Mar 01, 2024
प्रेम

कळत नकळत पर्व 2 भाग 10

Read Later
कळत नकळत पर्व 2 भाग 10

आपण मागील भागात पाहिले की मीराचे नविन ऑफिस चालू झाले.. त्यामध्ये पूजा पण केली.. काका आणि काकू पूजेला बसले होते.. त्यावेळी मीरा खूप सुंदर दिसत होती.. अमर फक्त तिच्याकडेच बघत होता.. आता पुढे..

अमरचा प्रोजेक्ट पूर्ण झाला.. ज्यात मीराने त्याला मदत केली होती.. तो प्रोजेक्ट ऑफिसमध्ये त्याने सबमिट केला.. त्यावरील प्रेझेंटेशन खूप सुंदर झाले होते.. बाॅसने अमरचे खूप कौतुक केले.. अमरवर सगळेच खूप खूश होते..

अमर घरी आल्यावर ही गोष्ट आईबाबांना सांगितली..
"मीराने पण खूप मदत केली तुला.. त्यामुळे तर प्रोजेक्ट लवकर झाला तुझा.." काकू

"हो ग आई.. तिला मी थॅन्क्यू म्हणणारच आहे.." अमर

"हो म्हण बाबा.. तोपर्यंत मी गोड काहीतरी बनवते.." काकू

अमर लगेच मीराकडे जातो.. मीरा लॅपटॉपवर काहीतरी काम करत असते..
"आत येऊ का मॅडम.." अमर

"अरे अमर.. ये ना.." मीरा

"काही काम चालू आहे.." अमर

"हो रे.. जरा डिझाईन्स बघत होते.. बोल ना तू कसा काय आलास??" मीरा

"यायचं नाही का??" अमर

"तस नाही रे.. म्हणजे काही काम होत का??" मीरा

"काम काही नाही.. पण एक सांगायचं होतं.." अमर

"बोल ना.." मीरा

"माझ्या प्रोजेक्टवर सगळे खूप खूश आहेत.. प्रोजेक्ट सिलेक्ट पण झाला.. आणि तो सगळ्यांना आवडला पण.. खरच मी आज खूप खूश आहे.." अमर

"अरे वा.. मस्तच की मग.." मीरा

"यामध्ये तुझाही तितकाच हातभार आहे.. म्हणून तुला थॅन्क्यू म्हणायला आलोय.." अमर

"अच्छा.. पण फक्त थॅन्क्यू म्हणून चालणार नाही.. पार्टी पाहिजे.." मीरा

"चल आवर.." अमर

"का??" मीरा

"पार्टी करायचंय ना.." अमर

"मी चेष्टा केली रे.. पुन्हा कधीतरी जाऊया.. आता मला काम आहे.." मीरा

"ते काही नाही.. तुझं काम नंतर कर.. आता पार्टी म्हणजे पार्टी.. चल आवर लवकर.." अमर

"बरं.. पण लवकर यायचं हं.. मला खूप काम आहे.." मीरा

"बरं.. मला सांग कुठे जायचं.." अमर

"तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे.." मीरा नकळत बोलून जाते.. अमर तिच्याकडेच बघत असतो..

"म्हणजे.. तू नेशील तिथे.." मीरा

"बरं आवर.. लगेच जाऊया.. मी आईला सांगतो.. तोवर तू ये.." अमर

"बरं " मीरा

अमर त्याच्या आईला सांगून मीराची वाट बघत असतो.. मीरा मस्त आवरून खाली येते.. तिने पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाइट कलरची लेगीन्स घातलेली होती.. ती खूप सुंदर दिसत होती.. अमरने कार बाहेर काढली.. मीरा त्याला आवडेल न आवडेल म्हणून मागे बसू लागली..

"हॅलो मॅडम.. मी तुमचा ड्रायव्हर नाही.. मित्र आहे.. पुढे बसा.." असे अमर म्हटल्यावर ती पुढे बसली..

"मला वाटलं.. पुढे बसलेल तुला आवडणार नाही.. म्हणून.." मीरा

"म्हणून मला ड्रायव्हर म्हणू देत काय सगळे.." अमर

"तसे काही नाही रे.." मीरा

"तसे नाही म्हणजे.. बरं ते सोड.. आपण वाॅटर पार्कला जाऊया काय??" अमर

"बरं चालेल.." मीरा

"पण चेंज करायला कपडेच घेतले नाहीत.. आणि ओल्या कपड्यामध्ये सर्दी झाली तर.." मीरा

"चल मग.. आपण दुकानातून कपडे घेऊनच जाऊ.." अमर

मग ते दोघे कपड्यांच्या दुकानात जातात.. तिथून दोघांसाठी कपडे घेतात.. आणि वाॅटर पार्ककडे जातात..

वाॅटर पार्कमध्ये गेल्यावर दोघेही पाण्यात उतरतात... त्या दिवशी तेथे खूप गर्दी झालेली असते.. भरपूर लोक वाॅटर पार्कमध्ये आलेले असतात.. अमर पाण्यात उतरल्यावर तो मीराला हात देतो.. मग मीरा पण पाण्यात उतरते.. सुरुवातीला एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे आणि पाण्यावर हात बडवणे एवढेच ते दोघे करत होते.. इकडे तिकडे बघत दबकतच पाण्यात खेळत होते..

नंतर एका ठराविक वेळानंतर दोघेही बेभान होऊन खेळू लागले.. त्यांना कशाचेही भान राहिले नाही.. अगदी लहान मुलासारखे पाण्यात उड्या मारत होते.. नाचत होते.. पाणी उडवत होते.. त्यांना जगाचे भान नव्हते.. ते वेड्यासारखं नाचत होते..

नाचता नाचता मीराचा तोलच गेला आणि आता ती पाण्यात पडणार इतक्यात अमर तिला पकडतो.. ती अमरच्या मीठीत जाते.. आणि तिच्या अंगावर शहारे येतात.. ती लाजून चूर झाली.. मिठीतून बाहेर येण्यासाठी ती प्रयत्न करते पण परत पाय घसरून ती त्याच्या मीठीत जाते.. ते दोघे बराच वेळ तसे असतात..

थोड्या वेळाने अमर तिला बाजूला करतो.. तोच तिच्या पायातून कळ येते आणि ती ओरडते..

"काय झालं??" अमर घाबरून विचारतो..

"माझा पाय खूप दुखत आहे.." मीरा

"कस काय??" अमर

"मुरगाळलाय बहुतेक.." मीरा

"चल बाहेर जाऊ मग.." अमर

दोघेही बाहेर जायला निघतात.. पण मीराला पाण्यातून एक पाऊलही पुढे टाकता यईना.. तिचा पाय पाण्यातून पुढे येईना.. मग अमरने तिला हळूच उचलले आणि तो बाहेर येऊ लागला..

अमरने मीराला उचलले तेव्हा तिने तिचे हात अमरच्या गळ्याभोवती पकडले.. तिला भीती वाटत होती.. पाण्यात याचा पण पाय घसरला तर??

शेवटी कसेबसे दोघेही बाहेर आले.. बाहेर आल्यावर अमर मीराला खाली सोडतो.. मीरा खाली उतरते.. पण तिचा पाय दुखत असतो त्यामुळे ती लगेच अमरचा हात पकडते.. अमर पण तिचा हात पकडतो.. आणि तिच्याकडे बघत असतो.. मीरा पाण्यातून आल्यामुळे तिचे ओले कपडे अंगाला चिकटले होते.. त्यातून तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते..

आजूबाजूला काही चांगली लोक नव्हती म्हणून अमरने मीराला लगेच चेंज करायला पाठवले.. मीरा चेंज करून आली.. मग अमर तिला एक खुर्चीवर बसायला सांगून तो चेंज करायला गेला..

अमर चेंज करून येईपर्यंत एक व्यक्ती मीराची छेड काढत होती.. अमर आला तेव्हा ती व्यक्ती मीराचा हात धरली होती..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

उंच भरारी घेऊ चला..

//