Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 5

Read Later
कळत नकळत भाग 5

आपण मागील लेखात पाहिले की, मीरा एका लग्नासाठी मॅनेजमेंट करायचं असतं.. ती तयारी करत असते.. अमर तिला सोडायला जाणार असतो.. आता पुढे..

मीरा आणि अमर दोघेही जाण्यासाठी बाहेर पडतात. अमर कार चालू करतो पण चालूच होत नाही. खूप प्रयत्न करून सुद्धा कार चालू होईना.

"अरे राहू दे. मी रिक्षाने जाते. तू थांब." असे म्हणून मीरा जाऊ लागते.

"मीरा थांब, मी बाईक घेतो. आपण बाईकने जाऊया." अमर.

"अरे असू दे ना. मी जाईन." मीरा.

"का बरं? मी आलेल चालणार नाही का??" अमर.

"अरे तसं नाही रे. उगाच तुला का त्रास?" मीरा.

"व्वा! मित्राला बरोबर घेऊन जायला त्रास." अमर.

"बरं बाबा चल. तू बोलायला ऐकणार आहेस." मीरा.

"तुझाच तर मित्र आहे ना." अमर.

अमर बाईक घेऊन येतो. पण मीराला त्यावर वन साईडला बसताच येईना. आश्रमात असताना ती कोणाच्या गाडीवर अस पाठीमागे बसली नव्हती.

"दोन साईडला बस ना. चालेल मला." अमर तिची खटपट बघून तिला म्हणाला. मग मीरा बाईक वर बसते.

"एक सांगू तुला." अमर.

"हो सांग ना." मीरा.

"माझ्या बाईक वर पहिल्यांदा कुणीतरी मुलगी बसली आहे. कार मध्ये बसले आहेत. पण बाईक वर सहसा मी कुणाला घेऊन जात नाही." अमर.

"हमम..." मीरा.

इतक्यात एक स्पीडब्रेकर येतो आणि अमर पटकन ब्रेक दाबतो. मीरा अवघडून बसलेली असते. ब्रेक दाबल्यावर ती पुढे येते आणि तिचा हात नकळत अमरच्या खांद्यावर जातो.

हे सगळं अचानक घडताना अमरला हवेत असल्याचं फिल होत. मीरा चटकन हात काढून घेते आणि "साॅरी" म्हणते.

"इट्स ओके. हात खांद्यावर ठेवलीस तरी चालेल." अमर.

"हमम..." मीरा.

ते दोघे दिवसभर सगळी खरेदी आणि तयारी करतात. अगदी हाॅलपासून केटरिंग पर्यंत सगळं ते दोघे बघत असतात. तशी मीराला अमरची खूप मदत होते. कारण त्याच्या ओळखीचे लोक, मित्र त्या शहरात भरपूर असतात.

"फायनली सगळी तयारी झाली. आता फक्त डेकोरेशन बाकी आहे." मीरा अमरला सांगते.

"ते पण करूया." अमर.

"अरे नको. उद्या मी जयंत आणि मनालीला सोबत घेऊन करेन." मीरा.

"का? मी आलो तर चालणार नाही." अमर.

"तस नाही रे. उगाच तुला का त्रास? आमचं काम आहे आम्ही करतो." मीरा.

"एका मैत्रिणीला मदत करायला कसला ग त्रास? मला काहीच त्रास नाही. जर तुम्हालाच मी नको असेन तर मग इट्स ओके." अमर.

"बरं ये. तू कोणाला बोलायला ऐकणार आहेस?" मीरा.

"तुझाच तर मित्र आहे. मग ऐकणार कसं?" अमर असे म्हटल्यावर दोघेही हसू लागतात.

"बरं चल आता काहीतरी खाऊया?" अमर.

"हो रे खूप उशीर झाला आहे. कामात माझ्या लक्षात आलं नाही किती वेळ झाला ते. साॅरी रे तुला खूप भूक लागली असेल ना." मीरा.

"अरे इट्स ओके. दोस्ती के लिए कुछ भी." अमर.

"नौटंकी बस आता चल जाऊया." असे म्हणत दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात.

जेवण करून झाल्यावर परत थोडी तयारी करतात. "अरेच्च्या मला काहीतरी घ्यायला हव." मीराच्या अचानक लक्षात येतं की लग्नात घालण्यासाठी तिने स्वतःला काहीच घेतलेलं नाही.

"काय झालं ग.." अमर.

"अरे मी काय घालू लग्नात..." मीरा.

"तू ना एक मस्त साडी घे. साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस.." अमर नकळत बोलून जातो.

मीरा त्याच्याकडेच बघत असते हे जेव्हा त्याला जाणवते तेव्हा तो म्हणतो की "तुझा लॅपटॉप वरच्या वाॅलवर बघितलेल म्हणून म्हणालो."

मीरा साडी घ्यायचं ठरवते. मग ते दोघे साडीच्या दुकानात जातात. मीरा दुकानदारला साडी दाखवायला सांगते. दुकानदार एक एक करत साडी दाखवत असतो. मीराला एकही साडी पसंत करता येईना.

एक गुलाबी रंगाची साडी हातात घेऊन अमर "ही साडी तुला खूप छान दिसेल." असे म्हणाला. मीरा अमरकडे बघतच थांबली. इतक्यात तेथील कामगार म्हणाला "अहो मॅडम तुमचे मिस्टर सांगतात ती साडी खूप छान आहे. एकच पीस आहे तो." तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघितले. मीराला खूपच अवघडल्यासारख वाटलं.

सगळी कामे झाल्यावर दोघेही घरी आले. मग मीरा अमरला म्हणाली "थॅन्क्यू सो मच, आज तू नसतास तर सगळी कामे झाली नसती." मीरा.

"तुला आभार मानायला आवडतय काय?" अमर.

"का रे?" मीरा.

"प्रत्येक वेळी आभार मानत असतेस. मैत्रीत नो साॅरी नो थॅन्क्यू." अमर.

"ओके बाबा, आता नो साॅरी नो थॅन्क्यू झालं." मीरा.

"दॅट्स द गुड गर्ल." असे अमर म्हणतो आणि दोघेही हसत घरात जातात.

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..