." साहिल ओळख करून देत बोलला.


 "ओहह....! तर s म्हणजे सिद्धार्थ होते का? म्हणून चावीच्या किचन पासून अंगात घातलेल्या टॉप पर्यत सगळी कडे सिद्धार्थचा s  होता.
बाय द वे मी प्राची सायली ची हक्काची आणि प्रिय मैत्रीण. कायम पाठराखीन असते मी हिची.


 "बर ओळख समारंभ  झाला असेल तर काही खायला मागवताय का? जाम भूक लागली आहे. या सिद्धार्थने दुपार पासून पाणी नाही पाजले, इथे यायचे की नाही याचं विचारात अर्धा दिवस घालवला."
पण अजून याचे रहस्य काही कळत नाही मला. साहिल आणि प्राची बोलल्यावर सायलीची विचार शृंखला तुटली.


"प्राची हा माझा कॉलेजचा मित्र सिद्धार्थ आहे. आम्ही दोघे कॉलेजमध्ये एकत्रच होतो.
पण याचे आणि माझे कधीच जमले नाही.हा जमीन तर मी आसमान होते....
पण हा कायम माझा क्रश होता. पहिल्या दिवसापासून याच्या प्रेमात होते मी..पण याने कधी माझ्याकडे वळूनपण पाहिले नाही. याला नक्की कश्या मुली आवडतात? हेच कळत नव्हते. पण मी शेवट पर्यंत प्रयत्न केले आणि मला यश आले..


पण ज्या दिवशी याला माझ्या भावना कळल्या त्याच दिवशी याचा अपघात झाला, आणि मी याच्या आयुष्यात आल्याने हे घडले असा ग्रह करून आम्ही दोघे एकमेकांपासून लांब झालो.

पण शेवटी हा बोलला होता. जर आपलं नशीब आपल्याला परत एकत्र आणेल तर आपण नक्की भेटू." सायली बोलून शांत झाली.


सिद्धार्थ फक्त तिला बघत होता. अजूनही सायली तशीच आहे.

बिनधास्त,मोकळी, स्वच्छंदी आणि निरागस.याच निरागसपणा च्या तर मी प्रेमात पडलो होतो. सगळ्यात वेगळे लीडर पणे वागणे, समाजकार्यासाठी स्वतःला झोकून देणे ह्यातच गुंतलो होतो मी.. पण मी हिच्या योग्य आहे का.? का आवडतो वेडीला, अजून वाट पाहत आहे माझी.

🎭 Series Post

View all