Mar 01, 2024
प्रेम

कळत नकळत पर्व 2 भाग 6

Read Later
कळत नकळत पर्व 2 भाग 6

आपण मागील भागात पाहिले की अमरचे ऑपरेशन यशस्वी झाले.. डाॅक्टरांनी त्याला आधीचे काही आठवेल किंवा नाही असे सांगितले.. काका आणि काकूंना खूप टेन्शन आलं होतं.. आता पुढे..

आज पाचवा दिवस अमरचा ऍक्सिडेंट होऊन.. अजूनही तो बेशुद्धच होता.. सगळे खूप घाबरले होते.. तो शुध्दीवर येण्यासाठी प्रार्थना करत होते.. काकूंनी तर सगळे देव पाण्यात ठेवते होते..

दुपारी अमरला शुध्द आली आणि सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.. सगळे खूप आनंदी आनंद झाले होते.. काकू तर देवाचे आभारच मानत होते.. हा आनंद जास्त वेळ टिकला नाही..

कारण आता आणखी एक टेन्शन होतेच.. अमरला नेमके काय आणि किती आठवतंय?? सगळे परत थोडसं टेन्शनमध्ये होते.. पण अमर आता ठिक आहे म्हटल्यावर सगळ्यांना बरं वाटलं..

"डाॅक्टर आम्ही आता भेटू शकतो का??" काका

"हो.. भेटू शकता.. पण मी तुम्हाला जे सांगितले आहे ते लक्षात आहे ना.." डाॅक्टर

"हो डाॅक्टर.." काका

"बरं.. जा भेटा.." डाॅक्टर

मग सगळे आत जातात.. अमर झोपलेला असतो.. सगळे आत आल्यावर त्याच्याकडे बघत असतात.. आता हा कसा रिऍक्ट होतो याचा अंदाज कुणाला येत नव्हता.. सगळे थोडा वेळ शांत होतो.. तोपर्यंत अमर डोळे उघडतो..

"आई बाबा.. किती वेळ झाला.. कोठे होतात तुम्ही??" अमर

"आहे बाळ इथेच.." करत काकू आनंदाने त्याच्या जवळ जातात..

"कसं वाटतंय बाळ आता तुला??" काका

"मी अगदी ठणठणीत आहे.. आणि आता लवकरच घरी येणार.." अमर

"देवच पावला बाबा.. किती टेन्शन आलं होतं आम्हाला.." काकू

"टेन्शन काय घ्यायचं त्यात.. हम शेर है.." अमर असे म्हणत हसू लागतो..

"होय आणि आम्हालाच माहित तू काय निवांतच होतास.." मीरा असे बोलताना अमर नुसताच तिच्याकडे बघितला..

"आई या कोण ग??" असे अमर म्हणताच मीराला कुणीतरी काळजात खंजीर खुपसलं की काय असं वाटल.. ती आतून पूर्णपणे कोलमडून गेली.. ती फक्त त्याच्याकडे बघत होती.. आणि लगेच तेथून बाहेर आली..

"अरे ती आपल्याकडेच राहते.. आमच्या सोबतीला.." काकू

"मग मी नाही बघितले तिला याआधी.." अमर

"अरे ती आता आली आहे.." काकू

"बरं.." अमर

मीरा बाहेर जाऊन बसली.. तिला काहीच सुचेना.. ती खूप रडली.. आता आणखी काय वाढलय पुढ्यात काय माहित.. तिला आता जगायचीच इच्छा राहिली नाही.. "आता मी कुणासाठी जगायचं.. जो जिवलग होता तोच साथ देत नाही.. ज्याच्या मनात मी नाही तेथे रहायची इच्छा नाही.. हे परमेश्वरा अजून किती रे दुःख देशील मला.." असे मनात म्हणत ती रडू लागते..

"रडू नको बाळ.." काकू

"मग काय करू काकू.. म्हणजे आता मी त्याच्या मनात नाही.. मीच त्याला आठवत नाही.. काय उपयोग मग??" मीरा

"अगं तू असा का विचार करतेस.. तू पहिला रडणं बंद कर बघू.. शांत हो बाळ.." काकू

"कशी होऊ शांत काकू.. ज्याच्याशी आयुष्यभर राहण्याची स्वप्न बघितली.. तोच आता सगळं विसरला आहे.. आता काही उपयोग नाही.. मी जाते परत.." मीरा

"अजिबात नाही हं.. यावेळी मी तुला जाऊ देणार नाही.. तू आमची पण मुलगी आहेस.. आम्ही तुझे कोणी नाही का ग??" काकू

"आहात काकू.. तुमच्याशिवाय या जगात माझं आहे तरी कोण?? पण आता कशाचीच इच्छा राहिली नाही बघा.. काही करायला नको वाटतं आहे.." मीरा

"अगं तू आमच्या सोबत रहा.. असे म्हणतात की सहवासाने प्रेम होतं आणि वाढत.. काय माहित तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहून तुमचं प्रेम फुलले तर.." काकू

"तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काकू.. हाच तर एक आशेचा किरण दिसतो.. पण त्याला मी आवडलेच नाही तर.." मीरा

"अगं तू कायम नकारात्मक का विचार करतेस.. सकारात्मक विचार करून बघ.. कायम चांगलंच घडणार.. बघ तू अमर तुझ्या प्रेमात नक्की पडेल.." काकू

"हो काकू.. तुम्ही म्हणता म्हटल्यावर तसेच होऊ दे.. बाप्पाच्या चरणी प्रार्थना.. तो अमरची तब्बेत पण लवकरच सुधारू दे.." मीरा

"हो ग.. अमरला लवकर बरे वाटू दे.. आणि तू लवकर आमची सून होऊन घरी ये.." काकू

"सून होऊन येईन की नाही माहित नाही.. पण मुलगी होऊन नक्की येईन.." मीरा

"आता कसं.. अशीच खूश रहा ग.." काकू

"काकू एक सांगायचं राहिलंच.." मीरा

"काय ग.." काकू

"अहो हा ऍक्सिडेंट माझ्या त्या काकाने करवून आणला होता.." मीरा

"काय?? तुला कस माहित??" काकू

"अहो मी पोलिस कंम्लेन्ट केली होती.. त्यांनी पूर्ण तपास केल्यावर समजलं की त्यांनीच हा कट रचला होता.." मीरा

"मग अमरला का मारलं त्यांनी.. याचा काय संबंध??" काकू

"अहो तो मला मदत करत होता ना म्हणून.." मीरा

"काय ग बाई.. लोक इस्टेटीसाठी किती खालच्या पातळीवर जातात.." काकू

"हो ना.. मग मी सगळी इस्टेट माझ्या नावावर करून घेतली.." मीरा

"बरं झालं बाई.. लोकांना नुसता फुकटचच पाहिजे असतं.. आयतं मिळत तेवढं घेतात.. मग त्यासाठी मागचा पुढचा विचार करत नाहीत.." काकू

"हो ना.." मीरा

आता खरंच अमर आणि मीराच प्रेम फुलते की नाही.. कशाप्रकारे फुलत ते आपण पुढच्या लेखात पाहू..

क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//