Jan 26, 2022
प्रेम

कळत नकळत भाग 3

Read Later
कळत नकळत भाग 3

आपण मागील भागात पाहिले की मीराचा धक्का लागून अमरचा लॅपटॉप खाली पडतो आणि तो बंद पडतो. तो मीराला खूप ओरडतो.. अमरला संध्याकाळी प्रेझेंटेशन द्यायचे असते म्हणून तो सकाळीच लॅपटॉप दुरूस्त करायला घेऊन जातो.. आता पुढे..

दुपार झाली तरी अमरचा लॅपटॉप दुरूस्त झालेला नसतो. जसजसा वेळ जाईल तसतसा त्याचा राग वाढत जातो. मग त्याची आई रूममध्ये येते. त्याच्या जवळ बसून "दुरूस्त झालं नाही का बाळ?" म्हणते.

"हमम.." अमर.

"चिडू नकोस होईल." अमरची आई.

"कधी?? मला संध्याकाळी पर्यंत प्रोजेक्ट द्यायचा आहे. कसं करणार आहे मी सगळं?" अमर.

"होईल रे काहीतरी." अमरची आई.

"काही होत नाही. हे सगळं त्या...." असे तो बोलत असतो इतक्यात मीरा तेथे येते.

"हे घे माझा लॅपटॉप. तुझा प्रोजेक्ट याच्यावर कर. तुझा लॅपटाॅप दुरूस्त होईपर्यंत वापरलास तरी चालेल. मला लगेच लागणार नाही आणि हो साॅरी बरं का. लॅपटॉप साठी आणि कालच्या गोष्टीसाठी." असे म्हणून मीरा लॅपटॉप तिथेच ठेवून जाते.

"फार लाघवी आहे पोरं. इतक्या गुणी मुलीला आईवडील नसावेत म्हणजे किती दुर्दैव त्या मुलीचं. बिचारी." अमरची आई.

"काय?? आईवडील नाहीत म्हणजे??" अमर.

"अनाथ आहे ती. आईवडील लहानपणीच अॅक्सिडेंन्ट मध्ये गेले. नातेवाईक पण कोणी नाहीत. अनाथ आश्रम मध्ये लहानाची मोठी झाली. आता शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडत आहे. इतरांवर अवलंबून रहायला तिला आवडत नाही. मायाळू आहे बघ ना आल्यापासून खूप जीव लावलाय तिने आम्हाला, म्हणून आम्ही तिला मुलीप्रमाणे वागवतो. स्वभावाने खूप चांगली आहे." अमरची आई.

"हे तू मला आधी का सांगितले नाहीस?" अमर.

"तू काही ऐकण्याच्या मनस्थितीत होतास का? नुसता राग राग करतोस. तिचं नाव घेतलं तरी तुला सहन होत नव्हत." अमरची आई.

"मला काय माहित? मला वाटलं ती तुमचा गैरफायदा घेत आहे." अमर.

"आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. माणसं ओळखता येतात आम्हाला. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आम्ही." अमरची आई.

"हो ग माझी आई. बरं चल आता मी प्रोजेक्टला चालू करतो. असच बडबडत बसलो तर संध्याकाळ होईल आणि प्रोजेक्ट तसाच राहून जाईल." अमर.

"बरं बाबा कर. मी जाते." असे म्हणून अमरची आई जाते.

आई गेल्यावर अमर काम करण्यासाठी लॅपटॉप चालू करतो. लॅपटॉप चालू केल्या बरोबर वाॅलवर मीराचा सुंदर फोटो येतो. फोटोत तिने मस्त लाल रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. नाकामध्ये लहानशी नथ घातली होती. ती खूप सुंदर दिसत होती. अमर फोटोकडे थोडा वेळ बघतच बसला. त्याची नजरच हटेना.

"यार काय मस्त दिसते ही. उगाचच भांडलो हिच्याशी. तेवढीच मैत्री तर झाली असती. काय माझ पण बॅडलक. मी हिला व्यवस्थित पाहिलं सुध्दा नाही. पण हिचं सुध्दा चुकलंच की. हिने समजूतीने घेतलं असतं तर? जाऊ दे. आता काय उपयोग? अमर भाऊ अस नुसता फोटोकडे बघत बसून काही होणार नाही. चला प्रोजेक्ट करायचा आहे. नाहीतर राहून जाईल फोटोकडे पाहता पाहता." अमर मनातच बोलत होता.

मग अमर प्रोजेक्ट करायला घेतो आणि त्याच प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होते. अमर खूप खूश होतो कारण त्याच प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झालेलं असतं. "चला आता मेल पाठवला की आजच काम पूर्ण झालं. मग मी निवांत बसू शकतो." अमर स्वतःच बडबडतो.

मेल पाठवून झाल्यावर तो खाली येतो. त्यावेळी संध्याकाळचे सात वाजलेले असतात. त्यावेळी हाॅलमध्ये मीरा आणि अमरची आई बोलत बसलेले असतात.

"आई जरा चहा करतेस काय ग" अमर आईला म्हणतो.

मग त्याची आई चहा करण्यासाठी आत जाते. आता हाॅलमध्ये फक्त अमर आणि मीरा दोघेच असतात. दोघांचीही अवस्था अवघडल्यासारखी असते. दोघेही शांतच बसलेले असतात. अमर उगाचच पेपर वाचत असल्याचं अॅक्टिंग करत असतो. मीरा आपली शांत मोबाईलमध्ये डोकावून बसते.

दोघेही शांत बसलेले असतात. "प्रोजेक्ट झाला का?" मीरा अमरला विचारते.

"हो आताच झाला. थॅक्यू तू लॅपटॉप दिलास म्हणून पूर्ण झाला. नाही तर झाला नसता." अमर.

"माझ्यामुळेच तर बंद पडला. साॅरी ते चुकून झालं." मीरा.

"इट्स ओके. बाय द वे मला सांग तू का आली होतीस?" अमर.

"तुला साॅरी म्हणायला आले होते. पण झालं तिसरच." मीरा.

"हमम..." अमर.

इतक्यात काकू चहा घेऊन येतात.

"चला दोघांच्यात बोलणं झालं तर. काय बोलत होतात." काकू.

"काही नाही ग. ते लॅपटॉप बद्दल बोलत होतो." अमर.

"घ्या म्हणजे अजून तेच आहे का तुमचं? असो पण त्या निमित्ताने तुमच्यात बोलणं तर झालं. नाही तर मधल्या मधे हाल." असे म्हणत अमरची आई हसते.

या पुढील भाग पुढील लेखात पाहू...

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..