Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत पर्व 2 भाग 7

Read Later
कळत नकळत पर्व 2 भाग 7

आपण मागील भागात पाहिले की अमर पाच दिवसांनी शुध्दीवर आला होता.. पण तो फक्त काका काकूंना तेवढंच ओळखत होता.. मीराला त्याने ओळखलेच नाही.. मीरा रडू लागली.. काकू तिला समजावून सांगितल्यावर ती शांत झाली.. आता पुढे..

अमरला बरे वाटू लागल्यावर त्याला डिस्चार्ज मिळाला.. तो आता घरी आला.. सगळे खूप खूश होते.. आता त्याच्या तब्बेतीत खूप सुधारणा होत होती.. आणखी थोडे दिवस गेल्यावर अमरने त्याच्या कंपनीला कळवून इकडेच ट्रान्स्फर करून घेतली..

आता अमर त्याच्या घराजवळच असलेल्या कंपनीत जाणार होता.. पण अजूनही तो रिकव्हर झाला नव्हता म्हणून त्याला घरातूनच प्रोजेक्ट करायला सांगितले होते.. पण तो प्रोजेक्ट तर कसा करणार.. कारण त्याचा हातच फ्रॅक्चर झाला होता..

तरिही तो त्याच्या परिने सर्व प्रयत्न करून प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो.. त्याला विश्रांतीची पण तितकीच गरज होती.. त्यामुळे काकू काका त्याला जास्त काम करू देत नव्हते.. तब्बेत सांभाळून कर म्हणत..

आज अमरचा प्रोजेक्ट कंपनीत सादर करायचा होता.. त्याला कंपनीत जायचं होतं.. पण हात फ्रॅक्चर असल्याने त्याला गाडी घेऊन जाता येत नव्हते..

"बाबा तुम्ही मला ऑफिसला सोडाल का??" अमर

"का रे.. आज का??" काका

"अहो एक प्रोजेक्ट द्यायचा आहे.. पण तो पूर्ण झालाच नाही.. दुसरा कोणी पूर्ण करत असेल तर त्याला देण्यास सांगणार आहे.." अमर

"अरे आलो असतो.. पण माझे दुसरे एक महत्त्वाचे काम आहे रे.. मी नाही येऊ शकत.." काका

"बरं मग मी रिक्षाने जातो.." अमर

"नको रे बाबा रिक्षाने.." काकू

"का?? मग कसा जाऊ सांग.." अमर वैतागून म्हणाला

"तू एक काम कर.. मीराला घेऊन जा.." काकू

"काय?? मी नाही हं.." अमर

"अरे मग जाऊ नकोस.. काय होईल ते होईल.." काकू

"बरं बाई जातो.. नुसता वैताग.. ती येते काय ते विचार??" अमर

"येते म्हणाली ती.." काकू मीराला विचारून सांगतात..

मीरा तयार होऊन येते.. मग मीरा आणि अमर दोघेही अमरच्या ऑफिसला जातात.. ऑफिसला गेल्यावर अमर सरांच्या केबिनमध्ये जातो आणि मीरा बाहेर बसते..

अमर आत थोडा घाबरतच जातो.. कारण त्याचा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झालेला नसतो..

"मे आय कम इन सर.." अमर

"येस कम इन.." सर

"सर मी अमर.. आपल्या फाॅरेनच्या कंपनीत होतो.. अॅक्सिडेंन्ट झाल्यावर मी इकडे ट्रान्सफर करून घेतली.." अमर

"येस.. वेलकम अमर.." सर

"थॅन्क्यू सर.." अमर

"बरं मला सांगा.. तुमच्याकडे जे प्रोजेक्टचे काम दिले होते ते पूर्ण झाले आहे ना.." सर

"सर त्यासाठीच तर मी आलो आहे.." अमर

"बोला.." सर

"सर अॅक्सिडेंन्ट झाल्यामुळे मी हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करू शकलो नाही सर.." अमर

"काय?? तुम्ही असे कसे करू शकता.. तुम्ही तुमची जबाबदारी वेळेत पार पाडू शकला नाहीत तर कंपनीला तुमची काहीच गरज नाही.." सर

