Jan 23, 2022
भयपट

कांता 1

Read Later
कांता 1

मीरा आणि अमरच नविनच लग्न झालं. अमरची नोकरी कोकणात असल्यामुळे तो तिकडेच राहत असे. आता मीरापण लग्न झाल्यावर तिकडेच जाणार असते. तिला खूप उत्सुकता असते की कोकण कसे असेल? तिथला निसर्ग, तिथली माणसं कशी असतील? अमर एक सरकारी अधिकारी होता. त्याची बदली कोकणात झाली होती. इतके दिवस तो मित्रांबरोबर राहत होता. आता त्याचं लग्न झालं होतं म्हणून त्याने हप्त्यावर घर घेतलं होतं.

आता कोकणातील घर म्हणजे निसर्गाच्या कुशीतच असणार. घराच्या सभोवताली आंबा, फणस, काजू अशा फळांची भरपूर झाडे होती. अमरने मीराला लग्न झाल्यावर या सगळ्याचे वर्णन करून सांगितले होते. त्यामुळे ती खूपच उत्सुक होती तिथे जाण्यासाठी.

मीरा आणि अमरच लव्ह मॅरेज. दोघेही काॅलेजला असल्यापासून एकत्र. सुरुवातीला त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीच रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. मीरा ही पण शिकलेली होती. पण तिने लग्नानंतर संसाराला प्राधान्य दिले. नोकरी करायची नाही असे तिने ठरवले.

लग्नासाठी आलेले सगळे पाहुणे आता हळूहळू जात होते. पाहुणे गेल्यावर मीरा आणि अमर त्यांच्या बॅगा भरण्यासाठी घेतात. तिथेच रहायला जाणार असतात म्हणून ते दोघे हनिमूनला जाणार नसतात.

अमरचे म्हणणे असते की "आपण थोडे दिवस तरी आईबाबांच्या सहवासात राहू. तेवढंच त्यांनाही बरं वाटेल."

अमरला जास्त दिवसाची सुट्टी मिळालेली नसते. दहा बारा दिवसांनी ते दोघे जातात. अमरने तेथे स्वतःचे एक घर घेतलेले असते. ते दोघे त्या घरात सामान लावतात. अमर थोडे सामान लावायला मदत करतो. ते दोघे थोडं थोडं करून सामान लावणार होते.

अमरला लगेच ऑफिसला जायचं असतं म्हणून तो लगेच आवरून ऑफिसला जातो. मीरा तिचं सगळं आवरून स्वयंपाक करायला जाते. स्वयंपाक करून ती खिडकीपाशी येऊन बसते. ती सहजच बाहेर बघते तर तिला एक बाई त्यांच्या घराकडे बघताना दिसते.

"ही बाई कोण असेल?" मीरा मनातच म्हणते.

ती एकटक त्यांच्या घराकडे बघत असते. मीराला कळतच नाही की ही बाई असे का बघत आहे.

"जाऊन बघूया कोण आहे ते?" असे म्हणत मीरा तेथे जाते. मीरा तेथे जाते तोपर्यंत तेथे कोणीच नसते.

परत मीरा घरात येते. ते दोघे तिथे नविनच आलेले असल्याने तेथे कोणीच ओळखत नव्हतं. मीरा एकटीच घरात असल्याने तिला थोडी भीती वाटतं होती.

"ती बाई कोण असेल?" असा मनात विचार करत असतानाच मोबाईल वाजला आणि मीरा भानावर आली.

"हॅलो" मीरा.

"अगं काय ग मीरा? पोहोचल्यावर फोन करा म्हणून सांगितले होते. तरी फोन केला नाही." मीराची सासू.

"साॅरी आई. ते सामान लावण्याच्या नादात राहिल." मीरा.

"बरं. मला सांग प्रवास व्यवस्थित झाला ना. काही अडचण नाही ना आली." मीराची सासू.

"नाही आई. अगदी व्यवस्थित प्रवास झाला." मीरा.

"काळजी घ्या दोघेही. तू एकटीच घरात असशील तर आतून लाॅक कर. तिथे तू नविन आहेस." मीराची सासू.

"हो आई. तुम्ही पण काळजी घ्या." असे म्हणून मीरा फोन ठेवते.

इतक्यात अमर येतो. "हाय डार्लींग, चल जेवायला वाढ मला लवकर जायचे आहे." अमर.

"हो" म्हणून मीरा किचनमधे जाते.

अमर हातपाय धुऊन जेवायला बसतो. जेवायला वाढून मीरा "अहो, मला ना त्या समोरच्या आंब्याच्या झाडाखाली एक बाई आपल्या घराकडे बघताना दिसली."

"कोणी तरी शेजारच असेल ग" अमर.

"नाही हो. ती खूप वेगळी होती. मी बाहेर जाऊन बघितले तर ती तेथे नव्हती." मीरा.

"अगं गेली असेल ती तिथून. तू लक्ष देऊ नकोस." अमर.

मीरा "बर" म्हणते पण तिच्या मनातून त्या बाईचे विचार काही केल्या जाईना.

आता ही बाई कोण असेल हे आपण पुढच्या लेखात पाहू.

रहस्यकथा लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.


*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..