Login

काना मागून आली आणि तिखट झाली भाग २

एक कथा
कानामागून आली आणि तिखट झाली भाग २:

सायली ऑफिसमध्ये रमून गेली होती. तिचा उत्साह, आत्मविश्वास आणि कामामधील नवता सगळ्यांच्या नजरेत भरत होता. तिने काही दिवसांतच "अर्बन खादी” या नव्या क्लायंटसाठी एक अॅक्टिव्ह सोशल मीडिया स्ट्रॅटेजी तयार केली होती.
त्या दिवशी सकाळी प्रेझेंटेशन रुम मध्ये श्रीधरजी, क्लायंट, सायली आणि संपदा होते.
सायलीने अत्यंत उत्साही पद्धतीने सादरीकरण सुरू केलं –
“अर्बन खादी” ही केवळ वस्त्रांची ब्रँड नाही, तर ती भारतीय शाश्वततेची ओळख आहे. त्यामुळे मी या साठी 'खादी ही खरी स्टाईल' हा विषय मांडतेय. त्यासाठी

स्थानिक कारागिरांच्या कहाण्या
किंवा
मुलकी हस्तकला कलाकारांच्या कथा

(स्पष्टीकरण: जे कारागीर पारंपरिक हस्तकलेत निपुण आहेत आणि त्यांच्या कलेमागील प्रेरणादायक गोष्टी.)


पर्यावरणपूरक जीवनशैली
किंवा
निसर्गस्नेही शैली

(स्पष्टीकरण: अशी जीवनशैली किंवा फॅशन जी पर्यावरणाचा विचार करून राबवली जाते.)


स्थानिक कारागिरांच्या प्रेरणादायक कथा
निसर्गस्नेही सौंदर्यशैली / जीवनशैली
श्रीधरजी: “ब्रिलियंट सायली! तुम्ही खूप विचारपूर्वक सादरीकरण केलंय. आपल्या ब्रँडला नेमकं काय हवंय, ते ओळखलंय तुम्ही.”
क्लायंटने सुद्धा टाळ्या वाजवल्या. संपदा थोडं हसली, पण ते हसू नकली होतं. तिच्या मनात काहीतरी टोचत होतं.
सायलीने सादरीकरण संपवून कंप्युटर बंद केला आणि संपदाकडे पाहून म्हणाली –
“मॅम, तुम्ही काही फीडबॅक द्याल का? मी पुढच्या सादरीकरणासाठी शिकायला तयार आहे.”
संपदा: थोडा दर्प मिसळलेला आवाज “तू बरीच मेहनत घेतली आहेस. पण ब्रँडची मूळ ओळख जपणंही महत्त्वाचं असतं. संकल्पना नवीन असेल, पण वापरकर्त्याला जुळवून घ्यायला वेळ लागतो.”
सायली (गोंधळून): “ओह, म्हणजे मी थोडं जास्त फॅन्सी विचार केलं का?”
श्रीधरजी: “संपदा, तुमचं म्हणणं योग्य आहे. पण एखादा नविन विचार स्वीकारणं हीसुद्धा एक कलाच आहे. खरं तर मला वाटतं – तुम्हाला सायलीकडून थोडं शिकायला हवं. ती तुमच्या अनुभवाला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकेल.”
ही वाक्यं संपदाला कानात शिष्याचा रस ओतल्यासारखं वाटलं
तिचा चेहरा स्तब्ध झाला. इतकी वर्षे या कंपनीत घालवून, माझी तिच्या कष्टांशी अशी तुलना? ती शांतपणे उठून केबिनकडे गेली.
केबिनमध्ये जाऊन ती खिडकीतून बाहेर पाहत राहिली. तिच्या मनात विचारांचा गोंधळ होता.
“मी इथे आठ वर्षं आहे… आणि आता मला शिक म्हणतात… ही मुलगी आली कुठून? आणि एवढ्या लवकर सगळ्यांची मर्जी जिंकली…”
ती स्वतःशीच पुटपुटली –
"काना मागून आली आणि तिखट झाली खरंच!"
त्या संध्याकाळी ती उशिरापर्यंत ऑफिसमध्ये बसली होती. सगळे गेले होते, पण ती एकटी. तिच्या डेस्कवर सायलीने ठेवलेला एक छोटाशी चिठ्ठी होती —
“थॅंक्यू मॅडम”तुमच्यासोबत काम करणं माझ्या साठी हेच शिकणं आहे!”
संपदा काही क्षण त्या चिठ्ठीकडे पाहत राहिली. तिच्या मनातली कुरकुर थोडी विरघळू लागली होती… पण अद्याप पूर्णपणे नाही.
संपदेच्या मनात सायली बद्दलची अढी जाईल की नाही?

🎭 Series Post

View all