Oct 24, 2021
कथामालिका

कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे...भाग १ला

Read Later
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे...भाग १ला

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
कामीनी ट्रॅव्हल्स पर्व २रे भाग १ला


कामीनी ट्रॅव्हल्स सुरु होऊन आज आठ वर्ष झालीत. पहिली तीन वर्ष हर्षवर्धनच्या तब्येतीत सुधारणा करण्याकडेच लक्ष होतं.त्यामुळे ट्रॅव्हलचा व्यवसाय मुंगीच्या पावलानी पुढे सरकत होता. तीन वर्षांत हर्षवर्धनच्या जिद्दीमुळे तसेच प्राची आणि कामीनीबाईंच्या कष्टामुळे हर्षवर्धन पुर्वी सारखा झाला.अगदी पूर्वीसारखं व्हायला थोडी वाट बघावी लागणार होती.

आता हर्षवर्धनला फोनवर दुस-याशी कसं बोलावं हे कळू लागलं होतं.

कामीनी ट्रॅव्हल्सचा या व्यवसायात ब-यापैकी जम बसला होता. हर्षवर्धनच्या अश्या केस मुळे सुरवातीपासूनच कामीनी बाई आणि प्राची या व्यवसायात हर्षवर्धनच्या बरोबरीनी मेहनत करत. कारण हर्षवर्धन एकदम खोलवर विचार करू शकत नसे. तसच एकदम निर्णय घेऊ शकत नसे.दोन वर्षापूर्वी कामीनी ट्रॅव्हल्सचं स्वतःचं ऑफीस झालं होतं. हर्षवर्धन आणि प्राचीच्या लग्नाला आता आठवर्ष झाली होती. त्यातील दोन तीन वर्ष हर्षवर्धनला पाहिल्यासारखं करण्यातच गेली होती. प्राचीला कसली घाई नव्हती.हर्षवर्धन बरा होतं हे महत्वाचं होतं. मेंदू सारख्या हुशार पण नाजूक भागावर उपचार करताना घाई करून चालणार नव्हतं.


आत्ता स्वतःच्या केबीनमध्ये बसून प्राची पुढच्या टूरचं सगळं नियोजन कसं केलेलं आहे हे बघत होती. हे बघता बघता प्राचीचं मन भूतकाळात गेलं. तिला हर्षवर्धन,आणि कामीनी बाईबरोबर भय्यासाहेबांचं घर सोडल्यापासूनचे दिवस आठवू लागले.


लग्नानंतर हर्षवर्धनची स्थिती बघता चिडून घटस्फोट घेण्याऐवजी तसंच भय्यासाहेबांनी दिलेली ऑफर स्विकारण्या ऐवजी तिनी हर्षवर्धनला सुधारण्याचं धाडस दाखवलं. ते दाखवताना ती भय्यासाहेबांबरोबर गनिमी कावा खेळली. प्राचीला प्राप्त करण्याच्या विकृत लालसेपायी त्यांना तिचा कावा कळलाच नाही. ही त्यांच्या दृष्टीनी एक शोकांतिका होती.


आठ वर्षांपूर्वी कामीनी ट्रॅव्हल्स सुरू केलं होतं. सुरवातीला भाड्यावर बसेस घेऊन शशांकच्या मित्राच्या मार्गदर्शनाखाली छोटे टूर आखल्या गेले. शशांकचा मित्र मंगेश भय्या ट्रॅव्हल्सच्या क्षेत्रातील बारकावे प्राचीला समजाऊन सांगत असे. व्यवसायाची सुरुवात होती. त्यात हर्षवर्धनच्या सुधारणेचकडे पण तेवढंच लक्ष देणं आवश्यक होतं.

सुरवातीला हर्षवर्धनला प्रवासात एकटं न पाठवता एकटी प्राचीच जात असे. राधा आणि शशांक मधून मधून तिच्याबरोबर जात. संपूर्ण प्रवास एकट्यानी नियोजीत करून पूर्ण करण्या इतका हर्षवर्धनच्या मेंदूची कृती तत्परता वाढली नव्हती. बरेच वर्षांच्या व्यसनामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी झालेली होती.ती वाढवणं आधी गरजेचं होतं. तोपर्यंत प्राची राधा, शशांक आणि मंगेशभय्या यांच्या मदतीनं ट्रॅव्हल्स सारखा व्यवसाय नेटानी पुढे नेत होती.


सुरवातीला हर्षवर्धन बरा झाल्यावर त्याला काही बौध्दीक कसरती करायला दिल्या होत्या.रोज पेपरमधे येणारे शब्दकोडे सोडवा असं तिथल्या डाॅ.नी सांगीतलं होतं. शब्द कोडं सोडवताना योग्य शब्द आठवण्यासाठी त्यांच्या मेंदूवर ताण येईल .त्यातून हळुहळू त्याची विचार करण्याची शक्ती वाढेल तशी त्याला एक दिशापण मिळेल.

पहिले काही दिवस तर तास न तास बसूनही त्याला एकही शब्द आठवायचा नाही. हळुहळू त्याच्या मेंदूकडून तसा अभ्यास करवून घ्यायला सुरुवात केली. प्राचीची एक मैत्रीण आशू मतीमंद मुला़ंच्या शाळेत शिकवायची.तिला प्राची नी विचारलं की "तू याबाबतीत माझी काही मदत करू शकतील का?"असं प्राची नी आशूला फोन करून विचारलं.

तर आशू म्हणाली.
"प्राची हर्षवर्धन मतीमंद नाही पण नशेचं सतत इतकी वर्ष सेवन केल्यामुळे त्याचा मेंदू आळसावला आहे. त्यामुळेच कुठलीही कृती सामान्य माणूस जसा पटकन करतो तसा हर्षवर्धन करू शकत नाही. हर्षवर्धनचा मेंदू हा विचार करून हुकूम सोडण्यासाठी एवढा चंट नाही राहीला.त्याला तसा चंट करावा लागेल.

त्याच्या मेंदूवरचा नशेच्या ताबा निघायला थोडा वेळ लागेल.कारण इतकी वर्ष त्यांच्या मेंदूला मेहनत घेण्याचीच सवय नव्हती. तो फक्त आराम करत होता.प्राची याला वेळ लागेल पण हे अशक्य नाही.तू काळजी करू नकोस आपण हे करू.तू ज्या पद्धतींनी हर्षवर्धनला यातून बाहेर काढलं आणि आताही तुझा प्रयत्न चालूच आहे. तुला हॅट्स ऑफ." ती प्राचीला मदत करायला तयार झाली.

"आशू हर्षवर्धनला पूर्वीसारखं करण्याचा माझा आणि आईंचा प्रयत्न चालू असतो.आज हर्षवर्धन मला आपली बायको म्हणून ओळखतो यांचा आनंद आहे.पण मला एवढ्यावरच थांबायचं नाही.कामीनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय त्याने समर्थपणे सांभाळला पाहिजे हे माझं स्वप्नं आहे.आशू तू आलीस त्यामुळे मला धीर आला.थॅंक्स मी हाक मारली आणि तू लगेच आलीस."
"ऐ बाई फार सेंटी करू नको मला. आपण करू प्रयत्नं. ऊद्यापासून मी येते." प्राचीला आता खूप शांत वाटत होतं. लवकरच हर्षवर्धन पहिलेसारखा होईल याची तिला खात्री वाटली.

हर्षवर्धन मतीमंद नव्हता पण खूप वर्ष ड्रग्ज घेतल्याने त्याच्या मेंदूला शिथीलता आली होती. कुठलीही भावना असो मग ती रागाची असेल किंवा प्रेमाची त्यात आत्यंतिक वरची पातळी तो गाठत असे. जेव्हा तो जसा वागायचा तेव्हा त्याचं वागणं मन घाबरवून सोडणारं असायचं.

त्या भावना इतक्या तीव्र पातळीवर व्यक्त होऊ नये म्हणून शारीरीक व्यायाम त्याच्यासाठी आवश्यक होता तसंच मेंदूला ही व्यायाम आवश्यक होता. हळुहळू या व्यायामामुळे त्यांच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल. मेंदू कार्यक्षम झाला की मेंदूची सदसद्विवेकबुद्धी वाढेल.ती वाढली की कुठलीही भावना इतक्या तीव्र पद्धतीने हर्षवर्धन व्यकृत करणार नाही. तो पूर्वीसारखा होण्यासाठी धीर धरावा लागेल असं डाॅ. म्हणाले होते.

शारीरिक आणि बौद्धिक व्यायाम सुरू केल्यावर लगेच त्याचा परीणाम अपेक्षीत करू नका. हे डाॅ.चं म्हणणं प्राची आणि कामीनी बाई दोघींनी लक्षात ठेवलं होतं.


एक दिवस हर्षवर्धन खूप उदास होता.कामीनीबाईंनी त्याला खूप विचारलं पण तो त्यांना काही सांगायलाच तयार नव्हता.प्राची घरी आल्यावर कामीनी बाईंनी ही गोष्ट तिच्या कानावर घातली.

"काहीच बोलला नाही तुम्हाला,? कुठे आहे हर्षवर्धन?"
"आपल्याच खोलीत बसलाय." प्राची आत गेली.हर्षवर्धनला असं उदास बसलेलं बघून तिनी विचारलं.

"काय झालं हर्षवर्धन? आज का एवढा उदास आहेस?" पहिले तर तो काहीच बोलला नाही. जेव्हा प्राची नी पुन्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला.
"प्राची मला काहीच जमत नाही."
"असं का वाटतंय तुला?"
"त्या शब्द कोड्यातलं मला काही येत नाही.मी ढ आहे."आणि रडू लागतो. प्राची त्यांच्या डोक्यावरुन हळूच हात फिरवते.आणि म्हणते." हर्षवर्धन तू ढ नाहीस. हे बघ तू ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहेस. जर तू ढ असता तर एका झटक्यात झाला असता का पास?"हर्षवर्धन नाही म्हणून मान हलवतो.
"मी नवरा आहेत तुझा?"एकदम जरबेच.या सुरात हर्षवर्धन बोलला. "हो आहेसच तू माझा नवरा यात शंका कसली आली तुला? हे बघ हे मंगळसूत्र तूच घातलय माझ्या गळ्यात. आठवतय नं?"

"मी नवरा आहे तर मी काम केलं पाहिजे न? पैसे मिळवले पाहिजे." प्राचीला आता त्याच्या ऊदास होण्याचं कारण कळलं.ती तेवढ्याच प्रेमानी ती म्हणाली.

" नव-यानी काम केलं पाहिजे,पैसे मिळवले पाहिजे हे तुझं म्हणणं बरोबर आहे पण कधीकधी नव-याला काम करणं शक्य नसलं,त्याला बरं नसलं तर बायकोनी काम करायला हवं नं.पटतय तुला ?" " हो." म्हणून सध्या तू आराम कर.इतकी वर्ष व्यसनामुळे तुझं शरीर आणि मेंदू दोघंही आळसावले होते.व्यायामानी तुझं शरीर बघ कसं पिळदार झालंय तसा मेंदूपण पिळदार व्हायला हवा.तेव्हा तू सहज काम करू शकशील."

"कधी होईल असं?" हर्षवर्धननी प्राचीला विचारलं.तशी प्राची म्हणाली " लवकरच होईल हे. माझी मैत्रीण आहे आशू ती तुला मेंदूसाठी व्यायाम द्यायला येणार आहे उद्यापासून. तो व्यायाम छान कर म्हणजे लवकर तू काम करायला लागशील. पैसे मिळवायला वागशील."

