कल्याणी

Story Of A Comman Girl

जलद लेखन 


विषय   भूतकाळात डोकावतांना.....





रमा -"मम्मा मम्मा कुठे आहेस तू? इथे या झाडाखाली बसून काय करते आहे? परत त्या चिमणीकडे आणि तिच्या घरट्याकडे बघते आहे. आता नाताळच्या सुट्ट्या लागल्या आहेत. सगळे बाल सदन मधले मुलं पिकनिक साठी दहा दिवस बाहेरगावी गेले आहेत. तू पण आमच्या सोबत चल ना मम्मा."

कल्याणी -"रमा, मीरा, जय मला माहिती आहे माझ्या शिवाय तुम्हाला करमत नाही. पण आता तुम्ही मोठे झाले आहात. तुम्ही तुमच्या आयुष्याचचे निर्णय स्वतः घ्या. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आता मी माझं संपूर्ण आयुष्य बाल सदन मध्येच घालवणार आहे.

रमा मला विनय आवडला आहे तू त्याच्यासोबत सुखी राहशील. जय तू ही नीता सोबत तुझा संसार सुरू कर, आणि मीरा तुला परदेशात जाण्यासाठी काही अडचण आली तर सांग तुझी मम्मा खंबीरपणे इथे उभी आहे."

कल्याणीच्या या ठाम मतावर रमा, मीरा आणि जयने एकमेकांकडे पाहिले आणि ते त्यांच्या त्यांच्या वाटेने निघून गेले. त्या झाडाखाली बसून कल्याणीला तिचा सगळा भूतकाळ आठवत होता……


कल्याणी -"मम्मा मम्मीss."

कल्याणी दरवाजातूनच ओरडत घरात येत होती. समोरच रामू नौकर प्रशस्त हॉलची साफसफाई करत होता. कल्याणीला बघून तो अदबीने उभा राहिला.

कल्याणी "रामू काका मामा कुठे आहे?"

रामू -"नमस्कार कल्याणी बेबी. बाईसाहेब स्वयंपाक घरात आहेत."

कल्याणी -"ओह रामू काका मी आता बेबी नाही. चांगली मोठी झाली आहे. मम्मा किचन मध्ये काय करते आहे?"

रामू -"जी तुम्ही येणार म्हणून भरल्या वांग्याची भाजी, गाजराचा हलवा आणि मूग डाळीचे पकोडे बनवत आहे."


कल्याणी -"आणि तुम्हाला सर्व कसं माहिती?"

रामू -"तुम्ही येणार म्हणून कालच बाईसाहेबांनी हा मेनू ठरवला. बायजा बी मदतीला तिथं हाय."


कल्याणी -"बर बर."

कल्याणी परत नाचत बागडत स्वयंपाक घरात तिच्या आईला जाऊन बीलगली. तिने आईच्या कमरेला वळसा घालून एक छानशी गिरकी घेतली."

आई "अगं काय करतेस मनू? माझे हात मसाल्याचे आहेत उगाच एखादा कण डोळ्यात गेला तर?"

कल्याणी -"मम्मा जाऊदे डोळ्यात कण मी आता लहानपणीची डोळ्यात गेलं म्हणून मुळूमुळू रडणारी मनू नाही तर मोठी कल्याणी झाली आहे."

आई - "लेकरू कितीही मोठे झालं तरी आईसाठी ते तिचं बाळच असतं. बरं जा पटकन हात पाय धुऊन घे. भूक लागली असेल ना तुला? मी पटकन पान वाढते."

कल्याणी -"(पकोडा तोंडात टाकत) मम्मा पप्पा कुठे आहे ग?"

आई -"कुठे असणार? पक्ष कार्यालयात! कार्यकर्त्यांशी येणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बैठक सुरू आहे. वेळ लागेल त्यांना घरी यायला. तोपर्यंत तू जेवून घे."

कल्याणी -"नो वे. मम्मा मी पप्पांच्या कार्यालयात जात आहे."


आणि कल्याणी निघून गेली. तिकडे कल्याणीचे वडील \"बाबासाहेब इनामदार\" पक्ष कार्यकर्त्यांशी मसलत करत होते.


बाबासाहेब -"हे बघा यावेळी ही निवडणूक आपल्या पक्षासाठी खूपच महत्त्वाची आहे. ही निवडणूकच आपल्या पक्षाचं राजकीय भवितव्य ठरविणार आहे, त्यामुळे या विधानसभा क्षेत्रात आपण काय काय विकास काम केली, आपली येणारी भविष्यातली विकासाची धोरण आणि जनसंपर्क याचा पूर्ण अभ्यास करून प्रत्येक मतदारापर्यंत आपला कार्यकर्ता पोहोचला पाहिजे. एकही मत फुटता कामा नये. प्रत्येक वार्ड, प्रत्येक घर आणि घरातल्या प्रत्येकाच्या ओठी केवळ आणि केवळ आपल्याच पक्षाचं आणि उमेदवाराचं नाव असायला हवं."


कल्याणी (कार्यालयाच्या दरवाजातूनच जोरात ओरडली) -"पण माझ्यावर ओठावर तुमचंच नाव आहे."


बाबासाहेब आणि कार्यकर्त्यांनी एकदमच कल्याणी कडे वळून पाहिलं.

बाबासाहेब -"आताची बैठक बरखास्त! उद्या पुन्हा पुढची रणनीती ठरवू. तुम्ही सगळेजण या आता. नमस्कार!

मनू अग माझी महत्वाची बैठक सुरू होती. तुला कितीदा सांगितलं असं भस्सकन मसलतीत येऊ नये."

कल्याणी -"उफ्फ हो पप्पा! मी इतक्या लांबून इतक्या वर्षाने आली आणि तुमचा आपलं तेच सुरू? आम्ही नाही बोलत जा."

कल्याणी फूरंगुटून बसली.


बाबासाहेब - "बर बाई! चुकलं आमचं! कान पकडून माफी मागतो."


कल्याणी (भाऊक होऊन) -"पप्पा असं वो काय करता? नका ना असे कान धरू! बर आता पटकन घरी चला मम्माने जेवणाचा मस्त बेत केलाय."

बाबासाहेब -"हं."



लेखिका  राखी भावसार भांडेकर.




************************************************

🎭 Series Post

View all