आई ऐक ना ग, आपण गावी जाणार आहोत ना, मग तिथे मला खूप मज्जा करता येईल ना?
हो रे सौरभ, उद्याच तर आपण निघणार मग काय? आज्जी आजोबांच्या राज्यात तू तर काय, खुशच.
हो हो, मी मस्त खेळणार, फिरणार, पोहणार सुद्धा.
मग मला जलपरी भेटणार.
अरे," हे काय आता नवीन? कोण रे ही जलपरी?" काहीतरी नको ते खुळ. बाबांनी तुला पुस्तकं वाचायला आणली आहेत, ते सर्व काल्पनिक असत.
आईच्या बोलण्याने अवघा दहा वर्षाचा असलेला सौरभ खट्टू झाला.
अस कस काल्पनिक? मला नक्की भेटणार जलपरी.
मी बाबांचेच ऐकणार. बाबा मला बोलले आहेत. ही पुस्तकं वाचली की त्यातली माणस आपल्याला नक्की भेटतात. म्हणून तर मी एवढी पुस्तकं वाचली.
दुसऱ्या दिवशी आई बाबांसोबत सौरभ गावी जायला निघाला. मस्त खिडकी कडच्या सीटवर बसून आई बाबांसोबत पळणारी झाडे बघत सौरभ गावी पोहोचला.
आज्जी आजोबांचा लाडोबा काकाच्या मुलांसोबत अगदी मिसळून गेला. गावचा खावू , इकडे तिकडे पळापळ ह्या मध्ये जलपरीला विसरून गेलेला.
त्याच्या जलपरीचा किस्सा आईने गावी घरच्या सर्वांना सांगितला, त्यावरून सर्वजण हसू लागले.
सौरभ, ये इकडे. आजोबांच्या प्रेमळ हाकेने सौरभ धावतच आजोबांच्या जवळ येवून बसला. बाळा तू भरपूर गोष्टींची पुस्तकं वाचतो, अस मी ऐकल. खर आहे का हे?
हो आजोबा, मी खूप गोष्टी वाचतो, तेही अगदी मन लावून.
सौरभ ने अस सांगितल्यावर, आजोबा सर्व नातवंडांना बोलवू लागले. सुमी, राघव, मीरा या इकडे. सौरभ आज आपल्याला गोष्टी सांगणार आहे.
सौरभ खूप खुश झालेला. घरातून सौरभ ची आज्जी, आई , छोटी काकी, मोठी काकी, काका, वडील सारेच आले. तसे पण संध्याकाळची वेळ होती. सारेच निवांत होते. सौरभ सुद्धा खुश होऊन गोष्ट सांगू लागला. अर्थातच त्याला आवडणारी जलपरीची गोष्ट तो अगदी रंगवून सांगू लागला. सारेच तल्लीन झाले. सौरभचे सारेच कौतुक करत होते. त्याच्या आई वडिलांना खूप आनंद झाला.
गोष्ट पूर्ण होताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले.
सौरभ बाळ, खूप छान गोष्ट, आता उद्या तुला माझ्याकडुन बक्षीस. आजोबांनी असे सांगताच सौरभ नाचू लागला.
दुसऱ्या दिवशी आजोबा सर्व नातवंडांना घेवून नदी किनारी गेले. तेथे मुलांना नदीच्या पात्रात पोहता यावं म्हणून सौरभ चे वडील आणि काका सुद्धा गेलेले. मुलांनी मनसोक्त नदीत डुबकी लावली. तेव्हड्यात नदी मध्ये, एक अवघ्या पाच वर्षाची मुलगी एकटीच पोहत होती. किनाऱ्यावर तिचे वडील तिची वाट पाहत होते. तीच ते पोहण बघून सौरभच्या वडिलांचे डोळेच दिपवून गेले.
बाबा ती एवढीशी चिमुकली कोण?
अरे ती दामुची नात, चार वर्षाची होती, तेव्हा तिच्या आईने तिला पोहण्याचे धडे दिले. तेव्हा पासून नदीची आणि तिची गट्टीच जमली. गावच्या कोणत्याही नदीच्या पात्रात सोडा तिला, ती अगदी न घाबरता पोहून येणारच.
तिची आई, लता मुंबईची, स्विमिंग कोच. पण इकडे लग्न होऊन आली आणि सर्वच थांबल. पण जेव्हा गावच्या नदीला पूर आला तेव्हा ह्याच नदीच्या कुशीतून, त्या नवख्या पोरीने गावातील खूप जणांना वाचवलं.
तेव्हापासून एरव्ही गावात मुली, बायाना पोहायला बंदी घालणाऱ्या गावातील लोकांनी आपल्या मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देण्याची विनंती लताला केली. तेव्हापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत लता त्यांना दुपारच्या वेळी प्रशिक्षण देते, तेही मोफत. तिचीच ही चिमुरडी, अवघ्या पाच वर्षाची. पण आईप्रमाणे पोहण्यात तरबेज. आजी दुपारची तिला इकडे जावू देत नाही मग, सकाळी बापाबरोबर येते पोहायला. दुपारी ह्या भागात दोन तास फक्त लताची सत्ता ह्या नदीवर.
वाह, जेवढं कौतुक करावं तेव्हढ कमी आहे लता वहिनीचे. सौरभचे वडील स्वतःच्या वडिलांच्या कानात काहीतरी पुटपुटले.
मस्त आयडिया म्हणत, सारे घरी परतले.
आज गावची पंचायत समितीची मीटिंग होती. सरपंच असलेले आजोबा आज अगदी खुशीत मीटिंगला पोहोचले. तिथे त्यांनी लता नाईक ह्यांचा जाहीर सत्कार करण्याचे घोषित केले. सत्काराच्या दिवशी अवघे गाव, गावच्या मंदिराच्या आवारात पोहोचले.
सौरभ बाळ ये इकडे, असे म्हणताच, तो आजोबा जवळ गेला. आता ह्या सर्व लोकांसमोर तुझी गोष्टीतली जलपरी कशी होती ते सांग. तेव्हा सर्वांसमोर सौरभ सांगू लागला, "जलपरी खूप हुशार असते, ती पाण्याला घाबरत नाही, पाण्यात कोणी पडल तर त्यांना मदत करते. अशी असते जलपरी."
सर्वांनी टाळ्या वाजवताच सौरभ चे बाल मन खुश झाले.
तेव्हाच सरपंच असलेल्या सौरभच्या आजोबांनी "जलपरी" हा किताब लता ताईंना बहाल केला. संपूर्ण गावाने ताईंचा सत्कार केला. लता नाईक ह्यांना आतापर्यंतच्या आयुष्यात मिळालेला सर्वात मोठा सन्मान होता.
सौरभ ही खुश झालेला, त्याच्या पुस्तकामधली कल्पनेतली जलपरी त्याच्या आजोबांनी त्याला प्रत्यक्षात दाखवली.
शहरात गेल्यावर शाळेतल्या मित्रांना, तो त्याच्या ग्रेट आजोबांची किमया सांगणार आहे. म्हणूनच आजोबा आज्जी आपल्या नातवंडांचे सर्वात मोठे मित्र असतात, हे सिद्ध झाले.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा