काना मागून आली आणि तिखट झाली भाग १
‘क्रिएटिव्ह स्केल स्टुडिओ’ ही एक नावाजलेली ब्रँड डेव्हलपमेंट आणि डिजाईन एजन्सी होती. त्यांचा क्लायंट बेस मोठा होता – बुटिक ब्रँड्सपासून मल्टिनॅशनल कंपन्यांपर्यंत. त्यांचं मुख्य काम म्हणजे लोगो डिझाईन, कॅम्पेन कन्सेप्ट तयार करणे, ब्रँडिंगची दिशा ठरवणे आणि सोशल मीडियासाठी प्रभावी कंटेंट डेव्हलप करणे.
संपदा देशपांडे, या कंपनीमध्ये गेली आठ वर्षं सीनियर क्रिएटिव्ह म्हणून काम करत होती. ती वेळेची पक्की, स्पष्ट बोलणारी आणि आपल्या कामात शिस्तीने काम करणारी होती. तिचं कामं पारंपरिक संकल्पनांवर आधारित असे. यशस्वी असलं, तरी नवीन पिढीच्या अपेक्षांशी ते कधी कधी जुळत नसे.
त्या सोमवारच्या सकाळी ऑफिसमध्ये एक नवीन चेहरा रिसेप्शनजवळ उभा होता – सायली राऊत. ती नुकतीच कंपनीमध्ये ‘क्रिएटिव्ह स्ट्रॅटजिस्ट’ म्हणून रुजू झाली होती.
श्रीधरजी जे या कंपनीचे संस्थापक आहेत ते संपदा ला म्हणाले,
“संपदा, हिला घेऊन काॅन्फरन्स रूममध्ये जा. नवीन ब्लॅन्डच्यि कॅम्पेनसाठी ब्रेन स्टाॅर्मींग आहे. आहे. सायलीनं काही नवीन कल्पनेचे आराखडे तयार केले आहेत.”
संपदा थोडं हसून म्हणाली
“हो. चला, सायली. लेट्स सी व्हाॅट यू हॅव गाॅट.”
सायली: “थॅंक्यू मॉम! मी खूप उत्साहित आहे. मी सादरीकरण करताना काही इन्टरॅक्टिव्ह संकल्पना आणल्या आहेत, थोड्या अनकन्व्हेशनल आहेत पण…”
संपदा: कटाक्ष टाकून म्हणाली, “ठीक आहे. मिटींगमध्ये पाहूया. आपल्या क्लायंट गाइडलाईनस फारच स्पेसिफिक असतात.”
मिटींगमध्ये सायलीने ज्या कल्पना मांडल्या, त्या खूपच आधुनिक होत्या – संपदा थक्क झाली होती.
त्या दिवसानंतर ऑफिसमध्ये एक बदल जाणवू लागला. श्रीधरजी सायलीला अधिक वेळ देत होते, तिच्या कल्पनांचं खुलेपणानं कौतुक करत होते.
संपदा काम करत होती, पण ती आतल्या आत अस्वस्थ होती. रोज ऑफिसमधून घरी गेल्यावर तिचा मूड बदललेला असायचा. आधी हसतखेळत असलेली संपदा आता शांत, आणि थोडी चिडचिडी झाली होती.
सायलीला हे काहीच कळत नव्हतं. ती तिच्या कामात रमलेली होती, नव्या कल्पनांनी भारलेली होती.
रात्री संपदा स्वतःशीच बोलत होती –
“ही कुठून आली इतक्यातच… आणि आता सगळ्यांच्या तोंडावर तिचंच नाव. मी इथे वर्षांनुवर्षं मेहनत करतेय… ते कोणालाच आठवत नाही?आणि ही सगळ्यांना इतकी आवडते?”
तिच्या मनात पहिल्यांदा त्या शब्दांची चाहूल आली–
"काना मागून आली आणि तिखट झाली…"
या शब्दा बरोबर तिच्या डोळ्यातून गरम अश्रू वाहू लागले. पुढे काय होईल? संपदा आणि सावलीत समेट होईल की विस्फोट?
.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा