टाचक्या टिचक्या जागेत किती वेळ पडून राहणार ? गुड्डीला येऊन आता दोन दिवस होत आले. खरंतर आल्याच्या दुसऱ्या दिवशीही तो भीतीने खोलीबाहेर पडला नाही . तो फक्त अधूनमधून खिडकीतून बाहेर डोकवी. आणि एखाद दुसरा हवालदार दिसला तरी, लहान मुलं घाबरतात , तशी खिडकी बंद करी. तसंही त्या रस्त्यावर बघण्यासारखं काहीच नव्हतं. जिकडे पाहावं तिकडे धंद्याकरिता उभ्या असलेल्या पोरी, दलालांची भांडणं, त्यांनी केलेली गिऱ्हाईकाची रस्सीखेच, सडलेल्या पानाच्या गाद्या , भसाड्या आवाजात लागलेली अचकट विचकट गाणी आणि ती वाजवणारी भिकारडी हॉटेलं. त्याच्या मनात आलं इथे असं कोणतं मोठं गिऱ्हाईक येत असणार ? ह्या मावश्या इतक्या मिजास करतात ती कोणाच्या जोरावर ? दादाला नक्की किती पैसे मिळत होते कुणास ठाऊक . काहीही असलं तरी त्याला या वातावरणाचाच आधार होता. मधेच त्याला लपवणाऱ्या मावशीकडून खाना आला होता. बेचव जेवण त्याने घशाखाली ढकललं. तो संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. म्हणजे जमलं तर खाली उतरायला बरं. पण तसं झालं नाही . संध्याकाळ झाली . तो निघाला. पण जवानी मावशीने त्याच्यावर नजर ठेवायला सांगितलेल्या पठाणाने त्याला अडवले. " ऐ, सुव्वरके बच्चे, जानेको मना है तेरेको. चल अंदर. " तसा तो घाबरट होता. तो पुन्हा आत आला. रागाने त्याने बाजूच्याच कमऱ्यात असलेल्या मौसीकडे दाद मागण्यासाठी जायचं ठरवलं. पण न जाता तो स्वस्थ बसला. तिने उरलेले पैसे मागितले तर ? ...आपण पहिल्यापासून भित्रट , असं त्याच्या मनात आलं. त्याला एकदम आब्बाजानची आठवण झाली. ते म्हणायचे, " तेरेमे हुन्नर नही है बेटा , तेरा ये जनानी चेहरा देखकरही कोई रहम करेगा तो करेगा, वरना जिंदगी हराम हो जायगी." आता त्याला ते खरं वाटू लागलं. आपण अगदीच पुचाट आहोत. आता फक्त "मिस्चिफ आया तोही कुछ हो सकता है. " असं तो आत्तापर्यंत तीन चार वेळा तरी म्हणाला असेल. संध्याकाळने तो विभाग रंगवला. दिव्यांच्या रंगीत प्रकाशात आकाशातल्या चांदण्यांचं स्वरूप आलं. गुड्डी पुन्हा खिडकीतून डोकवू लागला. त्याच्या मनात आलं साला आपण आणि या रांडांमध्ये काय फरक आहे ? आपणही आज खिडकीतच उभे आहोत. चुकून आपणही धंदा करतोय असा समज होऊन एखादा पुरुषाचा शौकीन आला तर पंचाइत व्हायची. म्हणून तो बाजूला झाला. असला प्रकार त्याने ब्लू फिल्ममध्ये पाहिला होता. पळाल्यापासून मजा अशी करता आली नव्हती.
मग तो मागे न बघता आपल्या खोलीकडे भराभर गेला. त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला. पुन्हा एकदा त्याने मिस्चिफला फोन लावला. पण त्याने उचलला नाही. निराशेने तो त्या लहानशा खोलीत बेडला सांभाळून फेऱ्या मारीत राहिला. आजपर्यंत इतक्या भराभर त्याने कधीही फेऱ्या मारलेल्या नव्हत्या. कोणाच्या ना कोणाच्या तरी आधाराने त्याला जगण्याची सवय होती. पण
गुड्डी पुन्हा बेडवर बसतो न बसतो तोच पुन्हा दरवाजा ठोकला गेला. दोनतीन वेळा थाप पडल्यावर त्याला समजलं की मगाशी खालून धावत वर येणारी माणसंच असणार, जी या पोरीचा शोध घेत आली. त्याने हातातलं पिस्तूल सांभाळीत दरवाजा उघडला. बाहेर पठाण जेवणाची थाळी घेऊन उभा होता. गुड्डीच्या हातातलं पिस्तूल पाहून त्याच्या हातात थाळी सरकवीत तो म्हणाला, " तुम स्साला खुदकुशी करेगा ? मुसलमान कभी खुदकुशी नही करता, समझे, चल खाना खा ले और चुपचाप बैठ. " असं म्हणून तो निघून गेला. त्याला पोरगी पळून आलेली असल्याची खबर नसावी. म्हणजेच हा इथे नव्हता तर. आपण प्रयत्न केला असता तर जाऊ शकलो असतो. जेवणाची थाळी बेडवर ठेवून त्याने बेडखाली लपलेल्या पोरीला बाहेर यायला सांगितले. " देख , खाना खा ले. फिर यहांसे कैसा भागनेका इसके बारेमे बात करेंगे. " पोरगी बाहेर येताच पुन्हा म्हणाली, " मुझे कुछ नही चाहिये, मुझे यहांसे जाना है..... तिने स्वतःच्या उघड्या छातीवर हात आडवे ठेवले. एकूण तिचा बांधा चांगला होता. तिच्या अंगावर त्याला ओरबाडल्याच्या खुणा गुड्डीला दिसल्या. कां कोण जाणे पण त्याला या पोरीची कीव आली. हिला पळून जायला आपण मदत करायला हवी. असं त्याला वाटू लागलं. तो परत म्हणाला, " भागना तो है ही. लेकीन भागने के लिये ताकत तो चाहिये, इसलिये खाना खा लो. डरना नही. " मग त्याने थाळीतल्या एका ताटलीत तिला दोन चपात्या आणि भाजी दिली . तिच्यापुढे ठेवली. अजून तिला विश्वास नव्हता. तिने उभ्या उभ्याच चपात्या खाण्यास सुरुवात केली. पण तिची नजर एक सारखी इकडे तिकडे फिरत होती. ते पाहून गुड्डी स्वतःशी म्हणाला, हिला जरी बाहेर काढली तरी हिच्या घरच्या लोकांनी हिला घरात घ्यायला हवं. म्हणजे ही परत आपल्याच ताब्यात राहील. त्याचं मन डचमळू लागलं. आलेले चांगले विचार विरले. म्हणजे आपली कायमची सोय होईल. त्याच्या विचारांमध्ये काहीतरी बदल होतोय हे पोरीला जाणवलं म्हणून तिने पुन्हा काळजीने विचारले," आप मुझे बाहर निकालेंगे ना ? नही तो मै अभी खुदकुशी कर लूंगी , मुझे मेरे जान की परवाह नही है. " असं म्हणून तिने पटकन हातातली थाळी फेकली आणि बेडवर ठेवलेलं पिस्तूल उचललं आणि स्वतःच्या कानशिलाजवळ नेलं. गुड्डीने जेवण अर्धवट सोडले आणि तिला समजावणीच्या सुरात म्हणाला, " अरे अरे, ये क्या कर रही तो तुम , कही बात हो जायेगी . ऐसा मत करना बेबी. तेरे साथ मै भी मर जाउंगा, मै भी यहां नही रहना चाहता. " त्याने घाईघाईने तिचा दंड धरला. तिच्या हातातलं पिस्तूल काढून घेण्यासाठी तो झटापट करू लागला. त्यात ती आरडा ओरडा करू लागेल
त्यांना काही कळेना. ते सगळीकडे फिरून पाहू लागले. पण असे प्रत्येक चाळीत जाऊन पाहण्यात चांगलाच वेळ जात होता. शेवटी ते चौघे जण एका गल्लीच्या तोंडाशी थांबले. आतमध्येच गुड्डी आणि ती पोरगी होती. त्यांनाही माहीत नव्हतं की बाहेर पेरियरची माणसं उभी आहेत. मग त्या चौघांनी प्रत्येक गल्ली तपासण्याचं ठरवलं. पण आधी ते उभे असलेली गल्ली त्यांनी तपासली नाही. गुड्डी परत मुख्य रस्त्यावर आला. तिथून त्याला मौसीची चाळ दिसत होती, अजूनही पहिल्या माळ्यावर पोरींची गर्दी दिसली. अचानक त्याला समोर कॅफे गोलमाल दिसला. तिथे ते दोघे पळत पळत शिरले. कॅफे मध्ये चांगलीच गर्दी होती, पण सगळी खालच्या थरातल्या लोकांची. कौंटरवरचा मुसलमान पाहून गुड्डीला जरा बरं वाटलं. त्याने त्याला भलतीच स्टोरी सांगून आपल्याला उभ्या असलेल्या मुलीला विकायचंय असं सांगितलं. ते ऐकून काउंटरवरचा मिया म्हणाला, " वो सब ठीक है, लेकीन मै ये धंदा नही करता. ज्यादासे ज्यादा तेरेकू दोन तीन दिन रयनेको जगा दूंगा , सिर्फ इसलिये की तुम मुसलमान हो. भटारखानेसे बाहर जाओ. बाये बाजूमे उपर एक रूम है. " भाई लेकीन खानेका पैसा तो तेरेकू देना पडेगा. " असं म्हटल्यावर गुड्डीने त्याला आपल्या हातातली अंगठी काढून दिली. " फिलहाल तो मै ये दे सकता हूं, अब तो दोन तीन दिन खानेका इंतजाम हो जायेगा ना ? " ते पाहून मियाने मान डोलवली. मग गुड्डी पोरीला घेऊन रुममध्ये गेला. मग ती पोरगी म्हणाली, " कमसे कम हम स्टेशनपे तो जायेंगे, ताकी हम गाडी पकडके कही दूर जा सकेंगे. " आता जरा गुड्डीचं मन ताळ्यावर आलं. त्याने खऱ्या अर्थाने तिच्याकडे पाहिलं. मग खालीच उभ्या असलेल्या माणसाला त्याने जेवणाची ऑर्डर दिली. जवळ जवळ साडे दहा वाजत आले होते.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा