Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 6

Read Later
कळत नकळत भाग 6

आपण मागील लेखात पाहिले की अमर आणि मीरा दोघेजण मिळून लग्नासाठी सगळी तयारी करतात.. सगळी खरेदी करतात.. मग घरी येतात.. आता पुढे...

घरात आल्यावर दोघेही फ्रेश होऊन येतात. काका काकू त्यांची जेवायला वाट बघत असतात. मग सगळे एकत्र मिळून जेवण करतात. मीरा काका काकूंना दिवसभर काय काय झालं ते सांगत गप्पा गोष्टी करत जेवत असते.

जेवण झाल्यावर सगळे थोडा वेळ बसून मग झोपायला जातात. अमर दिवसभरात काय काय झालं ते आठवून हसत असतो. त्याला आज झोप येत नाही. "आज मला असे काय होत आहे. मी फक्त तिचाच विचार करत आहे." असे तो मनात विचार करतो. त्याला अजिबात झोप येत नव्हती. तो गाणी ऐकत बसतो इतक्यात एक गाणं लागतं..

गुणगुणाती है ये हवाए
गुणगुणाता है गगन
गा रहा है सारा ये अलम
जूबी डू पारा रम पण
जूबी डूबी जूबी डूबी पम पा रा
जूबी डूबी परम पम

"आहाहाऽऽ काय मनातल गाणं लागलंय. आज दिवस एकदम मस्त गेलाय. असे दिवस असतील तर जगण्यात मजा आहे. झोपा अमर शेट उद्या बघू कसा दिवस जातोय ते?" अमर स्वतःशीच बोलत असतो. मग तो झोपतो.

सकाळी मीराची परत गडबड सुरू असते. लग्नासाठी एकच दिवस बाकी असतो. "बापरे! अजून खूप काम बाकी आहे. डेकोरेशन, केटरिंगचे काम अजून बरंच काही. कधी होणार? एकच दिवस बाकी आहे." असे मीरा मनात बडबडत असते. इतक्यात अमर येतो.

"हाय गुड माॅर्निंग, झाली का तयारी?" अमर.

"नाही रे अजून बरंच काम शिल्लक आहे. बघ ना अजून जयंत आणि मनाली पण आले नाहीत. आज एका दिवसात बरीच तयारी करायची आहे. कसं होणार? मला काहीच कळेना. टेन्शन आलंय रे." मीरा.

"डोन्ट वरी. मी आहे ना. मग टेन्शन काय घेतेस. काय काम आहे फक्त तुम्ही ऑर्डर द्यायचं मॅडम. आम्ही लगेच हजर असू." अमर.

"बास तुझी नौटंकी. तू सोबत असशील तर मला कसलच टेन्शन येणार नाही." मीरा.

"मी तर आयुष्याभर सोबत रहायला तयार आहे.." अमर हळूच म्हणतो.

"काही म्हणालास काय??" मीरा.

"काय काय काम आहे असं म्हणालो." अमर.

"पहिला नाष्टा करून घे. नाहीतर काकू रागावतील." मीरा.

"हो ग बाई चल लवकर." अमर.

दोघेही नाष्टा करायला जातात. इतक्यात जयंत आणि मनाली येतात.

"अरे आलात तुम्ही. या नाष्टा करता का?" मीरा म्हणते.

"नाही ओ मॅडम आम्ही करून आलोय. तुम्ही करा." असे म्हणून दोघेजण वाट बघत बसतात. नाष्टा करून अमर आणि मीरा बाहेर येतात.

"मॅडम आज काय करायचं? काय काय करायचं ते सांगा?" मनाली म्हणते.

"हो सांगते, मनाली तू आणि जयंत केटरिंगचे बघा. नंतर तुम्ही मला जाॅईन व्हा. मी डेकोरेशनच बघते." मीरा.

"हो चालेल मॅम." मनाली.

"हॅलो, एक मिनिट. मी काय इथे माशा मारायला आलोय काय? मला पण काहीतरी काम सांगा की?" अमर.

"अरे राहू दे ना. तुला उगीच त्रास कशाला?" मीरा.

"अच्छा, म्हणजे आता मला त्रास होतोय काय? बरं मला कोणी मित्रच मानत नाही. मी जातो आता." अमर.

"ए नौटंकी चल आता. आपण डेकोरेशन करूया." मीरा हसत म्हणते.

"चला बाबा कुणाला तरी काळजी आहे म्हणायची मैत्रीची." अमर मीराला चिडवत असतो.

बर चला आता. लागा कामाला नाहीतर इथेच संध्याकाळ व्हायची. असे म्हणत सगळे आपापल्या कामाला जातात. मीरा आणि अमर डेकोरेशन करायला जातात. त्याचं साहित्य मीराने आधीच आणलेलं होत. त्यामुळे जरा त्रास आणि वेळ कमी झाला.

स्टेज डेकोरेशन करताना दोघांनी मिळून एकमताने छान सजावट केलेली असते. संपूर्ण हाॅल सजावटीसाठी त्यांना भरपूर वेळ लागला. दुपारी मनाली आणि जयंत पण यांच्या बरोबर डेकोरेशन करायला येतात.

फुलांची सजावट, फुलांचे हार, पुष्पगुच्छ, पाहुण्यांना देण्यासाठी गुलाब आणि अक्षता या सगळ्याची तयारी करता करता सगळ्यांचीच धांदल उडालेली असते.

स्टेज डेकोरेशन करताना मीरा मधेच म्हणते, "येथे मीरा वेड्स अमर असे लाहायला पाहिजे."

"काय??" अमर अगदी आश्चर्याने विचारतो.

"अरे उद्या ज्यांचे लग्न आहे ते दोघे मीरा आणि अमरच आहेत." मीरा थोडीशी लाजूनच सांगते.

"ओह मला वाटलं...." अमर.

"काय.." मीरा.

"काही नाही." असे म्हणत अमर मनात म्हणतो, "खरोखरच म्हणाली असतीस तरी मी एका पायावर तयार आहे."

अखेर मध्यरात्री त्यांचे डेकोरेशनचे काम पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्याचा आनंद होताच पण ते सगळे खूपच दमलेले होते. मीराच थोडी टेन्शन मध्ये होती. ती एकटीच बसली होती.

"काय झालं." अमर तिच्या जवळ जाऊन म्हणतो.

"काही नाही रे. थोडसं टेन्शन आलं आहे." मीरा.

"कशाच??" अमर.

"अरे पहिलच काम आहे. काही चूक झाली तर.." मीरा.

"काही होणार नाही. तू इतकं मनापासून करत आहेस तर चूक कशी होईल?? तू निवांत रहा आणि घरी जाऊन शांत झोप. उद्याच उद्या बघूया." असे अमर तिला समजावतो.

"ठिक आहे.. चल घरी जाऊया. उद्या लवकर यायला पाहिजे." मीरा.

"येस मॅडम. चला." असे म्हणत दोघेही घरी जातात.

घरी आल्यावर काकू त्यांची वाट बघत बसलेले असतात. "काय आई झोपायचं नाही का?? उगाच जागत बसतीस." अमर आईला म्हणतो.

"अरे तुम्ही येईपर्यंत झोप कशी लागणार? बरं मला सांगा तुम्ही जेवणार आहात की जेवला आहात?" अमरची आई म्हणाली.

"काकू आम्ही बाहेरून जेवण करून आलो आहोत. तुम्ही झोपा आता. उद्या आम्हाला लवकर जायचे आहे." मीरा काकूंना म्हणते.

मग सगळे जणच झोपातला जातात.

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..