कामथे काका (भाग १६)

सगळे गेल्यावर दादाने दिवाणजीचं काम करणाऱ्या माणसाला फोन केला.....

सगळे गेल्यावर दादाने दिवाणजींचं काम करणाऱ्या माणसाला फोन केला. कारण अजून पन्नास लाखांचा प्रश्न होता. खोपडी देणारा म्हणाला, " दादासाब, खोपडीया एकदम ताजी है. अभी अभी घंटा पह्यले लायी है. डिलिव्हरी देनेको मै खुद निकला हूं. " दादाला जरा बरं वाटलं. पण त्याला संशयही आला. आपण तर ह्याला केव्हा ये हे न सांगताच हा कसा काय येतोय? काही दगा फटका होईल या शंकेने त्याने प्रथम आपलं पिस्तूल काढून हातात धरलं. मग दिवाणजींना फोन लावून खोपड्या शनिवारी रात्री पोहोचतील असे कळवले. फक्त उरलेले पैसे घेऊन येणाऱ्या माणसाजवळ ताबडतोब द्यावे लागतील. जर त्यात काही गफलत केली तर प्राणाशी गाठ असेल. बेल वाजली. हातातलं पिस्तूल रोखत दादाने स्वतः दार उघडले. दारात पूर्ण काळा कभिन्न माणूस उभा होता. त्याच्या हातात एक प्लास्टिकची निळ्या रंगाची पिशवी होती. त्यात दुसऱ्या एका पिशवीत बर्फाच्या चुऱ्यात पॅक केलेली पाच बालकांची शिरे होती. तो आत आला. मग त्याच्याकडूनच आणलेलं पॅकिंग उघडून दादाने त्या खास कामासाठी बनवलेली लाकडाची पेटी उचलून आणली. त्यात बर्फाचा चुरा भरला. त्यात आणखीन थोडा बर्फ मोठ्या फ्रीज मधून काढून पसरला. ती पाचही शिरे त्या दोघांनी एकेक करून बर्फात निर्विकारपणे ठेवली. जगात आल्या आल्याच वरचा रस्ता दाखवणाऱ्याचं दर्शनही निदान मेल्यानंतर नको म्हणूनच जणू काही त्यांचे निरागस डोळे मिटले होते. निर्दयपणाला सुद्धा लाज वाटेल इतक्या निर्दय पणे त्या दोघांनी त्यांच्या डोक्यांवर बर्फाचा दाट थर पसरला. फ़ार टिकतील की नाही याची खात्री नसल्याने शनिवारी बँकेत जायच्या आधी जास्त आणि नवीन बर्फ टाकून ठेवण्याचे दादाने ठरवले. मग तो माणूस गेल्यावर दादाने ती पेटी ओढत फ्रीजजवळ आणली. फ्रीजमधल्या निरर्थक बाटल्या आणि इतर सामान काढून त्याने ती फ्रीजमध्ये मोठ्या मुश्किलीने ठेवली. नुसते एवढे काम करताना त्याला जबरदस्त धाप लागली. याची डिलिव्हरी किती त्रासदायक होईल याची त्याला जाणीव झाली............ जवळ जवळ एक वाजून गेला होता, जेव्हा हिरा आणि जीवनदान सूर्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले. दोघांनी मिळून बांधलेल्या सखारामला कसंतरी उचललं. सखाराम बेशुद्ध नव्हता. त्यामुळे त्याने त्यातल्या त्यात बांधलेल्या अवस्थेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण उचलणारे धंदेवाईक गुन्हेगार असल्याने सखारामचा विरोध मावळला. ते दोघेही सखारामला घेऊन दादाच्या केबिनमध्ये शिरले आणि त्यांनी सखारामचं मुटकुळं खाली ठेवलं. त्याबरोबर दादा कडाडला, " तुम लोग कौनसा भी काम हो, लफडा करतेही हो क्या? एक काम साला ठीक तरहसे नही कर सकते. अब किसको पकडके लाये? " दोघेही स्तब्ध होते. त्यांना तसे उभे पाहून तो म्हणाला, " जबान भाग गयी क्या? बोलते क्यूं नही कमीनो? " त्यावर जीवनदान म्हणाला," दादा ये हवालादार है. बहोत नड राहा था, इसलिये उसको यहां लाना पडा. वो मरा नही है? अब इसे खोले क्या? " तशी दादा म्हणाला, " किसीकी राह देख रहे हो क्या? " ......... ते दोऱ्या सोडणार तेवढ्यात सखारामच्या मोबाइलची रिंग वाजली. हिराने तो घेतला. पण काही बोलला नाही. तो पर्यंत जीवनदानने त्याला कसातरी ओढत पुढे आणला.हिराने फोन बंद केला. आणि दोऱ्या सोडून हवालदाराला बाहेर काढलं. सखारामला पाहून दादा म्हणाला," अरे हवालदार साब आप ? उस दिन पैसा कम पड गया क्या ? " सखाराम काहीच बोलला नाही. तो उभा राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच हिराने त्याच्या कानफटात मारली . तोभेलकांडला आणि जमिनीवर पडला. मग हिरा म्हणाला, " दादा अब इसका क्या करे? " खरंतर दादा स्तंभित झाला होता. हे लोक एका पोलिसाला पकडून घेऊन आले होते. त्याला त्याची जाणीव झाली. त्याला सोडलं तरी त्रासदायक नाही सोडलं तरी त्रासदायक. त्याला पुन्हा एकदा त्या दोघांचा राग आला. मग त्याला हिराने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, असं करण्याशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. मग तो थोडा विचार करून म्हणाला. " इसको बांधके डाल दो सुरंगमे. बादमे सोचके इसका फुल ऍड फायनल करेंगे. " त्याला त्या दोघांनी मग यथेच्छ तुडवला. अर्धमेला केला. आणि पुन्हा एकदा बांधून केबिन खालच्या भुयारात बंद केला. ख्ररं तर दादाचं डोकं चालत नव्हतं. अचानक निर्माण झालेल्या या अडचणीवर काय उपाय करावा त्याला सुचेना. मग ते दोघे गेले. दादाने व्हिस्कीचा ग्लास तोंडाला लावून विचार करायला सुरुवात केली........