प्राची आणि हर्षवर्धनचा संवाद कामीनी बाई दारात उभं राहून ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या.

त्यांच्या मनात आलं भय्यासाहेबांनी वाईट हेतू मनात ठेऊन आपल्या घरची सून म्हणून प्राचीला पसंत केलं. वाईटातून चांगलं निघतं म्हणतात तसं झालं. प्राची आली आपल्या घरात म्हणून हर्षवर्धनवर उपचार करणं शक्य झालं.नाहीतर...माहित नाही हर्षवर्धनचं आयुष्य कसं झालं असतं.


प्राचीनीच आपल्या काळजाच्या तुकड्यांना चांगलं केलं. नाहीतर आजही आपला मुलगा असाच राहीला असता.त्यांनी देवाची प्रार्थना केली." देवा दोघांचा संसार सुखाचा होऊ दे." त्या हळूच खोलीच्या दारापासून लांब झाल्या.

कामीनी बाईंना त्यांचा मुलगा परत मिळाला याचा आनंद होता. प्राचीच्या धाडसाचं त्यांना कौतुक वाटतं असे.हर्षवर्धन व्यसनाच्या विळख्यातून आता पूर्णपणें बाहेर पडला होता. आता त्याच्या मेंदुची शक्ती वाढवायची होती.

प्राचीचं मंगेशभय्यांकडून या व्यवसाया विषयी छोट्या छोट्या टिप्स घेणं चालूच होतं.तिला त्यांचा खूपच पाठींबा होता.

एकाच क्षेत्रात असून मंगेशभय्या त्यातील ट्रेंड सिक्रेट सहजपणे प्राचीला सांगत होते हे विशेष होतं.प्राचीलाही याचं कौतूक वाटतं असे.

एकदा मंगेशभय्या शशांकला म्हणाले होते." शशांक प्राची हुशार आहेच पण धोरणी सुद्धा आहे. तिनी जे धैर्य दाखवलंय हर्षवर्धनला व्यसनातून बाहेर काढण्यासाठी त्याला तोड नाही.ती या क्षेत्रात नवीन आहे पण तिचे काही प्रश्न असे असतात जसं काही ती या क्षेत्रात फार वर्षांपासून आहे. तिला मार्गदर्शन करायला मला खूपच आनंद होतो. खरतर प्राची ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात माझी प्रतीस्पर्धी आहे. तरी मला तिची मदत करावीशी वाटते. प्राचीनी या क्षेत्रात खूप लांबचा पल्ला गाठावा अशीच. माझी इच्छा आहे."

" मंगेश प्राचीशी माझी ओळख राधा मुळे झाली. पण प्रत्येक भेटीत तिचा समजूतदारपणा आणि हर्षवर्धनला या व्यसनामुळे बाहेर काढण्याची जिद्द मला दिसायची. म्हणून ती मला ग्रेट वाटते."

या सगळ्या घडामोडीत राधा आणि शशांक यांची प्राचीला खूप मदत झाली होती.

दोन वर्षांपूर्वी राधा आणि शशांक यांचं लग्न झालं. ते दोघं अजूनही प्राची आणि हर्षवर्धनच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत.


सुरवातीच्या काळात टूरवर प्राची बरोबर राधा आणि शशांक पण असतं. प्रत्यक्ष प्रवासात काय अडचणी येऊ शकतात हे मंगेशभय्यांनी प्राचीला सांगीतलं होतं.पण तोंडी सांगणं वेगळं आणि प्रत्यक्षात ती अडचण आल्यावर सोडवणे हे वेगळं.

स्वत: प्राची प्रवासात असल्याने दोन गोष्टी झाल्या.
एक गोष्ट म्हणजे अडचणी अशाप्रकारच्या येऊ शकतात हे तिला कळलं. दुसरी गोष्ट ट्रॅव्हल कंपनीची मालकीण आपल्याबरोबर आहे. आपल्याशी बोलते.आपल्या अडचणींची लगेच दखल घेते. हे लक्षात आल्यानी प्रवासी खूष असायचे.

