कळले नाही तुला भाग १

पश्चाताप झाल्यावर चूक समजण्यात काहीच अर्थ राहत नाही.

त्या दिवशी प्रभातला पहिल्यांदाच स्वत: घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप झाला होता. जर त्याचवेळी भावना ओळखता आल्या असत्या तर.., आज हि वेळ कधी आपल्यावर ओढवलीच नसती. दिवसागणिक दिवस पुढे चालले होते. प्रभातच मन मात्र जून्या आठवणींमध्ये बिलगुण हमसून हमसून आतल्या आत रडत होते.

गेलेली वेळ पुन्हा येत नाही हे जितक खर तितकेच मनावरच्या आघात करणा-या जखमांच काय? हा प्रश्न प्रभातला भेडसावत होता.
तर आपण कथामालिकेत पाहणार आहोत प्रभातच्या आयुष्यात येणारी तन्वी आणि मायरा यांच्या परस्परात गुंफत जाणा-या नात्याची उकल कशी उलगडली जाणार आहे.


शाळांना दिवाळी आणि मे महिन्याची सुट्टी लागली की, प्रभातच मन मामाच्या गावाला जाण्याकडे ओढा घेत असायचे. खंत इतकीच असायची की प्रभातच नाव मायरा हिच्या बरोबर जुळल जायचं. मायरा मोठ्या मामाची मुलगी. दिसायला सावळी जरी असली तरी नाकी, डोळे छान होते. मध्यम बांधा कुरळे लांबसडक केस. मामाच्या घरी यायची खोटी. मामा आणि मामी या हो जावई बापू म्हणून हाक मारायला कुठे मागे पडायचे नाही.
प्रभातला नेमकी हिच गोष्ट आवडत नसायची. याकडे दुर्लक्ष करण्या खेरीज कोणताच पर्याय समोर नव्हता. मामा आणि मामी च जर मन दुखावल तर डोंगर,नदी, शेतात जाण्याचा आनंद कसा मिळणार.
मामा डोंगर चढायला पहाटे सहाला उठून घेवून जायचा. तिथे जावून उगवत्या सूर्याच्या दिसणा-या छटा डोळ्यात साठवून ठेवाव्याश्या वाटायच्या. मामाच्या गावी काही मित्रांशी ओळख होवून घट्ट मैत्रीचे ऋणानुबंध प्रस्थापित झाल्याने त्यांच्यासोबत नदीत मनसोक्त पोहण्याचा आनंद काही निराळाच. तिथे आई-बाबा ही ओरडायला नसायचे. आपलच राज्य असल्यासारखे मामाच्या घरी हव तस वागता यायच.


शहरातल्या पेक्षा गावाला सिनेमाच तिकीट देखील कमी असायचे. प्रभात गावाला मित्रांसोबत सिनेमा पाहायला जायचा. तिथे मित्रांबरोबर मिसळ, वडापाव, भेळ, भजी वर ताव मारायचा.
मामाला नको म्हणत असताना देखील आवडीचे कपडे हट्टाने घ्यायला लावायचा. मामी चमचमीत पदार्थांचा बेत रोजच करत असायची. अशी प्रेमळ वागणूक मिळाली की मन नेहमीच मामाच्या घरी येण्याकरता आतूर असायचे.


आई-बाबांना वेळ नसला तरी प्रभात स्वत: आपल्या शहरातल्या मित्र उदय ला बरोबर घेवून मामाच्या घरी राहायला येत असायचा. त्या काळात मायरा प्रभातला काय हव नको ते पाहत असायची. आता तर घरातल्यांप्रमाणे उदयला देखील माहित पडले प्रभात ला मायराच्या नावाने चिडवले जाते.


प्रभातने हि गोष्ट शाळेत पसरू नको अशी उदयला सक्त ताकीद दिली. नाहीतर पुढच्या वेळी मामाच्या गावी येताना बरोबर आणणार नाही. बिचारा उदय आधीच शांत स्वभावाचा. प्रभातने आवाज चढवल्यावर नाही सांगणार कोणाला अस बोलून गप्प राहिला. काही वर्षांचा काळ लोटला प्रभात आता काॅलेजला शिकायला जात होता. शहरातली चमचमणारी दुनिया प्रभातला हवीहवीशी वाटू लागली. त्याला मामाच्या गावी जाव अस लक्षात देखील आले नाही. मामच घरी एकदा पत्र आल ते पण मायरा ने लिहल होत. मामाच्या गावची वाट विसरलास का पोरा.? आठवण येती तुझी. गावाकड शेतीची काम तोंडापुढे असल्याने शहराकडे येण जमत नाही. गेले एक वर्ष येण झाला नाही प्रभातच. आमच्याकडून काही चूक झाली का?


खरच मामाची काही चूक झाली असेल का? की प्रभात काॅलेज मध्ये रममाण झालाय पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all