कळले नाही तुला भाग ३

पश्चाताप झाल्यावर चूक समजण्यात काहीच अर्थ राहत नाही.

आज तन्वीला काॅलेजच्या गार्डन मध्ये बोलवून मनातल सांगून प्रेम व्यक्त करायच प्रभात ठरवतो. तन्वी प्रभातने बोलवल्याप्रमाणे काॅलेजच्या गार्डन मध्ये येते. नेहमीप्रमाणे अभ्यासाची शंका घेवून प्रभातने बोलावले असणार अशी तन्वीची समजूत होते.

प्रभात आपल किती प्रेम आहे हे तन्वीला सांगताच. तन्वीचा चेहरा रागाने लालबुंद होतो. ती काही न बोलताच पाय आपटत तिथून निघून जाते. प्रभात तिला फोन करायचा प्रयत्न करतो, तन्वीला त्याच्याशी कोणतेच नाते यापुढे ठेवायचे नसते. प्रभात साॅरी, माफ कर असे मेसेज अनेकदा पाठवतो. तन्वी त्याकडे लक्ष देत नाही. काॅलेज सुटल्यावर प्रभात बरोबर घरी न जाता प्रियाला घेवून ती घरी जाते.
राग शांत झाल्यावर तन्वी आपल्याशी बोलायला नक्की येईल या आशेवर महिना निघून जातो. प्रभात स्वत:हून स्पष्ट मत ऐकायला प्रियाच्या मदतीने तन्वीला भेटायला बोलवतो. आज काय ते होवून जावू दे. असे प्रभात ठरवतो.

प्रभात : तू मला का टाळत आहेस. तुला मी आवडत नाही का? तस असेल तर का मला तुझ्यात गुंतवत राहिलीस.

तन्वी : बोलण्यासारख काही राहिल नाही आता. मी कधी त्या नात्याने नाही पाहिले तुला. मैत्री म्हणून आपण सोबत होतो. यासगळ्याचा तू असा अर्थ काढशील अस वाटल नव्हत मला.
प्रिया ने उदयला होकार दिला म्हणून आपण चौघे एकत्र फिरत होतो. तर तु लगेच मला गृहित धरायला लागला हे मला आधीच कळायला हव होत.


शेवटी व्हायचे तेच झाले. तू अस बोलून आपल्यातली मैत्री देखील गमावली आहेस. आणि हो अजून एक सांगायचं नव्हत मला. पण सांगते आता. मी कायमचे हे शहर सोडून परदेशात चालले आहे. उर्वरित शिक्षण तिकडेच घेणार आहे. हा निर्णय बाबांनीच घेतला आहे. आम्ही सगळे शिफ्ट होणार आहोत तिकडे.


प्रभातला क्षणभर हे ऐकून गरगरल्यासारखे झाले. तन्वी च्या मनात आपल्या बाबत काहीच नव्हत. हे सर्व एकतर्फी प्रेम होत. या विचाराने तो स्तब्ध झाला. नैराश्याच्या छायेत प्रभात स्वत:लाच विसरला होता. भरलेल्या आसवांनी तिथून निघून कसाबसा घरी आला. खोलीचे दार लावून रडत बसला. घरात कोणाशीच बोलत नव्हता.
काय प्रकार आहे ते समजायला मार्ग सुचत नव्हता. उदयला फोन करुन घरच्यांनी बोलावून घेतले. उदयला झाल्या प्रकाराची काहिच कल्पना नव्हती. प्रियाशी बोलून काय घडले याची विचारपूस केली.
आपला मित्र संकटात आहे हे पाहताच त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. प्रभात काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हता. प्रभातची प्रकृती नाजूक झाली होती. डाॅक्टरांनी कुठेतरी मोकळ्या हवेत घेवून जायला सांगितले.


आईने प्रभातला मामाच्या गावी घेवून जाण्याचे सुचवले. जून्या आठवणींनी त्याला झाल्या प्रकारातून बाहेर पडता येईल असे वाटले.

उदयच्या मदतीने गावी नेण्याची तयारी केली जाते. इकडे प्रभात येणार म्हणून जल्लोषात तयारी सुरु असते. मायराला लहानपणापासून प्रभात आवडत असतो. चिडवल्याप्रमाणे प्रभातशी लग्न होण्याची स्वप्न मायरा पाहत असते.


प्रभात गावाला पोहचतो. तो एकटाच स्वत:च्याच विश्वात गुंतलेला पाहायला मिळतो. मायरा चेष्टा, मस्करी करण्याचा प्रयत्न करते. प्रभात यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही. न राहवून उदयला प्रभात बाबत विचारते. उदय तिला तन्वी बाबतचे सत्य सांगतो.
मायरा स्वत:चे दु:ख लपवत उदयला वचन देते या सगळ्यातून बाहेर यायला प्रभातची नक्कीच मदत करेन.


आपल दु:ख लपवत मायरा उदयच्या मदतीने प्रभातला डोंगरावर, नदीच्या ठिकाणी घेवून जाते. लहानपणीच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न करत असते. शेतात जावून कणसे तोडून आणणे. कैरी, चिंचा खाणे. या आठवणींना उजाळा देत मायरा प्रभातच्या आयुष्यातून नैराश्याला दूर करण्याचा प्रयत्न करत असते.


प्रभात तन्वीला विसरु शकेल का? मायराच प्रेम प्रभातला जाणवेल का? पाहूया अंतिम भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all