कलाटणी
भाग-4 अंतिम
भाग-4 अंतिम
शरयूची जबाबदारी वाढली होती. एक वकील म्हणून तिची त्या दृष्टीने तयारीही सुरू झाली हायकोर्टात सुप्रीम कोर्टात स्टॅन्ड देण्यासाठी.
नाव राघव पण कृत्य मात्र रावणाची.
तिला राघवला त्याच्या कुकृत्याची सजा मिळवून द्यायचीच होती.
पुन्हा अजून नवीन कुणीतरी अबला त्या हैवानाची शिकार ठरू नये आणि ती जीवनातून उठू नये.
वापरा आणि फेका. वरतून पैसाही कमवा. परत मोकाटच्या मोकाटच. कसा वचक बसणार त्याच्या कुकृत्याला?
आपण काही चुकीचे करतोय ही जाणीवही त्याच्या निर्मम हृदयाला स्पर्श करत नव्हती.
आपण काही चुकीचे करतोय ही जाणीवही त्याच्या निर्मम हृदयाला स्पर्श करत नव्हती.
ही एकच सायली नाही तर अशा कित्येक सायली तो निर्ममपणे कुस्करून फेकून देईल. अजून किती सायली जीवनातून उठवेल हा?
त्याआधी त्याला फासावर लटकवायचेच मग त्यासाठी मला माझ्या जीवनाची किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर.
आणि...
आणि ती यशस्वी झाली. तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेले ते यश होते.
आणि ती यशस्वी झाली. तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेले ते यश होते.
त्याला कारागृहाच्या गजाआड बेडीत बंदिस्त बघताना तिच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा भाव होता. तिची देहबोली स्पष्ट दर्शवत होती की तिने किती मोठी कामगिरी केली आहे.
सहाजिकच होते ते.
तो क्षण एडवोकेट शरयूच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण होता.
तो तिच्या जीवनातील फक्त वकील म्हणूनच टर्निंग पॉईंट नव्हता तर...
एक 'पिडीता' म्हणूनही तिच्या जीवनातील तो टर्निंग पॉईंट होता.
राघवची सायलीच्या आधीची शिकार,सावज ती स्वतः होती.
सायली आधी शरयू ने हे सगळं भोगलं होतं.
राघवने तिची छळवणूक करण्यात कोणतीच कसर ठेवली नव्हती.
वास्तविक शरयू इंजिनियर. मुलगाही इंजिनिअर शोधावा म्हणून आई-वडिलांनी शोध घेतला. इंजिनियर असल्याची बतावणी करून राघवने शरयूला मागणी घातली.वडिलांनी चौकशी केली सगळंच व्यवस्थित वाटलं म्हणून
चट मंगनी पट व्याह.

आई-वडिलांची एकुलती लाडली कन्या. शाही लग्न सोहळा झाला. हौशीला काय कमी. हुंडा काय हुंड्याचा बाप मिळाला असता त्या नराधमाला.
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा खरा चेहरा उघड झाला शरयू समोर. शरयू समजली आपली फसवणूक झालीय.
पण त्याने तिचे माहेरी जाण्याचे सगळे रस्तेच बंद करून टाकले. कळविण्याचे सुद्धा.
स्वतः तिच्या बाजूला बसायचा राघव आणि माहेरी फोन लावायला लावायचा मी खूप आनंदी आहे सध्या घ्यायला येऊ नका मी फोन करेन तेव्हा या.
बापाला वाटायचं खूप सुखी आहे आपली पोर पण बापाचं काळीज ते. आपल्या हृदयाचा तुकडा त्याने त्याच्या स्वाधीन केलेला होता.
दोन महिन्यानंतर न राहवून बाप पोरीच्या भेटीला आला. तेव्हा राघवने तिला बाथरुममधे कोंडून ठेवलेले. तिच्या बापाला सांगतो ती बाहेर गेलेली आहे. बापाचा संशय बळावला.
शरयू ने बाहेर वडिलांचा आवाज ऐकला आणि जोरदार ओरडली
" बाबा मला सोडवा."
तिने आपल्या साडीचा पदर फाडून त्यावर आपल्याच रक्ताने लिहिले 'मला वाचवा' आणि ती चिंधी तिने खिडकीतून बाहेर फेकली. तिचा आवाज ऐकून बापाने वर बघितले ती चिंधी त्यांच्या हातात पडली. ते वाचून बापाला भोवळच आली.
त्यांनी चार लोकांच्या मदतीने आपल्या पोरीची सुटका केली.
पोरीचा खंगलेला चेहरा बघून बापाला रडू कोसळले.त्याने हंबरडाच फोडला. एवढी सुंदर त्याची पोर पार सुकून गेली होती. भयभीत झाली होती.

माहेरी येऊन तिने वकील होण्याचा निर्णय घेतला. तिला स्वतःसाठी आणि तिच्यासारख्या पीडित महिलांसाठी लढायचं होतं.
ती स्वतःच राघव वर दावा दाखल करणार होती. तिची तशी तयारीही सुरू होती.
तेव्हाच...
सायली आली.
आज तिने स्वतःवरील अत्याचाराचा बदला घेतला होता.
समाप्त
©®शरयू महाजन
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा