कळले नाही तुला भाग - २

पश्चाताप झाल्यावर चूक समजण्यात काहीच अर्थ राहत नाही.

मामाच आलेल पत्र प्रभातने वाचून देखील दुर्लक्ष केल. आईने जेवताना मामाच्या पत्राबद्दल विचारले. कधी जाणार तू मामाला भेटायला. या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे ते समजेनासे झाले. 


प्रभात : सध्या परीक्षा जवळ आल्या. आता जाणे शक्य नाही.

आई : लागोपाठ सुट्टया आहेत पुढच्या महिन्यात तेव्हा तर जावू शकतोस तू. एरव्ही मामाच्या गावी जाण्याची एकही संधी सोडत नव्हता. हल्ली काय झाल कोणास ठावूक. खरच मामा काही बोलला का तुला? कोणत्या गोष्टीचा राग आहे मनात?

प्रभात : काही नाही तस. थोड अभ्यासाच टेन्शन आहे.


आई : बर कर अभ्यास तू. मी आणि बाबा तरी जावून येतो या शनिवारी. उगाच मामाच्या जिवाला घोर नको लागायला.

प्रभात : मी पाठवतो त्याला पत्रात उत्तर.

आई : ते पाहून घ्या तुम्ही दोघ. उगाच मला त्यात ओढू नका.


प्रभातच वागण हल्ली बदलत चालल होत. प्रभात काॅलेज मध्ये असणाऱ्या तन्वीच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता. तन्वी काॅलेज मधली हुशार विद्यार्थी तर होतीच पण दिसायला तितकीच देखणी होती. गोरीपान, गोबरे गाल, सिल्की केस. तिच्याकड नुसते पाहतच राहावे अशी तिची अदा होती. ब्रेन विथ ब्यूटीच परफेक्ट समेट तन्वी मध्ये दिसून येत होता.
प्रभात तन्वीशी बोलता याव म्हणून अभ्यासातली अडचण समजून घ्यायला जायचा बहाणा करत असायचा. उदयला प्रभातचे तन्वी वरचे प्रेम कळून चुकले होते.
खर पाहायला गेल तर तन्वी कोणाच्या प्रेमात पडणारी मुलगी नव्हती. तिच्या दृष्टि ने करीअर हि पहिली कॅटेगरी होती. तिला इंजिनियर होण्याच आई-बाबांच स्वप्न पूर्ण करायच होत. त्या करता शिकून परदेशात जाण्याचे देखील तिच स्वप्न आहे. हे उदयला तन्वी ची मैत्रिण प्रियाकडून समजले होते.


प्रिया आणि उदय एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्या घरी देखील एकमेकां विषयी माहिती होती. घरच्यांची पसंती पाहता डिग्री झाली की लगेचच लग्नाचा बार उडवून देणारे होते. प्रिया ने उदयला त्याचा मित्र प्रभातला अनेकदा समजावून सांग असे सांगातले, तन्वीचा नाद सोडून दे. तिच ध्येय पक्के आहे. तिच्या आयुष्यात प्रेमाला तिळमात्रही जागा नाही.


प्रभातने उदय बाबत चुकिचा समज करुन घेतला होता. उदयला काय जाते बोलायला. त्याच झाले नीटनेटके. माझ्या आयुष्यात काय चालले याच त्याला काही देणघेण नाही. अस स्वत:शीच पुटपुटत प्रभात उदय जवळ जावून सांगतो, \"आजपासून तू तुझ बघायच. माझ्या आयुष्यात डोकवायला यायच नाही. उदय प्रभातच्या बोलण्याने दुखावला जातो. तो मनाशी ठाम निश्चय करतो. आपली चूक नसताना प्रभात आरोप करत आहेत. त्याला एक ना एक दिवस याचा पश्चाताप होईल. तो स्वत:हून बोलायला आल्या शिवाय आपण बोलायचे नाही असे ठरवतो.


प्रभातने तन्वी बरोबर मैत्रीचे बंध निर्माण केले होते. तिच्या बरोबर हाॅटेल, सिनेमा पाहायला जावू लागला. काॅलेज मधून घरी नेवून सोडणे तर आता रोजचेच झाले होते. प्रभातला तन्वीचे देखील आपल्यावर प्रेम आहे या खोट्या विश्वात सुखी राहू लागला.
तन्वी च्या मनात निख्खळ मैत्री व्यतिरिक्त कोणतेच नाते प्रभात विषयी नव्हते.

प्रभात तन्वी वर असणारे प्रेम व्यक्त करायला जाणार आहे. यावर तन्वीची प्रतिक्रीया काय असणार जाणून घेवूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all