भुयारात टाकलेल्या सखारामला, खोल विहिरीत पडल्यासारखं वाटत होतं. त्याने उठण्याचा प्रयत्न केला, त्याबरोबर त्याला डोक्यात वेदनेच्या इंगळ्या डसल्यासारखा भास झाला. ती एकच कळ नव्हती. ते वेदनांचं मोहोळ होतं. मग पुन्हा त्याला ग्लानी आली. आणि तो खालच्या पायरीवर अस्ताव्यस्त पसरला. देहाचा बराचसा भाग पायरी लहान असल्याने खालच्या पाण्यात लोंबत होता. जवळ जवळ अर्ध्या तासाने तो आता हळू हळू शुद्धीवर येत होता. प्रथम त्याला पाणी पिण्याची इच्छा झाली. अत्यंत कुबट, कुजट अशा पाणथळ वासाने त्याला अस्वस्थता आली. सबंध अंग ठणकत होतं. पाण्यातले उंदीर आता त्याच्या अंगावर उड्या मारून त्याच्या पायातल्या बुटांना चावून चावून कंटाळले. त्याने कष्टाने डोळे उघडले. अंधाराला सरावल्यावर त्याला आपल्या डोक्यावरचे छत जवळच असल्याचीजाणीव झाली. समोरच्या बाजूला असलेल्या गंजक्या जाळीवजा गेटची कल्पना यायला त्याच्या मेंदूला फार कष्ट पडले. पण एकूण आपणकुठेतरी जमिनीखाली आहोत हे त्याला कळले. उठून बसण्याची शक्ती नव्हती. आणि हाता पायांना बांधलेल्या दोऱ्या आता काचू लागल्याहोत्या. त्यामुळे झालेल्या लहान सहान जखमांची आग आता त्याला जाणवू लागली. त्याला प्रथम आठवण झाली ती श्रीकांत सरांची . त्यांनाकसं कळणार , आपण इथे अडकलो आहोत ते. या विचाराने तो जास्त अस्वस्थ झाला. आपला फोन किशाच्या माणसांनी घेतला असणार, हे नक्की . त्याच्या मनात आलं, हा किशा बँकेवर दरोडा घालण्याच्या तयारीत आहे. पण उपयोग नव्हता. त्याचा फोन त्याच्या जवळ नव्हता, आणि श्रीकांत सरांना कळवण्याचा दुसरा मार्गही त्याला कळत नव्हता. अंगात अजूनही ताकत नसल्याने त्याला चांगलाच थकवा जाणवत होता. पाण्यात उंदीर आहेत हे त्याला त्यांच्या आवाजावरून जाणवलं. पण त्याला कोणताही प्रतिकार करता येत नव्हता, की तो पाय वर घेऊ शकत होता. थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या जागेतून त्याला वर काहीतरी सरकवल्याचा आवाज आला. काय असेल बरं हे? मेंदूला ताण देणं जमत नव्हतं. पाय मोकळे असते तर ते त्याने हातातून काढले असते. पण तसं नव्हतं. त्यामुळे निराशेने त्याने पाय तसेच ठेवले. बूट चावून कंटाळलेल्या उंदरांनी त्याच्या पँटमध्ये उड्या मारून पाहिलं. त्यांना मांसाचा वास आला त्या बरोबर चावायला लागले. पण त्यांच्या तोंडात बांधलेली दोरी आली. तीच त्यांनी कुरतडायला सुरुवात केली. एका वेळेला पाच पाच सहा सहा उंदीर कुरतडू लागले. साधारण पणे अर्ध्या पाऊण तासाने दोऱ्यांचं बळ कमी झालं. एकेक करीत त्यांचा विळखा सुटला. त्या सैल होऊन लोंबू लागल्या. जणू काही परमेश्वरानेच उंदरांना बुद्धी दिली. पण आता मात्र ते सखारामच्या पायांना चावे घेऊ लागले. त्यामुळे सखारामला येणारी ग्लानी पळाली. तो त्या पायरीवर उठून बसला. त्याने पाय वर घेतले. पण त्याचे बूट मात्र सैल झाल्याने पाण्यात गळून पडले. हळू हळू जमेल तसे पाय मागे बांधलेल्या हातांच्या दोऱ्यांमध्ये घालून हात पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ गेला. पँट ओली असल्याने अथक प्रयत्नाने पाय बाहेर आले व हात बांधलेल्या अवस्थेत का होईना पुढे आले. आता प्रश्न होता. हात सोडवण्याचा. पण ते तितकंसं सोप नव्हतं. दम लागल्याने तो बराच वेळ तसाच बसून राहिला. अंधाराला डोळे आता चांगलेच सरावू लागल्याने भुयाराचे छत त्याला दिसू लागले. तो जिथे बसला होता तिथे ते बरंच खाली होतं. त्यामुळे उभं राहण्याचा प्रश्नच नव्हता. आता त्याला तहान आणि भूक लागल्याची जाणीव झाली. त्याने आशेने भुयाराच्या भिंतीकडे पाहिलं. पण त्यात असलेल्या भोकशांशिवाय तिथे काही नव्हतं. त्या भोकशांमध्ये काही असलं तरी उठून पाहण्याची ताकत असायला हवी. निदान सध्यातरी काही करता येण्यासारखं नव्हतं.

किशा पीत बसला होता. रात्रीचे दोन वाजले होते. बरोबर आणलेला नाश्ता तो खात होता. दारूने त्याच्या डोक्याचा आता पक्का ताबा घेतला. त्याला समोरचं सगळं अदृश्य झाल्यासारखं वाटत होतं. अचानक त्याला जुन्या आठवणी खाऊ लागल्या. अधून मधूनत्याला प्रथम भेटलेली स्त्री आठवली. जिच्यापासून त्याने प्रथमच शरीरसुख लुटलं होतं. तेव्हापासून त्याला बाईची गरज सारखी वाटू लागलीहोती. त्याला आता जमाना झाला होता. पुढे पुढे त्याने कितीतरी मुली, स्त्रिया भ्रष्ट केल्या होत्या. त्याच्या डोळ्यासमोर वेगवेगळे अनोळखी चेहरेयेऊ लागले. त्यातलीच एक साधनाबेन होती. त्याला एकदम तिची आठवण झाली तेव्हा त्याने लगेचच जायचे ठरवले. तो उठलाही. पण तोलसांभाळणं त्याला कठीण गेल्याने तो परत खुर्चीत पडला. शांततेचा भंग करीत फोनची बेल वाजली. तो केवढ्यांदा दचकला. त्याने एक घाणशिवी देऊन तो उचलला. पलीकडून दगडी आवाज आला " पीते रहो भोसडिके, मै परसू आ राहा हूं. " .....किशाच्या डोक्यात ओळख यायलावेळ लागला. तेवढ्या अवधीत पलीकडच्या माणसाने गोळ्यासारख्या शिव्या झाडल्या . आणि तो म्हणाला, " किशा मै किक्ला बोल राहा हूं. अब पहचाना क्या ? .... " किशा अर्धवट भानावर येत म्हणाला, " अरे , किक्लाभाई , कैसा है तू ? परसू रातको आयेगा क्या ? लगता है , तुझे लेने आना पडेगा. लेकीन भाई कलही तो तेरा काम होनेवाला है. " ......किक्लाने जोरदार शिवी देऊन म्हंटलं, " वो मेरेको मालूम नही. किसीको भी भेजो. " त्याने फोन खाली ठेवला. किशाची आता पूर्ण उतरली होती. तो मनाशीच म्हणाला, कुछ ना कुछ तो दिक्कत पैदा होतीही है. अब ये बीचमे क्यूं आ राहा है . सूर्याको भेजूं या और किसीको ? ........ त्याला काकांची आठवण झाली . काकाको भेजनेका तो गाडी लगेगी, गाडी लगेगी तो हिराको जाना होगा. साला ये क्यूं आ राहा है ? ........ कुछ करना तो पडेगा...... मग अचानक त्याला एका नव्या विचाराची शंका आली. अगर ऐन टाइमपे पुलिस आ धमकी तो क्या करेंगे. या विचाराने तो चांगलाच अस्वस्थ झाला. याचा विचार इतके दिवसात त्याने केलाच नव्हता. अगर किसीने उनको खबर दी तो. कोई गद्दार अपनेमेसेही निकला तो? आता त्याची चांगलीच उतरली. त्याने काहीच तजवीज केली नव्हती. आणि त्याचा असा अनुभव होता, की असले परके विचार खरे होतात. पण आता काय उपयोग होता. मग असं काही झालंच तर तर.....? त्याला साधनाची आठवण झाली. आणि त्याच्या डोक्यात आशेचा किरण आला. आपण तिच्या घरी पळून जाऊ. लुटलेला माल सूर्याला ऑफिसमध्ये घेऊन जायला सांगू. म्हणजे सगळं ठीक होईल. पण ते इतकं सोपं नव्हतं. याचीही त्याला जाणीव झाली. त्याने नऊ वाजता ताराबाईंच्या फ्लॅटमधे जाण्यापेक्षा आपण जीवनदानला घेऊन सातसाडेसात वाजता पोहोचू. म्हणजे वेळही जास्त मिळेल.


********** *************************************************************************************
काकांनी पैशांची पिशवी नीट ठेवल्यावर ते हॉलमध्ये आले. त्यांनी नीताच्या चेहऱ्याकडे पाहिले. पण तिला कसलाच संशय आलेला दिसला नाही. ती आत गेली मधला दरवाजा लावला. काका पण अंथरूण घालून झोपी गेले. आज शनिवार होता. आजचा दिवस त्यांच्या आयुष्याला काय कलाटणी देतो कुणास ठाऊक. या विचाराने ते अस्वस्थ झाले सकाळी उठल्यावर त्यांनी प्रथम काही केले असेल तर साधनाला फोन केला. तिने हॅलो म्हणायच्या आतच त्यांनी म्हंटले, " फोन ठेवू नकोस, फक्त एकदा ऐकून घे, मग वाटलं तर बंद कर. मला तुझी माफी मागायची आहे. " असं म्हणून त्यांनी तिला आपण कसे परिस्थितीने लाचार होत गेलो, आणि त्यामुळे तिला त्यांना कसे काही सांगता आले नाही, हे पटवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ती स्वस्थ व्हावी म्हणून ते म्हणाले, " तुझ्या जागी मी असतो तरी तुझ्याच सारखा वागलो असतो, पण दुसऱ्या माणसाचं ऐकायचंच नाही हा कुठला न्याय? थोडी फार तर संधी दिली पाहिजे, नाही का? तुला काय वाटतं? " असं म्हणून त्यांनी तिच्यावरच बोलण्याची जबाबदारी ठेवली. खरंतर मी तुझ्या जागी असतो तर, वगैरे बोलणं म्हणजे उगाचंच आपण दुसऱ्याचाही विचार करतोय असं वाटण्यासाठी म्हंटलेलं असतं, आणि सामान्य माणूस त्याला बळी पडतो. तेच झालं. ती म्हणाली, "ठीक आहे, तुम्हाला यायला हरकत नाही. पण मी काहीही वचन देत नाही. निर्णय माझाच असेल. " आता काकांना थोडी आशा वाटली. म्हणजे जायला हरकत नाही. अजून तरी किशाकडून बोलावणं न आल्याने काका अंधोळ करून निघाले. नीताला सांगून ते बाहेर पडले. जाताना तिला मी लवकरच येईन असे म्हणाले. बससाठी उभे राहिले. पण बसला एवढी गर्दी की त्यांना शिरताच आलं नाही. अशा दोन तीन बसेस सोडल्यावर त्यांना एकदाची बस मिळाली. ते घाईघाईने साधनाच्या फ्लॅटजवळ आले. त्या घाईत त्यांना त्यांचा पाठलाग होतोय हे त्यांना कळलच नाही. बेल वाजवल्या बरोबरच दार उघडले गेले. प्रथम ते प्रसन्न चेहऱ्याने साधनाकडे बघून हसले. तिचा चेहरा मात्र मख्ख होता. तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते आत आले. सोना शाळेत गेली असणार असे समजून त्यांनी काहीच विचारले नाही. मधल्या काही दिवसांनंतर ते साधनाला प्रथमच भेटत होते. म्हणजे त्यांनी सगळं सांगितल्या दिवसापासून. आत शिरल्या शिरल्या त्यांना तिला जवळ घ्यावंस वाटलं. पण त्यांनी घाई न करण्याचं ठरवलं. सोफ्यावर बसत ते म्हणाले, " साधना मला खरच माफ कर. पुढचा विचार करून आपण काय करायचं हे ठरवलं तर चालेल ना? " उत्तरादाखल ती किचनमध्ये गेली. त्यांना काही कळेना काय करावं. मग तेही थोडा वेळ वाट पाहून आत गेले. सोना आत झोपलेली होती. त्यांना आश्चर्य वाटलं. हिला बरबिरं नाही की काय? पण ते आत गेले आणि तिला म्हणाले. " साधना तुला माझ्याशी काहीच बोलायचं नाही का? " उत्तरादाखल तिने फक्त ते चहा घेणार का विचारले. मग मात्र काकांचा धीर सुटला. त्यांनी तिचा हात धरून तिला आपल्याकडे वळवली. आणि घाईघाईने म्हणाले, " साधना तुला नक्की काय निर्णय घ्यायचाय हे ऐकायला मी आलोय आणि तू लक्षच देणार नसलीस तर निघेन मी आणि परत कधीही भेटणार नाही. तुला काय वाटतं, सगळं विसरता येईल तुला? असंच जर होतं तर इतकी जवळीक तरी कशाला निर्माण केलीस? मी उशिरा सांगितलं हे खरं, पण लपवून तर ठेवलं नाही ना? मला सांगायचा धीरच झाला नाही, त्याला, मी तरी काय करणार? माझ्या मनात कपट नाही हे लक्षात ठेव. " जेवढं जमलं तेवढं त्यांनी बोलून टाकलं. आणि तिचा हात सोडून ते बाहेर सोफ्यावर जाऊन बसले......

जवळ जवळ दहा पंधरा मिनिटं अशीच गेली. काकांना चांगलंच असुरक्षित वाटू लागलं. आपलं आयुष्य असच एकट्याने जाणार. सगळं आयुष्य असं काढणं याची त्यांना अचानक भीती वाटू लागली. आपल्याला चक्कर येते की काय अशी त्यांना भावना झाली. या जगात आपलं कोणीही नाही अशा नैराश्याने त्यांना ग्रासले. जरा कुठे आशा निर्माण झाली होती तीही संपल्याचं त्यांना जाणवलं. थोड्याच वेळात साधना आतून चहाचे कप घेऊन बाहेर आली. ती काय बोलते इकडे त्यांचं लक्षच नव्हतं. ते सोफ्यावर मागे डोकं टेकून बसले. तिने समोर ठेवलेल्या चहाच्या कपाला त्यांनी हात लावला नाही. मग ती म्हणाली, " ठीक आहे मी सगळं विसरून जायला तयार आहे पण तुमचा या दरोड्याशी काही संबंध नाही ना? " ....... त्यांचा चेहरा फिका पडला. तिच्या लक्षात आलं की नाही ते त्यांना कळलं नाही. खरं त्यांच्या ओठावर होतं. आजच दरोडा पडणार असल्याची त्यांना जाणीव झाली. . एकीकडे हादरा देणारं वास्तव आणि दुसरीकडे आपल्या भवितव्याचा प्रश्न. मग मात्र ते पटकन खोटं बोलले. त्यावर ती म्हणाली, " तरीही मी पोलिसांना कळवणार आहेच........ " ती थोडी थांबली. तिला काकांची प्रतिक्रिया पाहायची होती. ते मख्ख चेहरा करून बसले. आता त्यांना खऱ्या खोट्याची पर्वा नव्हती. ते सहसा खरं बोलत नसत. ज्याच्यामुळे ते विचलित होतील, किंवा त्यांना आवडणारी व्यक्ती विचलित होईल. रोहिणीच्या बाबतीत ते असंच करीत. पण तिची गोष्ट वेगळी होती. ती त्यांना समर्पित झाली होती. ती त्यांना वेगळी वाटतच नसे. इथे तसं नव्हतं. ते साधनाच्या बाबतीतही पझेसिव्ह होते. पण साधनाकडून रोहिणी इतकं समर्पण त्यांना झालेलं दिसलं नाही. शेवटी ती दुसऱ्याची बायको होती. तसंच अजूनही तिने त्यांच्याशी लग्न केलेलं नव्हतं. हिला आता उत्तेजित करायला हवं. पण ते सोपं नव्हतं. ते तसेच उठले. त्यांनी चहाला हातही न लावलेला पाहून ती म्हणाली, " लहान लहान गोष्टीसुद्धा किती गांभीर्याने घेता तुम्ही. मी पोलिसांना सांगणार म्हटल्यावर तुम्हाला एवढं असुरक्षित का वाटायला लागलं? तुमचा तर या

दरोड्याशी संबंध असेल असं मला तरी वाटत नाही. चहा गार झालाय तो गरम करून आणते. तेवढा घ्या आणि मग हवंतर जा. नाहीतर काहीतरी उपाय सुचतोय का ते पाहा. इतके हताश का होता? " ....... ती चहाचा कप आत घेऊन गेली. ती जाताना त्यांना परत एकदा तिला सांगावंस वाटलं, की ते त्यांच्या मनाविरुद्ध ह्या सगळ्यात कसे ओढले गेले. आणि तिने ते सहानुभूतीने ऐकावे असं त्यांना वाटू लागलं. ती आत गेली. पण आपणही आत जाऊन तिला अचानक जवळ घेतलं तर तिचे विचार बदलतील असं त्यांना वाटलं. मग ते थांबले नाहीत. तसंही गेले काही दिवस ते अगदी एकटे पडले होते. त्यांना कोणतीच आशा वाटत नव्हती. ते विचार बदलायच्या आत स्वयंपाकघरात गेले. त्यांना तिने लावलेला सेंट जाणवू लागला. ती चहा गरम करीत असतानाच अचानक तिच्या दंडाला स्पर्श झाल्याने ती घाबरली. पटकन ती त्यांच्याकडे वळली. आता काकांनी न थांबता तिला जवळ ओढली आणि म्हणाले, " साधना माझ्यावर विश्वास ठेव. " पण तिला हे अजिबात आवडलं नसल्याने त्यांना दूर लोटलं. चहा त्यांच्या हातात देऊन म्हणाली, " दूर राहा. मी आता फसणार नाही. . मला हे सगळं सांगितलत तरी कशाला. ............" ते हॉलमध्ये आले.

खिशातला फोन फुरफुरला. काकांनी पाहिलं. तो किशाचा होता. फोन घ्यावा की नाही, अशा दोलायमान अवस्थेत त्यांनी तो घेतला. किशा म्हणाला, " काकाजी, आपको मिटिंगमे आनेकी जरुरत नही. लेकीन रात के दो बजे ऑफिस आना है. " त्यांनी काही बोलण्याच्या आतच त्याने फोन बंद केला. ही काय वेळ झाली, ऑफिसला जाण्याची? नीताला काय सांगणार? आणि केव्हा निघणार? असले विचित्र प्रश्न मनात घोळू लागले. साधनाच्या बाबतीतला विचार आता सोडावा हेच बरं. तरीही त्यांनी तिला मी संध्याकाळी आलो तर चालेल का अस विचारलं. त्यावर तिने जास्त उत्साह न दाखवता होकार दिला. तिच्या मनात आलं, काहीतरी अजून यांच्या मनात आहे. पण ते सांगायला तयार नाहीत. असं काय लपवीत असावेत? यांना तात्पुरती आशा दाखवली तर तेही कळेल. म्हणून तिने अचानक भाव बदलले. आणि पूर्वीच्या उत्साहात ती म्हणाली, " या संध्याकाळी अवश्य बोलू. "...... ते घाईघाईने निघाले. ताराबाईंच्या फ्लॅटकडे त्यांची नजर गेली. आज मीटिंग आहे तरी आत कोणीतरी असेलच. त्यांचा अंदाज बरोबर होता. आत सध्यातरी फक्त रमजान होता. बाकी सगळेच मीटिंगला गेले होते. ते, लवकर निघाल्याने त्यांना घरी जाताना तरी बस लगेचच मिळाली. ते घरी आले तेव्हा बारा वाजून गेले होते. बार वाजायच्येत आणि बारा वाजले व बारा वाजून गेले किती धोकादायक शब्दप्रयोग, त्यांच्या सहज मनात आलं. ते घरात शिरल्या शिरल्या नीताने विचारलं, " हे काय आज गेलात काय आलात काय? लवकर सुटका झाली वाटतं? " ती कणीक मळत होती. श्रेया खेळत होती. त्यांनी कपडे बदलले आणी तिच्याशी खेळू लागले. तिच्याशी खेळता खेळता त्यांना सहज आठवण झाली. आज रात्री आपण किती वाजता घरी येणार, की येणारच नाही. संध्याकाळी लवकरच निघावं, म्हणजे नीताला संशय येणार नाही. मग त्यांनी आत जाऊन नीताला सांगितले की ते संध्याकाळी सहा वाजता ऑफिसला जाणार आहेत आणि जर उशीर झाला तर ते त्यांच्या मित्राकडे राहतील. तिने अर्थातच जास्त विचारलं नाही. तिला लक्षात आलं यांच्यावर अंकुश ठेवण्याऐवजी नुसतं लक्ष ठेवावं हे बरं, म्हणजे रमेश आल्यावर त्याला सविस्तर सांगता येईल. मग यांची पिडा कायमची टळेल. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते श्रेयाला घेऊन बागेत गेले. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यांनी बाहेर असतानाच साधनाला फोन केला. आणि जेवायला येत असल्याचं सांगितलं. त्यावर ती काहीच बोलली नाही. तिची मूक परवानगी आहे हे त्यांनी ठरवलं. बरोबर साडेसहाच्या सुमारास ते तिच्या घरी पोहोचले. अजूनही ताराबाईंच्या घराला कुलूप होतं. ते मुद्दामच चालत गेले. आता आतमधे सगळेच असण्याची शक्यता आहे. काकांचा अंदाज बरोबर होता. ते सगळेच आत होते. फक्त दादा तेवढा रात्री नऊच्या आसपास येणार होता. तो पर्यंत सगळ्यांनीच पुन्हा एकदा प्लानवर विचार करायचा. असं मीटिंगमध्ये ठरलं. जीवनदान तेवढा बाहेर राहणार होता. खरंतर हे काम सूर्याला हवं होतं. कारण किक्लाला त्याला आणायला जायचं होतं. तसा काण्या जाणारच होता . त्याची त्यामुळे त्याची निराशा झाली होती. काण्या किक्लाला सूर्याच्या फ्लॅटवर घेऊन जाणार होता. त्याच्याकडून सूर्याला खरी माहिती हवी होती पण ते तेवढं सोपं नव्हता. किक्ला म्हणजे नागाची जात होती. कितीही खूश केलं तरी त्याचं समाधान होत नसे. आणि नंतर तो काय करील याचा भरवसा नसे.त्याच्या वागण्याचा कोणालाच अंदाज येत नसे. अगदी दादाला सुद्धा..........


काकांनी बेल वाजवल्या बरोबर लगेचच दार उघडलं गेलं. ते सोनाने उघडलं. तिला त्यांना पाहून आनंद झाला होता. त्यांना जवळजवळ चार दिवस झाले होते. तेव्हा ते तिला दिसत होते. त्यांनी तिच्या गालाला हात लावला. ती दार बंद करून त्यांना बिलगली आणि म्हणाली, " तुम्ही मम्मीचं मनावर घेऊ नका, हं.! ती अशीच आहे. किचनच्या दारात उभ्या असलेल्या साधनाला पाहून ते म्हणाले, \""असं नाही बोलूं. " ती बाजूला झाली. ते हॉलमध्ये बसून राहिले. ती बोलवत नाही तो पर्यंत आपण कशाला जा. असं त्यांच्या मनात आलं. पण त्यांना राहवत नव्हतं. आयुष्यात सहकाऱ्याची गरज असते हे तीव्रतेने त्यांना जाणवत होतं. कारण ते एकटे होते. तसं तिचं नव्हतं. तिला सोना होती आणि त्या दोघींचं घरही होतं. मुलगा आणि सून यांच्यात काका फारसे मिसळळे नव्हते. तेही त्यांना फारसे हवे होते असं नव्हतं. बदनाम बाप आणि सासरा याला जवळ ठेवून काय करायचं, असा त्यांचा सरळ हिशेब होता, असा काकांनी ग्रह करून घेतला होता. तोही त्यांनी दिलेल्या वागणुकीमुळे. दहा पंधरा मिनिटं बसल्यावर साधना बाहेर आली. " आलाच आहात तर आत येऊन बसा ना. म्हणजे बोलता येईल. " असं तिने म्हंटलं आणि पडत्या फळाची आज्ञा मानून ते उठले. तिने लावलेला. सेंट पुन्हा एकदा त्यांना ढवळून गेला. तिच्या अगदी जवळून जात त्यांनी तिच्या अंगाचा आणि सेंटचा वास नाकात भरून घेतला. ही परत भेटणार की नाही याबद्दल ते सांशक होते. आता हिला काय सांगायचं? दरोड्याबद्दल तर बिलकुल बोलायचं नाही असच त्यांनी ठरवलं. उलट तिच्याशी जवळीक कशी साधता येईल त्याचा प्रयत्न त्यांना करावासा वाटला. ते काहीच बोलत नाहीत असे पाहून तिने परत पोलिसांना दरोड्याची माहिती देण्याविषयी त्यांना सांगितलं. पण आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करून ते डायनिंग टेबलाजवळील एका खुर्चीत बसले. काही वेळ दोघांपैकी कोणीच काही बोललं नाही. काकांना सारखी सगळं खरं सांगायची उबळ येत होती. तशीही तिने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता ती नेहमीसारखा त्यांना दुजोरा देत नव्हती. खरंतर त्यांना आता जादूच्या कांडीसारखं आयुष्य एकदम बदलावं असं वाटत होतं. म्हणजे त्यांचा गुन्हेगारी जगताशी आलेला संबंध संपुष्टात येईल. तसं पाहिलं तर ते केवळ दुर्दैवाने या परिस्थितीत अडकले होते. यातून सुटकेचा त्यांना पूर्णतया अधिकार होता. लाचेचे पैसे त्यांनी घेतलेच नव्हते. केवळ शिपायाची जबानी आणी तक्रारदाराची जबानी यावर सगळं कुभांड रचलं गेलं होतं. खर सांगितलं तर फार तर ती नाही म्हणेल. का कोण जाणे त्यांना आजचा दिवस निर्णायक वाटत होता. तसा तो प्रत्येक संबंधित व्यक्तीकरता निर्णायकच होता. भले ती दूरान्वये संबंधित असेल. विचारांच्या भोवऱ्यात अचानक तिने प्रश्न विचारला, " तुम्ही काही तरी सांगणार होतात ना....... " मनातल्या काहुराचा भंग झाला. ते म्हणाले, " तसं विशेष काही नाही. प्रश्न परत एकच आहे. आपण एकत्र आयुष्य घालवायला काय हरकत आहे म्हणजे...... "असं म्हणून त्यांनी बोलणं अर्धवट ठेवलं. संध्याकाळचे साडेसात वाजायला आले. किशा दादा आता कुठे असेल कुणास ठाऊक. तो एक तर ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये असेल किंवा बँकेत असेल असं त्यांच्या मनात आलं. काकांचा अंदाज खरा होता. किशा आत्ता ताराबाईंच्या फ्लॅटमध्ये होता. साधनाला काहीतरी पण उत्तर देणं भाग होतं. ती स्वतःशी म्हणाली आपण समजा यांच्याबरोबर मुंबई सोडून जायचं नाही म्हंटलं तरी लग्न करणं कितपत योग्य ठरेल? हे जर दरोड्याशी संबंधित असतील तर आपली आणि सोनाची त्यांच्याबरोबर किती फरफट होईल काही सांगता येत नाही. यांना आपली एवढी गरज का आहे? तिचा कोणताही निर्णय पक्का होईना. पण एक नक्की होतं की ती पोलिसांना दरोड्याबद्दल सांगणार होती. तिला हे माहीत नव्हतं की दरोडा आजच पडणार आहे. ती उघड उघड एवढंच बोलली, " खरं सांगू का तुम्हाला, मला काहीही ठरवणं अजूनही कठीणच जातय. आपण एक दोन दिवसानी विचार करू. " घाईघाईने काका म्हणाले, " म्हणजे तुझा नकार आहे तर...... " त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिला कोणतीही घाई नव्हती. मग त्यांना उठावंस वाटलं. पण ते जाणार कुठे? घरी जाता येत नाही. दोन वाजता रात्री ऑफिसला जायचंय, हे कोणालाही सांगता येत नव्हतं. ते फारच अस्वस्थ झाले. एखाद्या लहान पिशवीत खूपसे कपडे कोंबून भरावेत तशी त्यांची मन:स्थिती झाली. कोणताच कपडा काढता येत नाही आणि भरले तर आणखीन हवेत पण त्यांची आउटलेटच बंद झाली. त्यांच्या मनात जमलेल्या वाफेचं झांकण उघडता येणं कठीण होतं. बळजबरीने एकेक करून विचार काढणं जरूर होतं. पण समोर साधना पाहत असताना ते करणं कठिण होतं. त्यांनी झटकन विषय बदलला. " अजून जेवण तयार व्हायला वेळ असेल तर मी जरा बाहेर, हॉलमध्ये बसतो. " त्यांना स्वतंत्र विचार करायचा आहे हे तिने ओळखले. मग त्यांना जास्त अस्वस्थ न करता ती म्हणाली, " तासभर तरी लागेल. "........ असं म्हंटल्यावर उठले बाहेर सोफ्यावर जाऊन बसले. कॉर्नर टेबलावरचा निर्जीव घोडा आता त्यांच्याकडे डोळे वटारून पाहत असल्याचा त्यांना भास झाला. किंबहुना त्यांनी लवकरा लवकरात लवकर जावं असंच तो सुचवीत असावा. त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. घरातल्या निर्जीव वस्तूंना पण वातावरणाचा अंदाज येत असावा. ते डोक्यावर हात आडवा ठेवून सोफ्यावर पडून राहिले. नीताला जरी आवडत नसलं, तरी साधनाने त्या बाबत कधी हरकत घेतली नव्हती.

इथे जेवल्यावर आपण कुठे जाणार आहोत? लवकर निघालं, तर घरी जावं लागेल, मग पुन्हा दोन वाजता बाहेर पडता येणार नाही. उशिरा निघालं तर कुठे जातोय हे सांगावं लागेल. चुपचाप निघालो तर साधनाला आवडणार नाही. पण त्यांनी चुपचाप निघण्याच ठरवलं. तशीही साधना त्यांच्या आयुष्यात आता येईल किंवा नाही याबाबत ते चांगलेच सांशक होते. मग काहीतरी करायचं म्हणून ते सोनाच्या खोलीत डोकावले. ती गाढ झोपेत होती. ती अश्या भलत्याच वेळी कशी झोपली . त्यांना ते आवडलं नाही. ते तिच्याजवळ बसले तिच्या डोक्यावरून हात फिरवताना त्यांना एकदम निलूची आठवण झाली. निलू लहानपणी कशी आपल्याशिवाय झोपायचीच नाही. तिची घट्ट मिठी त्यांना आठवली. मग ते जरा सोनाजवळच लवंडले. त्यांनाही झोपावंस वाटलं. त्यांनी डोळे मिटले, पण पुढच्याच क्षणी सोनाने त्यांना घट्ट मिठी मारली. जवळ जवळ अर्धा पाऊण तास झाला. अचानक त्यांना काहीतरी धपकन कुठेतरी दूर काहीतरी पडल्याचा आवाज आला. कोणती तरी जड वस्तू पडली असावी. त्यांना त्याचा अंदाज येईना. तर आठ वाजून गेले होते. अजून साधनाचा स्वयंपाक झाला नव्हता. एवढं ही काय करत्ये? त्यांच्या मनात आलं. सोनाची मिठी सोडवून ते आत गेले. पुन्हा एकदा खुर्चीत बसले. साधनाला अंदाज आला. मन शांत झालेलं दिसतय. साधनाने प्रथम सोनाला उठवलं. मग जेवणाची तयारी करुन ते तिचेही जेवायला बसले. कोणीतरी काहीतरी बोलावं अस दोघांना वाटत होतं. पण कोणीच काही बोलेना. मग सोनानेच शांततेचा भंग करीत विचारले, " काका आज तुम्ही इथेच राहणार ना? " ते मानेनेच हो म्हणाले. त्यांना भीती वाटली आपण प्रकट उत्तर दिलं आणि भलत्याच विषयाला तोंड फुटलं तर...... ‍ जेवणं तर झाली. ते पुन्हा हॉलमध्ये येऊन बसले. हिला आपल्याशी बोलायचंच नाही. आपल्यालाही इथे येणं भाग होतं. तासभर असाच गेला. साधनालाही अस्वस्थता आली. संवाद साधायचाय पण कसा, तिला कळेना. साडेनऊ वाजायला आले. तिने अंथरूणं घातली. ती आज सोनाजवळ झोपली. काकांना आतल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलं. तेवढाच संवाद...... पोलिसांना आपण केव्हा सांगणार? तिला कळेना. आपल्याला तरी काय करायचंय, दरोडा पडतोय तर आपण तरी काय करणार आहोत. तेच तेच विचार तिला कंटाळा आणू लागले. एक माणूस आपल्या घरात आहे आणि आपण बोलायलाही तयार नाही. हे बरोबर नाही. काहीतरी निमित्त काढून ती आतल्या बेडरूममध्ये आली. पडदे सरकवण्याच्या मिषाने पण काकांना ऐकू जाईल असं ती स्वतःशी म्हणाली, " केवढा पाऊस लागलाय? " काकाही जागे होते. ते म्हणाले, " साधना तुला पुढचं आयुष्य एकटीनेच काढण्यात रस आहे का?, विचार कर. मला, मुलगा सून आहेत पण असून नसल्यासारखी. तुला नातेवाईक नाहीतच. मग तू उरलेलं आयुष्य कसं काढणार? सोनाचं कधीतरी पण लग्न होईलच. आपण एकत्र आलो तर बऱ्याच गोष्टी सुकर होतील...... " असं म्हणून ते तिच्या जवळ आले. ती विचारात गढलेली पाहून त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. हळूहळू त्यांनी तिला आपल्याकडे वळवली आणी तिला आपल्या जवळ घेत म्हणाले, " थोडं रिस्क आहे, पण त्याशिवाय सुख कसं मिळणार? अजून आपल्या अंगात जोर आहे पुष्कळ गोष्टी करता येतील. " तिच्या अंगाचा वास घेत ते तिच्यावर झुकले आणि तिला मिठीत घेत त्यांनी तिच्या गालावर ओठ टेकले. तीही विचार करून दमली असल्याने त्यांना आपोआपच प्रतिसाद देऊ लागली. तिला घेऊन मग ते बिछान्यावर बसले. पुढचे काही क्षण तरी त्यांचे धुंदीत गेले. जरा वेळाने भानावर येत ती म्हणाली, " तरीसुद्धा मला विचार करायला हवा. " काकांनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. अजून