कामथे काका (भाग ११)

काका अजूनही बाहेरच होते........

काका अजूनही बाहेरच होते. बोलावल्याशिवाय कसे आत जाणार?..... आजींचं मुटकुळं दादासमोर ठेवून आकडा म्हणाला, " वैसे बुढ्ढी कम नही है, दादा. " मग त्याने झमझम बद्दल सविस्तर सांगितले आणि स्वतःच्या प्रसंगावधानाने केवढा मोठा धोका टळला होता हेही सांगायला तो विसरला नाही. झमझमको सबक सिखानेकी जरूरत है असेही त्याने सांगितले. दादाने त्याच्याकडे लक्ष न देता गोणपाट उघडायचा इशारा केला. सावकाश गोणपाट काढले गेले....... आजींचा हलकंडा देह खालच्या गालिच्यावर ठेवला गेला. तिच्या तोंडातला बोळा काढला गेला. म्हातारी बेशुद्ध झाली असे समजून तिच्या तोंडावर पाणी मारले. पण हालचालीचे चिन्ह दिसेना. तशी दादा म्हणाला, " वो जिंदा नही है....... " अचानक विक्षिप्त शांतता पसरली. " किसने किया ये "...... दादाच्या बोलण्यात जरब होती. त्याने आकड्याकडे रागाने पाहिले. म्हातारीवर जास्त पाणी ओतून पाहिले, पण हालचाल दिसेना. म्हातारीला हालवून प्रयत्न करणाऱ्या आकड्याला कॉलर धरून उचलीत दादा म्हणाला, " डाक्टरको बुलाओ... जाव, जलदी..... " कपाळावरचा घाम शर्टाच्या बाहीने पुशीत आकडा म्हणाला, " डाक्टर कहांसे आयेगा, दादा.... " दादा सिगारेट शिलगावीत म्हणाला, " अपना डाक्टर मर गया क्या? " आकड्याने कटील कडून नंबर घेतला आणि तो केबीन बाहेर आला, आणि काकांजवळचा फोन लावून म्हणाला, " ए डाक्टरके बच्चे! दादाके ऑफिसमे फौरन आ जा" काकांचे डोळे विस्फारले गेले. ते पाहून आकडा तिरसटून म्हणाला, " ज्यादा होशियार होनेकी जरूरत नही है, हम सब देख लेंगे" त्यालाही काका आवडत नसावेत. तो केबिनमध्ये शिरला. काकांना संशय आलाच होता. नक्कीच कोणीतरी मेलं असलं पाहिजे. पंधरा वीस मिनिटात दरवाजा उघडला गेला. हातात डॉक्टरची बॅग असलेला, बऱ्यापैकी दिसणारा, पस्तिशीला पोचलेला, एक मुलगासा माणूस आत शिरला. त्याने पांढरा शर्ट खोचलेला होता. गळ्यात स्टेथेस्कोप अडकवलेला होता. तो सरळ केबिनमध्ये शिरला त्याने काकांकडे पाहिलं नाही. काकांना आत जावंसं वाटलं. पण ते तसूभरही हालले नाहीत. मुटकुळं मेलेल्या माणसाचं असणार. त्यांच्या मनात शहारणारा विचार आला. का कोण जाणे पण त्यांना मेलेल्या माणसाची फार भीती वाटायची. खरंतर मेलेला माणूस हा जगातला सर्वात निरुपद्रवी माणूस. जिवंत माणसंच भानगडी करतात. पण त्यांना कोण समजावणार? असो. त्यांनी बरीच नावं आठवून पाहिली. पण अंदाज येईना. शेवटी ते जडपणे खुर्चीत बसले. आत आल्या आल्या दादा म्हणाला, " देख, बुढ्ढी जिंदा है क्या? ". डॉक्टरने मग म्हातारीची नाडी पाहिली, छाती दाबून पाहिली, उपडी उताणी करून तपासून पाहिली. मग कानातली नळी काढीत म्हणाला, " दादा, मै इंजक्शन देता हूं, इसे होश आया तो ठीक, नही तो...... " त्याने वाक्य अर्धवट सोडले. इंजक्शन भरून म्हातारीच्या वाळक्या दंडात घुसवले. मग त्याने परत नाडी हातात धरून दहा पंधरा मिनिटे वाट पाहिली. पण तिची काहीच हालचाल होईना. तिचे हातपाय चोळले, डोळे तपासले, पण म्हातारी काहीच प्रतिसाद देईना, तेव्हा त्याने ती गेल्याचं जाहीर केलं. दादा संतापून म्हणाला, "ठीक देखा क्या तूने? मंगता है तो फिरसे जांच ले. अधा अधुरा डाक्टर". तरीही डॉ. ने तेच सांगितले. डॉक्टर एम. बी. बी. एस̮. च्या शेवटच्या वर्षाला असताना, एका रॅगिंगच्या केसमध्ये अडकला आणि त्यातून झालेल्या खुनाला जबाबदार ठरला म्हणून त्याला युनिव्हर्सिटीने रस्टिकेट केला. शिक्षा झाली. आत गेला. तिथे दादा भेटला. म्हणाला, "मूंह मागे दाम दूंगा, छूटनेके बाद मुझे मिलना, डिग्रीकी फिकर नही करना, वो मै तेरेकू लाके दूंगा" मग डॉक्टरने त्याच्यासाठी काम केलं. लवकरच तो चांगल्या वस्तीत राहू लागला. दोन दोन गाड्या वापरू लागला. पण अनाधिकृत गर्भपात, शस्त्रक्रिया आणि इतर उलटे सुलटे उपचार करू लागला. खूप कमावू लागला. त्याच्या धंद्यात दादा सकट सगळ्यांनीच कमावून घेतलं होतं. म्हातारीच्या बाबतीत त्याचा निर्णय ऐकून दादा भडकला. आकड्याला आता आकडी येण्याचं बाकी होतं. दादाने त्याला तिरकसपणे विचारलं, " हमारे साथ काम करनेका कंटाला आ गया क्या? ऐसे भूलको पेरियरके टोलीमे क्या सजा मिलती थी? " आकडा दादाकडे यायच्या आधी पेरियरसाठी काम करायचा. आकड्याला गप्प पाहून दादा ओरडला, " हरामी तेरी जबान चिपक गयी क्या? ".... खालच्या मानेने तो म्हणाला, " मौत ". दादाने जागेवरून उठत त्याला सणसणीत शिवी हासडून एक कानफटात मारली. तो भेलकांडला. दादा म्हणाला, " पहले सोचा नही था क्या? इसकी मौत होगी तो उसे ठिकाने लगाना पडेगा? " आकडा म्हणाला, " दादा हमे अंदाजा नही आया, गलती हो गयी. माफ करना. " त्याने दादाचे पाय धरले. त्याचे केस धरून त्याला उठवीत दादा नरमाईने म्हणाला, " बेटा अपने धंदेमे माफी बोले तो मौत. स्साला कोई भरवसे का राहा नही. जीवनरामने गलती किया, तूने भी गलती किया " मग सूर्या मध्ये पडला, " इसके बारेमे बादमे सोचते है, इसको मारेंगे तो इसको भी ठिकाने लगाना पडेगा. चाहे तो सोल्याको बुलाते है" आकड्याच्या अंगाला कंप सुटला. "सोल्या? " इससे अच्छा तो मरना ठीक है. त्याच्या मनात आले. पण तो काहीच बोलला नाही. मग सर्व प्रथम त्यांनी म्हातारीची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. मग काय झालं. कोण जाणे. स्क्रीनवर दादाला मुख्य दरवाज्याशी आलेल्या पोलीस हवालदाराचा चेहरा दिसला. त्यांबरोबर दादा म्हणाला, " पुलीस आयी है, बूढीको लेकर तुम सब लोग अंडरग्राउंड छुप जाव. सिर्फ सूर्या रहेगा मेरे साथ. " कार्पेट गुंडाळून म्हातारीला उचलून ते सर्वजण खालच्या भुयारात उतरले. सूर्याने कार्पेट परत सारखे केले.

मुख्य दरवाजा उघडला गेला. हवालदार साहेब आत आले. काकांना पाहून ते म्हणाले, " काकाजी, पोतं घेऊन आत शिरलेले ते सगळे गेले कुठे? " काकांना अचानक काय बोलावं सुचेना. त्यांनी एकदा केबीन कडे पाहिलं. आणि हवालदाराकडे. हवालदाराने ओळखलं. "केबिनमध्ये आहेत तर..... " असं म्हणत तो केबीन कडे हातातली काठी नाचवीत निघाला. दरवाजा उघडून कटीलने त्याला आत घेतले. तेवढ्यात दादाने काकांना फोन करून जाण्यास सांगितले. म्हणजे खरं काय ते कळू नये. पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे ते थर्मास घेऊन बाहेर पडले. साडेसहा झाले होते. आत शिरलेल्या हवालदाराला दादा म्हणाला, " काय जाला हवालादार साहेब? बसून जा! बसून जा! " हवालदार मात्र इकडे तिकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाला, " ये कार्पेटपर पानी कायकू डाला?, क्या गडबडा है? "... दादा म्हणाला, " अरे साहेब, ये तो हमारा सूर्या है ना, साले को जरा भी अकल नही. पी पाके आता है, और उल्टी करता है, अरे आपभी लीजिये ना थोडी. " असे म्हणून त्याने देशी दारूची चपटीशी बाटली काढली आणि त्याच्या पुढ्यात ठेवली. ते पाहून हवालदाराने विचारले, " ये मेरे लिये है ".... त्यावर दादा म्हणाला, " हां! हां! बिलकुल, आपहीके लिये है. आज आप यहां नही आते तो थानेमे पहुंचा देते". तिकडे लक्ष न देता त्याने विचारले, " देखो मैने यहां गोणपाटके पिशवीमे कुछ लाया करके देखा है, और पीछा भी किया है. क्या लाया उसमे?.... बोलो! मुझे भुलानेकी कोशिश नही करना. और ये बोटल मेरेको नही चाहिये. मग दादा नरमाईने म्हणाला, " अरे हवालादार साहेब, आपके दिमाग की दाद देनी पडेगी. असलमे आपको इनस्पेक्टर होना चाहिये था. लेकीन सरकार छोटे आदमीको देखती नही. अरे, साब ये पंटर लोग रास्तेपर गंदगी करते है, तो मैने उनको बोला, अपनी मुंबई साफ सुथरी होनी चाहिये, इसलिये किया हुआ कचरा भरके यहॉ लाव, इधर उधर नही डालना. वो देखो, कोनेमे पडी है गंदगी. " कोपऱ्यातल्या बाटल्या, काही लाकडी फळ्या दाखवून दादा म्हणाला. तरी पण हवालदाराला पटेना. मग दादाने आतून एक नोटांचं बंडल काढलं आणि त्याला देऊन म्हणाला, " अरे ये रखो. ये तो चलेगा न? काम आयेगा. वैसाभी पुलिस को पगार देरीसे मिलती है, ऐसा सुना है. " पुढ ठेवलेलं बंडल खिशात घालीत समोरच पडलेल्या बाटल्या आणि फळ्यांकडे संशयाने पाहतं म्हणाला, " तुम लोगोने, कचराही लाया था न? " जास्त काही विचारण्यासारखं न दिसल्यानं तो उठला. तो कार्पेटवर पाहतं पाहतं केबिनच्या दरवाज्याजवळ पोचला. तिथे मात्र त्याला सोन्याची बांगडी पडलेली दिसली. ती उचलून म्हणाला, " ये क्या है? लगता है, यहांपर कोई औरत आयी होगी. "... त्याने संशयाने दादाकडे पाहिले व म्हणाला, " किसीको आगवाह किया है क्या? " असल्या आरोपाला कोणी हो म्हणणार नाही, याच विचार त्याने केला नाही. आवाजात मऊपणा आणीत दादा म्हणाला, " अरे आपके दिमागकी तो दाद देनी चाहिये. हमारे बच्चे सब ऐसेही है. मजा करने औरत को लाते है और ऐसे चीजे फैल जाती है. "..... हवालदाराकडून बांगडी घेत सूर्या म्हणाला, " आईये आपको छोड आता हूं. " त्याला जवळ जवळ ढकलीतच त्याने बाहेर काढलं. तरी त्याने विचारलेच, "यहां एक बूढा बैठा था, वो किधर गया.? " "कौन बूढा? " सूर्याने विचारले..... हवालदार म्हणाला, " अरे वोही जो अभी था.... "

"अरे वो? वो तो दादासे मिलने आया था, आपको देखकर घबराकर निकल गया शायद. "......

तरीही शेवटी हवालदार म्हणाला, " मेरेको शक है, साला ये बांगडी कहांसे आया? " स्वतःवर ताबा ठेवीत सूर्या म्हणाला, " दादाने बोला ना, किसी औरतकी गिरी होगी. "..... दरवाजा उघडून त्याने हवालदाराला बाहेरची वाट दाखवली. दरवाजा लॉक झाला. सूर्या आत आला. दादा म्हणाला, " सबको बुलाव. " मग ते पाचही जण एकेक करून म्हातारीचं प्रेत घेऊन वर आले. ज्याने म्हातारीला धरले होते, त्याने इतक्या अलगजपणे खाली ठेवले, की जणू काही ती जरा जोरात ठेवलं तर ओरडली असती असा त्याचा समज असावा. पण ती केव्हाच सगळ्याच्या पलीकडे गेलेली होती. दादा रागावून आकड्याला म्हातारीची बांगडी दाखवीत म्हणाला, " क्यूं बे बुढीकी चुडी नही सम्हाल सके? " तो अर्थातच काही बोलला नाही. सूर्या म्हणाला, " दादा ये बाते तो होती रहेगी, पहले बूढीको ठिकाने लगाने की सोचो. " मग सर्वानुमते असे ठरले, की आकड्याने एकट्याने म्हातारीला विरारच्या खाडीत फेकून द्यायचे.... कुणाच्याही मदतीशिवाय. केलेल्या चुकीची ही शिक्षा होऊ शकत नाही, हेही दादाने बजावले. मग एकेक करून ते जायला निघणार एवढ्यात फोन वाजला. दादाने तो घेतला. पलीकडून दिवाणजींचा आवाज आला, " नमस्ते दादासाब! हमारे कामके बारेमे आपने क्या तय किया? " म्हातारीच्या प्रकरणात दादा ते काम विसरलाच होता. पण स्वतःला सावरीत रागाने म्हणाला, " क्यूं दो लाख वापिस भिजवा दूं क्या? " आवाजात अजिजी आणीत दिवाणजी म्हणाले, "अरे दादासाब आप गुस्सा मत होइये. वो तो आपके स्वागतके लिये थे. मैने सिर्फ अपने कामके बारेमे पूछा. सरजी अफ्रिकासे पेश्तू साबका फोन आया था....... " त्यांनी वाक्या अर्धवट सोडले. त्यावर दादा म्हणाला, " देखिये हमारे काकाजी जब पूरी जानकारी करेंगे तभी हम आपको बोलेंगे. "

. ..... "आप अपना वक्त लीजिये सरकार, तकलीफ माफ करना. " थोडक्यासाठी काम खराब व्हायला नको म्हणून त्याने घाबरून घाईघाईने फोन ठेवला असावा. त्यावर दादा काहीच बोलला नाही. सूर्याची अपेक्षा दादा त्याच्याशी चर्चा करील अशी होती. पण तसे काहीच घडले नाही...... संध्याकाळचे साडेसात वाजत होते. आकडा एकटाच त्या म्हातारीबरोबर भुयारात बसला होता. तो आज रात्रीच म्हातारीला फेकणार होता.

त्यांना त्याची फिकीर नव्हती. त्या दोघांनी मग बाटली काढली, आणि आणलेल्या चिकनवर ताव मारायला सुरुवात केली. इकडे काका जवळ जवळ धावतच रस्त्यावर आले. त्यांना मेलेल्या माणसाच्या उघड्या डोळ्यांची फार भीती वाटे. अर्थातच हा मुडदा त्यांनी पाहिला नव्हता. फार काय मुडदा होता, की जिवंत माणूस होता हेही त्यांना माहिती नव्हते. ते घरी पोचले. रमेश अजून घरी आला नव्हता. ते घरी पोचले आणि चिडलेल्या माणसागत जोरदार पावसाला सुरुवात झाली. ते थोडक्यात बचावले होते. फ्रेश होऊन कपडे बदलतात न बदलतात तोच त्यांचा मोबाईल वाजला. फोन सोनाचा होता. \"सोना\" साधनाची मुलगी. तिच्या फोन करण्याचं कारण त्यांना कळेना. त्यांना साधना बोलेल असं वाटलं. पण सोना म्हणाली, " काका, आईला बरं वाटत नाही, तुम्ही याल का? मला फार भीती वाटते..... " तिचा आवाज रडवेला झाला होता. काकांच्या मनात आलं, साधनाला कोणीच नातेवाईक नाहीत की काय? पण त्यांनी तो विचार झटकून टाकला. मग ते म्हणाले, "घाबरू नकोस मी येतो. ".... खरेतर जेमतेम साडेसात वाजत होते. तसं जेवण तयार व्हायला अजून तास दीड तासाचा अवधी होता. त्यामुळे ते चहा घेऊन परत कपडे करू लागले, तशी नीताने विचारले, " हे काय, पुन्हा जायचंय? " ते हो म्हणाले आणि त्यांची वाट पाहू नको असेही त्यांनी सांगितले. जास्त संशयाला जागा नको म्हणून ते म्हणाले, " अगं, माझ्या मित्राकडे जातोय, तो फार आजारी आहे आणि घरी त्याची नऊ दहा वर्षाची मुलगीच असते, ती घाबरली बिचारी. कदाचित मी आज आणि उद्या सुद्धा त्याच्याकडेच राहीन. " तिने जास्त विचारू नये म्हणून ते छत्री, नाइट ड्रेस व थर्मास घेऊन लवकरच बाहेर पडले. खाली उतरले. त्यांना बिल्डिंगला लागून असलेल्या बोळवजा रस्त्यावर गर्दी दिसली. ते कोणाला तरी विचारणार, एवढ्यात रघुमल पुढे झाला आणि दबक्या आवाजात म्हणाला, " पाटकर चला गया, उसके पापने ही उसको मारा, अच्छा हो गया" काकांना वेळही नव्हता आणि इंटरेस्टही. ते घाईत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते छत्री उघडून निघाले. वारा आणि पाऊस छत्री डोक्यावर धरू देत नव्हते. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. ते जेमतेम बस स्टॉपवर पचले. दहा पंधरा मिनिटात बस आली. आत शिरले. बसता बसता त्यांच्या मनात आलं, बरं झालं पाटकर गेला ते. आपण कायमचे सुटलो. अशीच वेगवेगळ्या व्यापातून सुटका झाली तर बरं होईल. त्यांना काय माहीत, ते दुसऱ्या व्यापात पाऊल टाकत होते. वीस पंचवीस मिनिटात ते साधनाबेनच्या बिल्डिंगपाशी आले. पाऊस ऐकायला तयार नव्हता. आकाशात विजा चमकत होत्या, पण बिल्डिंगच्या अर्ध्या भागातली वीज मात्र गेलेली दिसली. ते छत्री बंद करून पावसाला चुकवीत साधनाच्या फ्लॅटपाशी पोचले. बेल दाबून पाहिली. पण वाजली नाही. म्हणून त्यांनी दाराची कडी जोरात वाजवली. साडे आठा होत होते. त्यांना खरंतर खूप भूक लागली होती. येताना आपणच काही खाण्याचं घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं असा विचार करीत असतानाच दरवाजा उघडला गेला. दारात सोना हातात मेणबत्ती धरून उभी होती. रात्रीच्या अंधारात ती त्यांना चर्चमध्ये उभ्या असलेल्या मुलीसारखी वाटली.

काका आत शिरले. सोनाच्या हातातली मेणबत्त्ती घेऊन तिला जवळ घेत म्हणाले, " आलो ना मी, आता घाबरू नकोस. तू एकटी नाहीस बरं का. " तिला घेऊन ते साधनाच्या मास्टर बेडरूममध्ये शिरले. आत एका स्टुलावर ठेवलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात बिछान्यावर पडलेल्या साधनाकडे पाहिले. सोनाला हातातली मेणबत्ती घरात नेऊन ठेवायला सांगितली. बिछान्याशी उभ्या असलेल्या काकांना तिच्या शेजारी बसावं की नाही, कळेना. त्यांची अडचण ओळखून ती क्षीण हसत म्हणाली, " बसलात तरी हरकत नाही. सोनाने आग्रह धरला म्हणून तुम्हाला बोलावलं. " तिच्या जवळ बसत ते म्हणाले, " आणि तुझं काय?.... प्रतिक्रिये करिता ते थोडावेळ थांबले. तिच्या तोंडावरचे लाजरे भाव पाहून ते काय समजायचं ते समजले आणि पुढे म्हणाले,.... बोलण्याचा सुद्धा त्रास घेऊ नकोस".... मग त्यांनी धीर करून आपला उजवा हात तिच्या कपाळावर ठेवला. ते कोमट होतं. पण किंचितसा घामही तिला येत होता. आता ते मागे राहिले नाही. त्यांनी चटकन तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, " साधना एकदम कशी गं आजारी पडलीस? "ते तिच्या केसांमधून हात फिरवीत राहिले. तिला भरून आले. डोळ्यात येणारे पाणी एका हाताने पुसत ती म्हणाली, " काय माहीत?...... ". मग त्यांनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांचा हात घट्ट धरून ती म्हणाली, " थँक्स! एकच भाऊ आहे, पण तो सांगलीला असतो. मी जातीबाहेर लग्न केलं म्हणून तो येत नाही.... काय सांगणार? " त्यांनी दोन्ही हातांनी तिचा चेहरा कुरवाळण्यासाठी स्वतःचा हात सोडवून घेतला. पण तेवढ्यात सोना आली आणि वीजही. त्यांनी अर्थातच विचार बदलला. सोना काकांना चिकटून उभी राहिली. तिला एका हाताने घट्ट धरीत ते म्हणाले, " आता मम्मी बरी होईल हं! सकाळी औषध आणलय ना? " सोना हो म्हणाली. तिच्याकडून टॉवेल आणून साधनाला देत ते म्हणाले, " आलेला घाम पुसून घे बरं. घामावर वारा बसला तर पुन्हा ताप चढेल. " बाहेर पावसाची वाऱ्याबरोबर युद्धासारखी धुमश्चक्री चालू होती. रस्त्यावरच्या दिव्यांचा पिवळा प्रकाश वाऱ्या पावसाबरोबर हालत असल्याचा भास होत होता..... मग एकदम विजेचा लखलखाट होऊन धडाम धूम आवाज होऊन ती कोठेतरी पडल्याचा आवाज झाला..... एका हाताने सोनाला आणि दुसऱ्या हाताने साधनाचा चेहरा घट्ट धरून काका तिला बिछान्यावर चिकटून बसले. साधनानेही कुशीवर वळून एक हात काकांच्या कमरेभोवती लपेटला. विजेच्या लखलखाटात साधनाचा क्षणभर तेजाळलेला चेहरा पाहून तिला आपली गरज असल्याचे त्यांना जाणवले. मग काही क्षण दोघींना तसेच धरून बसले. साधनाच्या अंगातून येणाऱ्या जवळिकेच्या भावनेने त्यांना व्यापून टाकले. तिच्या शरीरच इतका निकटचा स्पर्श भावनेसहित त्यांना प्रथमच जाणवत होता. ते उत्तेजित झाले. त्यांच्या मनात आलं, वेळ काय आणि काय हे विचार?. भानावर येत साधना बाजूला झाली. पुन्हा वीज गेली. आता मात्र आजूबाजूच्या सगळ्याच इमारतींमधील वीज गेल्याचं दिसलं.नशीब मगाशी लावलेली मेणबत्ती ते विझवायचे विसरून गेले होते.

मग काकांचे लक्ष सहज समोरच्या भिंतीकडे गेलं. साधनाच्या नवऱ्याचा फोटो तिथेच टांगलेला होता. फक्त आता तो दिसत नव्हता. दूरवर कुठेतरी वीज असावी. तिथला अंधुक उजेड तिच्यावर पडत होता. त्या प्रकाशात फोटोची काच तेवढी काहीशी चकाकत होती. का कोण जाणे पण काकांना तिच्या नवऱ्याचं त्यांच्यावर लक्ष असल्यासारखं त्यांना वाटलं. आणि ते अस्वस्थ झाले. परत त्यांच्या मनात आलं, "मेलेल्या माणसाची पापणी न लवणारी थंड आणि स्थिर नजर" त्यांना न्याहाळतं आहे. खरंतर दिसत काहीच नव्हतं. पूर्वी त्यांनी तो फोटो पाहिलेला असल्यानेच तसं झालं होत..... भेद्रट विचार जावेत म्हणून ते बिछान्यावरून उठले आणि सोनाचा हात धरून ते समोरच्या खिडकीपाशी गेले. पावसाची झड आत येत होती. पण त्यांनी खिडकी बंद केली नाही. ते बाहेर डोकावले. एकदोन बसेस जात येत होत्या. रस्त्यावर असणारी तुरळक माणसं, वाहनांच्या प्रकाशात लाइट अँड साउंड कार्यक्रमात हालचाली करतात तशी दिसत होती. आयुष्य असच लाइट अँड साउंड कार्यक्रमासारखं असावं असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला....... त्यांची भूक आता चांगलीच पेटली होती. त्या दोचींचीही जेवणं व्हायची असणार, ते स्वतःशी म्हणाले. ते साधनाजवळ येऊन म्हणाले, " तू आणि सोनाने काही खाल्लंय का? " ती नाही म्हणाली. तिच्या तोंडावरचे भाव दिसणं कठीण होतं. त्यांची सावली तिच्यावर पडली होती. मेणबत्तीचा प्रकाश उजेडापेक्षा अंधार अधिक जाणवून देत होता. खोलीतलं वातावरण पावसाने ओलसर झालं होतं. तसं ते मादक वातावरण होतं. पण साधना बरी असती तर त्यांना इथे वोलावलं गेलच नसतं असाही त्यांनी विचार केला आणि विचार मागे सारले. मग ते म्हणाले, " मी सोनाच्या मदतीने तुझासाठी थोडा भात टाकतो. आणि आमच्या दोघांसाठी मी बाहेरून काहीतरी घेऊन येतो. उडप्याचं हॉटेल मागेच आहे. "..... ती म्हणाली, " ठीक आहे, पण एवढ्या पावसाचे फार लांब जाऊ नका. "..... त्यांना हे वाक्य ऐकल्यासारखं वाटलं. आणि त्यांना रोहिणीची आठवण झाली. रोहिणी आणि साधनामध्ये त्यांना अजिबात फरक वाटला नाही. खरंतर अशी वाक्य साधारणपणे माणूस बोलतोच. आणि ती स्थलकालाबाधित ऐकू पण येतात. पण काकांना एवढं तिचं आकर्षण होतं की मन दरवेळेला रोहिणीबरोबर साम्य शोधीत असायचं. त्यांना तो चमत्कार वाटायचा. साध्या गोष्टी गूढ आहेत असं समजून चालणाऱ्याला कोण समजावून सांगणार? आयुष्य सपाटच असतं, पण आपण त्यात रंग भरतो आणि ते रंगीत करतो.....

सोनाला घेऊन ते प्रथम स्वयंपाकघरात शिरले. तिच्या मदतीने त्यांनी भात लावला. ते पुन्हा साधनाच्या खोलीत आले, म्हणाले, " भात लावलेला आहे, सोनाला घेऊन मी बाहेर जाऊन येतो. किल्ली घेऊनच जातो. तू उठू नकोस. येतो लवकरच. " ती मंद हसली. पण त्यांना दिसले नाही. मग ते सोनाचा हात धरून छत्री घेऊन बाहेर पडले. बिल्डिंगच्या मागच्याच बाजूला उडप्याचं हॉटेल असल्याचं त्यांना आठवलं. जिन्यावरून उतरताना पुन्हा वीज आली. वीज सारखी लपंडाव खेळत होती. का कोण जाणे पण ताराबाईंच्या फ्लॅट समोरून जाताना त्यांना बाहेरील कुलूप पाहून त्यांचं काय झालं असावं कळेना. त्यांना वेगळीच शंका आली. ताराबाई घरातून कशाला जातील? त्या दिवशी पोत्यात घातलेल्या ताराबाई तर नव्हत्या.....? त्यांना आपला त्यांच्या नसण्याशी उगाचच संबंध असल्यासारखा वाटला. रस्ता ओलांडून ते बिल्डिंगच्या मागच्या बाजूच्या हॉटेल मध्ये शिरले. इडली सांबार, डोसा आणि पुरीभाजी त्यांनी पार्सल करायला सांगितली. हॉटेलच्या आतून बँकेच्या मागच्या दरवाज्याकडे पाहिलं. तो बंद होता...... वॉचमन तिथे बसलेला दिसला. त्यांच्या अंगातून अचानक भीतीची लहर चमकून गेली. याच आठवड्यात दादा बँकेवर दरवडा घालणार होता. तेवढ्यात उडप्याने "ये लो साब आपका पार्सल" असे म्हणून त्यांच्या समोर पार्सल ठेवले. ते उगाचंच दचकले. जणू काही उडप्याने दरवड्यातला त्यांचा वाटा समोर ठेवला होता. ते भानावर आले. सोनाला घेऊन ते भराभर निघाले. पावसाची थांबण्याची इच्छा नसावी आणि काकांचीही. ते घाईघाईने साधनाच्या फ्लॅटमध्ये शिरले. लाइट असल्यामुळे अंधारात ठेचकाळण्याचा प्रश्न नव्हता. आल्या आल्याच त्यांना भात जळल्याचा वास आला. पण गॅस बंद केलेला दिसला बहुतेक साधनाने केला असावा. ते प्रथम साधनाच्या बेडरूम मध्ये शिरले. मग ते तिघेही जेवायला बसले.

साधना आजारी असल्याने तिला जेवण फारसं खपलं नाही. पण काकांना मात्र सकाळ पासून जेवण न मिळाल्याने आणलेलं सगळंच खपलं. साधनाच्या हे लक्षात आलं असावं. तिला वाटलं आपण उगाचच यांना बोलावलं. पण ती काही बोलली नाही. पाऊसही थोडासा थांबला होता. जणूकाही त्याचाही डिनर टाइम असावा. जेवणं संपतात न संपतात तोच पुन्हा पाऊस त्वेषाने सुरू झाला. मग सोना साधनाच्या बाजूला झोपली. काका बेडच्या समोर खुर्ची घेऊन बसले होते. साधनाचा ताप आता पूर्ण उतरला होता. अंगाला येणारा घाम पुशीत ती म्हणाली, " तुम्हालाही झोपायचं असेल तर झोपा........ " असे म्हणून तिने वाक्य अर्धवट सोडले. मोहाला टाळीत काका म्हणाले, " मी बाहेरच्या खोलीत झोपतो...... " आणि ते झोपण्यासाठी उठले. त्यावर साधना म्हणाली, " इथेच खाली गादी घालून झोपलात तरी चालेल,.... " असे म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिले. जणू काही तिला \"माझा विश्वास आहे तुमच्यावर\" असं म्हणायचं असावं. त्यांच्या मनात त्यांचं उत्तर तयार होतं \"पण माझा माझ्यावर विश्वास नाही\". मग ती म्हणाली, " म्हणजे मला काही लागलं तर तुम्हाला उठवता येईल, बाकी काही नाही. " त्यावर ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी आत जाऊन पायजमा आणि शर्ट घातला. काढलेले कपडे ठेवण्यासाठी त्यांनी कपाट उघडले. आत काही पुरुषी कपडे होते आणि तिच्या काही साड्याही होत्या. त्यांना आश्चर्य वाटलं, नवऱ्याचे कपडे तिने अजून जपून ठेवले असावेत, असं त्यांना वाटलं. पण ते काही बोलले नाहीत. कपाट बंद करून त्यांनी साधनाच्या खोलीत आपली गादी घातली. आणि ते लवंडले. पाठ टेकताच त्यांना खरंतर पेंग येऊ लागली. सकाळ पासून त्यांना जरादेखील पाठ टेकायलाही मिळालं नव्हतं. आता रात्रीचे साडेनऊ वाजले होते. त्यांनी मध्येच उठून साधनासाठी गरम पाणी आणि स्वतःसाठी गार पाणी आणून ठेवलं. ही कामं रोहिणी करीत असे. त्यांना एकदम आठवण झाली. खोलीत एक लहानसा नाइट लँप लावला होता. काकांना पूर्ण अंधार लागत असे. ते झोपेची आराधना करू लागले. साधनाची बिछान्यावर चाललेली चुळबूळ ऐकू येत होती. ती दिवस भर पडून असल्याने तिला झोप लागत नसावी. एकदम काय बोलावं दोघांनाही कळेना. दोघांनाही बोलायचं होतं. पण धीर होत नव्हता. साधनाने मध्येच प्रश्न फेकला. " तुमची बायको आजारी असताना तुम्ही काय करीत होतात? ".... त्यांनी बराच वेळ उत्तर दिलं नाही. या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तरी चालण्यासारखं होतं. पण थोडावेळ घेऊन काका म्हणाले, " काय करणार? असाच खाली झोपत होतो. माझी तर जागाही खूप लहान होती. " त्यांना खरंतर त्यांचा सगळा इतिहासच तिला सांगावासा वाटत होता. पण त्यांनी मनाला आवर घातला. ते फार बोलत नाहीत असं पाहून विषय टाळीत ती म्हणाली, " तुम्हाला जर नाइट लँप नको असला तर वंद करू शकता. " ते उठले आणि पडत्या फळाची आज्ञा मानून त्यांनी लाइट बंद केला. काळोखात एक बरं असतं, तोंडावरच्या भावना दिसत नाहीत. पण बोलण्याच्या पद्धती वरून त्या ओळखता येतात. प्रकाशात मात्र या बीन शब्दांच्या भावना लपवता येत नाहीत. त्यांच्या मनात आलं. म्हणून तर त्यांना काळोख आवडायचा. ते स्वतःशीच म्हणाले, " आता कसं स्वप्न रंजन करायला हरकत नाही........

जवळ जवळ अर्धा तास असाच गेला. घड्याळात दहाचे ठोके पडले. बाहेर पिवळा प्रकाश झिरपवणारा पाऊस इमानदारीत पडत होता. जणू काही त्याला कोटा दिला होता. मग त्यांच्या मनात ताराबाईच्या फ्लॅटचे विचार आले. कुठलीच लिंक न लागल्याने त्यांनी विचार करणं सोडून दिलं. साधनाही झोपली होती. असेच अकरा वाजले. काकांना झोप लागली. एक दीडच्या सुमारास त्यांना मुख्य दरवाजा बाहेर खरवडण्याचा आवाज आला. ते नीट ऐकू लागले. त्यांची झोप अचानक गेली. ते आवाजाच्या दिशेने ऐकू लागले. तो आवाज खूप लांबचा असावा असं त्यांना वाटलं. पण तो कुठून येतोय त्यांना कळेना. त्यांनी काळोखात साधनाच्या पलंगाकडे पाहिलं. दोघी गाढ झोपेत होत्या. ते मांजराच्या पावलाने उठले, आणि आतली खोली ओलांडून हॉलमध्ये पोहोचले. आता तो खरवडण्याचा आवाज आणखीन लांबून येत असल्याचं त्यांना जाणवलं. मध्येच पावसाचा आवाज येई आणि तो आवाज नाहीसा होई. पावसाचा एवढा आवाज होता, की त्यात लहान सहान आवाज सहज हरवले असते. ते मुख्य दरवाज्यापाशी पोहोचले, आणि त्यांनी दरवाज्याला कान लावला. आत तर पावसाच्या आवाजामुळे त्या आवाजाची दिशाच हरवली. ते कंटाळले. दार उघडून बाहेर पडावं असं त्यांना वाटू लागलं. निदान तो आवाज कोठून येतोय एवढं तर पाहून येऊ. पण साधना उठली तर?..... या भीतीने ते मागे वळले. पुन्हा बिछान्यावर लवंडले. त्यांची नजर परत साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे गेली. पण आता ते न घाबरता त्याला मनातल्या मनात म्हणाले, " मी तुला बिलकुल घाबरणार नाही, आणि साधनाशी मी लग्नही करीन. " परत खरवडण्याचा आवाज आला. ते जवळ जवळ अर्धातास तो आवाज ऐकत पडले. त्यांची झोप आता पळाली होती. डोळे अंधाजवळ जवळ अर्धा तास असाच गेला. घड्याळात दहाचे ठोके पडले. बाहेर पिवळा प्रकाश झिरपवणारा पाऊस इमानदारीत पडत होता. जणू काही त्याला कोटा दिला होता. मग त्यांच्या मनात ताराबाईच्या फ्लॅटचे विचार आले. कुठलीच लिंक न लागल्याने त्यांनी विचार करणं सोडून दिलं. साधनाही झोपली होती. असेच अकरा वाजले. काकांना झोप लागली. एक दीडच्या सुमारास त्यांना मुख्य दरवाजा बाहेर खरवडण्याचा आवाज आला. ते नीट ऐकू लागले. त्यांची झोप अचानक गेली. ते आवाजाच्या दिशेने ऐकू लागले. तो आवाज खूप लांबचा असावा असं त्यांना वाटलं. पण तो कुठून येतोय त्यांना कळेना. त्यांनी काळोखात साधनाच्या पलंगाकडे पाहिलं. दोघी गाढ झोपेत होत्या. ते मांजराच्या पावलाने उठले, आणि आतली खोली ओलांडून हॉलमध्ये पोहोचले. आता तो खरवडण्याचा आवाज आणखीन लांबून येत असल्याचं त्यांना जाणवलं. मध्येच पावसाचा आवाज येई आणि तो आवाज नाहीसा होई. पावसाचा एवढा आवाज होता, की त्यात लहान सहान आवाज सहज हरवले असते. ते मुख्य दरवाज्यापाशी पोहोचले, आणि त्यांनी दरवाज्याला कान लावला. आत तर पावसाच्या आवाजामुळे त्या आवाजाची दिशाच हरवली. ते कंटाळले. दार उघडून बाहेर पडावं असं त्यांना वाटू लागलं. निदान तो आवाज कोठून येतोय एवढं तर पाहून येऊ. पण साधना उठली तर?..... या भीतीने ते मागे वळले. पुन्हा बिछान्यावर लवंडले. त्यांची नजर परत साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे गेली. पण आता ते न घाबरता त्याला मनातल्या मनात म्हणाले, " मी तुला बिलकुल घाबरणार नाही, आणि साधनाशी मी लग्नही करीन. " परत खरवडण्याचा आवाज आला. ते जवळ जवळ अर्धातास तो आवाज ऐकत पडले. त्यांची झोप आता पळाली होती. डोळे अंधाराला सरावले होते. जणूकाही समोरचं त्यांना स्पष्ट दिसत होतं. पावसाचा आवाजही वाढला होता. त्याचं डोकं फिरलं होतं आणि त्यांचंही........
आपण उगाचच अस्वस्थ होतोय. त्यांच्या मनात आलं, कुठला का आवाज असेना, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत असं थोडंच आहे? पण वरवरच्या मलमपट्टीने मन मानेना. तेवढ्यात साधनाने कूस बदलली. तिच्या श्वासाचा मंद आवाज येत होता. त्यांना आता पडण्यापेक्षा उठून बसावंस वाटलं. अधून मधून खरवडण्याचा आवाज येतच होता. ते परत अस्वस्थ झाले. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. तीन वाजत होते. ठोके पडू द्यावेत, मग उठावं. नाहीतर त्या आवाजाने साधना उठली आणि आपण तिला जागेवर दिसलो नाही तर.....? त्यांना गैरसमजाची भीती वाटली. दहा मिनिटं नुसतंच पडून राहायचं होतं. मग त्यांनी नीताचा विचार करावयास सुरुवात केली. तिला संशय तर आला नसेल? त्यांना नीताकडून सुरुवातीला मिळालेली तुच्छतेची वागणूक आठवली. त्याने ते व्यथित झाले. आता तीन वाजून गेले होते. पडलेले ठोके त्यांना आठवणींच्या ओघात ऐकूच गेले नाहीत. मग त्यांचं लक्ष सहज घड्याळाकडे गेलं. तीन वाजून चांगली दहा मिनिटं झाली होती. त्यांना वाटलं, ठोके पडूनही त्यांनाच काय साधनालाही ऐकू आले नाहीत. ते जागेच होते तरीही. माणूस उगाचच घाबरतो. कारण तो तेवढा निर्ढावलेला नसतो. त्यांना मनाचं आश्चर्य वाटलं. स्वतःच प्रश्न निर्माण करतं आणि स्वतःच उत्तर किंवा वेगवेगळे तर्क वितर्क पुढे आणतं. आपण सहज पणानं वागावं, माणूस हेच नेमकं विसरतो. असो. ते जागचे उठले. परिचितासारखे स्वयंपाकघरात आले. एवढ्या पावसाळ्यातही ते फ्रीज मधलं थंड पाणी प्यायले......

आणि त्यांनी पुढच्या दाराला कान लावला. आवाज थोड्या थोड्या वेळानं येत होता. जणू कोणी ऐकत नाही ना

याची खातरजमा करूनच काम करणारा आवाज करीत होता. त्यांनी हळूहळू लॅच उघडला. बोल्टही सरकवला. पुढचा दरवाजा अर्धवट उघडला. कॉरिडॉरमधून पावसाळलेला पिवळा प्रकाश एकदमच त्यांच्या तोंडावर आल्याने त्यांचे डोळे अंमळ दिपले. मग त्यांनी मागे वळून आत पाहिलं. मागे अर्थातच कोणीही नव्हतं. त्यांनी सावकाश दरवाज्याचं लॉक बंद केलं. दरवाजा कमीत कमी उघडा ठेवून ते बाहेर पडले. झडीच्या पाण्याने पायाला लागणारा ओलसरपणा अंगवळणी पाडत ते जिन्यापर्यंत गेले. आता खाली उतरणार एवढ्यात समोरच्या अंधारात दोन डोळे चमकले. गुरगूर करीत झोपलेलं कुत्रं त्यांच्याकडे आलं. त्यांचा वास घेतला. मग जागेवर जाऊन शांतपणे पडून राहिलं..... ते तसेच खाली उतरले. आता आवाज खरवडण्या ऐवजी ठप्प.. ठप्प असा येत होता. एवढ्या रात्री कोण आणि कसली दुरुस्ती करतंय? आणि आजूबाजूच्या फ्लॅटमधले लोक बाहेर कसे आले नाहीत? का ते बेशुद्ध झाले आहेत? काही ठिकाणी गॅलऱ्यांच्या बाहेर लावलेल्या पत्र्यांमुळे पावसाचा आवाज जास्त येत होता, म्हणूनही तो आवाज कोणाला ऐकू आला नसावा अशी समजूत त्यांनी करून घेतली. हळू हळू ते पहिल्या माळ्यावर आले. सरडे आजींच्या घरातून आवाज येत होता. त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांचं लक्ष आता लगतच्याच फ्लॅट कडे गेलं. त्यालाही बाहेरून कुलूप होतं. शेजारच्या माणसालाही दादाच्या माणसांनी बाहेर काढलं होतं की काय? ते थोडे शहारले. दादाने आजींना मारून फ्लॅट बळकावला होता. आणि इथून ते बँकेत घुसणार होते..... त्यांनी हा विचार घाबरून दडपून टाकला. हे शक्यच नाही. दुसरा कुठला तरी आवाज असेल. पण मनात निर्माण झालेली शक्यता एवढी प्रबळ होती आणि खरीपण (ज्याची त्यांना खरीतर जाणीवही होती), की त्यांना आता आपण खाली आलोय, आणि आपल्याला कोणी पाहिलं तर काय होईल, या भीतीने ते चटकन मागे वळले. वरच्या जिन्याकडे जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली. इकडे तिकडे चोरासारखे पाहतं (जणू काही तेच ताराबाईंचा फ्लॅट फोडत होते)ते तिसऱ्या मजल्यावर पोहोचले. दरवाज्याशी आले तर, दरवाजा सताड उघडा होता. आत साधना उभी होती........ आता तर त्यांची बोबडीच वळली. साधनाने लाइट लावला नव्हता, त्यामुळे ती एखाद्या अनोळखी आकृती सारखी दिसत होती. ते आ वासून पाहत राहिले. ती म्हणाली, " हे काय चाललंय तुमचं? ".... ते थरथरत म्हणाले, "नं...! नाही काही नाही!..... "

मग एवढ्या रात्रीचे बाहेरसे गेलात? कोणी आलं होतं? " तिने काळजीने विचारले. तिच्या बोलण्यात त्यांना भीतीही जाणवली. आत येत तिला समजावणीच्या सुरात ते म्हणाले, " अगं मला कसला तरी आवाज आला म्हणून मी पाहायला गेलो इतकंच ". तरी ती संशयाने म्हणाली, "इतकंच? चला झोपा आता. तुम्हाला पहिल्यापासून झोप कमीच आहे का? असे रात्रीचे कितीतरी आवाज येतात, तुम्ही सगळ्या आवाजांचा माग काढता की काय? ती तशीच पाठमोरी होऊन तिच्या बिछान्याकडे वळली.

मग तेही अंथरुणावर चुळबुळत पडून राहिले. ती काहीच बोलली नाही, पण त्यांना कांडकोडल्यासारखं झालं.

* * * *

* * * *

* * * *

* * * *

इकडे कॉन्स्टे. सावंत ड्यूटी संपली असूनही परत पोलिस स्टेशनकडे निघाला. स्वतःच तोल सांभाळीत तो रस्त्याने चालला होता. त्याला अजूनही शंका होती, या बदमाशांनी कुणातरी बाईला पळवून आणली आहे, नाहीतर तिथे ती सोन्याची बांगडी कुठून आली?. ती त्याच्या हातातून मिळे पर्यंत सूर्या इतका अस्वस्थ का झाला होता? मग त्याला वाटू लागलं, आपण नक्की शुद्धीवर होतो ना? काहीही झालं तरी बांगडी आणि तो म्हातारा नक्कीच आपण पाहिला होता. त्यामुळे त्याला सदर घटनेची सायबाला सांगून स्टेशन डायरीत नोंद घेतली पाहिजे असं वाटू लागलं. आता तो चांगलाच शुद्धीवर आला होता. त्याचा तोल जाण्याचं थांबलं. त्याला आपल्या पिण्याचा राग येऊ लागला. एकदम त्याला आपण केव्हा प्यायला सुरुवात केली ते आठवावंस वाटलं. पण मेंदूला ताण देऊनही त्याला आठवेना. त्याने डोकं पुन्हा पुन्हा हालवून प्रयत्न करून पाहिला. पण सुचेना. मग आलेला ताण विसरण्यासाठी त्याला परत एखादा पेग तरी घ्यावा असं वाटू लागलं. या सगळ्या तंद्रीत त्याला स्टेशन कधी आलं ते कळलं नाही. रात्रीचे नऊ वाजत होते.... त्याचा सहकारी सखाराम पानतावणे त्याला पाहून म्हणाला, " सावतानू रस्ता चुकलात जनू? हे घर नाय पो. स्टेशन हाय. संध्याकाळीच रिलीव्ह झालास अन लगेच आलास? " सावंतला सख्याचा राग आला, त्याला हलकी शिवी देत तो म्हणाला, " सायेब हाय का बघ. माझ्याजवळ इंफरमेशन आहे. " फारसं काम न करणाऱ्या सावंतकडे इंफर्मेशन आहे म्हंटल्यावर खवचट पणे सखाराम म्हणाला, " लवकरच पीएसाआय होणार बघ गड्या तू" सावंतला त्याची लगट आवडली नाही. नाही म्हंटलं तरी आपण याला चांगलेच सीनियर आहोत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करीत तो आत शिरला.

इन्स्पे. श्रीकांत कोणत्यातरी फायलीत डोकं घालून बसले होते. ते वाचता वाचता विचारमग्न होत होते आणि बाजूच्या कागदावर टिपणे काढीत होते. थोडक्यात ते फाइलचा अभ्यास करीत होते. त्यांच्यासमोर एका मृत व्यक्तीचा फोटो होता. तो जीवनरामचा होता. ते पुन्हा पुन्हा फोटोतला चेहरा फायलीतल्या फोटोशी पडताळून पाहत होते. आतापर्यंत एकच खूण जमली होती, ती म्हणजे छातीवरचे गोंदवलेले नाव. हा पेरियरच्या टोळीतला म्हणजे पेरियरला नक्कीच माहिती असणार. त्यांना इतरही काही नवीन कल्पना सुचल्याहोत्या त्यांचेही टिपण त्यांनी काढले होते. त्यांचे वरिष्ठ म्हणजे "एसीपी खंडागळे. " त्यांना इन्स्पे. श्रीकांतांचं ज्योतिषवेड माहीत होतं. आणि ते त्यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या सूचना व अनुमानं ते जरा विचार करूनच स्वीकारीत असत. आता सुद्धा इन्स्पे. श्रीकांतांनी कारवाई साठी योग्य वेळ शोधून काढली होती. अचानक दरवाजा ढकलून आत आलेल्या कॉन्स्टे. सावंतमुळे त्यांची तंद्री भंग पावली. कपाळावर आठ्या घालून आणि सावंतच्या तोंडाचा भपका टाळीत ते म्हणाले, " सावंत, ऑफिसरच्या केबिनमध्ये शिरतानाचे रीतिरिवाज विसरलास वाटतं? ".... मग सावंतने खाली मान घालून सॉरी म्हंटले आणि कडक सलाम ठोकीत तो म्हणाला, " सायेब एक इंफर्मेशन आहे..... " थोडा वेळ थांबून श्रीकांत ओठाच्या कोपऱ्यातून तुच्छतेचं हसू हसत म्हणाले, " तुझ्याकडे आणि इंफर्मेशन? काम कधी पासून करायला लागलास? " सावंत थोडावेळ चुळबूळ करीत म्हणाला, " सायेब किशा आणि त्याची माणसं यांनी एका बाईला पळवून आणलेली आहे. म्हणजे त्याला आपल्याला खंडणीच्या केसमध्ये पकडता येईल. " मग त्याने सविस्तर जे घडले ते सांगितले. ऐकून घेऊन श्रीकांत म्हणाले, " हं! बरंच मोठं स्वप्न पाहिलंस वाटतं, घेतल्यावर? " त्याबरोबर सावंत म्हणाला, "आयच्यान सायेब, आपण दारू पितो, पैशे पण खातो, पण खोटं बोलत नाही. काही करून तुम्ही किशा आणि सूर्याला ताब्यात घ्या. आणि तिथं एक म्हातारा बी होता, कुठं पळाला कोण जाणे..... " असं म्हणत सलाम ठोकून तो केबीन बाहेर पडला.

श्रीकांतच काय, सावंतचं बोलणं गंभीरपणे घ्यायचं नाही, असं जणू सगळ्या स्टाफने ठरवलं होतं.श्रीकांत सर परत फायलीत घुसले. त्यांना खंडागळे साहेबांना भेटून काढलेली टिपणं दाखवून कधी एकदा पेरियरला ताब्यात घेतोय असं झालं होतं. पेरियर, एक नामचीन गुंड. काही वर्षांपूर्वी श्रीकांत सरांचा त्याच्याशी सबंध आला होता. त्यावेळी त्याने त्यांना जी तुच्छता दर्शक वागणूक दिलेली त्यांना आठवत होती. म्हणजे त्यांना तो बोललेलं आठवत होतं. "स्साला, आजकल डिपार्टमेंटमे कुत्तेके माफिक लोगोंकी भर्ती करवाते है... ". तो आणखीनही काही बोलला होता. पण हे त्यांच्या लक्षात राहिलं होतं. आणि बरेच दिवसात हातही साफ केले नव्हते. ते तसेच उठले. काढलेल्या टिपणांसहित फाइल घेऊन ते खंडागळेंच्या केबीन पाशी पोहोचले. आत कुणीतरी अधिकारी बसला होता. ते दुसऱ्या पो. स्टेशनचे एसीपी शिरसाट होते. ते श्रीकांतांना ओळखत होते. केव्हातरी भविष्य विषयक प्रश्न पाहिल्याने त्यांची ओळख झाली होती. खंडागळे साहेबांनी बाहेरची हालचाल पाहून आत येण्यास फर्मावले. आत शिरल्यावर सलामी झाली. आणि श्रीकांतांना शिरसाट दिसले. ओळखीचं हसू झाल्यावर खंडागळे साहेब म्हणाले, " काय आणलंय? कुंडल्या की काय " थोडं खवचटपणाने त्यांनी विचारलं. वातावरण थोडं सैल झाल्याचं पाहून श्रीकांत म्हणाले, " सर, कुंडल्याच आहेत, फक्त गुन्हेगारांच्या, इतकंच. " खंडागळेंना असली जवळीक आवडली नाही. शिरसाटांबरोबर ते हसले, पण बेताचेच. मग श्रीकांतांनी काढलेली टिपणं व फाइलमधील फ्लॅग लावलेले भाग दाखवले. खंडागळे म्हणाले, " फाइल ठेवून जा,मी वघतो आणि बोलावतो तुम्हाला. " खंडागळे साहेबांना अर्थातच फाइल शिरसाट साहेबांसमोर पाहायची नव्हती. तेवढ्यात शिरसाट म्हणाले," ठीक आहे, मी चलतो. चालू द्या तुमचं. " तशी खंडागळे म्हणाले, " कामं होतच राहतात हो. आज लंच घेऊनच जा. "..... पण शिरसाट दहा पंधरा मिनिटातच उठले.

श्रीकांत आपल्या जागेवर परतले होते. त्यांना खंडागळेंकडून कौतुकाची अपेक्षा होती. आपण काहीतरी मौलिक शोधून काढल्यासारखे वाटत होते. या पेरियरच्या टोळीतल्या माणसाचा खून अंतर्गत वैमनस्यामुळेच झाला असणार. हे त्यांना जो जो विचार करावा तो तो वाटू लागलं. एकदा जीवनरामच्या घरीही जाऊन आलं पाहिजे. असा विचार करता करता टेबलावरचा फोन खणखणला. खंडागळे साहेबांनी त्यांना बोलावलं होतं. ते अपेक्षेने उठले. आणि साहेबांसमोर हजर झाले. एसीपी खंडागळे, एक चौकोनी चेहऱ्याचा, मोठ्या नाकाचा, जाड मिशांचा, काळसर दगडी माणूस. ते कधी हसले असतील की नाही हे कुणासही सांगता आले नसते. त्यांनी उग्र नजरेने श्रीकांतांना न्याहाळले, आणि बसण्याची खूण केली. थोडावेळ असाच घालवून त्यांनी विचारले, " श्रीकांत तुम्ही कोणत्या बॅचचे इन्स्पेकटर? " हा प्रश्न अनपेक्षित होता. आणि थोडा निराशाजनकही. माणूस जेव्हा एकदम तुमच्या सर्व्हिसवर किंवा बॅचवर घसरतो, तेव्हा काहीतरी अप्रिय घडणार असं समजावं, असा श्रीकांतांचा होरा होता. त्यांचे अंदाज साधारणपणे बरोबर येत. फाइल वर गंभीर चर्चा होईल असं त्यांना वाटलं होतं. ते चाचरत म्हणाले, " पंचात्तरची बॅच सर "..... " म्हणजे तुम्ही या पदावर गेली पंधरा वर्ष आहात तर. " खंडागळे त्यांचा चेहरा न्याहाळीत म्हणाले. अर्थातच ते येस सर म्हणाले. त्यांचे तोंड उघडे राहिले. त्यांना कळेना हे सगळं कुठे जाणार? ते अस्वस्थ झाले.

खंडागळे कुजकटपणे म्हणाले, " ज्योतिषशास्त्रात लक्ष घालण्यापेक्षा फोर्सच्या कामात लक्ष अघाला. अहो, पेरियर तुम्हाला आवडत नाही, म्हणून तुम्ही हा चान्स घेताय. पण त्याच्या विरुद्ध तुमच्याकडे काय आहे? मृत व्यक्ती त्याच्या टोळीतली होती म्हणून त्याची चौकशी करणार का तुम्ही? तुम्हाला माहीत आहे ना तो कुणाचा पिट्टू आहे ते? आं! त्यापेक्षा मृत व्यक्ती बाबत मिसिंगची तक्रार आहे का ते का पाहत नाही? किंवा त्याच्या घरच्यांना बोलावून बॉडी आयडेंटिफाय का करीत नाही. काही प्राथमिक उपचार पूर्ण करायचे सोडून, हे काय करताय तुम्ही? कामं अशी चालतात होय? "..... "सॉरी सर, पण मला वाटतं जीवनरामचा संबंध किशाच्या टोळीशी तरी नक्कीच असावा. निदान सूर्याला तरी ताब्यात घ्यावा. जीवनरामने किशाच्या टोळीबद्दल आपल्याला खबर कशाला दिली होती. जरी आपली रेड फसली होती, तरी त्याने खबर दिली म्हणूनही कदाचित त्याला किशाने मारला असावा. "...... आपल्या बोलण्याला फाटे फुटतायत असं वाटल्याने खंडागळे चिडले, " हे पाहा,सध्यातरी जीवनरामची बॉडी आयडेंटीफाय करून घ्या, मग विचार करू तुमच्या दुसऱ्या पर्यायाचा. यू मे गो नाउ ". असं म्हंटल्यावर श्रीकांत नाराजीने आपल्या केबीन कडे निघाले. खुर्चीवर रेळून ते बसले. आपलं डोकं चालवण्यात काही अर्थ नाही, हेच खरं. त्यांना एकदम सावंतची आठवण झाली. त्यांनी त्याला बोलावले. पण तो घरी गेला होता.

* * * *

* * * *

* * * *

* * *

सकाळ झाली. काका ऑफिसला जायला निघाले. आज साधनाची तब्येत बरी होती. चहा आणि नाश्ता तिनेच तयार केला होता. काका दरवाज्यापाशी आले. साधनाने त्यांना विचारले, " संध्याकाळी येणार आहात की घरी जाणार आहात?. त्यावर ते बघतो म्हणाले, आणि निघाले. जिना उतरताना त्यांची नजर पहिल्या मजल्यावरच्या ताराबाईंच्या फ्लॅटकडे गेली. त्याला बाहेरून कुलूप होतं.

आता आवाज थांबला होता. आश्चर्य म्हणजे त्याच्या शेजारच्या फ्लॅटलाही बाहेरून कुलूप होतं. त्यांनी जास्त विचार केला नाही. पावसाची रिपरिप थांबली होती. ते बस साठी थांबले. येणारी बस पकडण्यापूर्वी त्यांना परत साधनाच्या घरी परत जावे असे वाटले, किंवा बाहेर राहून ताराबाईंच्या फ्लॅटवर नजर ठेवावी आणि कोण येतं कोण जातं ते पाहावं असं वाटलं. पण त्यांच्यात तेवढं धाडस नव्हतं. ते ऑफिसमध्ये पोहोचले. ते खुर्चीत बसताक्षणीच त्यांना दादाने आत बोलावले. केबीन मध्ये आज मीटिंग असावी. अकडा, त्याच्याबरोबरचे तिघे आणि इतरही एक दोन माणसे होती. त्यातला एक माणूस एकदम स्मार्ट दिसत होता. तो इंजिनियर किंवा एखाद्या कंपनीचा डायरेक्टर वगैरे असावा असं काकांना वाटलं. गोरटेलेश्या चेहऱ्यावर सोनेरी काडीचा चष्मा त्याला शोभून दिसत होता. उंच कपाळ, त्या खालचे तेजस्वी डोळे पाहून तर काकांची खात्रीच झाली, की तो कुणीतरी इंजिनियर असावा. अंगात ताम्रवर्णी ब्लेझर आतल्या लालसर शर्टावर शोभून दिसत होता. असली रंगसंगती दुसऱ्या कोणालाही शोभली नसती असं त्यांना वाटलं. काका आत आल्याबरोबर, दादाने विचारले, " काकाजी, आपके पास कुछ रस्ता है, ये बैंकका काम जलदी खतम करनेके लिये.? "...... काका विचार करू लागले. बाकीच्या लोकांना काका काय सांगणार कपाळ असं वाटत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्वच्छ दिसत होतं. काका म्हणाले, "एखादा दिनके लिये म्युन्सिपाल्टीका रास्तेका, या गटरका काम निकलेगा तो अच्छा होगा. क्यूं की....

काकांना पुढे बोलू न देता किशा घाईघाईने बाकीच्यांना म्हणाला, " तुम लोगोंको क्या लगता है? " आणि विचारात गढला. बाकी कोणी प्रतिक्रिया देण्या आधी सूर्या म्हणाला, " काकाजी की सलाह से चलेंगे तो समझ लो हो गया कल्याण. " त्याचा उपरोधिक स्वर जाणवला. मग किशा म्हणाला, " काका ठीक कहता है, काम निकलेगा नही, निकालना पडेगा. और मशीन की आवाजमे अकडा अपना काम जलदी भी कर सकता है. ये सब जलदी होना मंगता है. पह्यले ऐसे कॉंट्रॅक्टर को ढूंढो जो हमेशा मशीन किरायेपर देता है. उसे यहां पकडके लाओ.फिर उसे पटानेका काम मै करुंगा. और काकाजी आपको और एक बार बैंकमे जाकर जिस बाथरूममे हम उतर रहे है वो दरवजा खुला कैसा रहेगा ये सोचो............... ". त्याने थोडा वेळ जाऊ दिला मग काकांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तो म्हणाला, " हैआप डरना नही. मै किसी दूसरेको साथमे भेजूंगा. "..... हे ऐकल्यावर काका जरा विचारात पडले. एखादा लहानसा सहभागही त्यांना त्या दरोड्याशी जोडणार होता. " काकाके साथ रमजान जाएगा. रमजान एक दो छोटा स्क्रू ड्रायव्हर साथ लेके जायेगा. बाकी सब कैसा करनेका काका देखेगा. " बाजूलाच उभ्या असलेल्या एका वीस बावीस वर्षाच्या मुलाकडे बोट करीत दादाने म्हंटले. दादा पुढे बडबडत होता. " ऐसा हप्ता हप्ता गवाना मुझे परवडेगा नही. समझे ना तुम? (त्याचा रोख अकड्याकडे होता) अगले हप्तेका शनिवार पक्का किया है. अभी ये एरिक साब बैंकमे रोजका रोकडा कितना आता है और वो कभी बडे बैंकमे भरनेके लिये जाते है वो अगले दो दिनमे ढूंढके निकालेगा. फिर इस शनिवार को पूरा प्लान बना लेंगे, क्या क्या कैसे करना है. काकाजी आपको भी शनिवार की मिटिंगमे आना है "

सब लोग अकडा और उसके साथी छोडकर निकलेंगे. ".... असं म्हंटल्यावर सगळेच बाहेर पडले. आत फक्त अकडा, सूर्या आणि त्यांचे साथीदार तेवढे बाकी होते.

बाहेर आल्यावर रमजान काकांना भेटला. काकांनी मग त्याचा फोन नंबर लिहून घेतला. आणि लवकरच त्याला संपर्क करण्याचे आश्वासन दिले. नंतर ते तडक घरी आले. रमेश आज विषेश खुशीत होता. त्याला बहुतेक लवकरच काही महिन्यांसाठी कॅनडाला जावं लागण्याचं निश्चित झालं होतं. ते काम जमलं की मग त्याचे प्रमोशन होऊन तो जास्त कालावधी साठी जाणार असल्याचं तो म्हणत होता. काकांच्या डोक्यात परत बँकेत जाण्याच्या विचाराची सावली पडू लागली. एक प्रकारचं अनिश्चितपणाचं ओझं त्यांना वाटू लागलं.

खरंतर त्यांना आता हे सगळं कोणाला तरी सांगावसं वाटू लागलं. पण सांगणार कोणाला??? ते परत परत विचार करू लागले. त्यांचं जेवणातलं लक्ष उडालं, हे रमेशच्या लक्षात आलं. त्याने विचारलं, "तुम्ही कसला विचार करताय? मी परत येई पर्यंत नीताला तुमची सोबत होईल. "..... नीताला फारसं आवडलं नाही. पण तिने मानेनेच होकार भरला. दोन तीन महिन्यांचाच तर प्रश्न आहे. करू कसं तरी. काकांना वाटलं रमेशला आपण विचलित झाल्याचं जाणवलं असावं. पण भीतीला आवर घालून ते हसले. आणि म्हणाले, " अरे तू अजिबात काळजी करू नकोस. मी सांभाळीन सगळं. " मग ती चर्चा तेवढ्यावरच राहिली. अंथरूणावर पडल्या पडल्या ते विचार करू लागले. त्यांना ते बँकेतलं मॅनेजरच्या केबिनजवळचं दार दिसू लागलं. आता रमजानला फोन करावा लागणार होता. कामाचं टेन्शन काकांना नव्हतं. एक बरं होतं की अजून तरी त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता. दादाची माणसं मात्र आपल्या कामात वाकबगार होती. मग त्यांनी आधी साधनाकडे जायचं ठरवलं.

तिची तब्येत पाहण्याच्या निमित्ताने त्यांनी ती म्हणाली तर तिथेच राहण्याचं ठरवलं. म्हणजे तिच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याला जाता येईल आणि लग्नाचा प्रस्ताव तिच्यापुढे ठेवता येईल. सुटून आल्यापासून ते तसे एकटेच होते. रमेश आणि नीता आता बरे वागत होते. पण आपण लग्न करतोय म्हंटल्यावर त्यांच्या रागीट प्रतिक्रिया नक्की येतील याची त्यांना भीती वाटू लागली. मग आस्ते आस्ते साधनाच्या जवळिकेचा विचार करता करता त्यांना झोप लागली.

सकाळ झाली. काका उठले. चहा नाश्ता झाला. आजकाल काकांना नाश्ता रमेशबरोबरच मिळायचा. तेवढ्यात श्रेया बाहेर आली. तिला उचलून घेऊन ते बाल्कनीत आले. तिला ते वेगवेगळे आवाज काढून ते खेळवू लागले. ती पण खूश होऊन त्यांना प्रतिसाद देत होती. रमेश ऑफिसला जायला निघाला. आज तो जास्त खूश होता. आयुष्यात मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर बरं असतं त्यांच्या मनात आलं. काकांनी श्रेयाला खाली सोडले. पण ती "आपण बागेत जाऊ या ना, खेळायला. " म्हणून काकांच्या मागे लागली. त्यांनी नीताकडे पाहिलं. तिने त्यांची अडचण ओळखली. मग ती म्हणाली, " आपण जाऊ बाहेर, आजोबांना ऑफिसला जायचंय. " असं म्हणून ती आत गेली. रमेश बाहेर पडला. दाराला लागलेला पेपर त्याने काकांना दिला आणि दरवाजा बंद केला. पेपर चाळायला सुरुवात केली. बातम्या नेहमीच्याच होत्या. तरीही माणूस रोज पेपर पाहतो अचानक एका पानावर त्यांना एक जाहिरात दिसली.
" पुण्याजवळील एका गावात असलेल्या वृद्धाश्रमासाठी रेसिडेंट मॅनेजर पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर. विनापाश सेवानिवृत्त माणसास प्राधान्य. वय ४५ ते ६०. वैद्यकीय तपासणी अनिवार्य. पगाराच्या अपेक्षेसहित अर्ज करावा. "

काकांना जाहिरात फारच आवडली. आपल्याला ही नोकरी नक्कीच मिळेल असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी तीच जाहिरात बारकाईने परत परत वाचली. आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण विनापाशही नाही आणि सेवानिवृत्तही नाही. आपल्याजवळ सेवानिवृत्तीचा आदेश नसून बडतर्फीचा आदेश आहे असे त्यांच्या लक्षात आले. अचानक त्यांचा उत्साह कमी झाला. येणारी सुटकेची संधी गेल्यामुळे त्यांना तीन दिवसांनी होणाऱ्या दादाबरोबरच्या मीटिंगचा विचार करणं आता भाग होतं. आपण परत बँकेत जाऊन यावं म्हणजे जरा फेरविचार करता येईल..... कसला फेरविचार? त्यांच्या मनात आलं. ते यांत्रिक पणाने उठले. बाथरूम मध्ये जाऊन अंघोळीला बसले. त्यांना आता आपल्याभोवतीच्या परिस्थितीत आपण मिसळलो नाही असं वाटून अस्वस्थ वाटू लागलं. कोणत्याही प्रकारे मनापासून जोडणारा दुवा नसल्याचे त्यांना जाणवू लागलं. सगळं कसंसब लोग अकडा और उसके साथी छोडकर निकलेंगे. ".... असं म्हंटल्यावर सगळेच बाहेर पडले. आत फक्त अकडा, सूर्या आणि त्यांचे साथीदार तेवढे बाकी होते.

काकांना जाहिरात फारच आवडली. आपल्याला ही नोकरी नक्कीच मिळेल असं त्यांना वाटू लागलं. मग त्यांनी तीच जाहिरात बारकाईने परत परत वाचली. आणि त्यांच्या लक्षात आलं, आपण विनापाशही नाही आणि सेवानिवृत्तही नाही. आपल्याजवळ सेवानिवृत्तीचा आदेश नसून बडतर्फीचा आदेश आहे असे त्यांच्या लक्षात आले. अचानक त्यांचा उत्साह कमी झाला. येणारी सुटकेची संधी गेल्यामुळे त्यांना तीन दिवसांनी होणाऱ्या दादाबरोबरच्या मीटिंगचा विचार करणं आता भाग होतं. आपण परत बँकेत जाऊन यावं म्हणजे जरा फेरविचार करता येईल..... कसला फेरविचार? त्यांच्या मनात आलं. ते यांत्रिक पणाने उठले. बाथरूम मध्ये जाऊन अंघोळीला बसले. त्यांना आता आपल्याभोवतीच्या परिस्थितीत आपण मिसळलो नाही असं वाटून अस्वस्थ वाटू लागलं. कोणत्याही प्रकारे मनापासून जोडणारा दुवा नसल्याचे त्यांना जाणवू लागलं. सगळं कसं परकं वाटू लागलं. साधनाला तिची मुलगी आहे. रमेशला त्याची बायको आणि मुलगी आहे, किशाला त्याची टोळी आहे, आपल्याला धरून राहणारं कोण आहे? असल्या लोंबकळत्या स्थितीत ठेवणाऱ्या विचारांनी ते उद्विग्न झाले. त्यांचं मन विनाकारण बंड करून उठलं. मग ते स्वतःशी म्हणाले, " आपण मीटिंगलाच गेलो नाही तर? फार कशाला आपण हे शहर सोडून पळून गेलो तर? तसंही आपल्याला काय भविष्य आहे या नगरीत? "पण साधनाच्या आकर्षणाचा विचार मनात आल्यावर त्यांच्या मनात नेहमीसारखे विचार येऊ लागले. त्यांना एकदम साधनाकडे जाण्याची निकड वाटू लागली. बँकेत आणखीन एक फेरी टाकावीशी वाटू लागली.
ते अंघोळ झाल्यानंतर बाहेर जाण्यासाठी कपडे घालायचे सोडून उगाचच इकडे तिकडे करीत राहिले. त्यांनी मनाला समजावणारा विचार केला. पळून जाऊन कुणाबरोबर तरी सहजीवन जगण्याची वयाबरोबर वाढणारी गरज थोडीच कमी होणार होती?........ त्यांना रोहिणीचा अभाव जाणवला. साधनाला आपण उघड उघड लग्नाबाबत विचारायला हवं. त्यांना त्यांचं मन साधनात चांगलंच गुंतल्याचं
जाणवत होतं. ते तिच्याशिवाय जगू शकत नाहीत. असले वांझोटे विचार मनात येत राहिले. त्यांनी अनिच्छेनेच कपडे केले आणि नीताला सांगून ते बाहेर पडले. त्यांच्या खिशातला मोबाईल जागा झाला. त्यांनी तो उघडून कानाला लावला. तो रमजान होता. "काकाजी कभी जानेका बैंकमे? " काका म्हणाले, " मीच फोन करीन ". फोन तर बंद झाला. आपण रमजानला काय सांगणार? आधी बँकेत जावं. म्हणून त्यांनी बस पकडली.
काका बँकेच्या रस्त्यावर आले. त्या दिवशी बुधवार होता. ते बँकिंग हॉल मध्ये शिरले. त्यांनी कौंटरवरच्या मुलीकडे पासबुक भरायला दिले. ती ओळखीचं हसू हसली. ती सुगंधा होती. त्यांची नजर लॉकरला लागून असलेल्या बाथरुमवजा खोली कडे गेली. दरवाजा बंद होता. बाहेरून बोल्ट लावलेला दिसला. आज बँकेत फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे बिनाकामाचं फिरता येत नव्हतं. काकांच्या मनात आलं. गर्दीत एक बरं असतं कोण कुठे का फिरतोय हे समजतही नाही आणि कोणी विचारीतही नाही. गर्दीची अशी एक सुरक्षितता असते. "देअर इज सेफ्टी इन नंबर्स ". असं कुठेतरी वाचल्याचं त्यांना आठवलं. त्यामुळे त्या खोलीजवळ जाणं कठीण होतं. तिला आतून बोल्ट होता की नाही, हे कळणं कठीण होतं. जर कोणाला त्या खोली बद्दल विचारलं आणि पुढे काही घडलं तर काकांचा संबंध त्याच्याशी जोडला जायचा. माणूस कितीही व्यग्र असला तरी त्याला प्रसंगानुसार बारकावे आठवू शकतात. अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही. आणि अशीच लोकं पोलिसांना सापडतात व मदत करतात. पोलिस म्हंटल्यावर, काकांना पोलीस किती बारकावे शोधतात याची आठवण झाली. त्या विचारासरशी ते घाबरले. पण माहिती काढणं आवश्यक होतं. काकां या बँकेत यायला लागल्यापासून तोंडावर रुमाल ठेवीत असत. त्यांची अशी समजूत होती
की समोरच्या माणसाला पूर्ण चेहरा आठवत नाही आणि जर कुठे कॅमेरे वगैरे लावले असतील तर सगळा चेहरा तरी त्यात येणार नाही. काकांच्या स्वतःच्या अश्या बऱ्याच समजुती होत्या. ते विचारात असतानाच सुगंधा म्हणाली, " काका पासबुक वेळेवर अपडेट करीत जा, म्हणजे फार वेळ लागणार नाही. पास बुक त्यांच्या हातात देत ती पुन्हा एकदा गोड हसली. आता मात्र काकांनी आवाजात आणि चेहऱ्यावर जास्तच सहजता आणीत त्या बंद खोलीकडे बोट करून तिला विचारलं, " बाथरूम तिकडे आहे का (बाथरूम कुठे आहे ते माहीत असतानाही) "..... त्यावर त्या दिशेला वळून पाहतं ती म्हणाली, " छे छे!, अहो ती अडगळीची खोली आहे, त्यात जुनी रजिस्टरं वगैरे ठेवतो आम्ही, जागा कमी पडते ना म्हणून. बाथरूम ते तिकडे आहे. " असे म्हणून तिने काकांना माहीत असलेल्या बाथरूमकडे बोट दाखवलं. काकांना आपलं नशीब जोरावर असल्यासारखं वाटलं. काका स्वतःशीच हसले. त्यांच्या मनात आलं. काही काही लोक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना न विचारलेली माहिती पण कशी भोळसटपणाने देतात ते. सुगंधाला काय माहीत पुढे या माहितीचा कोण कसा वापर करणार आहे म्हणून?. काकांचं काम झालं होतं. ते पास बुक खिशात टाकून बाहेर पडले.

त्यांना साधनाला भेटायचं होतं. ते लवकरच तिच्या फ्लॅटजवळ पोहोचले. बेल वाजवली. आतून तत्परतेने दार उघडले गेले. दारात साधना त्रासिक चेहरा करून उभी होती. त्यांना पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यात बदल झाला. त्यांना आत येऊन देत ती