प्राचीला अश्या प्रवाशांनी केलेली जाहीरातच आणखी प्रवासी मिळवून द्यायचे.प्रवासी मिळवण्यासाठी प्राचीला वेगळ्या आकर्षक गोष्टींची मदत व्यवसायाची सुरुवात असूनही घेण्याची गरज पडली नाही.प्रवाशांनी आपल्या कंपनीतर्फे प्रवास करावा म्हणून काही मोह दाखवून प्रत्यक्षात त्यातील एकही गोष्ट न देणं प्राचीला मुळीच पटत नव्हतं.

कामीनी बाई हर्षवर्धनची देखभाल करण्यासाठी घरी असतं.
हळुहळू हर्षवर्धन मध्ये आत्मविश्वास जाणवू लागला होता. बोलतांना सुरवातीला तो अडखळायचा कारण पुढचं वाक्य कसं म्हणायचं हे त्याला पटकन कळत नसे.

मेंदूला आलेल्या शिथीलतेमुळे असं होतं होतं.हीच शिथीलता काढून टाकण्यासाठी आशू त्याला वेगवेगळे खेळ खेळायला देत असे.कोणताही खेळ उपचार पद्धती म्हणून वापरत असताना त्या रूग्णाला कंटाळा येईपर्यंत वापरून चालत नाही.रुग्णाला सतत काही नाविन्य दिलं तर तो हिरीरीनी त्या उपचार पद्धतीला प्रतीसाद देतो.

आशू असच नाविन्यपूर्ण उपचार पद्धत दर आठवड्याला हर्षवर्धनला देत असे. सुरवातीला त्याचा मेंदू शिथील जरी असला तरी पटकन सोडवू शकेल अशी कोडी किंवा खेळ देत असे. आता हळुहळू तिनी उपचार पद्धतीतील काठीण्य पातळी वाढवून त्याला तसे खेळ द्यायला सुरुवात केली. याचे रिझल्ट्स चांगले दिसू लागले होते.

आता हर्षवर्धन ब-यापैकी समोरच्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर विचार करून देऊ लागला होता. या वेळच्या टूरमध्ये हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असं प्राचीला वाटत होतं.

तिनी हा विचार आशूला फोन करून बोलून दाखवला.आशू म्हणाली "हरकत नाही. या टूरमुळे कदाचीत आणखी फरक पडेल. मेंदूची जी समजून घेण्याची प्रक्रिया असते तिचं प्रात्यक्षीक त्याला मिळेल. तुझी कल्पना चांगली आहे.घेऊन जा." यावर प्राची नी आशूला विचारलं " तू आमच्याबरोबर टूरवर असणं तुला आवश्यक वाटत असेल तर तू चल. म्हणजे ऐनवेळेवर त्याचा काही गोंधळ झाला तर तो कशामुळे झाला?तो कसा दूर करायचा? हे कदाचित समजणार नाही म्हणून विचारतेय तुला."

"हो.तूम्हणते आहेस ते बरोबर आहे.येते मी तुझ्याबरोबर.फक्त मला तारखा कधीच्या ठरवणार आहेस ते सांग.म्हणजे माझं शेड्यूल त्याप्रमाणे मला ठरवता येईल." " ठीक आहे." प्राची म्हणाली.आणि तिनं फोन ठेवला.

हर्षवर्धनला टूरवर नेता येऊ शकतं हे कळल्यावर प्राचीला फार आनंद झाला.आता हर्षवर्धन लवकर बरा होईल. आईंना ही बातमी सांगीतलीच पाहिजे. प्राचीनी घरचा फोन नंबर फिरवला.आणि आनंदानी तिनी ही गोष्ट आपल्या सासूला सांगीतली.
------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका...मीनाक्षी वैद्य

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now