"साॅरी सर.. अॅक्सिडेंन्ट झाल्यामुळे मी करू शकलो नाही.. माझे याआधीचे रेकाॅर्ड तुम्ही चेक करा ना.." अमर

"खूप वेळ होता तुमच्याकडे.. तरीही तुम्ही प्रोजेक्ट वेळेत पूर्ण केला नाही.. अॅक्सिडेंन्ट झाल्यावर इतके दिवस कोणीच रजा घेत नाही.. तुम्ही काहीतरी कारण सांगू नका.." सर थोडे चिडून बोलतात

"मी खरंच सांगतोय सर.." अमर

"तुम्ही मेडिकल सर्टिफिकेटस पण अजून सबमिट केले नाहीत.. मग आम्ही काय समजायचे.." सर

"हो सर मी सबमिट करणारच आहे.." अमर

"कधी?? तुम्ही काहीही सांगाल.. कसा विश्वास ठेवायचा?? हातच तर फ्रॅक्चर दिसत आहे फक्त.." सर

"एक मिनिट सर.. बाहेर एक मुलगी आहे तिला विचारू शकता.. ती फक्त आमच्या सोबत राहते.." अमर

सर फक्त बाहेर निरखून बघतात.. बोलवा बघू त्यांना आत.." सर

मीरा आत आल्यावर..
"तुम्ही मिस मीरा आहात ना.." सर

"हो.. तुम्ही मला कसे ओळखता??" मीरा

"मागे माझ्या एका मित्राच्या मुलाचं लग्न झालं.. सगळी अरेंजमेंट तुम्हीच केली होती.. मला खूपच आवडली होती.. आता माझ्या मुलीच लग्न आहे.. मी मित्राला तुमचा नंबर मागितला तर समजलं की तुम्ही आता काम करत नाही.. मी खूप निराश झालो.. पण देवाच्या कृपेने तुम्ही भेटलात.. प्लीज माझ्या मुलीच्या लग्नाच्या अरेंजमेंटच काम तुम्ही घ्या ना.." सर

"ते नंतर बघू.. मला सांगा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करणार्या एम्लाॅईसोबत असेच अविश्वास दाखवता का??" मीरा हे बोलताना अमर फक्त तिच्याकडेच पाहत होता

"का?? काय झालं.." सर

"हे अमर.. इतके दिवस आजारी असूनही प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.. पण नाही झाला पूर्ण.. आजारी होते म्हणूनच ना.. मग तुम्ही त्यांचे आधीचे रेकाॅर्ड न बघताच त्यांचे परिक्षण केले का??" मीरा

"नाही म्हणजे मला वाटलं हे खोटं बोलत असतील.. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाला नाही की सगळे असंच म्हणतात म्हणून.. पण तुम्ही म्हणताय त्यात तथ्य आहे.. सो मिस्टर अमर हा प्रोजेक्ट तुम्हीच पूर्ण करा.. अजून चार दिवस आहेत आपल्याकडे.." सर

"ओके सर.. थॅन्क्यू.." अमर

"ओके.. मीरा ते अरेंजमेंटच तेवढं बघा.." सर

"मी सांगते तुम्हाला.." मीरा

बाहेर आल्यावर अमर मीराच्या मागे जाऊन "कसली साॅलीड आहेस ग तू.. कसलं बोललीस.. थॅन्क्यू सो मच.." अमर

"त्यात काय एवढं.. मी खरं काय ते सांगितले.." मीरा

"पण भारी.. आणि ते मॅरेज अरेंजमेंटच काय ग??" अमर

"मी लग्नाची सगळी अरेंजमेंट करत होते.." मीरा

"आणि आता..." अमर

"नाही करत.." मीरा

"का??" अमर

"काहीतरी कारण आहे.. मी सांगू शकत नाही.." मीरा

"बरं.. मग फ्रेण्डस्.." अमर मीराच्या पुढे मैत्रीचा हात पुढे करतो..

मीराला गहिवरून येत.. पण ती लपवते.. आपलं एक पाऊल पुढे पडले म्हणून तिला आनंदही होतो..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..