म्हणाली, " अहो, आताच्या आत्ता, तीन वेळा बेल वाजली. कधी सेल्समन, कधी मदत मागणारी मुलं, तर कधी वेगळ्याच नावाची चौकशी करणारी माणसं. घाईच्या वेळेतच येतात. " ते आत येत म्हणाले, " ठीक आहे मी संध्याकाळी येईन. " असं म्हणून ते सोफ्यावर बसले. पण गेले नाहीत. तेवढ्यात ती आतून सरबताचे ग्लास घेऊन आली आणि म्हणाली, " तसंच तुमचं काही काम असेल तर मी लवकर येऊ का? मी
येईपर्यंत बसा" तिने मनापासून विचारले. ते म्हणाले, " नाही नाही, माझं खास असं काही काम नाही. " ती म्हणाली, " नक्की ना? मला वाटतं तुम्हाला काही बोलायचंय असं दिसतंय. " तिची नजर टाळीत ते काही न बोलता उठले. तिच्या मनात आलं, यांचं काहीतरी बिघडलंय. ते बाहेर आले, ते तिला ऑफिसला जायचं असेल, हे विसरले होते. स्वतःवरच चिडले. त्यांना तिच्याशी जमलं असतं तर लग्नाबद्दल बोलायचं
होतं. निदान त्यांना थोडा मोकळेपणा हवा होता. तिच्याबरोबर तिच्या सहवासात त्यांना राहायचं होतं. तिच्याशी त्यांना जवळीक साधायची होती. त्यांनी कंटाळून रमजानला फोन केला. " कल सुबे ग्यारा बजे आना " आणि त्यांनी त्याला पत्ता सांगितला. ते समोरच्या रेस्टॉरंटमध्ये शिरले. जरूर नसताना त्यांनी नाश्ता मागवला. प्लेटमधल्या वस्तूशी ते खेळत राहिले. जवळ जवळ अर्धा तास त्यांनी घालवला. आपलं काय बिनसलं हे माहीत असूनही ते पाहायला तयार नव्हते. खरंतर आत्ता त्यांना साधनाला जवळ घेऊन आलेला रिकामपणाचा सगळा शीण नाहीसा करायचा होता. आत्ताही ते तिने लावलेल्या सेंटमुळे आणि तिच्या कपड्यातून दिसणाऱ्या आकर्षक बांध्यामुळे उत्तेजित झाले होते. बाहेर येऊन आता वर्ष होऊन गेलं होतं. पण कुणाशीतरी प्रेमाच्या चार गोष्टी कराव्यात, हे काही साधत नव्हतं. त्यांना एक प्रकारच्या निराशेने घेरले. घेतलेला नाश्ता अर्धवट टाकून ते बाहेर आले. त्यांची प्लेट उचलणारा पोऱ्या म्हणाला, " साला, हमको खाने को मिलता नही, और
खाना फेकके चला गया. " अर्थातच त्यांना काही ऐकू आले नाही. त्यांनी मग रस्त्यावर आल्यावर दादाला फोन केला आणि आपली तब्येत बरी नसल्याने आपण येणार नसल्याचं सांगितलं. त्यावर दादाने त्यांना कामके पीछे रहो असं सांगितलं आणि फोन बंद केला.
त्यांनी बस पकडली आणि ते घरी निघाले. लवकर आलेले त्यांना पाहून नीता म्हणाली, " आज बाहेरच काम होतं की काय? " त्यांनी होकार भरला आणि म्हणाले, " कदाचित आज रात्री मला माझ्या मित्राकडे जावे लागेल. तो काही दिवसांपूर्वी आजारी होता
ना, तोच. " त्यावर ती काहीच बोलली नाही. अशा रितीने त्यांनी वातावरण तयार केले. खरंतर त्यांना सुचत नव्हतं. त्यांनी जेवणानंतर कसातरी वेळ काढला. दुपारचे चार वाजले. फालतू कारणासाठी ते खाली उतरले. त्यांनी साधनाला फोन लावला आणि आज ते राहायला येत असल्याचं त्यांनी तिला सांगितलं. येताना श्रेयासाठी ते चॉकलेट आणायला विसरले नाही. श्रेया जुलै मध्ये दोन वर्षांची होणार होती. ते सुटून आले तेव्हा तिचा वाढदिवस त्यांना सामील न करता झाला होता. आता त्यांनी ते लक्षात ठेवलं होतं. तिला आणि रमेश नीताला
पण त्यांनी चांगल्यापैकी भेट देण्याचं ठरवलं होतं. मागच्या वर्षीच्या वाढदिवशी घरात स्वीकारलं गेलं नव्हतं आणि त्यांच्या जवळ पैसेही नव्हते. श्रेया झोपल्याने त्यांनी चॉकलेट नीता जवळ दिले. अगदी जुजबी कपडे घेऊन ते साडेपाचच्या सुमाराला निघाले. आज ते साधनाला विचारणार होते. तसे साधनाशी मैत्री होऊन वर्ष होत होते. म्हणजे काही फार जुना परिचय होता असे नव्हते. पण काकांना धीर निघत नव्हता. एकटेपणा स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत जास्त समजूतदारपणे स्वीकारतात. काही वेळेला शेवटापर्यंत निभावून नेतातही. पण पुरूष त्या मानाने
उतावीळ असतात. आणखी एखाद दोन वर्ष त्यांनी काढली असती तर हरकत नव्हती, असं कोणीही म्हणेल. पण त्यांची मानसिक अवस्था आणि जगण्याची अनिश्चित अप्रिय चाकोरीच त्यांना हा निर्णय घ्यायला भाग पाडीत होती. तिच्या घराकडे जाता जाता मनातल्या मनात ते स्वतःशीच म्हणाले, " मी सोनाचं सगळं काही करीन पण मला स्वतःचं असं घर हवं. स्वतःची अशी जीव लावणारी बायको हवी, मी एकटा जगू शकत नाही. रमेश आत्ता ठीक वागतोय, उद्या काही कारणांनी त्याने घरातून जायला सांगितलं तर? "..... स्वतःच्या निर्णयाचं समर्थन करणारे संवाद त्यांच्या डोक्यात चालू राहिले. त्याच विचारात ते साधनाच्या बिल्डिंगमध्ये शिरले.
त्यांनी तिच्या दारावरची बेल वाजवली. सोनाने दार उघडले. " मम्मी काका आल्येत, " असं म्हणून ती आत गेली. साधना आतून टॉवेलने तोंड पुशीत बाहेर आली. ती नुकतीच आली असावी. ती म्हणाली, " तरी मी सकाळी विचारलं होतं. पण तेव्हा काहीच बोलला नाहीत. " घरच्याच कपड्यात ती त्यांना आत्ता जास्तच आकर्षक वाटली, तिचा एकूण बांधा आणि शरीराची गोलाई त्यांना जवळून पाहावीशी वाटली. कदाचित याला कारण, रोहिणी गेल्यापासून ते कोणत्याच स्त्रीच्या संपर्कात आलेले नव्हते, हेच असावे........ त्यांनी तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर दिले नाही. ते फारसं काहीच बोलत नाहीत असं पाहून ती म्हणाली, " काय घ्याल? चहा, कॉफी की थंड? " त्यावर ते काहीही चालेल म्हणाले. ती काहीतरी पेय आणण्याच्या दृष्टीने आत वळली. तिला त्यांचं मौन नवीन होतं. म्हणजे हे नाराज झाले की तोंड बंद ठेवून बसतात वाटतं. तेवढ्यात त्यांनी बाहेरून सोनाला हाक मारली. सोना आत येत म्हणाली, "काका, आपण चेस खेळू या? मम्मीने आजच आणलाय. " ते काहीतरी करायचं म्हणून हो म्हणाले. सोनाने लवकरच चेस बोर्ड आणि सोंगट्या आणल्या. त्यांनी सोंगट्या पटावर मांडून तिला खेळ समजवायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष चहा घेऊन येणाऱ्या साधनावर जास्त होतं. तरीही त्यांनी सोनाला समजावून सांगितले. तिने नेसलेली लाल साडी तिला शोभून दिसत होती. काका तिच्या प्रेमात पडले होते हेच खरं. खरंतर या वयाची स्त्री त्यांना आकर्षक वाटणं हा एक विचित्र योगायोग होता....... ते अधून मधून तिच्याकडे पाहतायत हे तिच्याही लक्षात आलं. त्यांनी चहाचा कप हातात घेताना तिच्या हाताला हेतुपूर्वक स्पर्श केला. आणि ते तिच्या प्रतिक्रिये करिता थांबले...... पण तिने काहीही निदर्शनास येऊ दिले नाही. सोनाला वेगवेगळ्या सोंगट्यांच्या चाली पुन्हा एकदा समजावून सांगितल्या. तसं एकदम हे लक्षात ठेवणं तिच्या सारख्या लहान मुलीलाच काय एखाद्या मोठ्या माणसालाही शक्य नव्हतं. तरीही तिने फार लवकर लक्षात घेतलं. फक्त घोडा आणि वजीराची चाल तिला लक्षात येईना. मग काका साधनाकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून म्हणाले, " घोडा असाच चालतो, थोडा सरळ थोडा तिरका, काही काही माणसं कशी विचित्र वागतात, तशी. "..... सोना पटकन म्हणाली, " म्हणजे माझ्या मम्मीसारखा का? ती अशीच करते कधी कधीइतकी छान वागते ना तर कधीकधी विचित्रच. " तिने साधनाकडे पाह्यलं. साधनाने डोळे वटारले आणि म्हणाली, " फार बोलायला लागल्येस हं सोना! आत जा पाहू " सोना जोरात म्हणाली, " मी नाही जाणार, तूच जा. मला आत्ता काकांशी खेळायचंय " वातावरण बिघडतंय असं पाहून काकांनी मध्यस्थी केली. " अगं मी आज तुझ्याकडे राहणार आहे, कशाला काळजी करतेस, आपण आज खूप खेळू. तू असं कर सध्या आत जा आणि तुला सांगितलंय त्याची प्रॅक्टिस कर पाहू. आपण थोड्या वेळाने सगळेच बाहेर जाऊ, (साधनाकडे वळून म्हणाले) काय चालेल ना? " त्यावर ती म्हणाली, " तुम्ही दोघे जा मी स्वयंपाकाचं बघते" आता मात्र सोना तिच्या मागे लागली, " चल ना मम्मी, ते एवढं म्हणतायत तर. आणि आपण आज बाहेरच जेवू आणि आइसक्रीम पण खाऊ. " मग नाईलाजाने ती हो म्हणाली. सोना आत गेली. काकांना जरा मोकळं वाटलं. ते जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, " मग काय जायचं ना बाहेर? " थोडावेळ जाऊन देऊन ती म्हणाली, " आपण सगळेच बाहेर पडलो तर लोकांचा गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही. मला इथे राहायचंय. तुम्ही माझे कोण आहात काय सांगणार मी? " तिचं म्हणणं त्यांना पटलं. तिने मग आत जाऊन सोनाला समजावलं की आज जाण्यापेक्षा आपण रविवारी जाऊ. आणि आपण जर बाहेर गेलो तर तू काकांशी खेळणार केव्हा, ते तर उद्या सकाळी जातीलही. सकाळी तुला शाळा आहे आणि मला ऑफिसही आहे. सोनाला हळू हळू पटलं. तरीही ती थोडी नाराजच होती. पण काकांनी तिला बाहेर बोलावले आणि ते तिला खेळ समजावून सांगू लागले. ती लवकरच त्यात रंगली. मध्येच खेळ सोडून ते आत जाण्यास वळले. त्यावर ती म्हणाली, " काका बसा ना आता तुमची चाल आहे. काय हवय तुम्हाला? ".... ते म्हणाले, " अग
आत मम्मी एकटी आहे ना आणि तू आता माझी चाल खेळून विचार कर बरं. मी आलोच दहा मिनिटात. ती त्यांच्या चालीवर विचार करू लागली. तेवढ्यात ते आत गेले. साधना आत भाजी चिरून कुकर लावण्याच्या तयारीत होती. ती सिंकमध्ये ठेवलेल्या कपबश्या विसळीत होती. काका हळूच तिच्यामागे आले. तिला कल्पना आली नाही. त्यांनी तिच्या खांद्यांना स्पर्श केला ती केवढी तरी दचकून मागे वळली. काकांनी तिला घट्ट धरून ठेवली. तिच्या केसांमधून हात फिरवीत ते म्हणाले, " साधना, का कोण जाणे सारखं तुझ्याकडे यावंस वाटतं.तुला काय वाटतं? " त्यांनी तिच्या गालावर ओठ टेकवीत म्हटलं. बऱ्याच वर्षांत तिला असा स्पर्श झालेला आठवत नव्हता. काकांनी तिच्या कमरेभोवती हात घालून तिला घट्ट धरून ठेवली. तिच्या ओटीपोटाचा स्पर्श त्यांना जाणवला. पण ती पटकन भानावर येत बाजूला झाली आणि म्हणाली, " बाहेर सोना एकटीच आहे, केव्हाही घरात येईल. त्यांनी तिला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे पुन्हा विचारलं. तिने त्या प्रश्नाचं उत्तर टाळलं आणि कुकर लावायला घेतला. खराच सोना धावत आत आली. आणि म्हणाली, " काका बघा हं, मी तुमची चाल कशी खेळले ती. आता तुम्ही नक्की हरणार. ". त्यावर ते साधनाकडे पाहत म्हणाले, " अगं मी नेहमीच हरत आलोय" असं म्हणून ते तिच्या सोबत बाहेरच्या खोलीत आले. सोनाला चांगलंच डोकं होतं. तिने खरंच त्यांची द्विधा मनःस्थिती केली होती. त्यांना पुढची चाल सुचेना. पटावरचीही आणि साधनाबरोबरचीही. ते काहीतरी खेळायचं म्हणून खेळले. खराच साधनाला आपण केललं आवडलं का? का आपण असं काही करू अशी अपेक्षाच नव्हती? त्यांच्या मनात हेही आलं, आपण किती विचार करतो. या गोष्टींची कारणं शोधीत बसायचं नाही. केलं केलं, नाही केलं नाही केलं. ती लावील तिला काय अर्थ लावायचाय तो. आपण आपली भूमिका प्रथमच स्पष्ट केली. ती आता काय प्रतिक्रिया देते पाहू. असं म्हणून ते खेळायला बसले. आता
त्यांना खेळ सुचू लागला. एकदा का वास्तव समजून घेतलं की माणसाला सुटल्यासारखं वाटतं. त्यांच तात्पुरत तसंच झालं. आज तिचा जो निर्णय असेल तो आपण स्वीकारायचा. तिला आपला विचारही सांगायचा. म्हणून तर ते आले होते. पुन्हा एकदा खेळ सोडून ते उठले. पण सोना आता काहीच बोलली नाही. कारण ते आता आत न जाता समोरच्या उघड्या खिडकी जवळ जाऊन बाहेर पाहू लागले. बाहेर पावसाची बऱ्यापैकी काळोखी आली होती. पडला तर बेदम पाऊस पडेल. पण वारा सुटला तर अजिबात पडणार नाही. संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते. रस्त्यावरचे दिवे लागले होते. लोकांची घरी जाण्याची लगबग सुरू होती. तुडुंब जनसमुदायातून बसेस चालल्या होत्या. जणू काही पाण्यातून बोटी. त्यांनी लांबवर नजर फेकली. त्या वातावरणात ते स्वतः नसल्याने त्यांना बाजूला काढलेल्या माणसासारखे वाटू लागले. मग त्यांना कामावर असताना आपली होणारी घाई आठवली. रोहिणी आणि रमेशच्या ओढीने आपण कसे जात होतो. रमेश लहान असे पर्यंत घरात
शिरल्या शिरल्या आई कुठे आहे ते पाहून ते रोहिणीला मिठीत घेत असत. त्यावेळी रोहिणी जे बोलत असे ते त्यांना आठवले. "अहो काय हे, जनाची नाही तर मनाची तरी बाळगा जरा. " त्यावर ते म्हणायचे, "रोज बाहेर जाताना घरातलं सौंदर्य मला दिवसभर बघायला मिळणार नाही अशा भावनेने मी जातो. खराच रोहिणी इतर पुष्कळ स्त्रिया तुझ्यापेक्षाही सुंदर पाहतो, पण तू ती तूच. मला मात्र तूच आवडतेस. " त्यांच्या स्तुतीने ती सुखावलेली पाहण्यात त्यांना अशी कितीतरी वर्ष धन्यता वाटली होती. अचानक रोहिणी चार वर्षांपूर्वी गेली ती हरवलीच, तीही कायमचीच. ते थोडे खिन्न झाले. सोनाने त्यांना आत्तापर्यंत तीन चार वेळा तरी हाका मारल्या असतील, पण त्यांना आत्ता कुठे ऐकू आलं. ते लगबगीने पुन्हा खेळाकडे बळले. त्यांचं लक्ष खेळात बिलकुल लागत नव्हतं. म्हणून ते मोठ्याने म्हणाले, " मी सोनाला घेऊन बाहेर जाऊन येऊ का? " त्यावर साधनाने ओरडून सांगितले, " जरूर, पण लवकर या. आणि पावसाचंही चिन्ह दिसतंय. रेनकोट छत्री घेऊन जा. "

सोना आहे त्याच कपड्यांवर बाहेर जाण्यास तयार झाली. रेनकोट घेऊ नका, त्याऐवजी छत्री घ्या असं ती हळूच म्हणाली. मग काकाही तिला घेऊन रेनकोट न घेता निघाले. उतरता उतरता त्यांची नजर ताराबाईच फ्लॅट कडे गेली. कुलूप अजून तसंच होतं. आत कोणीतरी नक्कीच असणार. ते घाईघाईने सोनाचा हात धरून रस्त्यावर आले. सोना म्हणाली, " काका आपण आइसक्रीम खायचं का? " तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. काका म्हणाले, " आता आइसक्रीम खाऊन कसं चालेल? " ती म्हणाली, " मम्मीला थोडंच खाल्ल्यावर कळणार आहे? " ते म्हणाले, " सर्दी झाली म्हणजे मम्मीला आपोआप कळेल. " ती थोडी निराश झाली. मग थोड्यावेळ चालल्यावर ती म्हणाली, " काका तुम्ही आमच्याकडेच का राहतं नाही? " उत्तरादाखल त्यांनी तिचा एक पापा घेतला. पण उत्तर दिले नाही. मनातल्या मनात म्हणाले, त्याच प्रयत्नात तर आहे मी. पण उघडपणे म्हणाले, " तुझ्या मम्मीला सांग म्हणजे मी राहीन. " ते इकडे तिकडे फिरले आणि पावसात भिजायला होईल म्हणून लवकरच घराकडे निघाले. येताना मात्र तिचं लक्ष आइसक्रीमच दुकानाकडे आहे हे पाहून त्यांनी मग दोन चॉकोबार विकत घेतले तिला तिचा चॉकोबार लवकर खायला सांगितला. हळूच बिल्डिंगमध्ये शिरले. घरात शिरेपर्यंत तिचा चॉकोबार संपला नाही. साधनाने दार उघडले. ती लटक्या रागाने म्हणाली, " का घेऊन दिलात तिला चॉकोबार, आता ती तुम्ही नसतानाही हट्ट करील. पावसाचे दिवस, सर्दी होईल नाही का? " त्यावर सोना म्हणाली, " पण मम्मी तू काकांना आपल्याकडेच राहायला सांग ना " आता मात्र ती निरुत्तर झाली. तिने मग सोनाला तिच्या अभ्यासाची आठवण करून दिली.

साडे आठ नऊच्या सुमारास ते जेवायला बसले. जेवण अप्रतिम होते. त्यामुळे जेवताना कोणीच फारसं बोललं नाही. साधनाचं लक्ष आपल्याकडे आहे हे काकांच्या लक्षात आलं. पण त्यांनी तसं दाखवलं नाही. सगळी आवरा आवर होई पर्यंत त्यांनी टी. व्ही. पाहिला. शेवटी दहाच्या बातम्या पाहिल्या, त्या बंद करण्यासाठी काकांनी रिमोट हातात घेतला, पण एका बातमीने त्यांचे लक्ष वेधून घेतले. "पावसामुळे महापालिकेने रस्ता दुरुस्तीची कामे तात्पुरती तरी रद्द केली आहेत. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये व नगरसेवकांमघे निराशेचे वातावरण पसरले आहे " त्यांनी तपशील ऐकला नाही. या बातमी मुळे त्यांच्या मनात धोक्याची घंटा वाजू लागली. अरेच्च्या म्हणजे, रस्ता खोदण्याचे मशीन वापरणे आता कठीण आहे. त्याचा आवाज त्यांच्या कामाला महत्त्वाचा होता. दादाला हे सांगितलेच पाहिजे. आत्ता तर सांगणे कठीण आहे पण उद्या सांगायला हवे. म्हणजे तो दुसरी काहीतरी व्यवस्था तो करील. साधनाचं आतलं काम झालेलं होतं. तिने सोनाला आत बोलावून तिला झोपवण्याचं कामकेलं. अर्ध्या पाऊण तासात सोना झोपली. तो पर्यंत काका हॉलमधल्या
सोफ्यावर आडवे झाले होते. ते पेंगुळलेले असतानाच साधना हॉलमध्ये आली. काकांनी येणारी झोप उडवली. आज हिच्याशी जवळीक साधून लग्नाबाबत बोललंच पाहिजे, असा विचार करून ते उठून बसले. ती सोफ्याच्या बाजूला असलेल्या एका खुर्चीत बसली. काही वेळ ते दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. नंतर ती म्हणाली, " काय पाहताय? काहीतरी बोलायचं होतं ना? "...... खिडकीकडे पाहत ते म्हणाले, " पाऊस जरा जास्तच आहे नाही? " पटकन मुद्यावर न येणाऱ्या माणसाचा आपल्याला कसा राग येतो, तसा काकांच्या बोलण्याने तिला आला.तिने सहजपणे म्हंटले, " अच्छा हेच सांगायचं होतं म्हणून आलात वाटतं, चला, झोपायचं बघितलं पाहिजे. " असं म्हणून ती उठून त्यांच्या बाजूने जाऊ लागली. पण पटकन तिचा हात ओढत काका म्हणाले, " काय हे? हे बोलायला येईन का मी? बस इकडे मला बोलायचंय तुझ्याशी. " असं म्हणून तिने बसावे म्हणून सरकणार इतक्यात हात ओढल्याने तिचा तोल जाऊन त्यांच्या अंगावर कोसळली. तिला जवळ घट्ट
धरीत ते म्हणाले, " साधना, मला तू आवडतेस, आय लाइक यू (लव्ह यू नाही, ते फक्त रोहिणीकरिता, असं मनातल्या मनात म्हणून त्यांनी ओठाशी आलेले शब्द मागे ढकलले) " त्यावर त्यांच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न न करता ती म्हणाली, " बसं झालं. आता अंथरूणं घालून झोपून जाऊ. नाहीतर काहीतरी भलतंच व्हायचं. ".... काका चावटपणाने तिच्या ओठांवर ओठ टेकत म्हणाले, " भलतंच करण्यासाठीच
तर आलोय. " दोघांच्याही उष्ण श्वासांनी निर्माण झालेली मादकता आता काकांना कधीच भंग पावू नये असं वाटत होतं. पण कसं तरी सोडवून घेत ती म्हणाली, " चला मला सकाळी लवकर उठून सोनाला शाळेत न्यायचंय"... ती बेडरूममध्ये जाण्यासाठी उभी राहिली. आता मात्र काका उठून तिला धरून चालू लागले. तिच्या इतर अंगांवर हात फिरवीत ते म्हणाले, " अंथरुणं कशाला घालायला पाहिजेत? डबलबेड आहे की आत. " त्यावर तिने पुन्हा एकदा सोडवून घेत ती खट्याळपणे म्हणाली, " आता मात्र मला सोनाजवळ जाऊनच झोपावं लागेल. "....... काकांच्या तोंडावर निराशा पसरली. ती आत जाऊन पाण्याची बाटली घेऊन आली. आणि बेडरूममध्ये शिरली. तिने बाटली एका बाजूच्या टेबलावर ठेवली. काका पण बेडरुममध्ये आले. त्यांनी विचार केला तिला जर आवडत नसतं तर ती जाऊन सोनाजवळ झोपली असती. मग तिला गृहीत धरूनच काका बेडवर तिच्या शेजारी लवंडले..........
तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना त्यांना एक वेगळंच सुख लाभत होतं. चार पाच वर्षांनंतर लाभलेला हा शारीरिक सहवास अधाश्यासारखा हातात घेण्यासाठी ते आसुसले होते. पण त्यांच्या मनाने त्यांना ही रोहिणी नसल्याची आठवण करून दिली. प्रत्येक स्त्री ही रोहिणी असूच शकत नाही. नकळत त्यांचा हात मागे आला. तिच्या ते लक्षात आलं. तिने डोळे मिटले. का.....? ते त्यांना कळलं नाही........ ही मूकसंमती समजून त्यांनी तिच्या उघड्या दिसणाऱ्या छातीच्या भागावरून हात फिरवला. ती लवकरच त्यांना बिलगली नकळत त्यांचे हात एकमेकांवर फिरू लागले. लाइट विझवण्याचीही त्यांना शुद्ध राहिली नाही. तिला जवळ घेऊन तिच्या उघड्या अंगावरून हात फिरवता फिरवता त्या दोघांनी एकमेकांची बऱ्याच वेळा चुंबनं घेतली. बेडरूमला कधी नव्हे तो प्रणयाचा वास येऊ लागला. तिच्या उघड्या छातीवरून हात फिरवता फिरवता, त्यांनी तिचा हात कुरवाळीत हातात घेतला. आणि म्हणाले, " साधना...... " पुढे बोलण्याचं धाडस ते करणार तेवढ्यात कुरवाळीत असलेल्या तिच्या हाताच्या अंगठ्या कडे त्यांची नजर गेली. त्यावर "ख्रिश्चन लोकांचा क्रॉस "गोंदवलेला त्यांना दिसला...... त्यांनी तिचं अंग कुरवाळणारा हात मागे घेतला. आलेली नशा थोडी बाजूला सारून तिने विचारले, " काय झालं? थांबलात का?.......... " त्यावर ते म्हणाले, " साधना तुझया अंगठयावर क्रॉस गोंदवलायस तू? हिंदू असूनही?.... अचानक तिला काय झालं कोण जाणे त्यांना बाजूला सारून ती म्हणाली, " त्यांनी काय झालं. समजा मी ख्रिश्चन असले तर कुठे कमी पडले का? ख्रिश्चन स्त्री, स्त्री नाही? तिला भावना नाहीत? ति प्रेम करू शकत नाही? बाजूला व्हा...... तुमच्या सारखे लोक आधी जात धर्म बघता काय? शरम नाही वाटत तुम्हाला मला बाजूला सारताना? मी ख्रिश्चन, म्हणून तुमचं आकर्षण कमी झालं. असच ना? "तिने कपडे केले. ती ताड ताड बोलत होती. काकांना धक्क्यावर धक्के बसत होते. अर्धे उघडे काका तसेच बिछान्यावर बसले होते. त्यांनी सहज म्हणून आजूबाजूला पाहिलं. पाऊस थांबला होता. साधनाच्या नवऱ्याच्या फोटो कडे त्यांची नजर सहज म्हणून गेली. त्याचे डोळे थंड असले तरी वटारलेले दिसत होते...... काका घाबरले. साधना उठून आतल्या खोलीत गेली. सोना जवळ तिला आता जास्त बरं वाटलं. तिला तिने मिठीत घेतली. साधनालाही पटकन झोप लागेना. आपण बोललो ते बरोबर आहे का? अशी टोचणी तिला लागली. एखाद्या माणसाला आश्चर्य वाटू शकेल अशीच ही गोष्ट आहे. पण त्यांनीही एकदम बाजूला सारायला नको होतं. विचार करता करता तिला झोप लागली. तिकडे काकांनी लाइट बंद केला आणि झोपायचा प्रयत्न केला. ते स्वतःवरच चरफडले. आता काहीही करता येण्यासारखं नव्हतं. रात्र अशीच तळमळत काढावी लागणार. मग त्यांना काही महिन्यांपूर्वी तिच्याकडे जेवायला आलेले होते तो प्रसंग आठवला. तिच्या हॉलमधल्या कपाटात त्यांना बायबलची प्रत दिसली होती. खरंच ही ख्रिश्चन तर नाही? पण मग एका जैन माणसाशी तिचं लग्न कसं झालं होतं. त्याला कसं चाललं? ज्याअर्थी त्याला चाललं, तर मलाही चालायला काय हरकत होती. काय फरक पडला मिळणाऱ्या सुखामध्ये? आपल्या हाताने आपण सुख घालवले. साधना म्हणाली ते काय चूक होतं? आपलं आकर्षण, ओढ एवढी तकलादू आहे? छे! चूकच झाली आपली. आता लग्नाबद्दल काय बोलणार?....... त्यांना अस्वस्थता आली. झोप लागत नव्हती. पाऊस बंद झाल्याने चांगलंच उकडू लागलं. आता फक्त आपल्याला सोनाच्या मदतीनेच सगळं करावं लागेल. उद्या सकाळी उठून तिला शाळेत पोचवायचं काम आपणच करावं. पाहू साधनाचा उद्या मूड कसा असेल तो...... आज आवाज येत नव्हता.
त्यांनी परत परत नीट कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. पण आज आवाज आला नाही. उद्या रमजान बरोबर बँकेत जायचं आहे. गर्दी असेल तर बरं होईल. मग त्यांना स्वप्न पडलं. बँकिंग हॉल, थोडासा गर्दीने झाकोळलेला. ते आणि रमजान इकडे तिकडे करतायत. मध्येच रमजान त्या खोलीजवळ मागे हात करून काहीतरी करीत होता. तेवढ्यात कोणीतरी ओरडून विचारले, " काय चाललंय तिकडे? " काका घाबरले. त्यांना
अचानक स्वप्नातच घाम फुटला, थरथर सुटली. त्यांनी घाम पुसायच्या आतच सिक्युरिटी गार्डने त्या दोघांना रंगेहात पकडलं. आणि मॅनेजर पुढे उभे केले. मॅनेजरने लगेच पोलीस बोलावले. सुगंधाचाच पोलीस झालेला दिसला त्याला पाहून काकांची घाबरून झोप मोडली. मग लक्षात आलं की हे स्वप्न होतं. स्वप्नात काहीही दिसतं. त्यांनी लाइट लावला समोर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्यायलं. लाइट बंद करून ते झोपी गेले.
सकाळी सहालाच साधना उठलेली होती. कपबश्यांच्या आवाजाने काकाही उठले. साधनाची लगबग चालू होती. सोनाचा डवा, आणि बाकी तयारी वगैरे करीत होती. काका आत आले. सवयीने ते बाथरूममध्ये गेले. फ्रेश होऊन बाहेर कपडे घालून बेडवर बसले. आतून साधनाने चहा आणि नाश्ता ट्रे मधून आणला. बाजूच्या टेबलावर ठेवीत तिने विचारले, " लगेच निघालात? " तिच्या लालसर आणि सुजमटलेल्या डोळ्यांकडे पाहत ते म्हणाले, " हिला शाळेत सोडून येतो. उगाच तुझा वेळ जायला नको. ".... थोडा वेळ त्यांच्याकडे पाहत ती म्हणाली, " मला रोजचीच सवय आहे. आणि शाळेत जायला बस समोरच्या फुटपाथवर येते. मी जाईन. " तरीही ते म्हणाले, " मी सांगितलं ना तिला सोडीन म्हणून. " तेवढ्यात सोना आत आली. तिने बोलणे ऐकलं असावं. " मम्मी आज काका सोडतील हं मला". त्यावर साधना म्हणाली, " ते रोज येणार नाही आहेत. ".... "हो, पण आज आहेत ना " असं सोना म्हणाली. साधनाला तिचा तो आगाऊपण वाटला. ती काही न बोलता आत गेली. दहा पंधरा मिनिटांनी काका सोनाला घेऊन बाहेर पडले. खाली गेल्यावर खिडकीत उभ्या असलेल्या साधनाने सोनाला हात केला. तिनेही केला. गंमत म्हणजे काकांनीही केला. दहा मिनिटं थांबल्यावर तिची बस आली. सोना शाळेत
गेली. काका मग वर आले. आज साधना बहुतेक बोलणार नाही. दार उघडंच होतं. ते लावीत काका आत शिरले. साधना स्वयंपाकघरात स्वतःचा डबा तयार करीत होती. ते आलेले पाहून ती म्हणाली, " आय ऍम सॉरी. " माहीत असूनही काकांनी कशासाठी असे विचारले. तेव्हा
तिने रात्रीच्या प्रकाराबद्दल असे सांगितले. आता मात्र काकांना राहवले नाही. आपण पुढे होऊन गैरसमज दूर केला नाही तर सगळंच फिसकटेल असे वाटून ते म्हणाले " मला सुद्धा माफ कर. मी असं वागायला नको होतं. पण मला एक सांग, तुझ्या हातावर हा क्रॉस गोंदवला कोणी? "
ती म्हणाली, " मम्मीने. माझी मम्मी ख्रिश्चन होती. पण तिनी आम्हाला म्हणजे मला, वडलांना आणि एक भाऊ आहे त्याला कधीच चर्च मध्ये जाण्याची सक्ती केली नाही. मी स्वतःहून चर्चमध्ये खूप वेळा गेलेली आहे. ती जेव्हा आजारी पडायची तेव्हा तर प्रभूला साकडं घालायची. तसंच गणपतीलाही घालायची. मग मी मेहतांशी लग्न केलं. तोही आमचा प्रेम विवाह होता. वडलांना पसंत होता. मम्मी तेव्हा नव्हती. पण भावाला पसंत नव्हता. त्यांनी संबंध कधी ठेवलाच नाही. कालच्या प्रकाराबद्दल खरंच मी माफी मागते. " तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता काकांनी तिला मनापासून जवळ घेतलं. हिची कथा आणखीनही काही तरी गूढ असणार असं काकांना वाटलं. पण त्यांनी ते बोलून दाखवले नाही. ती केव्हातरी सांगेलच. अचानक तिने विचारले, " तुम्ही थेट कामावर जाणार आहात की आधी घरी जाणार? " त्यावर ते म्हणाले, "अगं मला खालच्या बँकेत जायचंय. तुझं काही काम असेल तर सांग. " तिचं काय काम असणार, असं समजून ते म्हणाले. तिने उत्तर देण्याऐवजी त्यांनाच सुचलं. हिचं पण पास बुक असेल. ते भरायचं असलं तर आपल्याला बँकेत जायला वेगळं कारण लागणार नाही. फार तर नाही म्हणेल. तसं माझ्याजवळ पासबुक द्यायला काहीच हरकत नाही. ते विचारण्यासाठी अधीर झाले. चुळबूळ करीत तिथेच उभे राहिलेले पाहून ती म्हणाली, " माझ्याबरोबरच बाहेर पडा. "....... थोडावेळ जाऊन देऊन ते हॉलमध्ये जाऊन बसत म्हणाले, " तुझं काही खालच्या बँकेत काम असेल तर सांग, म्हणजे पास बुक वगैरे काही भरायचं असेल तर,.......  " असं म्हणून विचारलेलं सहज वाटावं म्हणून पेपरात डोकं घातलं. काकांचे अनुभवाने ठरलेले काही सिद्धांत होते. ते म्हणजे, जर काही काम असेल आणि काम करणारी व्यक्ती ते कितपत करील याची शंका असेल तर त्याला फोन वरून विचारावं, किंवा जर समोरच विचारायची वेळ आली तर दुसरीकडे लक्ष वळवून मग मोठ्याने विचारावं. शक्यतोवर ती व्यक्ती नाही म्हणत नाही. तसंच अशी व्यक्ती जायला निघाली की विचारावं. म्हणजे लगेच निर्णय मिळतो, अर्थात नकारात्मक उत्तर ऐकण्याची तयारी ठेवावी. पण सहसा होकारार्थी उत्तर मिळते असाच त्यांचा अनुभव होता. आत्ताही तसेच झाले. ती म्हणाली, " भरायचंय, पण असलं फालतू काम तुम्हाला काय सांगायचं. मीच जाईन कधीतरी. ".... आपलं काम बिघडेल असं वाटून ते घाईघाईने म्हणाले, " अगं त्यात काय मोठं, लहानसं काम आहे म्हणूनच विचारलं पाहा हं, म्हणजे मला नसेल द्यायचं तर आग्रह नाही माझा. " मग मात्र ती म्हणाली, " छे छे
तसं नाही" असं म्हणून तिने आतल्या एका कपाटातून त्यांना पास बुक काढून दिले. थोड्याच वेळात ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली, तेवढ्यात त्यांनी रमजानला फोन लावला. आणि बरोबर सव्वा अकराला बँकिंग हॉलमध्ये यायला सांगितलं.
साधना तयार झाली. पर्स वगैरे घेऊन ती निघाली. आत्ता तरी काकांना रमजानचं काम कसं होणार याची काळजी होती. त्यामुळे त्यांचं फारसं लक्ष तिच्या कपड्यांकडे आणि दिसण्याकडे गेलं नाही. तरीही तिच्या अंगाचा सुगंध त्यांना आवडला. ते दोघेही दरवाजा वंद करून खाली आले. नुकत्याच सुशिलाबाई आणि साठे मामा पोलिस स्टेशनला गेले होते. काकांनी बिल्डिंगच्या गेटजवळ तिचा मूक निरोप घेतला. उगाच कोणी पाहायला नको. ते बँकेत शिरले. तिथल्या बाक्ड्यावर रमजान दिसला नाही. त्यांनी घड्याळाकडे बघितलं. अकरा वाजून पाच मिनिटं झाली होती. त्यांची नजर "त्या " खोलीकडे गेली. ती जशी आधी दिसली होती, तशीच होती.... \". बं..... द \".
बँकेत आज बऱ्यापैकी गर्दी होती. पण भरपूर. नव्हती. ते बाकड्यावर टकले न टेकले तोच दार ढकलून रमजान आत आला. तो मलमलचा पांढरा शर्ट आणि तंग लेंगा घालून आला होता. तो तसा किडकिडीत होता. पण चिवट वाटला. गोरटेलेसा रमजान वीस एकवीस वर्षांचा होता. काकांना माही त नव्हते की तो तिजोऱ्या उघडण्यात पटाईत होता. त्याच्याजवळ काहीच नव्हते. काका उठून सुगंधा ज्या कौंटरमागे बसली होती, तिथे आले. तो त्यांच्या मागे होता. त्यांनी तिच्याकडे साधनाचं पास बुक दिलं. ते उघडून पाहत ती म्हणाली, " वेळ लागेल. बसा जरा. आज गर्दी आहे आणि पास बुक बरेच दिवसात भरलेलं नाही. " तरीही काका तिथेच उभे राहिले. नंतर वळून त्याला त्यांनी दबक्या आवाजात कोणती खोली ते सांगितले. चाणाक्ष रमजानने ती नीट पाहून घेतली. रुमच्या आजूबाजूला जराशी गर्दी होती. तिथेच लॉकर उघडून देणारा ऑफिसर बसला होता आणि त्याच्या टेबलाभोवती तीन चार माणसं उभी होती. दुसरे दोन म्हातारे, खुर्च्यांवर बसले होते. मग काकांनी रमजानला आपण टॉयलेटला जाणार आहोत म्हणून सांगितले आणि त्यांच्या पाठोपाठ यायला खुणावले. टॉयलेटला लॉकर ऑफिसरला ओलांडून जावे लागत होते. आणि ती रूमही लॉकरच्या खोलीजवळ होती. अचानक बँकेत गर्दी वाढली. ते पाहून बँकेतला गार्ड पुढे होऊन गर्दीला सांभाळू लागला. त्याने प्रत्येकाला कामाबद्दल विचारले आणि त्या त्या रांगेत उभं राहायला सांगितले. काकांच्या मागे वाट काढीत रमजान जात होता. काका लॉकर ऑफिसरच्या टेबलापाशी घोटाळले. त्यांनी खुणेने लॉकरच्या जवळच असलेल्या खोलीकडे इशारा केला. रमजान त्या खोलीजवळ उभ्या असणाऱ्या दोन तीन लोकांच्या मागे अशा रितीने उभा राहिला की त्याची पाठ खोलीकडे असेल. काका लॉकर बद्दल चौकशी करण्यासाठी त्या दोन तीन लोकांच्या पुढे उभे राहिले. हळूच मागे सरकत रमजान त्या खोलीच्या दरवाज्याला टेकला. आपल्या खिशातून स्क्रू ड्रायव्हर बाहेर काढून त्याने मागे न बघता हातानेच बोल्टचा अंदाज घेतला. बोल्ट चांगलाच सैल होता. पण दाराच्या चौकटीच्या भोकात अडकवलेला होता. त्याने स्क्रू काढून बोल्ट काढण्यापेक्षा बोल्ट आणि दाराचा भाग यात स्क्रू ड्रायव्हर घालून जोर लावला. लहानसा... \" कट\"... असा आवाज करीत बोल्ट उचकटून ठेवला. आता स्क्रू खाली पडले होते. एक दोन सैल स्क्रूंवर तो बोल्ट तिथेच लागला होता. आतून जर जोरात दरवाजा ओढला तर बोल्ट तुटला असता आणि खोलीचा दरवाजा उघडला असता. त्याने हातात अवचित आलेले स्क्रू आणि स्क्रू ड्रायव्हर खिशात टाकीत अधून मधून प्रश्नार्थक पाहणाऱ्या काकांना काम झाल्याचा इशारा केला. काका लगेचच सुगंधाकडे जाण्यासाठी वळले. ते पाहून त्यांच्या मागची दोन तीन माणसे कुरबुरली, " काही काम नव्हतं तर जागा अडवून हा गृहस्थ कशासाठी उभा होता कोण जाणे? " काकांनी तिकडे लक्ष दिले नाही. ते आणि रमजान परत कौटरजवळ आले. काकांना आणि त्याला गार्डाने हटकले. "आपका काम हो गया है तो निकलो. बहूत भीड हो गयी है. " रमजान कडे वळून तो म्हणाला, " आपका क्या काम है? " मग काका पुढे झाले तो त्यांच्या बरोबर आहे असे म्हणाले. त्यावर गार्ड म्हणाला, " आप लाईनमे लगो उनको उधर बैठनेको बोलो. " रमजान चुपचाप बाकड्यावर बसला. तेवढ्यात सुगंधाने खुणेने त्यांना बोलावले आणि भरलेले पास बुक हातात दिले. ती परत ओळखीचे हसू हसली. ते दोघेही लवकरच बाहेर पडले. आणि ऑफिसला गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

सुशीला कापसे, आजींच्या शेजारीण बाई. आजी नाहीशा झाल्या दिवसापासून बाहेरगावी गेल्याने त्यांनाही आजी आल्या नसतील याची पुसटशी देखिल कल्पना नव्हती. त्या मंगळवारी संध्याकाळी बॅगा घेऊन वर आल्या. त्यांनी कुलूप उघडताना सहज म्हणून आजींच्या दरवाज्याकडे पाहिलं. पण त्यांना आश्चर्य वाटलं नाही. आजींना भावाने अगदी मनापासून ठेवून घेतलेले दिसते आहे असे समजून कोणतीही चौकशी न करता घरात शिरल्या. आत शिरून दरवाजा लावतात न लावतात तोच त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी साडी बदलण्यासाठी काढलेला पदर परत खांद्यावर टाकला आणि जरा रागातच दार उघडले. दारात साठे मामा होते. सोसायटीचे सेक्रेटरी. आता हे कशाला आल्येत, म्हणून त्यांनी प्रश्नार्थक रितीने भुवया उंचावून त्यांच्याकडे पाहिले. साठे म्हणाले, " अहो सुशीला बाई, या आपल्या
ताराबाई बाहेरगावी जाऊन बरेच दिवस झालेत. कुठे गेल्येत माहीत आहे का? अहो अजून सोसायटीचे पैसे पण दिले नाहीत. " त्यावर त्या म्हणाल्या, "अहो त्या त्यांच्या भावाकडे जात्ये म्हणून म्हणाल्या " " असं! पण भाऊ आहे कुठे त्यांना? त्यांना तर कोणीच नाही, तुम्हाला माहीत नाही का? " खरंतर साठ्यांचा जिकडे तिकडे नाक खुपसण्याचा स्वभाव सुशीला बाईंना आवडत नव्हता. पण आजींना जाऊन बरेच दिवस झाले होते, हेही खरं होतं. मग त्यांनी साठ्यांना आजी गेल्या त्या दिवशीचा प्रसंग सांगितला. त्यावर साठे म्हणाले, " सुशीला बाई मला वाटतं, आपण पोलिस कंप्लेंट केली पाहिजे. तुम्ही याल का बरोबर? " सुशीला बाई थोडावेळ घोटाळल्या आणि म्हणाल्या, " हो येईन की. पण आज नको. मी आत्ताच आले. आपण एक दोन दिवसात जाऊ. " मग साठे गेले. त्यांची अपेक्षा होती, त्यांनी लगेचच यावं. पण सामाजिक
बांधिलकी, शेजारधर्म हे शब्द यांना काय कळणार? असं त्यांच्या मनात आलं. साठेच ते. उचापतींशिवाय दुसरं त्यांनी काही केलं नव्हतं. ज्याला ते समाज कार्य म्हणत असत. नेहमी असच घडायचं. पण आत्ता मात्र साठ्यांचं वागणं एकदम बरोबर होतं.
गुरुवारी सकाळी रमजान आणि काका बँकेत शिरले तेव्हा साठे मामा आणि सुशिलाबाई पोलिस स्टेशनला निघाले. बस पकडून ते पोलिस स्टेशनला पोहोचे पर्यंत त्यांना अकरा वाजून गेले होते. मामा तिथल्या ड्यूटी ऑफिसरकडे गेले. त्यांनी त्यांना आपण कोण कोठून आलो आणि येण्याचे कारण सांगितले. त्यावर तिथेच बसलेला कॉन्स्टेबल सखाराम म्हणाला, " अहो, ते सगळं ठीक आहे हो. पण आजींच्या जाण्याची तारीख, टाइम काय होता? आणि त्यांचा एखादा फोटो पण पाहिजे. " सुशिलाबाई म्हणाल्या, " म्हणजे बघा मागचा मंगळवार बुधवार असेल, दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास त्या गेल्या, मला सांगून गेल्या पण किल्ली ठेवली नाही, नेहमी ठेवतात हो. "
" अहो बाई तुम्ही शिकलेली माणसं. साधी गोष्ट आहे फोटो नको का? मिसिंगची कंप्लेंट लिहून घेऊ, पण शोधणार कसं? आणि दुसरं म्हणजे एवढ्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यावर परिणामही होतो कधी कधी. येतील लवकरच परत. दोन दिवस वाट बघा. " मग मात्र साठे मामा थोड्या तावाने म्हणाले, " अहो बरेच दिवस झाले म्हणून आलो. आता आणखीन कशाला वाट पाहायची? तुम्हाला कंप्लेंट नोंदवून घ्यायची नसेल तर तसं सांगा. वरच्या साहेबांना भेटतो. " आता मात्र कॉन्स्टेबल तापून म्हणाला, "ओ काका, इतका वेळ तुम्ही मोठी माणसं म्हणून ऐकून घेतलं. आमचाच कायदा आम्हाला शिकवू नका. बघा एखादा फोटो आणा. लगेचच कंप्लेंट नोंदवून घेतो, म्हणजे तपासाला सुरुवात करता येईल. निघा आता. " मामा आणि सुशीला बाई बाहेर पडले. आता फोटो आणायचा कुठून? त्यांच्या घराची दुसरी चावी पण कोणाकडेही
नव्हती. पोलिसांनी खरंतर कुलूप फोडून पाहायला काही हरकत नव्हती. पण पोलीस आहेत ते, त्यांनी आपलं ऐकलं मग काय राहिलं? त्यांनी विचार सुशिलाबाईंना बोलून दाखवला. ते दोघेही निराशेने घरी परतले. घरात शिरता शिरता सुशिलाबाईंनी एकदा नीट निरखून कुलुपाकडे पाहिलं. पण संशय घेण्यासारखं काहीही दिसलं नाही. कुलूप फोडून फोटो शोधायला आत कशाला जायला पाहिजे त्यांच्या मनात आलं.
या जुन्या लोकांचे फोटो मिळण्याची मोठीच मारामार असते. मग त्यांना जरा संशय यायला सुरुवात झाली. त्या स्वतःच्या घरात शिरल्या. त्या दिवशी आजी खूप घाबरलेल्या दिसत होत्या. कां बर? त्या स्वतः शी पुटपुटल्या. स्वतःच्या भावाकडे जाताना माणूस घाबरण्याचं काहीच कारण असायला नको. हे सगळं पोलिसांना सांगायला हवं, असं त्यांनी ठरवलं. आणि सोमवारी पुन्हा एकदा पोलिस स्टेशनला एकटीनेच जायचे ठरवले. त्या ही घरात एकट्याच राहतं असत. त्यांचे यजमान बाहेर गावी कामाला असल्याने महिन्यातून एक दोन वेळा येऊन जायचे. त्यांनी ते आले तर त्यांना सांगायचे ठरवले आणि जमलं तर त्यांना बरोबर घेऊन पोलिस स्टेशनला जायचं ठरवलं. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.

(क्रमशः )

🎭 Series Post

View all