आपण मागील भागात पाहिले की निशा मीराला कांता बद्दल सगळं काही सांगत असते.. निशा म्हणते की त्यांच्या आयुष्यात एक वेगळच वळण मिळालं ते काय पाहू..
एक दिवस कांता आणि मोहन त्याच झाडाखाली बोलत बसले होते. कांता मोहनला म्हणाली, "मला असे नुसता भेटायचा कंटाळा आला आहे. आपण लवकरच लग्न करूया."
मोहन "करूया ग पण घरची परवानगी नाही मिळणार."
दोघांनाही माहित होते की घरातलेच काय गावातले पण या लग्नाला नकारच देणार आहेत. म्हणून ते दोघे पळून जाण्याचा विचार करत होते.
"मग आपण पळून जाऊन लग्न केले तर.. मी तयार आहे. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार.." कांता.
"मी पण तुझ्या शिवाय नाही ग राहू शकणार राणी. पण आपल्याला या गावातील लोक सुखाने राहू देणार नाहीत." मोहन.
"मग आपण दुसरीकडे जाऊ. पण असं नुसताच भेटायचं नाही आणि हो माझ्या घरचे आता माझ्यासाठी स्थळ बघणार आहेत. माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे घरात. त्यामुळे काय करायचं ते लवकरच कर." कांता.
"बरं आपल्या लग्नाला कोणी मान्यता देणार नाहीत. मग आपल्याकडे पळून जाऊन लग्न करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण पळून जाऊन लग्न करूया. पण कधी आणि कसं हे ठरवायला हवं." मोहन.
"मी सांगते. उद्या मी घरी काहीबाही सांगून याच झाडाखाली तुझी वाट बघत बसते तू लवकर ये. आपण तुझ्या बहिणीला विश्वासात घेऊ. ती आपल्याला मदत करेल. मग आपण दुसरीकडे जाऊन आपला संसार थाटूया. चालेल का?" कांता.
"माझी होणारी बायको हुशार आहे. बर तसच करूया." मोहन.
"छान वाटलं होणारी बायको म्हणालास. पण मला खूप भीती वाटत आहे. कोणी बघितलं तर? कोणी काही केलं तर?? अश्या प्रश्नाने माझं मन घाबरत आहे." कांता.
"घाबरू नकोस मी आहे ना. सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव." मोहन.
"तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर तुझ्याशी लग्न करत आहे. मग आपण उद्या नक्की आपण लग्न करूया. मी येथेच तुझी वाट पाहिन तू नक्की येशील ना?" कांता.
"हो ग माझी राणी. मी नक्की येईन." असे म्हणत मोहन तिचा हात हातात घेतो. कांताला पण बरे वाटले.
पण त्याच वेळी कांताच्या भावाचा मित्र ते सगळं बघतो आणि कांताच्या भावाला जाऊन सांगतो. कांता घरी जाते तर सगळे तिच्याकडे रागाने बघत असतात. तिला काहीच कळेना की ह्यांना काय झालंय. ती सगळं आवरून खोलीत गेल्यावर तिच्या पाठोपाठ सगळे खोलीत जाऊन तिला जाब विचारतात. ती घाबरून जाते आणि काही न बोलता गप्प बसते.
कांताचे भाऊ तिला खूप मारतात.. कारण तो मित्र गावभर सगळं सांगेल ह्या भीतीने आणि रागाने रक्त येईपर्यंत तिला मारतात. ती बेशुद्ध पडते. पण तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही...
कांताच्या मनात फक्त एकच विचार उद्या झाडाखाली जाऊन मोहनला भेटायच.. आणि मग पळून जाऊन लग्न करायचं.. याच विचारात तिच्या भावांनी मारल्यामुळे तिला मरण आलं...
इकडे मोहन पण काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. कांता येऊन बसली असेल म्हणून घाईघाईने येत असताना घसरून नदीत पडल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला कारण त्याला पोहता येत नव्हते. इतरांनी पाण्याच्या आत जाऊन त्याचा मृतदेह पाहिला पण मोहनचा मृतदेह कुठेच सापडला नाही.
मग दुसर्या दिवशी ती त्या झाडाखाली बसलेली एका व्यक्तीला दिसली पण इतर कोणाला दिसली नाही. मग तिचा आत्मा त्या झाडाखाली आहे असे लोक म्हणू लागले. त्या दिवसापासून ती बिचारी अजूनही त्याची वाट बघत त्या झाडाखाली बसली आहे.
मोहनच्या घरातील सर्वजण हे घर सोडून दुसरीकडे रहायला गेले. कांताला मोहनच्या मृत्यूबद्दल काहीच माहिती नव्हते. ती अजूनही त्या झाडाखाली त्याची वाट बघत बसली आहे. तो एक दिवस नक्की येईल ही तिची भाबडी आशा...
निशा हे सगळं मीराला सांगत होती. मीरा हे ऐकून सुन्न झाली. "मग ती इतक्या वर्षांनी मलाच का दिसली?" मीरा.
"हे आपण गावाबाहेर असलेल्या त्या महाराज ला विचारू या. ते बाबा सगळ्यांना सल्ला देतात. अंगात भूत गेल्यावर ते पण काढतात आपण त्यांना विचारले तर ते काहीतरी उपाय नक्कीच सुचवतील." निशा.
"ठिक आहे आपण उद्याच जाऊ" असे म्हणून मीरा घरी जाते.
आता ते साधू महाराज काय सांगणार ते पाहू..
रहस्यकथा लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.
*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.
©®प्रियांका पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा