Login

कलाटणी भाग -2

स्त्री जन्माची कहाणी
कलाटणी

भाग -2

सायली, जिची ही केस होती तिच्या नशिबात लहानपणापासूनच केवळ अत्याचार आणि अत्याचारच लिहिले होते. तिचा जन्म झाला आणि आई गेली अशी अभागी मुलगी.
मुलगी मुळावर आली असे म्हणत बाप कधी धड वागलाच नाही. त्याने लगेच दुसरे लग्न केले.त्याला बायको तर मिळाली पण सायलीला आई नाही मिळाली.
शेवटी सावत्र आई ती सावत्रच. तिने सायलीला कधी आपलं म्हणून स्वीकारलंच नाही. उलट तिचा जेवढा छळ करता येईल तेवढा करत राहिली. कधी दोन प्रेमाचे शब्द तिच्या वाट्याला आलेच नाहीत सुग्रास अन्न, मिष्टान्न भोजन तर खूप दूरची गोष्ट पण रोजचं ताजं अन्नही कधी तिच्या वाट्याला आलं नाही. तिची सावत्र आई मुद्दाम शिळपाक अन्न खाऊ घालायची. कधीकधी तर उपाशीही ठेवायची. आणि एवढं करून तिच्याकडून सगळं घर काम करून घ्यायची. हक्काची,फुकटची मोलकरीणच भेटली होती तिला.
बाप बघूनही न बघितल्यासारखं करायचा. त्याचीही नावडतीच होती ती.
ती वयात आल्यावर तिला चांगल्या घरच्या मागण्या आल्या पण तिच्या आईने त्या ठोकरल्या बापही काहीच बोलला नाही.
ही गेली की घरातले काम कोण करेल ही चिंता तिच्या आईला लागून राहिली होती.
शेवटी मुद्दामहून तिने लोकांच्या टीकेस्तव सायलीच्या लग्नाचे मनावर घेतले आणि हे स्थळ तिने शोधले तिला या स्थळाचा पूर्वेतिहास माहीत होता तरी एनकेनप्रकारेण तिचा छळ कसा सुरू राहील याच सुडाच्या भावनेतून तिने सायलीच्या वडिलांवर दबाव आणून हे लग्न घडवून आणले होते.

सायली लग्न होऊन सासरी आली तरी तिचा छळवाद थांबलाच नाही.
तिचे दीदी वाडे पंच पोवाडे कायमच होते. उलट जास्तच भर पडली होती फक्त व्यक्ती आणि स्थळ बदलले होते छळवाद तसाच होता.
सायली जीवनाला कंटाळली होती.
ती दिवसेंदिवस खंगत चालली होती.
आजूबाजूचे सगळे बघणारे तिला म्हणत होते ‌, "काय ही हालत. सोडून दे त्याला जनावरालाही कमी मारत असतील एवढे क्रृर अत्याचार. आम्हाला बघवत नाही ग, तू कसे सहन करते?"
" मरशील एखाद्या दिवशी कळणारही नाही कुणाला. "

त्याला जणू विवाहाच्या माध्यमातून परवानाच मिळालेला बलात्काराचा. होय बलात्कारच. कारण जो पती-पत्नी दोघांच्या सहमतीने कुठलीही जोर जबरदस्ती न करता होतो तो समागम.

जर पत्नीची अजिबात इच्छा नसतानाही तिचे शरीर अगदी क्रूरपणे ओरबाडले जात असेल तर त्याला काय म्हणणार ना?
तो लंपट छाप, वासनांध होता. प्रेम तर काडीचेही नव्हते फक्त त्याला तिचे शरीर हवे होते. तो केवळ पैशासाठी हपापलेला होता.
आणि त्या पैशाच्या बळावर आपले सगळे शानशोक पूर्ण करत होता. माणुसकीला काळीमा फासणारं त्याचं वर्तन होतं. तो एक क्रूरकर्मा होता आणि त्याला घरातल्यांचीही साथ होती.
हुंडा या गोंडस नावाखाली त्याला मोठी रक्कम हवी होती.

अशी बळजबरी करायची तिला जिणे नकोसे करायचे मग ती आपण होऊन निघून जाणार. पोरीची बदनामी होईल, घटस्फोटात वेळ जाईल म्हणून मग मायबाप उलट यालाच घे बाबा एकदाचे मोकळे कर म्हणत पैसे देणार आणि आपल्या मुलीची सोडवणूक करून घेणार. सुटलो म्हणत
सुस्कारा टाकणार.
तो दुसरीला फसवायला मोकाट.
क्रमश:
बाकी पुढील भागात भाग-3 मध्ये
इथे तर ती मायबापालाच जड.
काय होते पुढे...त्याचा इतिहास काय?जाणून घेऊयात पुढील भागात.
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all