Login

कानगोष्टी

एकमेकांच्या त केलेले संभाषण
कानगोष्टी

आज एका लग्नात जाण्याचा योग्य आला. सगळे नातेवाईक , मित्र मंडळी आपल्याला गप्पात गुंग होती . एकिकडे लग्नाचा कार्यक्रम चालू होता. तो बघता बघता गप्पाना काही विश्राम नव्हता . आज या लग्नात मी एकटीच असल्यामुळे माझे बारीक निरीक्षण चालू होते. वातावरण म्हणाल तर अगदी सगळी कडे आनंदी आनंद होता. मागे सनई चे सूर वाजताय त्यात गुरुजींचा मंत्रांचा आवाज घुमतोय. मंगलमय वातावरण निर्माण झालं .

कोणी हातवारे करून तर कोणी हसत खिदळत , कोण कानात कुजबुजत असा विविध प्रकारात गप्पा चालू होत्या. सहज माझे लक्ष एक चार - पाच जणी बसल्या होत्या त्यांच्याकडे गेले. त्या एकमेकींच्या कानात एकदा लग्न विधीकडे बघत हळूहळू काहीतरी बोलत होत्या. त्या जसे जसे बोलत होत्या तसे तसे त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते. मला त्याचे खूप कुतूहल वाटत होतं . कारण हे सगळं मी लांबून बघत होते ना मी त्यांच्यात असते तर मी पण त्या गप्पात कधी सामील झाले असते कळलेच नसते . असो.

कुतूहल यासाठी कि आपण लहानपणी कानगोष्टी हा खेळ खेळायचो . त्यात एकेक गोष्ट आपण कानात सांगत जायचो आणि ती ऐकून पुढचा दुसऱ्याच्या कानात सांगायचो . यात किती बरोबर यायचे किती चूकायचे हे आपल्यालाच माहिती . ते खेळताना दुसर्याने जे सांगितले आणि आपण काय ऐकले यात कधी कधी गफलत होयची पण मी ऐकलंय तेच बरोबर समजून पुढे खेळात राहायचो . त्यात जरी चुकलं तरी तो खेळ समजून सोडून देयचो .

पण आता ज्या बायका एकमेकींच्या कानात जे सांगतोय त्यामुळे ते खरं खोट ना बघता पुढे सांगत होत्या. त्यामुळे कोणाच्या आयुष्यात काय वादळ उभं राहील याची कल्पना पण करता येणार नाही . हा एक प्रकारचा कानगोष्टी खेळच आहे .

हा गमतीने लहानपणी शिकवलेला खेळ आज यास्वरुपात बोलून माणसांची आयुष्य बदलवतोय . खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कानगोष्टी हा खेळ न राहता आयुष्याचा एक भाग होऊन गेला आहे .

हे लग्नातील गोष्ट एक निमित्त्य पण खरंच आपण आयुष्यात सारख्या कानगोष्टीचं तर करत असतो. एकमेंकाना सांगताना त्यात पण आपला स्वार्थ बघत असतो . या एका खेळाचे पुढे केवढं भलंमोठं रूप दिसून येते . याची कल्पनाच करता नाही येणार .

- सौ . चित्रा अ . महाराव