हिचं जसं आहे तसच आहे तर. ते स्वतःशी म्हणाले " शी इज डिफिकल्ट टू कन्व्हिन्स ". नंतर साधना झोपायला गेली. दहा वाजले. काका बिछान्याकडे वळले, पण डोक्यात अनिश्चितता घेऊनच. झोपायचं म्हंटलं तरी थोडीशी तरी स्वस्थता लागते. दोन वाजेपर्यंत ऑफिसला जायचं म्हणजे साडेबारा एकला तरी जायला पाहिजे. बस मिळाली तर बरी नाहीतर लोकल किंवा टॅक्सीने जाणेच ठीक राहील. दहा म्हणजे काही त्यांची झोपायची वेळ नव्हती. खरंतर त्यांची कोणतीच वेळ झोपायची नव्हती. तुरुंगात नऊ साडेनऊ म्हणजे झोपायची वेळ. घरी रोहिणी असताना प्रेमालाप करून झोपेपर्यंत त्यांना एक वाजून जाई. पण तिथे रोहिणी होती. भलेही दुसऱ्या दिवशी जळजळत्या डोळ्यांनी ऑफिसला जावं लागलं तरी त्यांना चालायचं. जाताना घालण्याचे कपडे त्यांनी जवळच ठेवले होते. साधनाला न सांगताच जायचं असल्याने त्यांनी बूट दरवाज्याबाहेर पडल्यावरच घालायचे ठरवले. नुसतं तळमळतच वेळ काढावा लागल्याने त्यांना साडे अकरा वाजायच्या सुमारास अचानक झोपेने घेरले. मोबाइलवर गजर लावला असता तर साधना उठली असती. ते दर अर्ध्या तासांनी आत्तापर्यंत उठले होते. पण अचानक लागलेल्या झोपेने ते गाफील राहिले. त्यांना एकदम घड्याळातल्या साडेबाराच्या ठोक्याने आणि लगेचच आलेल्या गोळीबाराच्या आवाजाने अर्धवट जाग आली. ते ताडकन उठले. दबल्या पावलांनी त्यांनी पुढचे दार उघडले. कॉरिडॉरमध्ये जाऊन त्यांनी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण काहीच ऐकू आले नाही. मग ते मागे वळले. त्यांनी बूट घातले आणि सावकाश आवाज न करता ते बाहेर पडले. कितीही सावकाश दार लावायचा प्रयत्न केला तरी रात्रीच्या शांत वातावरणात सेफ्टी लॅचचा खटकन आवाज झाला. ते थोडावेळ थांबले. साधना उठली तर काहीतरी फालतू कारण सांगून परत आत शिरून झोपायचं. पण तसं काही झालं नाही. ते जिन्यानेच खाली आले. ताराबाईंच्या फ्लॅटकडे त्यांची नजर गेली. आत्ता कुलूप दिसत नव्हतं. ते तिथे रेंगाळलेच नाही. तसेच ते तळमजल्यावर जाणाऱ्या जिन्याने उतरू लागले. त्यांचं लक्ष सहज म्हणून मुख्य गेटजवळ गेले. तिथे पोलिसांची गाडी पाहून ते थोडे बावचळले. पण जसं काही पाहिलंच नाही अशा रितीने ते गेटमधून बाहेर पडले. तिथले पोलिस गोळीबाराच्या दिशेने निघून गेल्याने काकांना जाणं सोपं झालं. ते अंधारलेल्या भागातून जात होते. आता त्यांनी टॅक्सी पकडण्याचं ठरवलं. पण मिळाली पाहिजे ना. रस्त्याने एखाद दुसरी टॅक्सी जात होती. पण अशा आडवेळी वाहतूक अशी नव्हतीच. शिवाय पावसाला कसलं एवढं उधाण आलं होतं कोण जाणे. तेवढ्यात एक टॅक्सी त्यांच्याजवळ येऊन थांबली. आतून दोन चार तरूण मुलांचा अचकट विचकट आवाज येत होता. त्यांनी काकांना विचारलं. " ए बुढ्ढे, चलता है क्या रांड बझार? तेरेको पागल बना देगा. " आतले प्यायलेले होते. काकांनी पण एक जबरदस्त शिवी हासडून " चल चल.... म्हंटलं. पण ते "डरता है स्साला. " असं म्हणून निघून गेले. काकांना या वेळेला बाहेर पडण्याचा पश्चात्ताप झाला. नाही गेलो तर दादा काय करणार आहे? पण आपण कोणत्या लोकांच्या संगतीत आहोत याची जाणीव होऊन त्यांनी थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्याला विचारले त्यावर तो म्हणाला, " डबल भाडा लगेगा. चलना है तो चल, नही तो मेरेको सोने दे., ये साला सोनेका टाइम है. आजकल तुम्हारे जैसे बुढ्ढे लोगही राडबझार ज्यादा जाते है. " तरीही काकांनी स्वतःवर ताबा ठेवला व म्हणाले, " ठीक है, चल जलदी. "

********************** ********************** ************************ ************

(क्रमशः)

🎭 Series Post

View all