कमाई माझी

Kamai Majhi
आई वडिलांना वैष्णव देवीला जायचे ठरले तसे आभा खूप खुश होती ,तशी त्यांनी देवीला एकदा तरी जाऊन यावे ही तिची मनोमन इच्छा होती .त्यासाठी तिला किती तरी वर्षे वाट बघावी लागली होती आणि finally आज तो दिवस येऊन ठेपला होता,तिचे स्वप्न पूर्ण होणार होते. आई वडिलांच्या त्यांच्या आयुष्यभर नुसते काबाड कष्ट केले होते. तिला नेहमी हेच वाटत आई बाबाला त्यांच्या आयुष्यात जे काही सुख असेल ते आता इथून पुढे मीच देईल. त्यांना ह्या retirement च्या उर्वरित आयुष्यात देव दर्शन ही मी घडून आणण्याचा प्रयत्न करेन.

जेव्हा त्यांचे हातपाय थांबतील तेव्हा तर चला म्हंटले तरी ते काही इतक्या उंच चढून येणार नाहीत ,मग तेव्हा काय अर्थ आहे .खरी हौस जर करायची असेल,देवदर्शन करावयाचे असेल तर आत्ताच .मग आहेच तेच घर तीच life. जर दादा नाही करू शकला तर काय झालं त्यांची लेक आहे ना. इतके तर मी नक्की करणार ,ते ही कोणाच्या मदतीशिवाय. मी सक्षम आहे त्यांच्या उरलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायला, आणि तसे ही मुलाने आई वडिलांचे केले तर पुण्य लागते मग मुलीने केले तर काय बिघडले.

आज खूप खुश होती आभा,चेऱ्यावर एक तेज होते, चमक होती,एक सुख होत, आंनद होता, जो आंनद कधी काळी आई बाबांनी त्यांचे पूर्ण आयुष्य मुलांना मोठं करण्यात गमावला होता,आणि तो आंनद जो आमच्या आनंदात त्यांना मिळत होता, अगदी मी ही तेच केले ,फार काही मोठी गोष्ट केली नाही, अजून फार करायचे आहे मला हा आंनद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी...

आभा तिचे पैसे कपाटातून तिकिटासाठी काढत होती, तिक्यात तिला जुन्या एका प्रसंगाची आठवण झाली होती.
तो प्रसंग म्हणजे 6 वर्षा पूर्वी खूप जिव्हारी लागला होता.
सहज बोलणे होते पण अगदी त्या बोलण्याने तिचे आयुष्यच बदलून गेले होते. तेव्हा ही आई बाबांना चार धाम ला तिने पाठवायचे ठरवले होते, खरे तर ते त्यांच्याच पैस्याणे जाणार होते, पण तिकीट मात्र तिने नवऱ्याला बुक करायला सांगितले होते. तिने plane चे तिकीट बुक करायला सांगितले होते आणि त्याने ट्रेन चे बुक केले होते.

तिला तिचे बाबा सगळया तिकिटाचे पैसे तिच्या घरी आल्यावर देणार होते, पण नवऱ्याला वाटले की ही आपल्या आई वडिलांना आपल्या पैस्यांवर चार धाम ला पाठवणार आहे, आणि खर्च जास्त होत आहे म्हणून त्याने ट्रेन चे तिकीट बुक केले, आणि तिला सांगितले, तू पाठवतेस ते ठीक आहे पण सध्या पैस्याची अडचण आहे,तू जरा हिशोबात पैसे खर्च कर...

तिला या शब्दाचा खूप राग आला होता, आपण आज जर स्वतः काही कमावतो असतो तर ही तडजोड करावी लागली नसती, म्हताऱ्या आई वडिलांना जे सोयीचे असेल ते करून दिले असते आणि ह्याच्याकडून दोन शब्द ही ऐकावे लागले नसते. आज तर त्यांना सांगणार की ते तुमच्या पैस्याने जाणार नव्हते, ते त्यांच्या खर्चाने जाणार होते... पण तिने ठरवले जेव्हा मी माझी स्वाभिमानाची कमाई कमवेल तेव्हा मी ,माझ्या आई वडिलांना माझ्या पैस्याने देवदर्शनाला घेऊन जाईल.

त्यांनतर आभा नौकरी शोधू लागली, घरातील कामे करून तिने नौकरी करण्याचा ध्यास घेतला, फक्त गृहिणी ही ओळख तिला पुरेशी वाटली नाही ,तिचा स्वाभिमान पडो पदी ठेचाळत होता, कोणी मनी काही नसले तरी मात्र इतरांचे साधे शब्द ही टोचू लागले होते, तिला एकच मार्ग दिसत होता जो स्वाभिमानाची दिशा दाखवत होता, खुणावत होता, वाढते खर्च, आपल्या इच्छा, अपेक्षा, कर्तव्य, शिक्षण यात ही स्वकमाई खूप आवश्यक वाटू लागली होती, म्हणजे नवऱ्याला हातभार, आई बाबासाठी काही करण्याची इच्छा, ह्याला एक छान मार्ग होता तो म्हणजे नौकरी, स्वाभिमानी वाटचाल.

तिला तिच्या डिग्रीच्या आधारावर छान पगाराची नौकरी मिळाली होती, आणि तेव्हापासून तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती...

मग आई बाबांनी देवीला नवस केल्या प्रमाणे ,आभा स्वतः त्यांना plane ने देवीला पाठवणार होती, तिने हा खर्च स्वतःच्या कमाईतून केला होता, नवरा म्हणत होता मी करतो तू फक्त सांग कोणती flight book करू.... ती म्हणाली मी already booking केली आहे... dont worry.