कळत नकळत पर्व 2 भाग 9

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की मीरा अमरला प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करते.. अमर तिला परत मॅरेज मॅनेजमेंटचं काम करायला सांगतो.. ती परत बघू म्हणते.. मग काका समजावून सांगितल्यावर ती तयार होते.. आता पुढे..

मीरा खूप विचार करते.. विचार करून झाल्यावर ती परत काका काकूंकडे जाते..
"काका मी परत माझं काम चालू करायचं म्हणत आहे.." मीरा

"अरे वा.. ही तर आनंदाची गोष्ट आहे.." काका

"पण एक अडचण आहे.." मीरा

"कोणती अडचण आहे??" काका

"काका मी स्वतःच ऑफिस चालू करायचं म्हणत आहे.." मीरा

"अरे वा.. मग कर की.. पैशाची काही अडचण आहे का??" काका

"अगदीच तसे नाही.. पण कुठे जागा आहे का बघायचं होतं.. म्हणजे मला यातलं काही माहीत नाही म्हणून.." मीरा

"अरे.. आपला एक गाळा आहे.. मेन रोडवर आहे.. तिथेच तू तुझं ऑफिस चालू कर.." काका

"हो चालेल.. पण भाडे.." मीरा

"आम्ही कधी विचारलय का तुला?? आणि तू आमच्यासाठी इतकं केलेस त्यापुढे हे भाडे काहीच नाही.. आणि हो आमच्या सुनेकडूनच आम्ही भाडे घ्यायचं का??" काका

"अहो काका.. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.." मीरा लाजतच म्हणते..

"मग तू कधीपासून सुरू करतेस.." काका

"अमरच्या सरांच काम घेणार आहे.. त्याआधी म्हणजे दोन दिवसात ऑफिस सुरू करायचं म्हणत आहे.." मीरा

"चांगली गोष्ट आहे.. लवकरच चालू कर.." काका

"पण मी काय म्हणते??" मीरा

"बिनधास्त बोल.." काका

"ऑफिस व्यवस्थित इंटेरियर करून घेते.. मग आपण एक छोटीशी पूजा घालूयात.." मीरा

"अगबाई किती छान.. बरं झालं बाई तूच म्हणालीस.. खूप दिवस झाले पूजाच घातली नाही.. या निमित्ताने तर पूजा घालूयात.." काकू

"होय काकू.. आणि पूजेला तुम्ही दोघे बसायचं.." मीरा

"आज तुमचं लग्न झालं असतं तर तुम्ही दोघे बसला असता पुजेला.." काकू

"नाही काकू.. तरीही मी तुम्हालाच पुजेला बसवले असते.. तुमच्यामुळेच मी इतकं करू शकले.." मीरा

"चला हिच आभार प्रदर्शन चालू झालं.." काकू

"काय काकू तुम्ही पण.." मीरा

"मग काय ग.. तू सगळी मेहनत घेतेस.. आणि नाव मात्र आमचं पुढे करतेस.." काकू

"तुमच्या शिवाय माझे आहे तरी कोण?? तुम्हीच तर माझं आयुष्य आहात.." मीरा असे म्हणत काकूंना मीठी मारते..

नंतर ती नविन ऑफिसमध्ये रिन्युएशनसाठी जाते.. तिथले काम पूर्ण झाले.. तिच्या मनाप्रमाणेच तिने ऑफिसचे डिझाईन केले होते.. एका दिवसात सगळे काम पूर्ण झाले होते.. सगळी तयारी करून झाल्यावर ती घरी आली.. ती आज खूप खूश होती.. कारण तिचं स्वतःचं ऑफिस चालू होणार होतं.. काकूंनी आज गोडाचा शिरा केला होता.. त्यांनाही खूप आनंद झाला होता..

"आई माझ्यासाठी कधी इतकं केल होतंस काय ग??" अमर चेष्टा करत होता

"म्हणजे काय?? आणि मीरा आमची मुलगी आहे.. त्यामुळे तिच्यासाठी पण आम्ही करणारच.." काकू

"हो करा करा.. मी आपला बिचारा.. बसतो तसंच.." अमर

"होय काय?? तू बिचारा.." म्हणत काकू त्याच्या तोंडात शिरा भरवतात..

आज मीराच्या नविन ऑफिसमध्ये पूजा असते.. सगळे सकाळी लवकर उठतात.. सगळ्यांचीच धावपळ सुरू असते.. कारण पूजेचा कार्यक्रम लवकर असतो.. पूजेसाठी थोड्याच लोकांना सांगितलेले असते.. मीराच्या ओळखीतले आणि नेहा, निरवची फॅमिली.. शेजारचे चार घर इतकेच..

सकाळी पूजा असल्याने सगळे लवकर आटोपून येतात.. अमर पण पिंक कुर्ता घातलेला असतो.. काकू काका पण आवरून तयार असतात.. आता सगळे मीराची वाट पाहत असतात..

मीरा आवरून येते.. ती पिंक कलरची साडी नेसलेली असते.. केस पूर्ण मोकळे सोडून एक लहानशी क्लचर लावलेली होती.. हलकासा मेकअप आणि सेंटचा सुवास दरवळत होता.. ती आली आणि एक लहानशी स्माईल केली..

अमर तर फक्त तिच्याकडेच पाहत होता.. त्याला तिच्याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते.. "कसली भारी दिसत आहे यार ही.." अमर मनातच म्हणतो.. तिची स्माईल बघून तर चक्कर येऊनच पडतो की काय असे होत होते.. तो असा बघताना मीराला खूप लागल्यासारखे होत होते.. काका काकू पण त्याच्याकडेच बघत होते आणि हसत होते..

"अमर निघूया काय??" काका

"हमम.." म्हणून अमर तिच्याकडेच पाहत होता..

"मीरा चल आपण जाऊ.." काका मस्करी करत म्हणाले..

"कुठे??" अमर एकदम भानावर येऊन म्हणाला.. तसे सगळे हसू लागले.. अमर खूपच ओशाळला..

सगळेजण मीराच्या ऑफिसमध्ये गेले.. ऑफिसची सगळी सजावट मीराने एकटीनेच केलेली होती.. ऑफिस समोर सुंदर रांगोळी काढली होती.. बाहेर फुलांचे तोरण बांधले होते.. आत देवाचे फोटो आणि त्यासमोर फुलांचे गालीचे केले होते.. देवाच्या मुर्तीला सुंदर हार घातलेला होता..

पुजारी पण वेळेवर आले होते.. त्यांनी त्यांचे सामान काढून पुजेची तयारी केली.. काका काकू पूजेला बसले.. पूजा सुरू झाली.. या सगळ्या तयारीमध्ये अमरचे सगळे लक्ष फक्त मीराकडेच होते.. तिच्याकडून त्याची नजरच हटेना.. पण मीरा थोडी अवघडल्यासारखी होती.. असे कोणी आपल्याकडे बघायला लागले की आहे ते पण काम बिघडते..

मीराला सगळे हळूहळू चिडवत होते.. आता काका काकूंना थोडं हायसं वाटलं.. अमरला ती आवडू लागली आहे असे त्यांना दिसले.. मन समाधान झाले..

पूजा सुरू झाल्यावर सगळे बसले.. अमर मीराच्या बाजूला जाऊन बसला.. मीरा लाजून चूर झाली.. मान्य आहे ती आधीही त्याच्या प्रेमात होती.. पण मधे खूप गॅप होता.. आणि अमरला आधीचं काहीच माहिती नव्हते.. त्यामुळे ती नव्याने त्याला ओळखत होती.. आणि त्याच्या प्रेमात पडत होती..

"अमर जरा कापूराची वडी देतोस का??" काका

अमरचे लक्षच नसते.. मग काका मीराला सांगतात.. मीरा उठून कापूर आणण्यासाठी जाते.. तेव्हा पण हा तिच्याकडेच पहात बसला होता.. ती आत गेल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला.. तेव्हा काकांनी भुवया उंचावून पाहिलं.. अमर लाजून उठूनच गेला.. तो गेल्यावर सगळे हळूच हसू लागले..

पूजा अगदी व्यवस्थित पार पडली.. आलेल्या मंडळींना चहा नाष्टा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली..

संध्याकाळी घरी आल्यावर अमरचे मन खूप बेचैन झाले.. आज मी असा का वागलो?? मी मीराकडे इतका का आकर्षित झालो.. ती सुंदर दिसत होती.. पण मी खूपच विचित्र वागलो.. सगळे काय म्हणाले असतील?? असे त्याच्या मनात विचार येत होते.. असू दे.. कोण काय म्हणतंय म्हणू दे.. पण आज ती खूपच सुंदर दिसत होती.. असे परत म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all