Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत पर्व 2 भाग 4

Read Later
कळत नकळत पर्व 2 भाग 4

आपण मागील भागात पाहिले की प्रमोद मीराला अडवून तिची छेड काढतो.. पण लोक जमा झाल्यामुळे तेथून काढता पाय घेतो.. मग प्रमोद आणि काका मिळून अमरला मारायचा प्लॅन करतात.. आता पुढे..

त्या दिवशी प्रमोद आणि काका मिळून अमरच्या घरासमोर पहारा देतात.. थोड्या वेळाने ट्रक ड्रायव्हर पण येतो जो त्या काकाचा मित्र असतो.. ते सगळे अमरची वाट पाहत असतात..

अमर काही सामान आणण्यासाठी जाणार असतो.. "ए आई.. काही सामान आणायचे आहे काय ग.." अमर

"नाही रे काही आणायचं.." आई

"मीरा तुला ग.." अमर

"अरे थांब मीच येते.. म्हणजे मला हव ते मी घेईन.." मीरा

"मग माझ मीच जातो.." अमर

"का रे.." मीरा

"अरे तुम्ही बायका खूप वेळ करता शाॅपिंगला.. मला ऑफिसच काम आहे.." अमर

"अरे मी वेळ करत नाही.. लगेच घेईन सामान.." मीरा

"नको ग.. आपण संध्याकाळी जाऊया.. प्लीज.." अमर

"बरं जा.." मीरा थोडी नाराज होते..

"राग आला.. संध्याकाळी नक्की जाऊया ना.." अमर

"बरं.." मीरा

अमर बाहेर येतो.. त्याची गाडी काढतो.. आणि जातो.. त्याच्या गाडीच्या मागोमाग ट्रक जात असतो..

"वर्दळीच्या ठिकाणी नको.. जरा पुढं जिथे वर्दळ कमी असेल तिथे जोरात गाडी नेऊन घालायची त्याच्या गाडीवर.. साल्याला खल्लास करायच.." काका ट्रक ड्रायव्हरला सांगतो..

"बरं.." म्हणून ट्रक अमरच्या गाडीच्या मागे नेतो..

थोडे पुढे गेल्यावर माणसांची वर्दळ कमी दिसते.. म्हणजे माणसं नसतातच तिथे.. काकांनी इशारा केल्यावर ट्रक ड्रायव्हर ट्रक जोरात नेतो आणि अमरच्या गाडीवर घालतो.. इतकी जोरात धडक मारतो की गाडीचा पार चेंदामेंदा झालेला असतो.. आणि ट्रक ड्रायव्हर ट्रक घेऊन पळून जातो..

झालं.. सगळं संपलं.. क्षणात होत्याच नव्हत झाल.. अमरचा ऍक्सिडेंट झाला तिथे कोणीच नसते.. तो एकटाच तिथे पडला.. हे सगळे घडले कशासाठी?? फक्त प्राॅपर्टीसाठी.. माणूस जन्माला एकटा येतो एकटा जातो.. बरोबर नेत तर काहीच नाही.. सगळं इथेच सोडून तर जातो.. पण त्याला इतका हव्यास..

आजवर भरपूर उदाहरणे आहेत.. भाऊबंदकीची भांडणे.. एकमेकांच्या वर काठ्या कुर्हाडी घेऊन जातात.. शेतीसाठी, जागेसाठी, घरासाठी सगळ्या इस्टेटीसाठी.. इतकं करून काय उपयोग?? सगळं इथेच तर सोडून जायचं आहे ना.. बिचारा अमर..

घरी मीरा, काकू गप्पा गोष्टी करत स्वयंपाक करत असतात.. "अमर आता जाॅबसाठी जाणार.. कितीवेळा सांगितलं की इकडे बदली करून घे बाबा म्हणून.." काकू

"आता घेणार आहे तो बदली करून.." मीरा

"घेणार म्हणजे घ्यायलाच पाहिजे.. नाहीतर आम्ही बोलणारच नाही त्याच्याशी.." काकू

"हं..." मीरा

"हे बघ तो जायच्या आधी लहानसा म्हणजे घरच्या घरी तुमचा साखरपुडा करू.. म्हणजे आम्ही निवांत.. तो परत आला की लग्न करू.." काकू

"हं.." मीरा इतकेच म्हणते..

"नाही म्हणजे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेच लग्न करू शकता.." काकू चेष्टेत म्हणतात..

मीरा लाजून लगेच खोलीत पळत जाते.. खोलीत गेल्यावर तिला एक फोन येतो.. "हॅलो मीरा बोलताय काय??" एक व्यक्ती

"हो आपण कोण??" मीरा

"अमरचा ऍक्सिडेंट झाला आहे.. त्याला हाॅस्पिटलमध्ये आणलेल आहे.. तुम्ही येता का??" ती व्यक्ती

"काय??" म्हणून मीराचा फोन हातातून खाली पडतो.. तिला काहीच कळेना की आता काय करावे.. ती थोडा वेळ सुन्न झाली..

"काका काकूंना कसं सांगायच.. काका हार्ट पेशंट आणि काकूंना बीपी.. हे ऐकून त्यांना काही झाले तर.. नाही नाही त्यांना काही होणार नाही.. त्यांना मी लगेच कळू देणार नाही.. पहिला मी हाॅस्पिटलमध्ये जाऊन सगळं बघते.. मग त्यांना सांगते.." असे म्हणून मनात मीरा हाॅस्पिटलमध्ये जायला निघते..

"काकू मी जरा जाऊन येते.. खूप अर्जंट काम आहे.." मीरा

"अगं इतकं काय महत्वाचं काम आहे ग.." काकू

"आल्यावर सांगते.. मला फोन करू नका.." मीरा असे सांगून हाॅस्पिटलमध्ये जाते.. ती हाॅस्पिटलमध्ये गेल्यावर तिला समोर पोलिस दिसतात.. ती अमरबद्दल विचारते..

"तुम्ही त्यांच्या कोण??" पोलिस

"मी त्यांची होणारी बायको.." मीरा

"त्यांचं कोणाशी वैर किंवा भांडण झालं होतं का??" पोलिस

"नाही.." मीरा

"तुमचा कोणावर संशय.." पोलिस

"नाही.." मीरा टेन्शन मध्ये असल्यामुळे तिला काही सुचलंच नाही..

"बरं तसे काही आढळल्यास आम्हाला कळवा.. आणि तुम्हाला एकदा पोलिस स्टेशनला यावं लागेल.." पोलिस

"हो.." मीरा

"बरं जा आता.." पोलिस

"मी अमरला भेटू शकते.." मीरा

"ते डाॅक्टरांना विचारा.." पोलिस

मीरा डाॅक्टरांना भेटायला जाते..

"डाॅक्टर अमर कसा आहे.. खूप काही लागलं नाही ना त्याला.." मीरा

"तुम्ही.." डाॅक्टर

"मी त्याची होणारी बायको.." मीरा

"अच्छा.. बसा.." डाॅक्टर

मीरा बसते..
"हे बघा.. त्यांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आहे.. त्यांना खूप लागलेल आहे.. रक्त पण भरपूर गेलेल आहे.. तातडीने ऑपरेशन करावं लागणार आहे.." डाॅक्टर

"डाॅक्टर पैशाची काही काळजी करू नका.. हवे तितके पैसे देईन.. पण माझ्या अमरला तेवढं लवकरात लवकर यातून बाहेर काढा.." असे म्हणून मीरा रडू लागते..

"हे बघा.. आमचे सगळे प्रयत्न आम्ही करतो.. त्यांना खूपच लागले आहे.. त्यामुळे गॅरेंटी देऊ शकत नाही.." डाॅक्टर असे बोलल्यावर मीराच्या पायाखालची जमीनच सरकली.. तिला काहीच कळेना..

"आता काका काकूंना कसे सांगायचे.. हे काय संकट ओढवल आहे आमच्यावर.. अमर मी येते म्हणाले होते ना रे.. मला का तू घेऊन गेला नाहीस.." असा मनात विचार करत मीरा रडत असते..

क्रमशः

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..