Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत पर्व 2 भाग 11

Read Later
कळत नकळत पर्व 2 भाग 11

आपण मागील भागात पाहिले की अमरच्या प्रोजेक्टचे ऑफिसमध्ये खूप कौतुक होते.. तो पण खूश होतो.. घरी येऊन सांगितल्यावर मीरा त्याला पार्टी मागते.. मग ते दोघे वाॅटर पार्कला जातात.. तेथे मीराचा पाय घसरतो.. आता पुढे..

मीरा चेंज करून आली आणि खुर्चीत बसली.. अमर चेंज करायला गेला.. तो चेंज करून आला आणि बघतो तर एक व्यक्ती मीराची छेड काढत होती.. मीराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.. मग ती व्यक्ती तिच्या जवळ आली..

"काय भारी आहेस तू.. एकटीच आहेस काय??" ती व्यक्ती

हे ऐकून अमरला राग आला.. तो लगेच पुढे येऊन.. "काही काम होत का??" म्हणाला..

"तू कोण रे हिरो.." ती व्यक्ती

"मी हिच्यासोबत आहे.. तुम्हीच म्हणालात ना.. एकटीच आहेस का?? म्हणून म्हणालो मी आहे.. काही काम होत का??" अमर

मग ती व्यक्ती निघून जाते.. अमर मीराचा हात धरून तिला गाडीपाशी आणतो.. आणि तिला डायरेक्ट हाॅस्पिटलमध्ये नेतो.. तेथे तिला तपासून डाॅक्टर पायाला फ्रॅक्चर करतात.. फ्रॅक्चर केल्यावर मग दोघेही घरी येतात.. घरी आल्यावर काकू

"अगं हे काय झालं तुला.. कुठे पडलीस??" काकू प्रश्नावर प्रश्न विचारू लागले..

"अगं हो हो.. सांगतो थांब.." अमर

"काळजी वाटते रे.." काकू

"काकू ते वाॅटर पार्कमध्ये पाय घसरला आणि मी पडले.." मीरा

"अगबाई.. फार लागलं नाही ना ग तुला.." काकू

"हो.. पण पाय फ्रॅक्चर आहे.. त्यामुळे काहीच करता येणार नाही.." मीरा थोडी नाराज होऊन म्हणाली..

"अगं मग कर ना आराम.." काकू

"अहो काकू कसा करू.. मला तर परवा लग्नाचे काम आहे.. कसे होणार काय माहित??" मीरा

"होईल ग.. इतक का टेन्शन घेतेस??" काकू

"मग काय करू?? मी सगळं कसं करणार??" मीरा

"हॅलो मॅडम.. मी कशाला आहे??" अमर

"तुला जमेल का??" मीरा

"या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी अमरला जमणार नाही.." अमर

"बस कर नौटंकी.." मीरा

"अगं खरंच सांगतोय मी.. करेन तुला मदत.." अमर

"थॅन्क्यू यार.. पण कसं करणार तू.." मीरा

"तू फक्त बसून सांग.. मी सगळं करेन.." अमर

"बरं बघते.. मी जरा फ्रेश होऊन येते.." मीरा

"चल तुझ्या रूममध्ये तुला सोडतो.." अमर

"बरं " मीरा

अमर मीराला तिच्या रूममध्ये नेऊन सोडतो.. आणि तो पण फ्रेश व्हायला जातो.. रात्री झोपताना एकदा अमर मीराकडे येतो..

"काय ग.. पाय काय म्हणतो.." अमर

"थोडं कमी आहे रे.. पण मला परवाच टेन्शन आलय.. मी उगीचच घेतलं ते काॅन्ट्रॅक्ट.." मीरा

"अगं मी आहे ना.. कशाला टेन्शन घेतेस.." अमर

"बर.. जयंत, मनाली आणि दोघेजण घेऊ तुझ्या मदतीला.. मी सांगेन तिथे बसून तुम्ही सगळं डेकोरेशन करा.. केटरिंग वगैरे जयंत आणि मनाली बघतील.. मी कोण काय करायचं ते सांगते.." मीरा

"येस बाॅस.." अमर

"ए काय रे.." मीरा

"अगं गम्मत करतोय.. नाहीतर तू मगासपासून टेन्शनमध्येच आहेस.." अमर

"येतच ना रे टेन्शन.. कसं होणार काय माहित??" मीरा

सगळे मीराच्या सांगण्यावरून सगळी तयारी करू लागले.. अमरने पण खूप मदत केली.. त्यांनी हाॅल सजावटीसाठी आणखी दोन माणसांची मदत घेतली होती.. त्यामुळे वेळेत काम पूर्ण झाले.. केटरिंगचे जयंत आणि मनालीने सगळी तयारी केली..

अमर खूपच दमला होता.. इतकं धावपळ करायची त्याला सवयच नव्हती.. पण आज तो अगदी पळून पळून सगळी कामं केला होता..

"साॅरी अमर.. माझ्यामुळे तुला इतकं करावं लागत आहे.. माझ्या पायाला लागलं नसतं तर मी सगळं केले असते.." मीरा

"अगं इतकं काय वाईट वाटून घेतेस.. माणसाला सगळ्या कामाची सवय असावी.. यात माझाही स्वार्थ आहे.." अमर

"तो कसा काय??" मीरा

"माझी नोकरी गेली की मला पण करायला बरं ना.." अमर हसत म्हणतो..

"तू पण ना.. नुसता नौटंकी आहेस.." मीरा

लग्नासाठीची सगळी तयारी पूर्ण होते.. लग्नही अगदी व्यवस्थित पार पडले.. सगळे जण कौतुक करत होते..

"वा मीरा मॅडम खूप छान.. सगळे भरभरून कौतुक करत आहेत.." अमरचे सर ज्यांच्या मुलीचं लग्न होतं ते म्हणाले..

"अहो सर.. मी काहीच केलेलं नाही.. सगळं क्रेडिट अमरला जाते.." मीरा

"हिने सांगितले नसते तर मी कसा करू शकलो असतो.." अमर

"वा दोघेही एकमेकांना पुरक आहात.. थॅन्क्यू सो मच.." अमरचे सर.

अशाप्रकारे लग्न व्यवस्थित पार पडले.. घरी आल्यावर सगळे मस्त आनंदात होते.. काकांनी एक पार्टी आयोजित करायचे ठरवले.. अमर बरा झाला, मीराचे नविन ऑफिस सगळं सुरळीत चालू आहे.. म्हणून एक मित्र परिवारासाठी सेलेब्रेशन ठेवले होते.. दोन दिवसांनी ठेवायचं ठरल.. तोपर्यंत मीराचा पायही बरा होईल.. म्हणजे तिलाही पार्टी एंजाॅय करता येईल..

पार्टी संध्याकाळी चालू होणार होती.. सगळी तयारी मीराने केली होती.. पार्टीमध्ये सगळा मित्र परिवार आला होता.. पार्टी खूप छान रंगली होती.. खूप रात्र झाली होती.. मनाली जायला निघाली..

"अगं मनाली तू आता जाऊ नकोस ग.. उद्या जा न.. उशीर झालाय ग.." मीरा

"अगं मी कुठे लांब राहते.. पाचच तर मिनिटाचा रस्ता आहे..जाईन मी.." मनाली

"थांब मी निम्या रस्त्यापर्यंत तुला सोडते.." मीरा

"नको ग.. माझी मी जाईन.." मनाली

"तू गप्प बस.. मी येते म्हणाले ना.. अमर आला असता.. पण त्याचे मित्र खूप दिवसांनी आले आहेत.. सो मी येते.. थांब काकूंना सांगते.." मीरा काकूंना सांगून मनालीला सोडायला जाते.. निम्म्या रस्त्यात तिला सोडते.. तेथेच त्या थोडा वेळ बोलत थांबतात.. मग मनाली जाते.. आणि मीरा पण येत असते..

ती थोडं पुढे आल्यावर समोरच प्रमोद दिसतो.. मीरा खूपच घाबरते..

यापुढे काय घडते ते आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..